Dr. Kunal Khemnar | ठेकेदाराने बिल सादर केल्यानंतर 7 दिवसात 70% बिल अदा करा  | अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांचे आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे

ठेकेदाराने बिल सादर केल्यानंतर 7 दिवसात 70% बिल अदा करा

| अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांचे आदेश

पुणे महानगरपालिकेकडून शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात येत आहेत. ज्या कामांची निविदा रक्कम रुपये ५० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असेल अशा कामांची सादर होणारी चालू
देयके आदा करताना कार्यपद्धती ठरवून दिली आहे. त्यानुसार  ठेकेदाराने बिल सादर केल्यानंतर 7 दिवसात 70% बिल अदा करा. असे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांनी दिले आहेत.

| अशी असेल कार्यपद्धती

१) संबंधित निविदाधारकांनी पूरक कागदपत्रांसह खात्याच्या अभियंत्याकडे देयक सादर केल्यानंतर देयक सादर केल्याच्या दिनांकापासून सात कार्यालयीन कामकाजाच्या दिवसामध्ये ७०% देय रक्कम संबंधित निविदाधारकास चालू बिलापोटी संबंधितानी आदा करावी.
२) उपरोक्त प्राप्त चालू देयकासोबत सादर कागदपत्रांची/प्रमाणपत्रांची व कामाच्या गुणवत्तेची खातरजमा करून त्यामध्ये असलेल्या त्रुटींची पूर्तता देयक सादर केल्यापासुनच्या १४ दिवसांमध्ये संबंधित निविदाधारकाने करावी. तदनंतर कार्यालयीन कामकाजाचे २८ दिवसाच्या आत सदरची
उर्वरित ३०% रक्कम संबंधितानी आदा करावी.
तदनुषंगाने, यापुढे उपरोक्त कार्यपद्धतीप्रमाणे सर्व संबंधितानी कार्यवाही करावी.

Audit : Bill : PMC : 25 मार्च नंतर एक ही बिल स्वीकारणार नाही  : महापालिका आयुक्तांचे आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे

25 मार्च नंतर एक ही बिल स्वीकारणार नाही

: महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे : महापालिकेच्या विविध विभागाकडून बिले तयार करून ऑडिट ला पाठवण्यासाठी नेहमीच उशीर केला जातो. विभागाकडून ऐनवेळेला म्हणजे 31 मार्च लाच बिले सादर केली जातात. ही गोष्ट महापालिका आयुक्तांच्या लक्षात आली आहे. याकडे आयुक्तांनी गंभीरपणे लक्ष दिले आहे. त्यामुळे आता 25 मार्च नंतर ऑडिट साठी एक ही बिल स्वीकारले जाणार नाही, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. शिवाय कामाच्या वर्क ऑर्डर 17 मार्च च्या अगोदर द्याव्यात. असे ही आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

: असे आहेत आयुक्तांचे आदेश

पुणे महानगरपालिका प्रशासनाने सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये विविध विकास कामांसाठी अंदाजपत्रकीय तरतुदी उपलब्ध करून दिल्या आहेत . आमचे असे निदर्शनास आले आहे की, बहुतांश वेळा विविध कार्यालयांकडून विकास कामांची भांडवली,महसुली,वार्डस्तरीय बिले वेळेवर तयार करून मुख्य लेखा व वित्त विभागाकडे अर्थान्वीक्षणासाठी (ऑडीट) व अदा करणेसाठी पाठविण्यात येत नाहीत.

कामांची बिले वेळेवर अदा करण्यासाठी मनपा प्रशासानाच्या सर्व विभागांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करावयाची आहे.
१. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये करण्यात येणा-या विविध विकास कामांसाठी देण्यात येणा-या कामांच्या वर्कऑर्डस या दिनांक १७ मार्च २०२२ पूर्वी देण्यात याव्या. तथापि या तारखेपूर्वी पुणे मनपा सार्वत्रिक निवडणूक २०२२ ची आचार संहिता लागू झाल्यास आचारसंहिता तारखेपासून
संपूर्ण आचारसंहिता कालावधीत कोणतेही कार्यादेश जारी करणे अनुज्ञेय असणार नाही.
२. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये विकासकामांची बिले दिनांक २५ मार्च २०२२ अखेर तयार करून मुख्य लेखा व वित्त विभागाकडे अर्थान्वीक्षणासाठी (ऑडीट ) व अदा करण्यासाठी पाठविण्यात यावे.
सर्व खातेप्रमुख यांनी आपले विभागातील सर्व संबंधितांना याबाबत सूचना द्याव्यात. वरील मुदतीनंतर कोणतेही बील स्वीकारले जाणार नाही याची नोंद घेऊन वर विहित केलेल्या वेळेत बिले मुख्य लेखा व वित्त विभागाकडे पाठविण्याची सर्व खातेप्रमुखांनी दक्षता घ्यावी.