PMC Medical College Dean | मेडिकल कॉलेजचे डीनना सेवेतून कमी करण्याचा निर्णय! | महापालिका आयुक्तांचा निर्णय

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

PMC Medical College Dean | मेडिकल कॉलेजचे डीनना सेवेतून कमी करण्याचा निर्णय! | महापालिका आयुक्तांचा निर्णय

PMC Medical College Dean | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) नव्याने स्थापन झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात (PMC Medical College) प्रवेश घेण्यासाठी सोळा लाख रुपये लाचेची मागणी करून त्यातील दहा लाख रुपये स्वीकारताना डीनला (Dean) रंगेहात पकडण्यात आले होते. याबाबत चौकशी करून आशिष बनगीरवार यांना महापालिका सेवेतून कमी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतला आहे.

 पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात (PMC Atal Bihari Vajpeyi Medical College) आशिष श्रीनाथ बनगिनवार, हे डीन (वर्ग-1) (Dean Ashish Bangirwar) म्हणून काम पाहत होते.

या प्रकरणी  एका 49 वर्षीय डॉक्टरने तक्रार दिली होती, यातील तक्रारदार यांचा मुलगा NEET परिक्षा – 2023 मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एम.बी.बी.एस.च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय, पुणे येथे इन्स्टिट्यूशनल कोटामधून निवड झाली होती. यासाठी 22 लाख 50 हजार रुपये इतके प्रवेश शुल्क होते. मात्र महाविद्यालयाचे डीन त्यांनी 16 लाख रुपये लाचेच्या स्वरूपात मागितले होते.दरम्यान लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात याची तक्रार केली होती. दरम्यान लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता आशिष बनगिनवार यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.

महापालिका प्रशासनाकडून देखील बनगीरवार यांची सविस्तर चौकशी करण्यात आली. त्यानुसार ते दोषी आढळल्याने महापालिका आयुक्तांनी त्यांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका प्रशासनाकडून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. कॉलेज च्या HOD कडे आता डीन चा तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. लवकरच नवीन भरती प्रक्रिया केली जाणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

——

News Title | PMC Medical College Dean | The decision to reduce the dean of the medical college from service! | Decision of Municipal Commissioner

Shivsena UBT | PMC Medical College | महापालिका मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळाची चौकशी करून बरखास्त करा | शिवसेना (UBT) ची मागणी

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

Shivsena UBT | PMC Medical College | महापालिका मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळाची चौकशी करून बरखास्त करा | शिवसेना (UBT) ची मागणी

Shivsena UBT | PMC Medical College |  पुणे मनपा च्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा लाचखोर डी एन ला निलंबित करा आणि व्यवस्थापन मंडळाची चौकशी करून बरखास्त करण्याची मागणी शिवसेनेने (UBT) महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Shivsena UBT | PMC Medical College)
        शिवसेनेच्या निवेदनानुसार  गरीब गरजू विद्यार्थ्यांना मेडिकल क्षेत्रात कमी खर्चात शिक्षण घेता यावे. यासाठी खासगी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबवावी. याहेतूने पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय पुणे चा .डी एन. आशिष बनगीनवार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दहा लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले असून त्याचे तत्परतेने निलंबन करावे तसेच त्याची तिथे अधिकारी पदावर नियुक्ती झाल्यापासूनची चौकशी करावी. आणि यातील सत्य कर भरणाऱ्या सामान्य पुणेकर नागरिकांना कळविण्यात यावे. तसेच व्यवस्थापन मंडळाची देखील चौकशी करणे आवश्यक आहे. मागील तीन वर्षापासून व्यवस्थापन कोट्यामध्ये झालेल्या प्रवेशांची आर्थिक गुन्हे शाखे मार्फत चौकशीचे आदेश पारित करावेत. तसेच हा भ्रष्टाचार फक्त डिन पर्यंत मर्यादित नाही तर याची पाळेमुळे व्यवस्थापन मंडळापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे व्यवस्थापन मंडळ त्वरित बरखास्त करावे. सर्व अधिकार त्रयस्थ व्यक्तीकडे म्हणजे निवृत्त न्याधिशांकडे द्यावेत. सदर महाविद्यालयात प्रशासक नेमावा व्यवस्थापन कोटा असलेले निकष मागील तीन वर्षात योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली आहे की नाही. याची देखील खात्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे. (PMC Medical College Dean)
               पुढील प्रवेशांमध्ये व्यवस्थापन कोटा बंद करून मेरिट लिस्ट प्रमाणेच सर्व ऍडमिशन करण्याचे आदेश आयुक्तांनी जारी करावेत. तसेच सदर वैद्यकीय महाविद्यालयात 25 ऍडमिशन हे व्यवस्थापन कोट्यातून देण्यात येतात हा कोटा कसला आहे ? म्हणजे व्यवस्थापन कोटा हा भ्रष्टाचाराचा मार्ग आहे का ? हा प्रश्न आम्हास आहे आणि सदर अधिकारी हा फक्त मोहरा असून यात अजून कोणाकोणाचा सहभाग आहे याची चौकशी करण्यात यावी. सदर विषय शिवसेनेने गांभीर्याने घेतला असून या विषयाला योग्य न्याय मिळण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देणार आहोत .  अशी मागणी शिवसेना पुणे शहराच्या वतीने नवेदनात करण्यात आली. (Pune Municipal Corporation News) 
यावेळी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहरसंघटिका पल्लवीताई जावळे, निकिता मारटकर, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, उपशहरप्रमुख आनंद गोयल, विश्वास चव्हाण, अनंत घरत, संजय सकपाळ, नागेश खडके, किशोर रजपूत, अरविंद दाभोळकर, नितीन दलभंजन, मुकुंद चव्हाण, भरत गोगावले, रूपेश पवार, अजय परदेशी, संजय वाल्हेकर, योगेश पवार, चंदन साळुंके, पंढरीनाथ खोपडे, राजू पवार, झुबेर तांबोळी, अविनाश सरोदे, अजिंक्य पांगरे उपस्थित होते. (Shivsena UBT Pune)
—–
News Title | Shivsena UBT | PMC Medical College | Investigate and dismiss the Board of Management of the Municipal Medical College Shiv Sena (UBT) demand

PMC Medical College News | मेडिकल कॉलेज प्रवेश घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा | सजग नागरिक मंचाची राज्य सरकारकडे मागणी

Categories
Breaking News Education PMC social पुणे

PMC Medical College News | मेडिकल कॉलेज प्रवेश घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा

| सजग नागरिक मंचाची राज्य सरकारकडे मागणी

PMC Medical College News | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) अटलबिहारी वाजपेयी महाविद्यालयातील (Atal Bihari Vajpeyi Medical College) वैद्यकीय प्रवेश घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी सजग नागरिक मंचाकडून (Sajag Nagrik Manch) राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे. (PMC Medical College News)
याबाबत मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी सांगितले कि, पुणे महापालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी रुग्णालयातील डीन ना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हाथ पकडले. या महाविद्यालयातील प्रथम वर्ष प्रवेशातील संस्था स्तरावर दिल्या जाणाऱ्या १५ जागांवरील प्रवेशादरम्यान पालकांकडून फी व्यतिरिक्त लाखो रुपये लाच घेतल्याप्रकरणी ही कारवाई झाली. या महाविद्यालयावर एक ट्रस्टी बोर्ड आहे ज्यावर पुणे महापालिका आयुक्त, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त तसेच आरोग्य प्रमुख आणि डीन असे चौघेजण आहेत. डीन ना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हाथ पकडले आहे.  त्यामुळे या प्रकारात उर्वरीत तीन सदस्य संगनमताने सामील आहेत का याची तसेच या वर्षीच्या आणि गेल्या वर्षीच्या संस्था स्तरावरील १५ जागांवरील प्रवेश प्रक्रियेची उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे. तसेच या भ्रष्टाचाराचं मूळ असलेल्या संस्था स्तरीय १५ जागांचा प्रवेश बंद करुन शासकीय मेडीकल महाविद्यालयातील प्रवेशा प्रमाणे १००% प्रवेश पूर्णपणे मेरीट वर आणि सेंट्रलाईज्ड पद्धतीने झाले पाहिजेत अशी आमची आग्रहाची मागणी आहे. असे वेलणकर यांनी सांगितले. (Pune Municipal Corporation News)
——–
News Title | PMC Medical College News | High level probe into medical college admission scam| Sajag Nagarik Mancha’s demand to the state government

PMC Medical College Dean | पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजच्या डीन ला 10 लाखाची लाच घेताना पकडले

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Medical College Dean | पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजच्या डीन ला 10 लाखाची लाच घेताना पकडले

PMC Medical College Dean | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) नव्याने स्थापन झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात (PMC Medical College) प्रवेश घेण्यासाठी सोळा लाख रुपये लाचेची मागणी करून त्यातील दहा लाख रुपये स्वीकारताना डीनला (Dean) रंगेहात पकडण्यात आले. आज सायंकाळी पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात (PMC Atal Bihari Vajpeyi Medical College) ही कारवाई करण्यात आली. आशिष श्रीनाथ बनगिनवार, (वय 54 वर्ष, डीन (वर्ग-1) (Dean Ashish Bangirwar) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 49 वर्षीय डॉक्टरने तक्रार दिली आहे. (PMC Medical College Dean)

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचा मुलगा NEET परिक्षा – 2023 मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एम.बी.बी.एस.च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय, पुणे येथे इन्स्टिट्यूशनल कोटामधून निवड झाली होती. यासाठी 22 लाख 50 हजार रुपये इतके प्रवेश शुल्क होते. मात्र महाविद्यालयाचे डीन त्यांनी 16 लाख रुपये लाचेच्या स्वरूपात मागितले होते.

दरम्यान लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात याची तक्रार केली होती. दरम्यान लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता आशिष बनगिनवार यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून प्रतिबंधक विभागाचे अधिकारी बनगिनवार यांच्या मागावर होते. दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात दहा लाख रुपयांची लाख स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी आता समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


News Title | PMC Medical College Dean | Dean of Pune Municipal Corporation’s Medical College was caught accepting a bribe of 10 lakhs