Appointment and promotion of Junior Engineers | आता महापालिका कनिष्ठ अभियंत्यांच्या नेमणुकीच्या व पदोन्नतीच्या पद्धतीत बदल

Categories
Breaking News PMC पुणे

आता महापालिका कनिष्ठ अभियंत्यांच्या नेमणुकीच्या व पदोन्नतीच्या पद्धतीत बदल

| नामनिर्देशन ८५% तर पदोन्नती १५%

|महापालिका प्रशासनाचा विधी समिती समोर प्रस्ताव

पुणे | पुणे महापालिका कनिष्ठ अभियंत्यांच्या नेमणुकीच्या व पदोन्नतीच्या पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/वाहतुक नियोजन/विद्युत/यांत्रिक) यांबाबत नामनिर्देशन- ८५% व पदोन्नती- १५% अशी दुरुस्ती महापालिका आयुक्त यांनी सुचविली आहे. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून विधी समिती समोर ठेवण्यात आला आहे. यामुळे नवीन उमेदवारांना महापालिकेत काम करण्याची संधी मिळणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता (वाहतूक नियोजन)/(स्थापत्य) /
(विद्युत)/(यांत्रिकी), वर्ग-१, उप अभियंता (वाहतूक नियोजन) / (स्थापत्य)/(विद्युत)/(यांत्रिकी), वर्ग-२ व कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन)/(स्थापत्य)/(विद्युत)/(यांत्रिकी), वर्ग-३ या पदाच्या नेमणुकीची पद्धत व टक्केवारी मध्ये बदल करण्याबाबत दि.०३/११/२०२२ रोजीच्या मा. विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीमध्ये कार्यकारी अभियंता (वाहतूक नियोजन)/(स्थापत्य)/(विद्युत)/(यांत्रिकी), वर्ग-१, उप अभियंता ( वाहतूक नियोजन) / (स्थापत्य) / (विद्युत) / (यांत्रिकी), वर्ग-२ व कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन)/(स्थापत्य)/(विद्युत)/(यांत्रिकी), वर्ग-३ या पदाच्या नेमणुकीची पद्धत व टक्केवारी नामनिर्देशन-२५% व पदोन्नती- ७५% रद्द करून पदोन्नती – १००% व कनिष्ठ अभियंता
(स्थापत्य/विद्युत्) या पदाच्या नेमणूकीची पद्धत व टक्केवारी नामनिर्देशन- ७५% व पदोन्नती-२५% रद्द करून पदोन्नती- १००% करण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शहर अभियंता यांनी कार्यकारी अभियंता (स्थापत्य) -२५% सरळसेवेने, उप अभियंता (स्थापत्य), पदोन्नती- १००% व कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), नामनिर्देशन- १००% करण्याबाबत कळविले आहे. त्यानुषंगाने निवेदन सादर केले होते. त्यानुसार कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/वाहतुक नियोजन/विद्युत/यांत्रिक) यांबाबत नामनिर्देशन- ८५% व पदोन्नती- १५% अशी दुरुस्ती महापालिका आयुक्त यांनी सुचविली आहे. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून विधी समिती समोर ठेवण्यात आला आहे. यामुळे नवीन उमेदवारांना महापालिकेत काम करण्याची संधी मिळणार आहे. विधी समितीत हा प्रस्ताव मान्य झाल्यानतर तो मुख्य सभेसमोर ठवला जाईल.