Pune Metro | मेट्रो स्टेशन बाहेर शेअर रिक्षा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार | मेट्रो प्रशासनाची मान्यता

Categories
Breaking News Political पुणे

Pune Metro | मेट्रो स्टेशन बाहेर शेअर रिक्षा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार | मेट्रो प्रशासनाची मान्यता

| १ मे पर्यंत कामगार पुतळ्याची ही डागडुजी

 

Pune Metro – (The Karbhari News Service) –  प्रवाशांच्या सोयीसाठी चार मुख्य मेट्रो स्टेशनवर शेअर रिक्षा सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाईल, अशी माहिती माजी आमदार आणि ‘वेकअप पुणेकर’ अभियानाचे संयोजक मोहन जोशी आणि रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी आज (शुक्रवारी) दिली.

वेकअप पुणेकर’ च्या ट्रॅफिक परिषदेत मेट्रो स्टेशन बाहेर शेअर रिक्षा सेवा यावर चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने महा मेट्रो आणि रिक्षा पंचायत यांची एकत्रित बैठक घेतली, असे मोहन जोशी आणि नितीन पवार यांनी स्पष्ट केले.

महा मेट्रोचे प्रशासन, रिक्षा प़चायतीचे प्रतिनिधी यांची बैठक मोहन जोशी आणि नितीन पवार यांच्या पुढाकाराने घेण्यात आली. बैठकीला महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि हेमंत सोनावणे, तसेच मेट्रो मार्गावरील पौड रस्ता, शिवाजीनगर, राजा बहादूर मोतीलाल मिल (बंडगार्डन) रस्ता परिसरातील रिक्षा पंचायतीचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. मुंबईमध्ये लोकल ट्रेन स्थानकाबाहेर शेअर रिक्षांची रांग दिसते. तशी रांग मेट्रो स्टेशन बाहेर दिसत नाही. शेअर रिक्षा वापरासाठी पुणेकरांची मानसिकता तयार करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. रिक्षांची रांग ज्या मेट्रो स्टेशनच्या बाहेर लागू शकेल, अशा मार्गांचा आढावा घेणे, तिथे जागेची उपलब्धता करून देणे आणि प्रायोगिक तत्त्वावर शेअर रिक्षा सुरू करणे असा निर्णय बैठकीत झाला. प्रारंभी दोन ते चार मेट्रो स्टेशन बाहेर शेअर रिक्षा सुरू करायची आणि नंतर ते प्रमाण वाढवत न्यायचे. याचे सर्वेक्षण पुढील आठवड्यात सुरू होईल, अशी माहिती मोहन जोशी आणि नितीन पवार यांनी दिली.

महा मेट्रोच्या मुख्य कार्यालयाशेजारील कामगार पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याची तयारी महा मेट्रो प्रशासनाने बैठकीत दाखविली.

बैठकीतील चर्चेत प्रशांत सुरसे, सुरेश कांबळे, बाळासाहेब पोकळे, रवींद्र पोरेड्डी, भरत उत्तेकर, सुरेश कानडे, दत्ता साळुंखे आदींनी सहभाग घेतला.

Pune Traffic | मुंबईच्या धर्तीवर पुणे वाहतूक शाखेसाठी सह-पोलीस आयुक्त नेमावेत

Categories
Breaking News Political social पुणे

Pune Traffic | मुंबईच्या धर्तीवर पुणे वाहतूक शाखेसाठी सह-पोलीस आयुक्त नेमावेत

|माजी आमदार मोहन जोशी यांची मागणी

 

Pune Traffic – (The Karbhari News Service) – शहरातील वाहतूक समस्या सोडविण्याचा उपाय म्हणून पोलीस खात्याच्या वाहतूक शाखेसाठी स्वतंत्र सह पोलीस आयुक्त नेमावेत, अशी मागणी माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress) यांनी उपमुख्य मंत्री आणि पुणे ज़िल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली आहे.

शहरातील वाहतूक प्रश्नाविषयी उपमुख्य मंत्री आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेवून मोहन जोशी यांनी निवेदन देऊन चर्चा केली. ‘वेकअप पुणेकर’ अभियानामार्फत स्वयंसेवी संस्था आणि वाहतूक तज्ज्ञ यांच्या मदतीने वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती जोशी यांनी दिली.

जागतिक संस्था ‘टॉम टॉम’ ने केलेल्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वात जास्त वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये पुण्याचा सातवा क्रमांक आहे, असे जोशी यांनी निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. पुण्याचे क्षेत्रफळ ५६० किलोमीटरवर पोहोचले आहे. वाहनांची वाढती संख्या, रहदारी व्यवस्थापनातील कमतरता यामुळे वाहतूक कोंडी होत राहाते, असेही निवेदनात म्हटले आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, स्वयंनियंत्रित सिग्नल्स, उड्डाणपूल, अतिक्रमण काढणे इत्यादी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहेच. वाहतूक व्यवस्थेचे नियंत्रण करणारी पोलीस यंत्रणाही सक्षम असणे आवश्यक आहे. यासाठी मुंबईच्या धर्तीवर पुण्यात वाहतूक शाखेसाठी स्वतंत्र सह पोलीस आयुक्त नेमले जावेत, अशी मागणी मोहन जोशी यांनी निवेदनाद्वारे उपमुख्य मंत्री आणि पालकमंत्र्यांकडे केली आणि त्यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.

Pune Airport | Pune Metro | Pune Congress | पुणे मेट्रोची सेवा तात्काळ विमानतळापर्यंत करा | काँग्रेस आक्रमक

Categories
Breaking News Political social पुणे

Pune Airport | Pune Metro | Pune Congress | पुणे मेट्रोची सेवा तात्काळ विमानतळापर्यंत  करा | काँग्रेस आक्रमक

 

Pune Airport | Pune Metro | Pune Congress | पुणे : आठ वर्षाहून अधिक काळ लांबलेला पुणे मेट्रोचा (Pune Metro) पहिला टप्पा पूर्ण करून त्यावर लवकरात लवकर वाहतूक चालू करा. पुणेकरांच्या संयमाचा अंत होऊ देऊ नका, असा इशारा माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress) आणि आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी मेट्रो प्रशासन आणि भाजप सरकारला आज सोमवारी दिला. (Pune Airport | Pune Metro | Pune Congress)

पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण करा, स्वारगेट ते कात्रज मार्ग (Swarhet katraj Underground Metro) काम लवकर सुरू करा, लोहगांव विमानतळापर्यंत (Pune Lohgaon Airport) मेट्रो सेवा द्या, अशा मेट्रो संबंधीच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार मोहन जोशी आणि रविंद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेट्रो संचालक यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोच्या कामाचे भूमीपूजन सुमारे आठ वर्षापूर्वी केले. त्यावेळी मोठा गाजावाजा करण्यात आला. मेट्रो लवकरच धावू लागेल, असे आश्वासन मोदी यांनी दिले. आठ वर्ष उलटली तरी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झालेला नाही. भाजप नेत्यांच्या सुप्त संघर्षात मेटुोचे काम लांबत गेले, त्यामुळे लाखो रूपयांनी खर्च वाढत गेला.ज्या पुणेकरांनी भाजपला महापालिकेत सत्ता दिली, आमदार, खासदार निवडून दिले, पण पुणेकरांना मेट्रो सेवेचा पुरेपूर लाभ भाजप देवू शकले नाही. याकडे भाजपचे त्यांच्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले, असे मोहन जोशी यांनी आंदोलकांसमोर बोलताना सांगितले.

या आंदोलनात दत्ता बहिरट, सुनिल मलके, मंजुर शेख,शेखर कपोते, प्रवीण करपे, शाबिर खान, आयुब पठाण, प्रथमेश आबनावे, विनोद रणपिसे, रोहन सुरवसे पाटील, किशोर मारणे, सुरेश कांबळे, रामविलास माहेश्वरी, बाबा नायडू, महेंद्र चव्हाण, राजाभाऊ कदम, साहील राऊत, अविनाश अडसूळ, सचिन बहिरट, बाबा सय्यद, अनिकेत सोनावणे आदी कार्यकर्ते सामील झाले होते.