Heritage Walk | आता ‘हेरिटेज वॉक’चे तिकीट देखील ऑनलाईन!  | पुणे महापालिकेने उपलब्ध करून दिली सुविधा 

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

आता ‘हेरिटेज वॉक’चे तिकीट देखील ऑनलाईन!

| पुणे महापालिकेने उपलब्ध करून दिली सुविधा

पुणे | पुणे महापालिका नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देते. महापालिकेकडून खूप साऱ्या सुविधा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जेणेकरून नागरिकांना रांगेत उभे राहण्याची वेळ येऊ नये. महापालिकेकडून उद्यानाच्या तिकीट ची सुविधा देखील ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली आहे. त्याच धर्तीवर आता महापालिकेकडून हेरिटेज वॉक चे तिकीट देखील ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार आहे. याबाबतचे पोर्टल तयार करण्यात आले असून लवकरच नागरिकांना याचा लाभ देण्यास सुरुवात होईल. अशी माहिती महापालिकेच्या संगणक आणि भवन विभागाकडून देण्यात आली. (Heritage walk)
पुणे शहराला समृद्ध असा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे देश विदेशातील लोक पुण्याकडे आकर्षित होतात. साहजिकच पुणे शहर हे पर्यटन क्षेत्र म्हणून उदयास येत आहे. पुणे शहरात शनिवारवाडा, लाल महल, विश्रामबागवाडा सारख्या महत्वाच्या ऐतिहासिक वास्तू आहेत. याची पर्यटकांना इत्यंभूत माहिती मिळावी, याकरता पुणे महापालिका प्रशासनाकडून हेरिटेज वॉक ही संकल्पना सुरु केली. त्याला देश आणि विदेशातील पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. महापालिकेकडून 9-10 स्थळासाठी हेरिटेज वॉक ची संकल्पना सुरु केली. यामध्ये शनिवारवाडा, विश्रामबागवाडा, कसबा गणपती,  लाल महाल, नाना वाडा,  तुळशीबाग राममंदिर, महात्मा फुले  मंडई, श्रीमंत दगडूशेठ गणपती, बेलबाग मंदिर, पुणे नगर वाचन मंदिर,  भाऊसाहेब रंगारी गणपती, तांबडी जोगेश्वरी मंदिर या स्थळांचा समावेश आहे. (PMC pune)
महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार या स्थळांना भेट देण्यास आलेल्या पर्यटकांना संबंधित वास्तूचे दर्शन घडवून त्याची सविस्तर माहिती दिली जाते. यासाठी नागरिकांना तिकीट दिले जाते. त्याचे दर देखील महापालिका मुख्य सभेने ठरवून दिले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी 100 रुपये, प्रौढ नागरिकांना 300 रुपये तर विदेशी नागरिकांना 500 रुपये तिकीट आकारण्यात येते. दर शनिवारी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते. (Pune municipal corporation)
—–
सद्यस्थितीत हेरिटेज वॉक चे तिकीट ऑफलाईन दिले जाते. मात्र आगामी काळात हे तिकीट ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. ऑनलाईन साठी देखील तिकीट दर ऑफलाईन सारखाच राहणार आहे. ऑनलाईन तिकिटाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या वेळेचे schedule ठरवून दिले जाईल. यासाठीचे पोर्टल तयार करण्यात आले असून लवकरच त्यावर अंमल केला जाईल.
राहुल जगताप, सांख्यिकी व संगणक विभाग प्रमुख 
—-

Pune Metro | पुणे मेट्रोचे ई-तिकीट आता व्हॉट्सअँप वर उपलब्ध

Categories
Breaking News social पुणे लाइफस्टाइल

पुणे मेट्रोचे ई-तिकीट आता व्हॉट्सअँप वर उपलब्ध

पुणे मेट्रोचे काम शहरामध्ये प्रगतीपथावर आहे. मेट्रो लवकरच नवीन मार्ग प्रवासासाठी सुरु करणार असल्याने मेट्रोने प्रवाश्यांच्या सोयीसाठी तिकीट व्हॉट्सअँप वर उपलब्ध करून दिले आहे. प्रत्येक नागरिक व्हॉट्सअँपचा मोठ्याप्रमाणावर उपयोग करत असतो. तरुणाई या ऑनलाईन साधनांचा वापर सहज करत असते. त्यासाठी पुणे मेट्रोने प्रवाश्यांना तिकिटाच्या रांगेत उभे राहायला लागू नये आणि त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी व्हॉट्सअँप वर तिकीट काढण्याची सोय केली आहे.

व्हॉट्सअँपवर ई-तिकीट काढण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे मेट्रोने प्रत्येक स्थानकात उपलब्ध करून दिलेल्या किऑस्क मशीनच्या साहाय्याने प्रवासी स्वतः हे तिकीट काढू शकतो. तर दुसरी पद्धत म्हणजे स्थानकात जाऊन टॉम (TOM) ऑपरेटरशी संपर्क साधून आपल्याला हे ई तिकीट मिळवता येईल.
पहिली पद्धत – किऑस्क मशीनद्वारे
१. स्थानकात गेल्यावर आपल्याला हवा तो मार्ग व मेट्रोची वेळ, तिकिटांची संख्या किऑस्क मशीनवर निवडा
२. त्यानंतर तिकिटाचे पैसे देताना आपल्याला कागदी तिकीट वा ई-तिकीट असा पर्याय विचारेल, त्यातील आपल्याला हवा तो पर्याय निवडा
३. ई-तिकीट असा पर्याय निवडल्यावर आलेला स्कॅनर (QR कोड) आपल्या मोबाईलद्वारे स्कॅन करा
५. स्कॅन केल्यावर आपल्या व्हॉट्सअँप वर क्रमांकावर OTP येईल
६. हा OTP किऑस्क मशीनमध्ये टाईप करा
७. OTP मान्य झाल्यावर आपल्याला मोबाईल वर एक लिंक मिळेल
८. या लिंक वर क्लिक केल्यावर आपल्याला आपले ई-तिकीट दिसेल
दुसरी पद्धत – TOM काउंटर/टॉम (TOM) ऑपरेटरशी संपर्क साधून
१. स्थानकात गेल्यावर आपल्याला हवा तो मार्ग व मेट्रोची वेळ निवडा
२. त्यानंतर तिकिटाचे पैसे देताना टॉम (TOM) ऑपरेटर आपल्याला कागदी तिकीट वा ई-तिकीट असा पर्याय विचारेल
३. आपण टॉम (TOM) ऑपरेटरला ई-तिकीट असा पर्याय सांगितल्यावर तो आपणास काउंटरवर लावण्यात आलेला
स्कॅनर (QR कोड) देईल
४. TOM काउंटरवर लावण्यात आलेला स्कॅनर (QR कोड) आपल्या मोबाईलद्वारे स्कॅन करा.
५. स्कॅन केल्यावर आपल्या व्हॉट्सअँप वर क्रमांकावर OTP येईल
६. हा OTP टॉम (TOM) ऑपरेटरला सांगा
७. OTP मान्य झाल्यावर आपल्याला मोबाईल वर एक लिंक मिळेल
८. या लिंक वर क्लिक केल्यावर आपल्याला आपले ई-तिकीट दिसेल

याव्यतिरिक्त पुणे मेट्रोने ९४२०१०१९९० हा व्हॉट्सअँप सुरु केला आहे. दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची आपल्या मोबाईलमध्ये हा नं सेव्ह करून ठेवावा. प्रवासी पुणे मेट्रोच्या या फोन नंबर वर 'हाय' मेसेज पाठवून चॅटबॉटशी संवाद साधण्यासाठी किंवा कोणत्याही मेट्रो स्टेशनवर उपलब्ध QR कोड स्कॅन करून व्हॉट्सअॅप चॅट सुरू करू शकतात.
सध्या, व्हॉट्सअॅपद्वारे QR कोड ई-तिकीट TOM काउंटर आणि डिजिटल किओस्क मशीनद्वारे वितरित केले जाते. लवकरच प्रवासी व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे तिकिटे बुक करू शकतील आणि व्हॉट्सअॅप वापरकर्ते त्यांच्या तिकिटांसाठी पेमेंट करू शकतील. व्हॉट्सअॅपवर त्यांचा प्रवास तपशील निवडल्यानंतर एकात्मिक पेमेंट पार्टनरद्वारे रिचार्ज करू शकतील.

ही सुविधा मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध असेल. हि सुविधा प्रवाश्यांसाठी लागू करताना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हंटले आहे की, पुणे मेट्रोच्या नवीन व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुविधेमुळे प्रवाशांना सुलभ आणि त्रासमुक्त प्रवास उपलब्ध होणार आहे. ही नवीन
तिकीट प्रणाली नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी खूप मदत करेल आणि हे एक पर्यावरणास अनुकूल पेपरलेस तिकीट समाधान देखील आहे. पुणे मेट्रो पुण्यातील नागरिकांना आणि अभ्यागतांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास देण्यावर विश्वास ठेवते. पुणे मेट्रोने लोकांना व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा वापरण्याचे आवाहन केले आहे.

Mobile App For Pune Metro : Online Ticket : हे मोबाईल ऍप घ्या आणि पुणे मेट्रोचे तिकीट घरबसल्या ऑनलाईन काढा 

Categories
Breaking News social पुणे

हे मोबाईल ऍप घ्या आणि पुणे मेट्रोचे तिकीट घरबसल्या ऑनलाईन काढा

: महामेट्रोने उपलब्ध करून दिली सुविधा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ( PM Narendra Modi) हस्ते पुण्यातील गरवारे ते वनाज या पुणे मेट्रोचे (Pune Metro) उदघाटन झाल्यावर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो नागरिकांसाठी सुरु करण्यात आली. त्यानंतर गेल्या तीन – चार दिवसात ५० हजारांपेक्षा जास्त पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला आहे. नागरिकांच्या उदंड प्रतिसादात मेट्रो सुरु असल्याचे दिसू लागले आहे. पण मेट्रोने जाण्यासाठी स्टेशनच्या तिकीट काउंटरवर नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. परंतु त्यावर उपाय म्हणून महामेट्रो प्रशासनाने घरबसल्या तिकीट मिळवण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

या प्रकारे करा तिकीटाची बुकिंग 

मोबाईलमध्ये असणाऱ्या प्ले स्टोर मधून (pune metro app) डाउनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर त्या अँपमध्ये स्वतःची माहिती भरणे बंधनकारक आहे. त्यातच तुम्हाला एक पासवर्ड तयार करावा लागणार आहे. म्हणजे नेहमी अँप उघडताना तो पासवर्ड टाकावा लागेल. अँपमध्ये सध्या सुरु असलेल्या स्टेशनची नावेही देण्यात आली आहेत. नागरिकांना सिंगल आणि रिटर्नचे तिकीटही काढता येणार आहे. मेट्रोच्या तिकिटाप्रमाणेच  प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी मोबाईलमध्ये डाउनलोड केलेल्या तिकिटाचा  कोड स्कॅन करावा लागणार आहे.

मेट्रो संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा

मेट्रो स्थानकावर पोहोचल्यापासून ते दुसऱ्या स्थानकातून बाहेर पडण्यापर्यंत संपूर्ण यंत्रणा ही स्वयंचलित करण्यात आली आहे. तिकीट काउंटरवर ऑनलाइन पैसे दिल्यानंतर तिकीट मिळते. त्यानंतर स्वयंचलित यंत्राद्वारे तिकिटावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर प्लॅटफाॅर्मवर जाण्यास परवानगी दिली जाते. तीन डब्यांच्या मेट्रोला प्रत्येकी चार स्वयंचलित दरवाजे आहेत. आत प्रवेश केल्यानंतर संपूर्ण वातावरण वातानुकूलित होते. त्याचबरोबर चार्जिंग व्यवस्थाही केली होती.  प्रत्येक डब्यात एलइडी स्क्रीन असून आपण कोणत्या स्थानकापर्यंत प्रवास करू शकतो याची माहिती दिली आहे. स्वयंचलित दरवाजाच्यावरच एक स्क्रीन आहे त्यावर मेट्रोचा मार्ग, तसेच पुढे कोणते स्थानक आहे याची माहिती दर्शवली जात आहे.