Swarget Katraj Metro | Pune News | स्वारगेट – कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार | मंत्री उदय सामंत

Categories
Breaking News Political social पुणे

Swarget Katraj Metro | Pune News | स्वारगेट – कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार| मंत्री उदय सामंत

 

Swarget Katraj Metro | Pune News |नागपूर| पुणे शहरातील स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो (Swarget Katraj Underground Metro) प्रस्तावित आहे. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जाईल, असे मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी विधानसभेत सांगितले. (Swarget Katraj Metro | Pune News)

सदस्य भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir) यांनी पुणे मेट्रो टप्पा १ आणि २ मध्ये स्थानकाची वाढ करण्यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेल्यानंतर राज्य शासन त्याचा पाठपुरावा करून मंजूरी घेईल. खडकवासला ते खराडी (Khadakwasla Kharadi Metro)  हा २५.६५ किमीच्या मेट्रो मार्गाचा डीपीआर राज्य शासनाकडे सादर झालेला आहे. तो देखील मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र शासनाकडे पाठवला जाईल. या मेट्रोचे शेवटचे स्टेशन खडकवासला धरणापर्यंत असावे अशी मागणी केलेली आहे. त्याची देखील संयुक्त पाहणी झालेली आहे. तो प्रस्ताव फिजिबिलिटी रिपोर्टसह शासनाकडे सादर केलेला असून राज्य शासन त्यावर निर्णय घेईल, असे मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

Khadakwasla – Kharadi Metro | खडकवासला – खराडी मेट्रो | साडेआठ हजार कोटींचा खर्च अपेक्षित  | महामेट्रोकडून महापालिकेस प्रारूप आराखडा सादर

Categories
Breaking News Commerce PMC social पुणे

खडकवासला – खराडी मेट्रो | साडेआठ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

| महामेट्रोकडून महापालिकेस प्रारूप आराखडा सादर

पुणे : महामेट्रोकडून खडकवासला ते खराडी या 25 किलोमीटर अंतराचा मेट्रोचा प्रारूप प्रकल्प आराखडा महापालिकेस सादर केला आहे. या मार्गासाठी सुमारे 8 हजार 565 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असणार असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली.

खडकवासला ते स्वारगेट- हडपसर आणि खराडी असा हा स्वतंत्र मार्ग असणार असून या मार्गावर 22 स्थानके असणार आहेत. या पूर्वी हा मार्ग मेट्रो आणि पीएमआरडीएकडून संयुक्त करण्यात येणार होता. मात्र, पुम्टाच्या बैठकीत हा स्वतंत्र मार्ग करण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार, महामेट्रोने हा डीपीआर तयार केला असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह महामेट्रो आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, हा प्रारूप आराखडा असून महापालिका प्रशासनाकडून त्यात, बदल सुचविल्यानंतर अंतिम आराखडा करून राज्यशासन तसेच केंद्रशासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले.

हा मार्ग खडकवासला-सिंहगड रस्ता- स्वारगेट- शंकरशेठ रस्ता- राम मनोहर लोहिया उद्यान- मुंढवा चौक – खराडी असा असणार आहे. हा संपूर्ण मार्ग इलिव्हेटेड असणार आहे. हा मार्ग मुख्य सिंहगड रस्त्याने सारसबागेच्या समोरून गणेश कलाक्रीडा मंचाच्या समोरून जेधे चौकातून शंकरशेठ रस्त्याने पुढे जाणार आहे. या मार्गावर एकूण 22 स्थानके असणार असून स्थानके तसेच मेट्रो मार्गासाठी जास्तीत जास्त शासकीय जागेचे भूसंपादन केले जाणार आहे. या शिवाय, ज्या ठिकाणी रस्त्यांची रूंदी कमी आहे. त्या ठिकाणी रस्त्याच्या वाहतूकीला अडथळा होणार नाही अशा पध्दतीने खांबाची उभारणी केली जाणार असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले.

खडकवासला, दालवेवाडी, नांदेडसिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे चौक, राजारामपूल, पु.ल देशपांडे उद्यान, दांडेकरपूल, स्वारगेट, सेव्हन लव्हज चौक, पुणे छावणी, रेसकोर्स, फातिमानगर, रामटेकडी, हडपसर, मगरपट्टा साऊथ, मगरपट्टा मेन, मगरपट्टा नॉर्थ, हडपसर रेल्वे स्टेशन, साईनाथ नगर आणि खराडी चौक ही स्थानके असणार आहेत. तर स्वारगेट येथे नेहरू स्टेडीयमच्या समोर स्थानक असणार असून या ठिकाणी येऊन प्रवाशांना स्वारगेट भूमिगत मेट्रोने पिंपरी-चिंचवड तसेच कात्रजकडे जाता येणार आहे, तसेच स्वारगेट येथील मल्टीमॉडेल हबचे पार्किंगच या कामासाठी वापरता येणार आहे.