Old Wada In Pune | पुणे शहरातील सी 1 प्रवर्गात मोडणारे वाडे लवकरच उतरवले जाणार!

Categories
Breaking News PMC social पुणे

Old Wada In Pune | पुणे शहरातील सी 1 प्रवर्गात मोडणारे वाडे लवकरच उतरवले जाणार!

 | पुणे महापालिका प्रशासनाची (Pune civic body) तयारी सुरु

Old Wada In Pune | (Author: Ganesh Mule) | पुणे शहरातील (Pune city) सी 1 प्रवर्गात (C 1 Category) मोडणारे म्हणजेच अति धोकादायक वाडे (Dangerous Old Wada) लवकरच उतरवले जाणार आहेत. महापालिका प्रशासनाने (Pune Municipal Corporation) त्याची तयारी सुरु केली आहे. संबंधित वाडा मालकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. टेंडर प्रक्रिया राबवून पावसाळा सुरु होण्याअगोदर वाडे उतरवण्यात येतील. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून (PMC Pune) देण्यात आली. (Old Wada in Pune)

पुणे शहरातील धोकादायक वाडे/इमारती यांचे सर्वेक्षण करणेचे काम  (Pune city old wada survey) टेक ब्युरो इंजि. प्रा.लि. (Tech beuro engineer private limited) यांचेकडून बांधकाम विभागाकडून चालू आहे. पुणे शहरात अंदाजे अडीच ते तीन हजार वाडे (old Wada) असून या सर्वेक्षणा अंतर्गत आज अखेर सुमारे १२०० वाडे / इमारतींचे सर्वेक्षण (Old wada survey) करण्यात आले आहे. त्यापैकी ३० वाडे अतिधोकादायक (सी१) या प्रवर्गात असल्याचा अहवाल टेकब्युरो इंजि.प्रा.लि. यांचेकडून प्राप्त झाला आहे. धोकादायक वाड्यांना नोटीसा (notices) बजावण्यात आल्या आहे. तसेच उर्वरीत सर्वेक्षण ३० मे २०२३ पर्यत पूर्ण करण्यात येणार असून सुमारे ३० ते ४० वाडे अतिधोकादायक (सी१) या प्रवर्गात येण्याची शक्यता आहे. (Pune old Wada news)

 पुणे शहरातील जुने वाडे हे बहुतांशी लाकडी बांधकामातील वैशिष्ट्यपूर्ण संरचनेमध्ये असून पावसाळ्यामध्ये अतिधोकादायक वाडे / इमारती पडण्याची शक्यता जास्त असते.  शासन परिपत्रकाचे अनुषंगाने तसेच दुर्घटना होऊ नये. याकरिता हे धोकादायक वाडे /इमारती पावसाळ्यापुर्वी निष्कासित करणे आवश्यक आहे.  त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यांनतर यावर कार्यवाही केली जाणार आहे. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Pune Municipal Corporation News)

चार टप्यात वर्गीकरण कसे ?

 सी-१ म्हणजे राहण्यास योग्य नाही, तात्काळ निष्कासित करावी लागणारी अतिधोकादायक इमारत. सी-२ ए म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे. सी-२ बी म्हणजे इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करणे. आणि सी-३ म्हणजे इमारतींची किरकोळ दुरुस्ती करणे असे चार टप्यात वर्गीकरण केले जात आहे. तशी सूचना पालिका प्रशासनाकडून इमारतींना देण्यात येते. (PMC Pune Marathi News)
—–
News Title | Old Wada In Pune | old Wada falling under C1 category in Pune city will be demolished soon   |  Preparation of Pune Municipal Administration started

Pune Mahanagarpalika Shetkari Athvade Bajar | पुणे महापालिकेच्या 7 ओटा मार्केटमध्ये सुरु केले जाणार आठवडे बाजार

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Mahanagarpalika Shetkari Athvade Bajar | पुणे महापालिकेच्या 7 ओटा मार्केटमध्ये सुरु केले जाणार आठवडे बाजार

| शेतकरी समूह गटांना आठवड्यातील एक दिवस उपलब्ध केले जाणार मार्केट

Pune Mahanagarpalika Shetkari Athvade Bajar  | शहरातील रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण टाळण्यासाठी आणि लोकांना चांगला भाजीपाला मिळावा यासाठी पुणे महापालिका  (PMC Pune) शहराच्या वेगवेगळ्या भागात सात ठिकाणी शेतकरी आठवडे बाजार (Farmer weekly market) भरविण्यास परवानगी देणार आहे.  बाणेर, आंबेगाव, धानोरी, कळस, खराडी आदी सात ठिकाणी शेतकरी आठवडे बाजार भरविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. ( Pune Mahanagarpalika Shetkari Athvade Bajar)

ओटा मार्केट अनेक वर्षांपासून विनावापर पडून

ओटा मार्केटमधील (PMC Pune Ota market) ओटे/गाळे हे यापूर्वी अतिक्रमण विभागाकडील (PMC Pune Encroachment Department) रस्ता, पदपथावरील अधिकृत परवानाधारकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने यापूर्वी सदर ओटा मार्केटमधील गाळ्यांमध्ये औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय हद्दीमधील रस्ता, पदपथावरील अधिकृत परवानाधारकांचे रीतसर पुनर्वसन करण्याचा अनेकवेळा प्रयत्न करून देखील तेथील व्यवसायिक सदर ओटा मार्केटमध्ये व्यवसाय होत नाही. या कारणास्तव तेथे पुनर्वसन करून घेणेस तयार झालेले नाहीत. त्यामुळे सदरचे ओटामार्केट अनेक वर्षांपासून विनावापर पडून आहेत. (Pune Municipal Corporation News)

सद्यस्थितीत पुणे शहरात विविध ठिकाणच्या मनपा मिळकतींवर बांधून तयार असलेली खालीलप्रमाणे एकूण सात ओटा मार्केट आहेत. (१) खराडी ओटा मार्केट, खराडी स.नं.५, (२) पुण्यनगरी ओटा मार्केट, वडगावशेरी स.नं.३९, (३) राजमाता जिजाऊ ओटा मार्केट, धानोरी, स.नं.१७, (४) कुरुंजाई ओटा मार्केट, कळस, स.नं.१२०, (५) सनसिटी ओटा मार्केट, वडगाव बु., स.नं.१२ (६) बाणेर ओटामार्केट, बाणेर स.नं.८५अ, (७) आंबेगाव ओपन ओटामार्केट, आंबेगाव बु. स.नं.४३/१. यामधील काही ओटामार्केटमध्ये संबंधित क्षेत्रिय कार्यालय हद्दीमधील नोंदणीकृत पथविक्रेत्यांचे रितसर पुनर्वसन करून देखील पथविक्रेते ओटा मार्केटमध्ये व्यवसाय होत नसल्याची कारणे सांगून ओटा मार्केटमध्ये पुनर्वसन केलेल्या गाळ्यांमध्ये व्यवसाय करण्यास नकार देवून ते पुन्हा रस्ता, पदपथांवर व्यवसाय करण्यास मागणी करीत आहेत. त्यामुळे  उपरोक्त ओटा मार्केटमधील बहुतांश गाळे रिक्त राहत आहेत. अशा ओटामार्केटमधील रिक्त गाळ्यांचा पूर्ण क्षमतेने वापर होण्याच्या अनुषंगाने मनपा स्तरावर नव्याने धोरण तयार करणेकामी सर्व संबंधित विभागांची बैठक घेवून याबाबतचे धोरण करण्याबाबत निर्णय झाला होता. त्यानुसार हे धोरण तयार करण्यात आले आहे. त्यानुसार आता यामध्ये आठवडे बाजार सुरु केले जाणार आहेत. (PMC Pune Marathi news)
राज्य शासनाचा कृषी विभागामार्फत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राबविण्यात येत आहे. या प्रकल्प अंतर्गत महापालिकेकडून “अर्बन फुड पायलट हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे, या पथदर्शी प्रकल्पातील शेतकरी आठवडे बाजारांच्या दर्जामध्ये सुधारणा करुन, नागरीकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध व्हावा व शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला दर मिळावा, यासाठी शेतकरी आठवडे बाजारास प्राधान्य देण्यात आले आहे. (Shetkari Athvade Bajar)
त्यानुसार महापालिकेच्या हद्दीतील बाणेर ओटा मार्केट, वडगाव बुद्रुक येथील सन सिटी ओटा मार्केट, आंबेगाव बुद्रुक ओटा मार्केट, खराडी ओटा मार्केट, वडगाव शेरी येथील पुण्यनगरी ओटा मार्केट, कळस येथील कुरूंजाई ओटा मार्केट, धानोरी ओटा मार्केट या ठिकाणी शेतकरी आठवडे बाजार भरविण्यात येणार आहे. बांधीव ओटा मार्केट कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) या संस्थेमार्फत निवडलेल्या समुदाय आधारित संस्थाना (सीबीओ) व शेतकरी उत्पादक कंपनी यांना आठवड्यातील एक दिवसासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. महापालिकेच्या हद्दीतील विविध ठिकाणच्या ठराविक मोकळ्या जागावर आठवडे बाजार भरविण्यासाठीचा प्रस्तावही महापालिकेकडे आला आहे. (PMC Pune ota market)

“शेतकरी आठवडे बाजार उपक्रमाद्वारे नागरिकांना स्वच्छ, ताजी, विषमुक्त, फळे व भाजीपाला वाजवी दरात मिळणार आहे. तसेच शेतकरी बांधवाना शेतमाल विक्री करण्याकरिता हक्काची जागा अल्प दरात उपलब्ध होणार आहे. तरी नागरिकांनी महापालिकाच्या ओटा मार्केटमध्ये जाऊन फळे व भाजीपाला याची खरेदी करावी. तसेच या योजनेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन उप आयुक्त,” असे आवाहन अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाकडून करण्यात आले आहे. (PMC Pune news)
——
News title | Pune Mahanagarpalika Shetkari Athvade Bajar |  Weekly market to be started in 7 Ota markets of Pune Municipal Corporation

PMC Pune Plastic Bottle Collection Competition 2023 | ‘प्लास्टिक बॉटल्स संकलन स्पर्धा २०२३’ च्या पुरस्काराचे वितरण

Categories
Breaking News cultural PMC Political social पुणे

PMC Pune Plastic Bottle Collection Competition 2023 | ‘प्लास्टिक बॉटल्स संकलन स्पर्धा २०२३’ च्या पुरस्काराचे वितरण

PMC Pune Plastic Bottle Collection Competition 2023 |पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने आयोजित केलेल्या ‘प्लास्टिक बॉटल्स संकलन स्पर्धा २०२३’ च्या पुरस्काराचे वितरण (Award distribution of ‘Plastic Bottles Collection Competition 2023’)  पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant patil) यांच्या हस्ते महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथे करण्यात आले. (PMC Pune Plastic Bottle Collection Competition 2023)

यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (PMC Pune Additional Commissioner Dr Kunal Khemnar), घनकचरा व्यवस्थापन उप आयुक्त आशा राऊत (solid waste management deputy commissioner Aasha Raut), राष्ट्रीय टेनिस खेळाडू तथा पुणे महानरपालिकेच्या स्वच्छता ब्रँड ॲम्बेसेडर ऋतुजा भोसले, माजी नगरसेवक माधुरी सहस्रबुद्धे, कमिन्स इंडिया कंपनीच्या अवंतिका कदम आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, महानगपालिकेने (PMC Pune) राबविलेली प्लास्टिक बॉटल संकलन स्पर्धेची कल्पना अतिशय अभिनव असून पुणे शहर प्लास्टिक मुक्त करण्यासठी हा चांगला उपक्रम आहे. आपल्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट घरातच लावण्याबाबत जागतिक पातळीवर संशोधन चालू आहे. स्वच्छतेची सवय म्हणून प्रत्येकाने आपल्या घरातील कचऱ्याचे वर्गीकरण करावे. (PMC Pune News)

नागरिकांनी आपली सोसायटी, शहर, कार्यालय, कॉलनी, घर स्वच्छ ठेवावे. ओल्या कचऱ्यातून खत निर्मिती होते. प्लास्टिक कचऱ्याची समस्या गंभीर आहे. प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करुन विविध वस्तू बनविता येतात, तसेच रस्ता बनविण्यासाठीही प्लास्टिकचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे कचरा म्हणून टाकले जाणारे प्लास्टिक संकलन करणे हाही एक चांगला उपक्रम आहे. (Pune News)

कापडी पिशव्यांच्या वापराला प्रोत्साहनासाठी पुणे शहरात १०० ठिकाणी कापडी पिशव्या मिळण्याचे यंत्र कार्यान्वित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्लास्टिक बॉटल संकलन करण्यासाठी कमिन्स इंडिया कंपनीने प्रायोजकत्व स्वीकारून चांगले कार्य केल्याचे पालकमंत्री म्हणाले. (PMC Pune Marathi news)

यावेळी श्री. पाटील यांच्या हस्ते शहर पातळीवरील व क्षेत्रिय कार्यालय स्तरावरील वैयक्तिक, शैक्षणिक, व संस्थात्मक गटातील प्रथम क्रमांक आलेल्या स्पर्धकांना प्रतिनिधीक स्वरुपात पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. (Pune mahanagarpalika)

प्रास्ताविकात श्री. खेमनार म्हणाले, या अभियानात २३ टन प्लास्टिकचे संकलन करण्यात आले. पुणे शहरात आपण दररोज २ हजार २०० टन कचरा संकलन करत असून त्यापैकी २०० टन कचऱ्याचे रिसायकलिंग केले जाते. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. (Pune municipal corporation news)

कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वच्छतेकडून संपन्नतेकडे’ पुस्तिकेचे, जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, ‘हवेची गुणवत्ता आणि पुणे’ या शिक्षण हस्तपुस्तिकेचे आणि हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) झेंड्यांचे अनावरण करण्यात आले.

यावेळी पुणे शहरात स्वच्छता अभियानात योगदान देणाऱ्या विविध संस्था, पुनर्प्रकियेद्वारे उत्पादने बनवणाऱ्या, माझा कचरा माझी जबाबदारी मोहिमेत सहभागी झालेल्या, कचऱ्याचे वर्गीकरण करणाऱ्या संस्था, कमिन्स इंडिया, जनवाणी संस्था, कारागिरी संस्था व सरहद्द कॉलेज आदींनाही पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

पुणे शहरातील प्लास्टिक कचरा व्यवस्थापन (PMC Pune Waste Management)

पुणे शहरातील १५ क्षेत्रिय कार्यालय स्तरावर वैयक्तिक, सर्व वयोगटातील नागरिक, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, संस्थात्मक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक आस्थापना, स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था व गणेश मंडळे इत्यादी गटांमध्ये १ फेब्रुवारी ते २ एप्रिल या कालावधीमध्ये प्लास्टिक बॉटल्स संकलन स्पर्धा घेण्यात आली. (PMC Pune plastic waste managament)

या स्पर्धेअंतर्गत एकूण २३ टन वजनाच्या प्लास्टिक बॉटल्स संकलित करण्यात आल्या असून या प्लास्टिक बॉटल्सचा पुर्नवापर करणे आवश्यक आहे. या पासून पर्यावरणाचा संदेश देणे करीता सार्वजनिक ठिकाणी शिल्प उभारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्लास्टीकचा वापर रस्ते विकासना करिता करण्यात येणार आहे. या शिवाय १६ टन प्लास्टिक पासून नाविन्यपूर्ण पद्धतीने टी शर्ट तयार करण्यात येत आहेत.

‘मेरा लाईफ मेरा स्वच्छ शहर’ हे राष्ट्रीय अभियान १५ मे ते ५ जून या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शहरामध्ये नागरिकांच्या सहभागातून विकेंद्रित पद्धतीने थ्री आर- रिड्यूस-रियुज- रिसायकल सेंटर्स उभारली जाणार असून या अभियानाचे उद्दिष्ट लाईफ मिशनच्या पर्यावरण रक्षण व संवर्धन उद्दिष्टाशी संलग्नित आहे.

प्लास्टिक बॉटल संकलन स्पर्धा 2023 च्या विजेत्यांचे प्रतिनिधिक सत्कार करण्यात आले यामध्ये शहर पातळीवर वैयक्तिक गटासाठी ई बाईक, शैक्षणिक गटासाठी म्युझिक इन्स्ट्रुमेंट सेट, व संस्थात्मक गटासाठी ओपन जिम सेट या प्रकारे बक्षिसे प्रदान करण्यात आली त्याचप्रमाणे क्षेत्रीय कार्यालय स्तरावर खालील प्रमाणे बक्षीसे प्रदान करण्यात आली .


News Title | PMC Pune Plastic Bottle Collection Competition 2023 | Award distribution of ‘Plastic Bottles Collection Competition 2023’