Dr. Kunal Khemnar | ठेकेदाराने बिल सादर केल्यानंतर 7 दिवसात 70% बिल अदा करा  | अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांचे आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे

ठेकेदाराने बिल सादर केल्यानंतर 7 दिवसात 70% बिल अदा करा

| अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांचे आदेश

पुणे महानगरपालिकेकडून शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात येत आहेत. ज्या कामांची निविदा रक्कम रुपये ५० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असेल अशा कामांची सादर होणारी चालू
देयके आदा करताना कार्यपद्धती ठरवून दिली आहे. त्यानुसार  ठेकेदाराने बिल सादर केल्यानंतर 7 दिवसात 70% बिल अदा करा. असे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांनी दिले आहेत.

| अशी असेल कार्यपद्धती

१) संबंधित निविदाधारकांनी पूरक कागदपत्रांसह खात्याच्या अभियंत्याकडे देयक सादर केल्यानंतर देयक सादर केल्याच्या दिनांकापासून सात कार्यालयीन कामकाजाच्या दिवसामध्ये ७०% देय रक्कम संबंधित निविदाधारकास चालू बिलापोटी संबंधितानी आदा करावी.
२) उपरोक्त प्राप्त चालू देयकासोबत सादर कागदपत्रांची/प्रमाणपत्रांची व कामाच्या गुणवत्तेची खातरजमा करून त्यामध्ये असलेल्या त्रुटींची पूर्तता देयक सादर केल्यापासुनच्या १४ दिवसांमध्ये संबंधित निविदाधारकाने करावी. तदनंतर कार्यालयीन कामकाजाचे २८ दिवसाच्या आत सदरची
उर्वरित ३०% रक्कम संबंधितानी आदा करावी.
तदनुषंगाने, यापुढे उपरोक्त कार्यपद्धतीप्रमाणे सर्व संबंधितानी कार्यवाही करावी.