Katraj-kondhva Road | कात्रज-कोंढवा रोड बाबतचा आयुक्तांचा दावा ठरला फोल!

Categories
Breaking News PMC social पुणे

कात्रज-कोंढवा रोड बाबतचा आयुक्तांचा दावा ठरला फोल!

पुणे | महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी मागील वर्षी बजेट सादर करताना दावा केला होता कि कसल्याही परिस्थितीत आम्ही कात्रज कोंढवा रोड चे काम सुरु करू. मात्र आयुक्तांचा हा दावा फोल ठरलेला दिसून येत आहे. कारण भूसंपादन अभावी रस्त्याचे काम पुढे गेलेले नाही. दरम्यान आगामी आर्थिक वर्षात तरी याच्यात काही प्रगती होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कात्रज कोंढवा रोड हा खूपच रहदारीचा रस्ता आहे. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेकडून रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. पूर्वी हा रस्ता 84 मीटर करण्याचे नियोजन होते. मात्र फक्त भूसंपादन साठी 736 कोटी रुपये लागणार होते. मात्र एवढी मोठी रक्कम असल्याने पुन्हा हा रस्ता 50 मीटर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 236 कोटी रुपये भूसंपादन साठी लागणार आहेत. यासाठी 200 कोटींचे अनुदान राज्य सरकार देणार आहे. मात्र सरकारने अजूनपर्यंत काही मदत केलेली नाही. त्यामुळे रस्त्याचे काम पुढे जाताना दिसत नाही. महापालिका आयुक्तांनी याबाबत केलेला दावा त्यामुळे फोल ठरताना दिसला आहे. दरम्यान आगामी आर्थिक वर्षात आयुक्तांनी या रस्त्यासाठी 17 कोटींची तरतूद केली आहे.

Kondhwa Road tender | कोंढवा रोड ची निविदा देखील वादाच्या भोवऱ्यात

Categories
Breaking News PMC Political पुणे

कोंढवा रोड ची निविदा देखील वादाच्या भोवऱ्यात | अनियमितता आढळल्याचा अरविंद शिंदे यांचा आरोप

पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाने आवश्यक त्या अटी, शर्ती वगळून वादग्रस्त रित्या कोंढवा रोड येथील २२ कोटींची निविदा प्रसिध्द केलेली आहे. असा आरोप पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला आहे. या निवेदेतील अनेक अनियमीत बाबी पत्राद्वारे अतिरिक्त आयुक्त (विशेष) यांच्या निदर्शनास आणून देत संबंधितांवर कायदेशिर कारवाई करण्याची मागणी देखील शिंदे यांनी केली.

 

शिंदे यांच्या निवेदनानुसार  कोंढवा रोड टेंडरच्या पूर्वगणक पत्रकात बहुतांशी टेंडर आयटम हे पूल बांधणे या विशेष आयटमचे आहेत. पूल बांधणेकरीता महापालिकेचे स्वतंत्र रजिस्ट्रेशन आहे. मात्र पूलाचे उल्लेख केल्यास पूलाचे नोंदणी दाखला नसलेले फक्त रस्ता बांधणीचे काम करणारे ठेकेदार या निविदा प्रक्रियेत भाग घेवू शकणार नाहीत. सबब या ठेकेदारांच्या आर्थिक काळजीने पछाडलेले पथविभागाचे अधिकारी यांनी सदर कामाचे कन्स्लंटंट यांना हाताशी धरून सत्ताधारी माजी आमदार, कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली पूल बांधणेचे अनुभव दाखल्याची अट वगळून पूर्वगणक पत्रक बनविले आहे. नुकत्याच वादग्रस्त ठरलेल्या पॅकेज कामे (१ ते ५) प्रमाणे  हे टेंडर देखील भ्रष्ठाचाराने माखले आहे.

शिंदे यांच्या नुसार कामाचे स्वरूप निविदेमध्ये नमूद केल्याप्रमाणे रस्ता बांधणीचे वाटत असले तरीही प्रत्यक्षात या कामामध्ये २०० मी. लांबीचा बॉक्स कल्वर्ट चा आयटम समाविष्ठ आहे. ही बाब सोईस्कर रित्या कामाच्या नांवात लपविलेली आहे.  कोणत्याही निविदेमध्ये रस्त व पूल हे दोनही आयटम समाविष्ट असल्यास या दोनही आयटमचे पूर्वानुमचलि असणे टेंडर नियमावलीनुसार गरजेचे आहे. संबंधित निविदेमध्ये पूल बांधणीचा अनुभव संशयास्पदरित्या प्रशासनाने मागविलेला नाही. काम हे पूलाचे असले तरीही त्यामध्ये डेक स्लब ची Quantity ही आश्चर्यकारकरित्या घेतली नाही. BOX CULVERT मध्ये अबेटमेंट पिलर असतात त्याचा दर हा जाणीवपूर्वक अन्य ठेकेदारांना दिशाभूल करणेसाठी चुकीचा धरला आहे. BOX CULVERT मध्ये जी स्टील वापरण्यात येणार आहे त्याची सुद्धा BOQ 30% Qty धरली नाही.

शिंदे यांनी पुढे म्हटले आहे कि, त्यामुळे काम हे चुकीच्या पद्धतीने लावले असून ते टेंडर दुरुस्त करून फेर टेंडर करावे. निविदेबाबत शहरातील एक माजी आमदार मनपाच्या ठेकेदारांना सदर निविदा न भरणेबाबत धमकावत असल्याचे चर्चा मनपा वर्तुळात आहे. संदर्भाकित निविदेबाबत आपण स्पर्धात्मक दर येणेकरीता पूर्वगणक पत्रक दुरूस्त करून फेरनिविदा मागवावी. निविदेसंबंधित कनिष्ठ अभियंता, कार्यकारी अभियंता यांना निलंबित करावे व या कामाचे कन्स्लंटंट यांना काळ्या यादी टाकावे अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीन आपणांस करीता आहोत. याबाबत ठोस कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल व कायदेशीर दाद मागण्यात येईल. असा इशारा ही शिंदे यांनी दिला आहे.

Bronze statue of Shivaji Maharaj | कात्रज-कोंढवा रोड वर शिवाजी महाराजांचा ब्राँझ धातूचा पूर्णाकृती पुतळा उभा केला जाणार | शहर सुधारणा समिती समोर प्रस्ताव

Categories
Breaking News PMC Political social पुणे

कात्रज-कोंढवा रोड वर शिवाजी महाराजांचा ब्राँझ धातूचा पूर्णाकृती पुतळा उभा केला जाणार

| शहर सुधारणा समिती समोर प्रस्ताव

प्रभाग क्र. ४७ (जुना ४१) कोंढवा बुद्रुक येथील कात्रज -कोंढवा ८४.० मीटर रुंद रस्ता व आर. एम. डी.
शाळेसमोरील २४.० मी. रुंद डी.पी. रस्ता येथील जागेत राजे छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांचा ब्राँझ धातूचा १३.० फुट उंच पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभा केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून शहर सुधारणा समिती समोर ठेवण्यात आला आहे. यावर समितीच्या पुढील बैठकीत चर्चा होईल. (Chatrapati Shivaji Maharaj bronze Statue)

प्रस्तावानुसार प्रभाग क्र. ४७ (जुना ४१) कोंढवा बुद्रुक येथील कात्रज -कोंढवा ८४.० मीटर रुंद रस्ता व आर. एम. डी. शाळेसमोरील २४.० मी. रुंद डी.पी. रस्ता येथील जागेत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ब्राँझ धातूचा १३.० फुट उंच पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा श्री भैरवनाथ ग्रामविकास मंडळ या संस्थेमार्फत स्वखर्चाने तयार करून पुणे महानगरपालिकेला सुपूर्द करण्यात येणार आहे. सदर शिल्पाचे काम शिल्पकार श्री अजिंक्य कुलकर्णी, डोणजे, पुणे यांच्या मार्फत तयार करण्यात येत आहे. या आशयाचे पत्र माजी आमदार योगेश पुंडलिक टिळेकर यांनी  भवन रचना खात्यास दिले आहे. (Pune Municipal corporation)

शासन निर्णय अनुषंगाने प्रभाग क्र. ४७ (जुना ४१) कोंढवा बुद्रुक येथील कात्रज -कोंढवा ८४.० मीटर रुंद रस्ता व आर. एम. डी. शाळेसमोरील २४.० मी. रुंद डी.पी. रस्ता येथील जागेत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ब्राँझ धातूचा १३.० फुट उंच पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारणे करिता मा.मुख्य सभा, पुणे महानगरपालिका यांची मान्यता घेणे आवश्यक आहे. विषयांकित ठिकाणी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारणे या कामी आवश्यक त्या सर्व संबंधित खात्याचे अभिप्राय प्राप्त करून घेणेत येत आहेत. (PMC pune)

प्रभाग क्र. ४७ (जुना ४१) कोंढवा बुद्रुक येथील कात्रज-कोंढवा ८४.० मीटर रुंद रस्ता व आर. एम. डी.
शाळेसमोरील २४.० मी. रुंद डी.पी. रस्ता येथील जागेत उभाराणेसाठी श्री भैरवनाथ ग्रामविकास मंडळ या संस्थेने व:खर्चाने तयार केलेला राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा ब्राँझ धातूचा १३.० फुट उंच पूर्णाकृती श्वारूढ पुतळा पुणे महानगरपालिकेकडे सुपूर्द करून घेण्यास व पुतळा उभारणे बाबतचा प्रस्ताव शहर सुधारणा समिती समोर ठेवण्यात आला आहे. त्यानंतर मुख्य सभेची मान्यताघ्यावी लागणार आहे. (PMC City improvement committee)

Katraj-Kondhva Road | भूसंपादनाचा खर्च वाचवण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्त्याचा आराखडा बदलणार 

Categories
Breaking News PMC पुणे

भूसंपादनाचा खर्च वाचवण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्त्याचा आराखडा बदलणार

| सल्लागारास सुधारीत रचनेचा आराखडा करण्याच्या सूचना

पुणे : कात्रज कोंढवा रस्त्यासाठी करोडो रुपयाचा खर्च होणार आहे. हा यातील ज्यादा खर्च हा भूसंपादन साठी होणार आहे. त्यामुळे भूसंपादनाचा खर्च वाचवण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्त्याचा आराखडा बदलला जाणार आहे. त्यासाठी, या रस्त्याचा सुधारीत आराखडा तयार करण्यात येणार असून त्याबाबतच्या सूचना या रस्त्याचे काम देण्यात आलेल्या सल्लागारास देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यासाठी आता पर्यंत केलेला कोटयावधीचा खर्च मात्र वाया जाणार आहे. अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.

 

हडपसरकडून नवीन पुणे-बेंगलोर महामार्गाकडे जाणाऱ्या कात्रज-कोंढवा रस्त्यावर जड वाहनांची वर्दळ असते. सध्याच्या स्थितीत हा रस्ता अवघा 18 मीटर रूंद असल्याने तसेच रस्त्याच्या कडेला अनेक भागात अतिक्रमणे झाल्याने या रस्त्यांवर मोठया प्रमाणात अपघात होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेडून हा रस्ता तब्बल 84 मीटर रूंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर या चार किलोमीटरच्या रस्त्यासाठी करावे लागणार भूसंपादनासाठी तब्बल 650 कोटींचा खर्च अपेक्षित होता तर या रस्त्याचे काम करण्यासाठी पालिकेने 31 ऑक्‍टोबर 2018 रोजी तब्बल 149 कोटींच्या खर्चास मान्यता दिली तर हे काम भूसंपादनासह तीन वर्षात करण्यात येणार होता. मात्र, भूसंपादनासाठी नागरिक रोख मोबदला मागत असल्याने तीन वर्षांच्या मुदतीनंतरही या रस्त्याचे 20 टक्केच काम झाले आहे. तर आता पर्यंत भूसंपादन झालेल्या रस्त्यावर 39 कोटींचा खर्च करण्यात आला असून या कामास दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

मात्र, आता पालिकेकडे सर्व जागामालक रोख मोबदला मागत असल्याने पालिकेची भूसंपादनाची क्षमताच नाही. तर रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने अपघात थांबण्यास तयार नाहीत. त्यामुळे, हा रस्ता अर्धवटच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने या रस्त्याची रूंदीच कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, महापालिकेचा भूसंपादनाचा खर्च निम्म्या पेक्षा अधिक वाचणार आहे. तसेच प्रकल्पाचा खर्चही कमी होणार असून रस्ता तातडीनं पूर्ण करता येणार आहे. महापालिका आयुक्तांसह, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केल्यानंतर याबाबत चर्चा झाली असून त्यानुसार, रस्त्याची रूंदी 40 मीटर केल्यानंतर भूसंपादनाचा खर्च किती वाचेल, किती ठिकाणी 40 मीटर रस्त्याचे भू संपादन पूर्ण झाले असून उर्वरीत ठिकाणी भूसंपादन करावे लागेल का ? प्रकल्पाचा खर्च किती कमी होईल याचा आराखडा सादर करण्याच्या सूचना सल्लागारांना देण्यात आल्या असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून देण्यात आली.
——————

Katraj-Kondhwa road : PMC : कात्रज – कोंढवा रस्त्याला २ पर्यायी रस्ते 

Categories
Breaking News PMC पुणे

कात्रज – कोंढवा रस्त्याला २ पर्यायी रस्ते

९ कोटींच्या कामाला स्थायी समितीची मंजुरी

पुणे : रहदारी टाळण्यासाठी कात्रज कोंढवा ८४ मीटरचा डीपी रस्ता तयार करण्यात येणार आहे. मात्र त्याआधी त्याला पर्यायी रस्ते तयार करण्याची निकड आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक ४१ ड मध्ये दोन पर्यायी रस्ते केले जाणार आहेत. यासाठी ९ कोटी खर्च अपेक्षित आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

: डीपी रस्त्याच्या कामातून खर्च केला जाणार

याबाबतचा प्रस्ताव नगरसेविका मनीषा कदम आणि उज्वला जंगले यांनी स्थायी समिती समोर ठेवला होता. त्यानुसार कात्रज-कोंढवा 84 मी डी.पी. रस्ता विकसित करणे या कामासंदर्भात पर्यायी रस्ते तयार करण्यासाठी प्रभाग क्र.41 ड मधील सर्वे नं.७६,७५,५१,५२,४३,४४,४५ मधून जाणारा डी.पी. रस्ता टिळेकर नगर मुख्य रस्ता काँक्रिटीकरण करणे या कामासाठी रू.7 कोटी तसेच  कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम सुरू असताना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सदर रस्त्याला जोडणारे रस्ते डांबरीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी प्रभाग क्र.41 ड मधील साई नगर,गोकुळ नगर,टिळेकर नगर डांबरीकरण व मजबुतीकरण करणे या कामासाठी र.रु.2 कोटी लागणारा खर्च सन 2021-22 च्या अंदाजपत्रकातील कात्रज-कोंढवा रस्ता राजस सोसा चौक ते खडीमशीन चौक ते पिसोळी गाव पुणे मनपा हद्द रस्ता 84 मी डी.पी. रस्त्याचे काम करणे बजेट कोड:- CE20A1262/A9-283 र.रू. 35 कोटी या तरतुदी मधून करण्यास मान्यता देण्यात यावी. या प्रस्तावाला स्थायी समिती ने मान्यता दिली आहे.