PMC Pune Property tax | प्रॉपर्टी टॅक्स मधून पुणे महापालिकेच्या तिजोरीत 184 कोटी रुपये जमा

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Property tax | प्रॉपर्टी टॅक्स मधून पुणे महापालिकेच्या तिजोरीत 184 कोटी रुपये जमा

| उद्यापर्यंत सगळी बिले नागरिकांना मिळणार

PMC Pune Property tax | पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) मिळकत कराच्या (Property tax) माध्यमातून 31 मे पर्यंत 184 कोटी रुपयांचे उत्पन्न (income) मिळाले आहे. पुणेकरांना 40% सवलतीने मिळकत कराची बिले देण्यास उशीर झाला. त्यामुळे 15 मे जोरदारपणे कर भरणा सुरु झाला आहे. त्यानुसार महापालिकेला हे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये सर्वात जास्त वाटा ऑनलाईन चा आहे. दरम्यान 5-10 सवलत नागरिकांना 31 जुलै पर्यंत सुरु राहणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका कर आकारणी व कर संकलन (PMC Property tax department) विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (PMC Pune Property tax)
प्रॉपर्टी टॅक्स विभागाने (PMC Property tax department) दिलेल्या माहितीनुसार 1 एप्रिल पासून 1 लाख 38 हजार 866 मिळकतधारकांनी 184 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स जमा केला आहे. (PMC Pune Marathi News)
Collection Since 1-04-2023
CASH – 27940(20%)-25.92 Cr (14%)
CHEQUE – 11312(8%)-32.42 Cr (18%)
ONLINE – 99614(72%)-125.99 Cr (68%)
Total amount – 138866 – 184.35 Cr”
मिळकतकर विभागाच्या वतीने सांगण्यात आले कि 12 लाख बिलापैकी साडे अकरा लाख बिले ऑनलाईन अपलोड करण्यात आली आहेत. (PMC Property tax bills) जवळपास 8 लाख छापील बिले नागरिकांना पाठवण्यात आली आहेत. तसेच 10 लाख लोकांना sms देखील पाठवण्यात आले आहेत. उद्यापर्यंत सगळी बिले नागरिकांना पोहोचतील. असे प्रॉपर्टी टॅक्स विभागाकडून (PMC Property tax department) सांगण्यात आले. (PMC Property tax bills)
——
News title | PMC Pune Property tax |  184 crore rupees deposited in the coffers of Pune Municipal Corporation from property tax