PMC : Hemant Rasne : स्थायी समितीच्या बैठकीत हे झाले महत्वाचे निर्णय!

Categories
Breaking News PMC पुणे

बेघरांसाठी दिवस-रात्र निवारा प्रकल्पाला मंजुरी

पुणे : पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान योजनेअंतर्गत पुणे महापालिका क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने बेघर नागरिकांसाठी दिवस-रात्र निवारा प्रकल्प राबविण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, सध्या येरवडा, सेनादत्त पेठ, बोपोडी, पुणे स्टेशन भागात बेघरांसाठी निवारा प्रकल्प राबविण्यात येतात. त्यांची मुदत संपल्याने नव्याने निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट, ओबीसी सेवा संघ, जान्हवी फाउंडेशन, अक्षरसृष्टी ग्रंथालय या संस्थांची निवड करण्यात आली आहे.
रासने पुढे म्हणाले, या प्रकल्पांसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यायचा आहे. तो उपलब्ध झाला नाही तर दोन कोटी रुपयांची तरतूद असललेल्या युवक कल्याण निधी अंतर्गत हा खर्च केला जार्इल. नगर विकास विभागाच्या आदेशानुसार प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमागे एक बेघर निवारा केंद्र उभे करायचे आहे. त्यानुसार ३८ लाख लोकसंख्या असलेल्या पुणे शहरात ३८ निवारा केंद्र उभी करण्याची योजना आहे. जशी जागा उपलब्ध होर्इल त्यानुसार आगामी काळात ही केंद्र उभी केली जातील.
—-

अग्निशमन सेवा शुल्क मान्यता

अग्निशमन दलाकडून उंच इमारतींना तसेच विशेष वापराच्या विविध इमारतींना आग प्रतिबंधक उपाययोनांच्या दृष्टीने करावयाच्या यंत्रणेसाठी प्राथमिक आणि अंतिम ना हरकत प्रमाणपत्र देताना अग्निशमन सेवा शुल्काच्या सुधारीत दरांना स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी  पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, पंधरा मीटर उंचीपर्यंतच्या विशेष वापराच्या विविध प्रकारच्या भोगवटा असणार्या ५०० चौरस मीटरपर्यंत क्षेत्रफळ असणार्या आणि ५०० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असणार्या इमारतींना अनुक्रमे २५ रुपये प्रती चौरस मीटर (किमान पंचवीस हजार रुपये) आणि ५० रुपये प्रती चौरस मीटर (किमान पन्नास हजार रुपये) शुल्क आकारले जाणार आहे. ही शुल्कवाढ आयुक्तांनी सुचविल्या प्रमाणे केली आहे.
रासने पुढे म्हणाले, १५ ते ४० मीटर उंचीच्या इमारतींसाठी प्रती चौरस मीटर १०० रुपये (किमान एक लाख रुपये), ४० ते ७० मीटर उंचीच्या इमारतीसाठी प्रती चौरस मीटर २५० रुपये (किमान अडीच लाख रुपये), ७० ते १०० मीटर उंचीच्या इमारतींसाठी प्रती चौरस मीटर ४०० रुपये (किमान चार लाख रुपये), १०० ते १५० मीटर उंचीच्या इमारतीसाठी प्रती चौरस मीटर ५०० रुपये (किमान साडे सात लाख रुपये) आणि १५० मीटर पेक्षा जास्त उंचीच्या इमारतीसाठी प्रती चौरस मीटर ६०० रुपये (किमान दहा लाख रुपये) शुल्क आकारण्यात येणार आहे. आयुक्तांनी सुचविलेल्या शुल्कात निम्म्याने कपात करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.
—–

शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासाठी डीबीटी

महापालिकेच्या शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वस्तू स्वरुपात मिळणार्या लाभांचे हस्तांतरण रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बॅंक (डीबीटी) खात्यावर जमा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी  पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, महापालिकेच्या शिक्षण विभागातील प्राथमिक, माध्यमिक, विद्या निकेतन, क्रीडा निकेतन शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य पुरविले जाते. गणवेश, पुस्तके, वह्या, दप्तरे, चित्रकला साहित्य, लेखन साहित्य, ट्रॅक सूट, बूट, स्वेटर असे साहित्य या योजनेअंतर्गत दिले जाते. या साहित्याचे किमान दरपत्रक ठरविण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार आवश्यक असणार्या सर्व शालेय साहित्यांच्या किमान दरांना स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
रासने म्हणाले, सन २०१७ पासून लाभांचे हस्तांतरण रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात केले जाते. गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीच्या स्थितीतशाळा बंद होत्या. त्यामुळे शालेय साहित्यासाठी आवश्यक असणारा निधी पालकांच्या खात्यावर जमा करण्यात आला नव्हते. या शैक्षणिक वर्षात अजूनही शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. परंतु नजिकच्या काळात शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्यास आवश्यकतेनुसार शालेय साहित्याचे वितरण करण्यासाठी डीबीटी पद्धतीने निधी जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारे शालेय साहित्याच्या किमान दरांना आज स्थायी समितीने मान्यता दिली.
—–

घसेटी पुलावरील मनपा शाळेत विविध अभ्यासक्रम

महात्मा फुले पेठेतील घसेटी पुलावरील महापालिकेच्या दगडी शाळेत शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कला क्षेत्रांतील विविध अभ्यासक्रम शिकविण्यासाठी शिवसाई फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेशी करार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, ही शाळा अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. या परिसरात आर्थिकदृष्ट्या अल्प उत्पन्न असणारे, मागासवर्गीय आणि विडी कामगारांची संख्या मोठी आहे. या सर्व समाजघटकांना उद्योग, व्यवसायाचे प्रशिक्षण, समुपदेशन करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला.
रासने पुढे म्हणाले, पुणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने पंधरा वर्षांसाठी शिवसाई फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविला जाईल. आस्थापना, प्रशिक्षक, शिक्षक आदी खर्च फाउंडेशनच्या वतीने केला जाईल. पाणी, विद्युत व्यवस्था आदी सुविधा महापालिकेतर्फे पुरविल्या जातील.
—-

भवानी पेठेत इंग्रजी माध्यमाची शाळा

भवानी पेठेत महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत रेवकाई नॉलेज फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पूर्व प्राथमिक ते इयत्ता पाचवी पर्यंतची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यासाठी करार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी  पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, महापालिका क्षेत्रात इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आकांक्षा फाउंडेशनसारख्या संस्थांबरोबर करार करण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर रेवकाई नॉलेज फाउंडेशन या संस्थेला परवानगी देण्यात आली आहे.
रासने पुढे म्हणाले, भवानी पेठेत अत्यल्प उत्पन्न असणार्र्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांच्या मुलांना इंग्रजी शिकण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला. शिक्षक, शिक्षकेतर आणि आस्थापना खर्च फाउंडेशन करणार आहे. विद्युत, पाणी आदी आवश्यक सेवा महापालिका पुरविणार आहे.
—–

शिवछत्रपती सन्मान विजेत्यांचा होणार गौरव

पुणे शहरातील राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या ६ खेळाडू आणि १३ क्रीडा मार्गदर्शकांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये आणि सन्मान चिन्ह देऊन महापालिकेच्या वतीने गौरव करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी  पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, या पूर्वी महापालिका हद्दीतील  खेडाडू आणि मार्गदर्शकांचा गौरव करण्यास मान्यता देण्यात आली होती. १९ जणांनी नव्याने अर्ज केले होते. त्यांचा गौरव करण्यासाठी १२ लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.

Tax relief : Archana Patil : कोरोना काळात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना करात मिळणार सवलत: नगरसेविका अर्चना पाटील यांच्या मागणीला यश

Categories
Breaking News PMC Political पुणे

कोरोना काळात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना करात मिळणार सवलत

: स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता

: नगरसेविका अर्चना पाटील यांच्या मागणीला यश

पुणे- पुणे शहरालगत असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मालमत्ताधारकांच्या कुटुंबियांना आगामी आर्थिक वर्षात सामान्य करात १००% सवलत जाहीर केलेली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेमार्फत पुणे शहरातील ज्या नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे अशा कुटुंबियांना आगामी आर्थिक वर्षात सामान्य करात १००% सवलत देण्यात यावी. तसेच सदर मयत नागरिकांच्या कुटुंबियांच्या मालमत्तांचे नांव हस्तांतरण करतेवेळी आकारण्यात येणारी “वारसा फी” माफ करण्यात यावी. अशी मागणी नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत केली होती. या मागणीला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली.

सन २०२० पासून भारतात कोरोना सारख्या महामारीने थैमान घातले आहे. यास पुणे शहर देखील अपवाद नाही. महाराष्ट्रातील कोरोनाचा पहिला रुग्ण हा पुणे शहरामध्ये सापडल्यानंतर कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत गेली. अशा वेळी प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबवून ही रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्याचे अथक प्रयत्न करण्यात आले. त्यामध्ये पुणे शहरातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांसाठी बेड्स राखीव ठेवणे, सर्व खाजगी रुग्रालयांबरोबर करार करून जास्तीत जास्त बेड्स ह्या करोना बाधित रुग्णांसाठी उपलब्ध ठेवणेबाबत सूचना देणे अशा अनेक उपाययोजनांचा समावेश होता.

परंतु कोरोनाची हि लहर इतकी घातक होती की यामध्ये अनेक नागरिकांना मृत्यूला सामोरे जावे लागले. कोरोनाच्या महामारीमध्ये अनेक पाल्यांनी आपले दोन्ही पालक गमावले. त्यामुळे त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा यक्षप्रश्न उभा झालेला आपण सर्वांनी पहिला आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात सामान्य करात १००% सवलत देण्यात यावी अशी मागणी पाटील यांनी केली.

स्थायी समितीने मी केलेल्या मागणीला मान्यता दिल्यामुळे मी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांचे आभार मानते. कोरोना मुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना करात सवलत 100 टक्के दिल्याने याचा नक्कीच नागरिकांना फायदा होईल.

अर्चना तुषार पाटील
नगरसेविका, स्थायी समिती सदस्य

PMC : Purchase of 80 lit buckets : नगरसेवकांच्या मागणीनुसार विविध प्रभागांसाठी 80 लिटरच्या बकेटची खरेदी  : 80 लाखाचा येणार खर्च ; स्थायी समितीची मान्यता 

Categories
PMC पुणे

नगरसेवकांच्या मागणीनुसार विविध प्रभागांसाठी 80 लिटरच्या बकेटची खरेदी

: 80 लाखाचा येणार खर्च ; स्थायी समितीची मान्यता

पुणे : शहरातील विविध प्रभागासाठी नगरसेवकांच्या मागणीनुसार 80 लिटरच्या बकेटची खरेदी करण्यात येणार आहे. निविदेच्या 12.50% अधिक दराने ही खरेदी होईल. यासाठी 80 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. याबाबतच्या प्रस्तावास नुकतीच स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

: 2019-20 खरेदी नाही झाली

 पुणे महानगरपालिकेच्या विविध प्रभागांसाटी 80 लिटरच्या  प्लास्टिक बकेट झाकणासह खरेदी करणे, याकामी विविध  सभासदाची मागणी प्राप्त आलेनुसार मध्यवर्ती भांडार कार्यालयमार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली होती. कोरोना विषाणूचे प्रादुर्भावाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मध्यवर्ती भांडार कार्यालयाकडून सन 2020-21 मध्ये 80 – लिटर क्षमतेच्या प्लास्टिक बकेटची खरेदी झालेली नाही. सन 2019-20 मध्ये खरेदी केलेल्या 80 लिटर क्षमतेच्या प्लास्टिक बकेट करिता 590.40 असा दर प्राप्त झालेला असून विषयांकित निविटेकामी सदर दर ग्राह्य धरून पूर्वगणक पत्रक तयार करण्यात आलेले आहे. पुणे महानगरपालिकेच्या विविध प्रभागांसाठी 80 – लिटर क्षमतेच्या प्लास्टिक बकेट झाकणासह खरेदी करणे या कामासाठी दिनांक 5 ऑक्टोबर  रोजी जाहीर निविदा प्रसिध्द करण्यात आली. त्यामध्ये एकही निविदाधारकाने सहभाग न घेतल्याने सदर निविदेस उप आयुक्त, मध्यवर्ती भांडार यांचे मान्यतेने फेर निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. सदर कामी फेर निविटा राबविल्यानंतरही एकाही निविदाधारकाने सहभाग न घेतल्याने सदर फेर निविदेस मा. उप आयुक्त, मध्यवर्ती भाडार यांचे मान्यतेने मुदतवाढ दिली असता एकूण 03 निविदा प्राप्त झालेल्या होत्या.

: पायल इंडस्ट्रीज ला काम

निविदेमध्ये प्राप्त झालेले दर हे निविदेच्या पूर्वगणन पत्रक 71. लक्ष पेक्षा 15.00% ने जास्त असल्याचे निदर्शनास आल्याने मध्यवर्ती भांडार कार्यालयाने सदर निविदेमधील जास्त आलेले दर कमी करण्यासाठी मे. पायल इंडस्ट्रीज यांना  16/11/2021 रोजी पत्र दिले. त्यानुसार मे. पायल इंडस्ट्रीज यांनी सदर निविदेकरिता प्रसिध्द करण्यात आलेले दर – र.रु. 590.40 प्रती नग हा दर 2 वर्षापूर्वीचा असल्यामुळे व सद्यस्थितीत प्लास्टिकच्या कच्च्या मालाचे भाव वाढले असल्याने दरवाढ झालेली आहे. तरी सुद्धा आमच्या संस्थेने 15% जास्त 2.50% कमी करून 12.50% जास्त दराने निविदेकामी काम करण्यास तयार असल्याचे  कळविले आहे.
विषयांकित निविदा पुणे मनपाच्या  सभासदांच्या मागणीनुसार राबविण्यात आलेली असून संबंधित मा.सभासद हे 80 – लिटर क्षमतेच्या प्लास्टिक बकेटचा पुरवठा करणेसाठी आग्रही आहेत. 80 – लिटर क्षमतेच्या प्लास्टिक बकेटची खरेदी केल्यास विविध प्रभागातील ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी मदत होणार आहे. मे. पायल इंडस्ट्रीज यांनी सदर निविदेकरिता 12.50% जास्त दराने निविदेकामी काम करण्यास तयार असल्याचे कळविलेनुसार मध्यवर्ती भांडार कार्यालयाने दराबाबत शहानिशा करणेकामी GeM पोर्टल या शासनमान्य संकेतस्थळावरील सद्यस्थितील 80 – लिटर क्षमतेच्या प्लास्टिक बकेटचे दर तपासले असता त्याचे र.रु 733/- प्रती नग असल्याचे आढळून आले. बाजारामधील 80 – लिटर क्षमतेच्या प्लास्टिक बकेटच्या दराचा विचार करता विषयांकित निविदेमधील प्राप्त दर बाजारभावाशी सुसंगत आहेत. सदर खरेदी कामी रक्कम रु. – 79,87,500/- ( सर्वकरांसह ) इतका खर्च येणार आहे. यासाठी सन 2021 – 22 च्या विविध मा. सभासदांची वॉर्डस्तरीय व ‘स’ यादीमधील अर्थशीर्षकावर पुरेशी तरतूद उपलब्ध आहे. त्यानुसार याला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

Hemant Rasne : Standing Commitee : स्थायी समितीच्या बैठकीत हे झाले महत्वाचे निर्णय : जाणून घ्या

Categories
PMC पुणे

‘स्वच्छ’च्या कर्मचार्यांना मिळणार मदर बॅग, स्कार्फ आणि पादत्राणे

पुणे : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील ‘स्वच्छ सेवा संस्थे’च्या कचरा वेचकांना मदर बॅग, पादत्राणांचे जोड आणि स्कार्फ पुरविण्यासाठी ४७ लाख ५१ हजार रुप चा निधी मंजुर करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, या निर्णयामुळे स्वच्छ सेवा संस्थेच्या कचरा वेचक कर्मचार्याना ८६ हजार ४०० मदर बॅग, तीन हजार चारशे पादत्राणांचे जोड आणि सात हजार दोनशे स्क्राप उपलब्ध होणार आहेत. त्याचा उपयोग या कर्मचार्यांच्या आरोग्याची काळजी आणि सुरक्षिततेसाठी होणार आहे.
—-

क्रीडा अधिकारी मंजुरीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे

पुणे महापालिकेच्या पंधरा क्षेत्रिय कार्यालयांसाठी प्रत्येकी एक या प्रमाणे क्रीडा अधिकार्यांच्या (शारीरिक संघटक) आकृतीबंधाच्या मान्यतेसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यास स्थायी समितीने मान्यता  दिली.
रासने म्हणाले, यापूर्वी शिक्षण मंडळामार्फत क्रीडा अधिकार्यांच्या १८ पदांचा आकृतीबंध राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. परंतु सरकारने सात पदांना अनुमती दिली. महापालिकेची १५ क्षेत्रिय कार्यालय आहेत. प्रत्येक कार्यालयासाठी किमान एक क्रीडा अधिकारी असणे आवश्यक आहे. त्यासाठी आणखी आठ पदांना मान्यता द्यावी यासाठी नव्याने प्रस्ताव पाठविण्याच्या निर्णयाला स्थायी समितीने मान्यता दिली.
—-

बोपोडीच्या शाळेत अकरावी आणि बारावीचे वर्ग

पुणे महापालिकेच्या बोपोडी उर्दू माध्यमिक हायस्कूलमध्ये २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता अकरावी आणि बारावीचे सुरु करण्यास मान्यता दिली.
रासने म्हणाले, मुख्य सभेच्या मान्यतेनंर हा प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर पुणे महापालिका आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन वर्ग चालविण्यात येतील.
—–

अग्निशमन केंद्रात फायरमनच्या नियुक्त्या

पुणे महापालिकेचे मुख्य अग्निशमन केंद्र आणि त्यांच्या नियंत्रणातील १३ उप अग्निशमन केंद्रामध्ये कंत्राटी पद्धतीने फायरमनच्या नियुक्त्या करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता  दिली.
रासने म्हणाले, कंत्राटी स्वरुपात फायरमनची नियुक्ती करण्यासाठी सहासष्ट लाख दहा हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित संस्थेशी करार करण्यात येर्इल. शासनाच्या नियमानुसार संबंधित संस्थेच्या वतीने महागार्इ भत्ता आणि वेतन दिले जाणार आहे.
—-

बावधन खुर्द येथील ई-लर्निंग स्कूलच्या कामासाठी निधी मंजूर

बावधन-कोथरुड डेपो क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत बावधन खुर्द येथे र्इ-लर्निंग शाळेचे उर्वरीत काम पूर्ण करण्यासाठी १ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

Koregaon Bhima : Rahul Bhandare : कोरेगाव-भीमा येथील क्रांती स्तंभाच्या परिसर विकासासाठी एक कोटी तरतूद

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा येथील क्रांती स्तंभाच्या परिसर विकासासाठी एक कोटी

: स्थायी समितीची मंजुरी

पुणे : शौर्याचे प्रतिक म्हणून कोरेगाव-भीमा येथे उभारण्यात आलेल्या क्रांती स्तंभाच्या परिसरातील सुशोभिकरण आणि विविध प्रकारची विकासकामे करण्यासाठी एक कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता देण्यात आली आहे. याबाबत भाजपचे नगरसेवक राहुल भंडारे  यांनी प्रस्ताव दिला होता. यातून आता तिथे मुलभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. अशी माहिती भंडारे यांनी दिली.

: राहुल भंडारे यांनी दिला होता प्रस्ताव

या बाबत भाजपचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे सदस्य राहुल भंडारे यांनी समिती समोर प्रस्ताव सदर केला होता. त्यानुसार पुणे शहरालगत शौर्याचे प्रतिक म्हणून कोरेगाव भीमा येथे स्मारक उभारण्यात आलेले आहे. दरवर्षी देशभरातून दि. १ जानेवारीला लाखो भीम अनुयायी या क्रांती स्तंभास भेट देण्यासाठी येत असतात. त्याच बरोबर अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी देखील मानवंदना देण्यासाठी येत असतात. दरवर्षी १ जानेवारीला मानवंदना देण्यासाठी मोठया प्रमाणावर भीम अनुयायी येत असतात; परंतू याठिकाणी असलेल्या सोईसुविधा अपुऱ्या असल्याने त्यांची गैरसोय होत असते. तरी कोरेगाव भीमा येथील क्रांती स्तंभाच्या परिसराच्या सुशोभिकरण व विकासासाठी पुणे महानगरपालिकेकडून एक कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात यावेत. मंगळवारच्या समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली आणि याला मंजुरी देण्यात आली.
शौर्याचे प्रतिक म्हणून कोरेगाव-भीमा येथे उभारण्यात आलेल्या क्रांती स्तंभाला दरवर्षी १ जानेवारीला मानवंदना देण्यासाठी मोठया प्रमाणावर भीम अनुयायी येत असतात; परंतू याठिकाणी असलेल्या सोईसुविधा अपुऱ्या असल्याने त्यांची गैरसोय होत असते. मात्र आता निधी उपलब्ध झाल्याने ही गैरसोय दूर होणार आहे.

           राहुल भंडारे, नगरसेवक

Katraj-Kondhwa road : PMC : कात्रज – कोंढवा रस्त्याला २ पर्यायी रस्ते 

Categories
Breaking News PMC पुणे

कात्रज – कोंढवा रस्त्याला २ पर्यायी रस्ते

९ कोटींच्या कामाला स्थायी समितीची मंजुरी

पुणे : रहदारी टाळण्यासाठी कात्रज कोंढवा ८४ मीटरचा डीपी रस्ता तयार करण्यात येणार आहे. मात्र त्याआधी त्याला पर्यायी रस्ते तयार करण्याची निकड आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक ४१ ड मध्ये दोन पर्यायी रस्ते केले जाणार आहेत. यासाठी ९ कोटी खर्च अपेक्षित आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

: डीपी रस्त्याच्या कामातून खर्च केला जाणार

याबाबतचा प्रस्ताव नगरसेविका मनीषा कदम आणि उज्वला जंगले यांनी स्थायी समिती समोर ठेवला होता. त्यानुसार कात्रज-कोंढवा 84 मी डी.पी. रस्ता विकसित करणे या कामासंदर्भात पर्यायी रस्ते तयार करण्यासाठी प्रभाग क्र.41 ड मधील सर्वे नं.७६,७५,५१,५२,४३,४४,४५ मधून जाणारा डी.पी. रस्ता टिळेकर नगर मुख्य रस्ता काँक्रिटीकरण करणे या कामासाठी रू.7 कोटी तसेच  कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम सुरू असताना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सदर रस्त्याला जोडणारे रस्ते डांबरीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी प्रभाग क्र.41 ड मधील साई नगर,गोकुळ नगर,टिळेकर नगर डांबरीकरण व मजबुतीकरण करणे या कामासाठी र.रु.2 कोटी लागणारा खर्च सन 2021-22 च्या अंदाजपत्रकातील कात्रज-कोंढवा रस्ता राजस सोसा चौक ते खडीमशीन चौक ते पिसोळी गाव पुणे मनपा हद्द रस्ता 84 मी डी.पी. रस्त्याचे काम करणे बजेट कोड:- CE20A1262/A9-283 र.रू. 35 कोटी या तरतुदी मधून करण्यास मान्यता देण्यात यावी. या प्रस्तावाला स्थायी समिती ने मान्यता दिली आहे.

Pune : Hemant Rasne : हातावर पोट असणाऱ्या पथारी व्यावसायिकांसाठी स्थायी समितीचा मोठा निर्णय 

Categories
Breaking News PMC पुणे

हातावर पोट असणाऱ्या पथारी व्यावसायिकांसाठी स्थायी समितीचा मोठा निर्णय

: लॉकडाउनमधील १२ कोटी  होणार माफ

पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शहरातील लॉकडाउन काळातील पथारी व्यावसायिकांचे भाडे शुल्क आणि दंडाची रक्कम माफ करण्याचा निर्णय आज स्थायी समितीत घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कोरोना काळात बिल बजावू न शकल्याने आगाऊ शुल्क न भरलेल्या एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२१ या कालावधीसाठीचे शुल्क ८ कोटी ३२ लाख रुपये आणि दंड ३ कोटी ६८ लाख रुपये असे १२ कोटी एक लाख रुपये माफ करण्यास मान्यता देण्यात आली. असे रासने यांनी सांगितले.

 

रासने पुढे म्हणाले, ‘गेल्या आर्थिक वर्षातील लॉकडाउनमुळे पथारी व्यावसायिकांचे भाडे आणि दंड माफ करण्यात यावा असा प्रस्ताव स्थायी समितीपुढे चर्चेला आला होता. त्यानुसार भाड्याच्या रकमेपोटी १६ कोटी २ लाख रुपये आणि या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत दंडापोटी ३ कोटी ७४ लाख रुपये असे एकूण १९ कोटी ७६ लाख रुपये माफ करावे लागत होते.’

रासने म्हणाले, ‘या प्रस्तावावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. ज्या काळात व्यवसाय करायला परवानगी देण्यात आली होती तो काळ वगळून उर्वरित काळासाठीचे भाडे शुल्क आणि दंड माफ करावा असा निर्णय करण्यात आला. त्यानुसार कोरोना काळात बिल बजावू न शकल्याने आगाऊ शुल्क न भरलेल्या एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२१ या कालावधीसाठीचे शुल्क ८ कोटी ३२ लाख रुपये आणि दंड ३ कोटी ६८ लाख रुपये असे १२ कोटी एक लाख रुपये माफ करण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे हातावर पोट असणाऱ्या आणि कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झालेल्या पथारी व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.’

माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांनी केली होती मागणी

याबाबत डॉ सिद्धार्थ धेंडे यांनी प्रस्ताव देत मागणी केली होती. 22 जून ला त्यांनी हा प्रस्ताव दिला होता. त्यांच्या पत्रानुसार गेले दीड वर्षे कोरोना काळात पुणे शहरातील शहरी व गरीब नागरीकांचे छोटे मोठे व्यवसाय पूर्णत: ठप्प झाले आहेत. यामध्ये पुणे शहरातील अधिकृत फेरीवाला, हातगाडीधारक, पथारीधारक, स्टॉलधारक हे देखील गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी कुटुंबाची मोडकळीस आलेली आर्थिक घडी बसविण्याचा प्रयत्न करीत आहेत. दीड वर्षात यांचेही व्यवसाय मोठया प्रमाणावरठप्प झाल आहेत. पुणे महानगरपालिकेतर्फे फेरीवाला धोरण नुसार या सर्व पथारीधारकांना सन २०२०- २०२१ च्या आर्थिक वर्षातील भाडे आकारणीची बिले पाठविण्यात आली आहेत.  कमीत कमी बिलेही ५० रू प्रति दिन भाडे x ३६५ दिवस = १८२५० + २२५० रू. इतका दंड आकारला आहे. एक प्रकारे पुणे शहरातील जवळजवळ ८०००० पथारी व्यावसायिकांना अन्यायकारक आहे. तरी मागील आर्थिक वर्षामध्ये कोरोना काळात पथारीचे व्यवसाय पूर्णत: बंद असल्याने त्यांच्यावर
उपासमारीची वेळ आली आहे. आजही कोरोनाच्या नियमावलीमध्ये हे व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालू नाहीत. त्यामुळे सर्व पथारीधारकांना सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाच्या भाडे आकारणीत व्यवसाय भाडे व दंड पूर्णत: माफ करणेत यावा. त्यानुसार आता दंड माफ करण्यात आला आहे