Tag: Bank Account
Post Office Saving Account | किमान शिल्लक फक्त 500 रुपये आणि अनेक सुविधा | जाणून घ्या पोस्ट ऑफिस खात्याचे फायदे
कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत
यासाठी शुल्क भरावे लागते
IPPB प्रीमियम खाते
IPPB प्रीमियम बचत खात्याची वैशिष्ट्ये आणि फायदे
बँक खात्यासाठी नॉमिनी का आवश्यक आहे ? तुमच्या एका चुकीमुळे संपूर्ण कुटुंब अडचणीत येऊ शकते
नेट बँकिंग व्यतिरिक्त, बँकेच्या शाखेला भेट देऊन देखील नामनिर्देशित केले जाऊ शकते.
SBI Digital saving account | बँकांमध्ये वारंवार जाण्यापासून सुटका मिळेल | घरी बसून एसबीआय खाते उघडा | जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
खाते फक्त OTP ने उघडले जाईल
डिजिटल बचत खाते कोण उघडू शकतो
प्रक्रिया काय आहे?
विमा पॉलिसीचे स्वरूप बदलणार
हे तपशील द्यावे लागतील
हे नियम बदलतील
योजनांच्या लाभासाठी दिव्यांग व्यक्तींनी बँक खाते आधारकार्डशी संलग्न करावे
पुणे| शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व दिव्यांग व मागासवर्गीय विद्यार्थी तसेच व्यक्तींनी त्यांचे राष्ट्रीयकृत बँक खाते आधारकार्डाशी संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शासनाच्या वित्त विभागाच्या ८ जून २०२२ च्या शासन निर्णयानुसार शासनाच्या योजनांचे लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतर (डिबीटी) पद्धतीने वर्ग करण्यात येणार आहेत. २०२२-२३ वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व दिव्यांग तसेच मागासवर्गीय विद्यार्थी तसेच व्यक्तींनी शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अनुदान, शिष्यवृत्ती, दिव्यांग कल्याणाच्या योजना, मागासवर्गीय कल्याणाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपले राष्ट्रीयकृत बँकेतील खाते आधारकार्डाशी संलग्न करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरंगटीवार यांनी केले आहे.
आता बँक खात्यात ठेवावे लागणार किमान १० हजार
: अन्यथा ग्राहकास ६०० रुपये दंड
नवी दिल्ली : देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) आपल्या सर्वच सेवांचे शुल्क वाढविले आहे. पीएनबीच्या शहरातील शाखेत खाते असल्यास आता खात्यावर किमान १० हजार रुपये शिल्लक ठेवावे लागतील. पीएनबीच्या शुल्कवाढीचा इतर बँकांकडून कित्ता गिरवला जाण्याची शक्यता असल्यामुळे देशातील बँकिंग सेवा महागण्याची शक्यता आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या संकेतस्थळावर सेवा शुल्काच्या वाढीची माहिती देण्यात आली आहे. नवीन शुल्क १५ जानेवारीपासून लागू होईल. खात्यात किमान शिल्लक मर्यादा आधी ५ हजार रुपये होती. आता किमान १० हजार रुपये खात्यावर ठेवावे लागतील. खात्यात १० हजारांपेक्षा कमी रक्कम राहिल्यास ग्राहकास ६०० रुपये दंड लागेल. दंडाची ही रक्कम आधी ३०० रुपये होती.
पीएनबीच्या ग्रामीण भागातील शाखांसाठी किमान शिल्लक मर्यादा १ हजार रुपये कायम ठेवण्यात आली असली तरी एवढी शिल्लक नसल्यास आता ४०० रुपये दंड लागणार आहे. आधी दंडाची रक्कम २०० रुपये होती. पीएनबीने आपल्या लॉकर शुल्कात ५०० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. छोट्या लॉकरचे शुल्क ग्रामीण भागासाठी १,००० रुपयांवरून १,२५० रुपये, तर शहरी भागासाठी १,५०० रुपयांवरून २,००० रुपये करण्यात आले आहे. सर्वांत मोठ्या आकाराच्या लॉकरचे शुल्क शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी १०,००० रुपये असे कायम ठेवण्यात आले आहे.
खात्यात पैसे नसल्यामुळे हप्ता चुकला अथवा डेबिट अकाऊंटमध्ये पैसे नसतील, तर लागणारा दंड १०० रुपयांवरून २५० रुपये करण्यात आला आहे. डिमांड ड्राफ्ट रद्द करण्यासाठीचे शुल्क १०० रुपयांवरून १५० रुपये करण्यात आले आहे. चेक परत आल्यास १ लाखांपर्यंतच्या रकमेवर लागणारे शुल्क १०० रुपयांवरून १५० रुपये, तर एका लाखावरील रकमेवरील शुल्क २०० रुपयांवरून २५० रुपये करण्यात आले आहे.
ग्राहकांना बसणार असा फटका…
- १० हजारांपेक्षा कमी रक्कम राहिल्यास ग्राहकास ६०० रुपये दंड
- छोट्या लॉकरचे शुल्क १,५०० रुपयांवरून २,००० खात्यात पैसे नसल्यामुळे हप्ता चुकल्यास दंड
- २५० रुपये फक्त तीन वेळा पैसे जमा करता येणार, त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी ५० रुपये शुल्क