Measles | Pune | गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम राबवावा | आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना, अतिरिक्त लसीकरणही करणार

Categories
Breaking News Political social आरोग्य पुणे महाराष्ट्र

गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम राबवावा

| आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना, अतिरिक्त लसीकरणही करणार

गोवर (Measles) संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम (Vaccination) महानगरपालिका तसेच नगर पालिका क्षेत्रात राबविण्याच्या सूचना राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत (Health minister Tanaji Sawant) यांनी आज दिल्या. त्याचबरोबर दहा कलमी कार्यक्रम राबविण्‍यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

पुणे येथे टास्क फोर्सची आज पहिली बैठक झाली. या बैठकीपूर्वी डॉ. सावंत यांनी टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके आणि आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, राज्य लसीकरण अधिकारी डाॅ. सचिन देसाई यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

बैठकीत डॉ. सुभाष साळुंके यांनी सांगितलं की गोवरचा उद्रेक थांबविण्यासाठी सर्वप्रथम ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यात यावे. त्यासाठी विशिष्ट कालमर्यादा ठरविण्यात येण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. यासाठी लागणारी यंत्रणा, लसीच्या मात्रा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या शिवाय उद्रेक झालेल्या भागात अतिरिक्त डोस देखील नऊ महिने ते पाच वर्षांच्या बालकांना देण्यात यावे असे सांगितले.

या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य तसेच आय एम एचे सदस्य उपस्थित होते. अडीच तास चाललेल्या या बैठकीत दहा कलमी कार्यक्रमा बाबत चर्चा होऊन यात नियंत्रणासाठी पुढील दहा कलमी कृतीयोजना निश्चित करण्यात आल्या आहेत.

तज्ञ डॉक्टर्स आणि सदस्यांनी लसीकरण तसेच विलगीकरण यावर भर देत कुपोषित बालकांकडे आधिक लक्ष देण्या संदर्भात मत व्यक्त केले. काही खाजगी डॉक्टर्स यांनी जनजागृतीवर भर देऊन लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविताना ती ठराविक काळा पुरती घ्यावी. याबाबत व्यापक जनजागृती करावी अशाही काही सूचना यावेळी मांडण्यात आल्या.

या बैठकीतील आलेल्या सुचना आणि तज्ञांनी व्यक्त केलेल्या मतावर राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्याशी पुन्हा सविस्तर चर्चा करून अतिरिक्त डोस, मनुष्य बळ आणी जनजागृती तसेच धर्मगुरू, लोकप्रतिनिधीचा सहभाग यावर बैठक घेऊन पुढिल उपाययोजना करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष डॉ सुभाष साळुंके यांनी सांगितले.

बैठकीत आयएमए, बालरोग तज्ज्ञ, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी यांच्यासह आरोग्‍य विभागातील वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.

दहा कलमी कार्यक्रम
o ताप–पुरळ रुग्णाचे गतिमान सर्वेक्षण
o राज्यातील गोवर हॉट स्पॉटचा शोध – उद्रेक स्थळे, लसीकरण कमी असणारे भाग, लोकसंख्येची दाटीवाटी असणारे , वंचित समाज समूह राहत असणारे आणि कुपोषण अधिक असणारे भाग या क्षेत्रावर विशेष भर दिला जाणार आहे.
o विभागीय स्तरावर शीघ्र प्रतिसाद पथके आणि स्थानिक सूक्ष्म कृतीआराखडा
o ९ महिने ५ वर्षेवयोगटातील बालकांसाठी विशेष लसीकरण अभियान आणि उद्रेक प्रतिसाद लसीकरण
o कुपोषित बालकांकडे विशेष लक्ष – प्रत्येक कुपोषित मुलाला प्राधान्याने उपचारात्मक पोषण , जीवनसत्व अ आणि गोवर लसीकरण
o आंतर विभागीय समन्वय – नगरविकास, महिला आणि
बालविकास, अल्पसंखयांक कल्याण विभाग यांचेशी समन्वय.
o राज्यातील सर्वांसाठी गोवर उपचार मार्गदर्शन सूचना
o गोवर प्रयोगशाळा जाळे आधिक विस्तारीकरण
o गोवर रुग्ण आणी मृत्यूचे सखोल साथरोगशास्त्रीय विशेष सर्वेक्षण आणि त्यानुसार कृतीयोजना, दीर्घकालीन उपाययोजनेसाठी आवश्यक संशोधन आणि सर्वांगीण शहरी आरोग्य यंत्रणेसाठी योजना
o सामाजिक प्रबोधन, लोकसहभाग आणी आरोग्य शिक्षण

Health Minister Dr Tanaji Sawant | पुण्यातील वाढत्या गोवर रुग्णाबाबत आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता | शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा डॉ. तानाजी सावंत यांनी घेतला आढावा

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे महाराष्ट्र

पुण्यातील वाढत्या गोवर रुग्णाबाबत आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

|शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा डॉ. तानाजी सावंत यांनी घेतला आढावा

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. तानाजी सावंत,  (Health Minister Dr Tanaji Sawant) यांनी रविवारी पुणे महानगरपालिका (PMC Pune) येथे भेट दिली. यावेळी त्यांनी शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा (Review of health system) घेतला. यात प्रामुख्याने सद्यस्थितीत नव्याने उद्भवलेल्या साथी बाबत सखोल आढावा घेण्यात आला. त्यांनी पुणे शहरामध्ये वाढत असलेल्या गोवर रुग्णांबद्दल (Measles patients)  चिंता व्यक्त केली व गोवर आजारावर त्वरीत आटोक्यात आणण्यासाठी च्या उपाय योजना सुचविल्या. (Pune Municipal corporation)

मंत्र्यांनी शहरातील दाट वस्ती मध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून गोवर संशयित रुग्ण शोधून त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविणे, विशेष करून खाजगी रुग्णालयांना जास्तीत जास्त भेटी देवून रुग्ण शोध मोहीम तीव्र करणे, नवीन समावेश झालेल्या गावांमध्ये विशेष लक्ष देणे, इत्यादी मा. डॉ. तानाजी सावंत यांनी गोवर सोबतच इतर आजार उदा. जापानी मेंदू ज्वर, झीका विषाणू (Zika virus) इत्यादीचा देखील सखोल आढावा घेतला. या सोबतच संपूर्ण आरोग्य विभागाला तत्परतेने कामे करण्याच्या सूचना दिल्या.  तसेच राज्य शासना कडून संपूर्ण तांत्रिक मदतीची ग्वाही दिली.

डॉ. सावंत यांनी यावेळी संपूर्ण जनतेला ताप व पुरळ असलेल्या प्रत्येक रुग्णाने शासकीय दवाखान्यामध्ये येवून उपचार घेण्याबाबत आव्हान केले. या भेटीच्या वेळी आमदार  भीमराव आण्णा तापकीर, विक्रम कुमार, महापालिका आयुक्त पुणे, रविंद्र बिनवडे, अति. महापलिका आयुक्त पुणे,  वृषालीताई चौधरी व आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (PMC commissioner Vikram Kumar)