PMC Solid Waste Management Department | सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे पुणेकरांना अजून पडणार महागात! | पुणे महापालिका अडीच ते तीन पटीने दंड वाढवणार

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Solid Waste Management Department | सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे पुणेकरांना अजून पडणार महागात!

| पुणे महापालिका अडीच ते तीन पटीने दंड वाढवणार

PMC Solid Waste Management Department | सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्ता किंवा मार्गावर अस्वच्छता करणे (Unhygienic in Public places), कचरा टाकणे यासाठी पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून (PMC Pune Solid Waste Management Department) दंड आकारला जातो. मागील चार महिन्यात महापालिकेने 1 कोटींचा दंड वसूल केला आहे. दरम्यान आगामी काळात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, अजून महागात पडणार आहे. कारण यासाठी आकारण्यात येत असलेला 180 रुपयाचा दंड वाढवून तो 500 रुपये करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या मंजुरीची आवश्यकता असते. महापालिका सरकार मान्यता देईल या भरवश्यावर नवीन दंडाची अंमलबजावणी करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation)
प्रशासनाच्या प्रस्तावा नुसार घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ चे तरतुदींचे अनुपालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना दंड करण्याचे अधिकार नगरपरिषद / नगर पंचायत यांना शासन निर्णय नुसार देण्यात आले आहेत.  त्यानुसार  पुणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन कार्यालयांतर्गत सार्वजनिक ठिकाणी / रस्ता / मार्गावर अस्वच्छता करणे याकरिता १८०/- दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. पुणे शहराचा विस्तार वाढत चाललेला असून वाढती लोकसंख्या त्यातून निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या दैनंदिन कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, त्याची अंमलबजावणी करणे तसेच घनकचरा हाताळणी आणि व्यवस्थापन नियमावली २०१६ नुसार प्रभावी करणेसाठी शहरातील नागरिकांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. शहरातील जुन्या हद्दीत व नवीन समाविष्ट गावे येथील नागरिक कचरा उघड्यावर टाकत असतात. त्यामुळे क्रोनिक स्पॉट व अनारोग्यकारक परिस्थिती निर्माण होते व सदर ठिकाणी पडलेला कचरा उचलून घेण्यासाठी अतिरिक्त मनुष्य बळ वाहतूक खर्च व मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया याकरिता महानगरपालिकेला आर्थिक तोशिष सहन करावी लागत आहे. (PMC Pune News)
प्रस्तावात पुढे म्हटले आहे कि, सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यावर  अस्वच्छता करणे याकरिता सध्या असणारी दंडाची तरतूद अत्यल्प असल्याने नागरिकांकडून घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करण्यामध्ये अनास्था दिसून येत आहे. त्यामुळे सदर दंडात्मक रक्कमेमध्ये वाढ करून १८०/- ऐवजी रक्कम ५००/- इतकी दंड आकारणी केल्यास प्रतिबंध सिद्धांतानुसार (theory of Deterrence) नुसार नागरिकांमध्ये अपेक्षित बदल घडून उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होणार आहे. यामुळे अपेक्षित घनकचरा व्यवस्थापन नियमांची अंमलबजावणी होऊन शहर स्वच्छ व सुंदर राखण्यास मदत होणार आहे. यामध्ये नागरिकांकडून निधी वसूल करणे असे उद्दिष्ट नसून घनकचरा व्यवस्थापनामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवणे व शहर विद्रुपीकरणास प्रतिबंध करणे असे ध्येय आहे. दंड रक्कम FI31A101 स्वच्छता संकल्प निधी या अर्थाशिर्षाकावर जमा होत असून या रक्कमेचा विनियोग सार्वजनिक स्वच्छतेच्या कामाकरिता केला जातो.
त्यानुसार हा प्रस्ताव स्थायी समिती आणि मुख्य सभेसमोर ठेवला जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. मात्र सरकार मान्यता देईल या भरवश्यावर नवीन दंडाची अंमलबजावणी करण्याचा मानस महापालिका प्रशासनाचा आहे.

Katraj Dairy Pune | Play Ground Reservation | कात्रज येथील मैदानाचे आरक्षण उठवू नये या मागणीसाठी महाविकास आघाडीचे वतीने पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Katraj Dairy Pune | Play Ground Reservation | कात्रज येथील मैदानाचे आरक्षण उठवू नये या मागणीसाठी महाविकास आघाडीचे वतीने पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन

Katraj Dairy Pune |  Play Ground Reservation | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation)  विकास आराखड्यात मैदानासाठी दर्शविण्यात ३.५९१ हेक्टरचा भूखंड पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला (Katraj Dairy) देण्याचा निर्णय झाला आहे. ही जागा मुलांना खेळासाठी राहू द्यावी अशी मागणी करत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi Pune) वतीने पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) समोर आंदोलन करण्यात आले. कात्रज येथील क्रीडांगणाचे आरक्षण उठवून दूध डेअरी व प्रक्रियेसाठी आरक्षण टाकणार असल्याच्या निषेधार्थ पुण्याचे पालकमंत्री व पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पुणे महानगरपालिका समोर आंदोलन घेण्यात आले. (Katraj Dairy Pune | Play Ground Reservation)

यावेळी वेगवेगळे खेळ रस्त्यावर खेळण्यात आले. कात्रज येथील डीपीमधील मैदानाचे आरक्षण उठवू नये याबाबत पुणे महानगरपालिका आयुक्त  विक्रमकुमार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, दूध डेअरी व प्रक्रिया उद्योग ग्रामीण भागाशी संबंधित आहे. महापालिकेच्या डीपीमधे याबाबत आरक्षण नाही . शहरांमध्ये खेळासाठी मैदानिची कमतरता भासत असताना ही जागा कात्रज डेअरीच्या व्यावसायिक वापरासाठी काढून घेणे योग्य नाही. पुणे शहरांमध्ये मुलांना खेळांसाठी पुरेसे क्रीडांगण नाही असे असताना जी जागा क्रीडांगणासाठी आरक्षित आहे आणि जर त्या जागेवरच आरक्षण काढून कात्रज डेअरीला ती जागा पुणे महानगरपालिका देणार असेल तर ते पुणेकरांच्या हिताचे नाही.  तसेच कात्रज, धनकवडी या भागात दाट लोकवस्ती आहे येथे मुलांना खेळांसाठी हक्काचे मैदान आवश्यक आहे. त्यामुळे महाविकास आघाडी पुणेकरांच्या हितासाठी आज रस्त्यावर उतरून आपला विरोध दर्शवित आहे. (Pune Sahkari Dudh Utpadak Sangh Pune)

यावेळी पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना गटाचे (उद्धव ठाकरे गट) गजानन थरकुडे संजयजी मोरे, माजी आमदार दिप्ती चवधरी, ऍड.अभय छाजेड, संगिता तिवारी, लता राजगुरू, गोपाळ तिवारी,शिवा मंत्री, अजित दरेकर रजनी त्रिभुवन, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, अक्षय माने,राजू याने संतोष पाटोळे, कृष्णा सोनकांबळे,एंन.एस.यू.आय.अध्क्ष अभिजित गोरे, प्रियांका रणपिसे,द.स.पोळेकर, सचिन आडेकर, सतिश पवार यशराज पारखी, बाळासाहेब मारणे लतेंद्र भिंगारे , मुन्नाभाई शेख , यासिन‌ शेख, अभिजित महामुनी, आशुतोष शिंदे आकाश माने,ओम भंवर उषा राजगुरू,रेखा गेहलोत, नलीनी दोरगे,छाया जाधव, सुंदर ओव्हाळ ,मोती उडते, सीमा महाडिक , शारदा वीर, अश्विनी गवारे, ज्योती परदेशी, दिलीप लोळगे,सेल्वराज अंथोनी,सागर खडके,नागेश कवडे दत्ता जधव आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Pune Airport | Pune Metro | Pune Congress | पुणे मेट्रोची सेवा तात्काळ विमानतळापर्यंत करा | काँग्रेस आक्रमक

Categories
Breaking News Political social पुणे

Pune Airport | Pune Metro | Pune Congress | पुणे मेट्रोची सेवा तात्काळ विमानतळापर्यंत  करा | काँग्रेस आक्रमक

 

Pune Airport | Pune Metro | Pune Congress | पुणे : आठ वर्षाहून अधिक काळ लांबलेला पुणे मेट्रोचा (Pune Metro) पहिला टप्पा पूर्ण करून त्यावर लवकरात लवकर वाहतूक चालू करा. पुणेकरांच्या संयमाचा अंत होऊ देऊ नका, असा इशारा माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress) आणि आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी मेट्रो प्रशासन आणि भाजप सरकारला आज सोमवारी दिला. (Pune Airport | Pune Metro | Pune Congress)

पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण करा, स्वारगेट ते कात्रज मार्ग (Swarhet katraj Underground Metro) काम लवकर सुरू करा, लोहगांव विमानतळापर्यंत (Pune Lohgaon Airport) मेट्रो सेवा द्या, अशा मेट्रो संबंधीच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार मोहन जोशी आणि रविंद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेट्रो संचालक यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोच्या कामाचे भूमीपूजन सुमारे आठ वर्षापूर्वी केले. त्यावेळी मोठा गाजावाजा करण्यात आला. मेट्रो लवकरच धावू लागेल, असे आश्वासन मोदी यांनी दिले. आठ वर्ष उलटली तरी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झालेला नाही. भाजप नेत्यांच्या सुप्त संघर्षात मेटुोचे काम लांबत गेले, त्यामुळे लाखो रूपयांनी खर्च वाढत गेला.ज्या पुणेकरांनी भाजपला महापालिकेत सत्ता दिली, आमदार, खासदार निवडून दिले, पण पुणेकरांना मेट्रो सेवेचा पुरेपूर लाभ भाजप देवू शकले नाही. याकडे भाजपचे त्यांच्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले, असे मोहन जोशी यांनी आंदोलकांसमोर बोलताना सांगितले.

या आंदोलनात दत्ता बहिरट, सुनिल मलके, मंजुर शेख,शेखर कपोते, प्रवीण करपे, शाबिर खान, आयुब पठाण, प्रथमेश आबनावे, विनोद रणपिसे, रोहन सुरवसे पाटील, किशोर मारणे, सुरेश कांबळे, रामविलास माहेश्वरी, बाबा नायडू, महेंद्र चव्हाण, राजाभाऊ कदम, साहील राऊत, अविनाश अडसूळ, सचिन बहिरट, बाबा सय्यद, अनिकेत सोनावणे आदी कार्यकर्ते सामील झाले होते.