TP Scheme | उरुळी देवाची  व फुरसुंगी  टीपी स्कीम | हरकती सूचनांचा अहवाल सरकारकडे पाठवला जाणार 

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

उरुळी देवाची  व फुरसुंगी  टीपी स्कीम

हरकती सूचनांचा अहवाल सरकारकडे पाठवला जाणार

 

उरुळी देवाची व फुरसुंगी i) टीपीस्कीम मधील बाह्य वळण मार्गाची रुंदी 110 मी. हून कमी करून 65 मी. करण्यासाठी मागविण्यात आलेल्या हरकती  व सूचनांवर ) सुनावणी घेऊन अंतिम अहवाल राज्य शासनाकडे ( पाठविण्यासाठीचा प्रस्ताव महापालिकेच्या  शहर सुधारणा समितीपुढे ठेवण्यात आला आहे.

महापालिका  हद्दीमध्ये चार वर्षांपुर्वी समाविष्ट करण्यात आलेल्या उरुळी देवाची व फुरसुंगी या गावांमध्ये महापालिकेच्यावतीने टी.पी.स्किम द्वारे विकास करण्याची प्रक्रिया मार्च 2019 पासून सुरू करण्यात आली आहे. दरम्यान यापुर्वी जाहीर केलेल्या इराद्यामध्ये या दोन्ही गावांच्या मध्यातून जाणार्‍या बाह्यवळण मार्गाची रुंदी 110 मी. होती. परंतू  रस्तारुंदीसाठी आवश्यक जागेची प्रकरणे न्यायालयात असून न्यायालयीन प्रक्रिया ( दिर्घ काळ सुरू राहाण्याची शक्यता आहे. यामुळे टी.पी.स्किमला वेळ लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने बाह्यवळण मार्गाची (Bypass) रुंदी 110 मी. वरून 65 मी. पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांच्या हरकती आणि सूचनाही मागवल्या आहेत. रस्ता रुंदी बदलावर उरुळी देवाची मधील टी.पी. स्किम योजना क्र. 6 वर 55 हरकती व सूचना आल्या आहेत. तर फुरसुंगीमधील योजना क्र. 9 वर 155 हरकती व सूचना आल्या आहेत.
या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन अंतिम अहवाल तयार करून शहर सुधारणा समिती आणि मुख्य सभ्येच्या मान्यतेने तो शासनाच्या नगर रचना विभागाकडे (Town Planning Department) सादर करण्यात येणार आहे.
या प्रक्रियेला मान्यता देण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाने शहर सुधारणा समितीपुढे ठेवला आहे. यापैकी उरूळी देवाची येथील योजना क्र. 6 ही 109. 78 हेक्टरवर राबविण्यात येणार असून योजना क्र.9 ही 260.67 हेक्टर क्षेत्रावर राबविली जाणार आहे.

Petrol-Diesel Price | राज्यात पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त 

Categories
Breaking News Commerce Political social देश/विदेश महाराष्ट्र

राज्यात पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त

राज्यातील नागरिकांना पेट्रोल डिझेल बाबत अजून दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने काल पेट्रोल आणि डिझेलचे  अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील  मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे २५०० कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. तर राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.

मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता ८० कोटी रुपये महिन्याला आणि १२५ कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. १६ जून २०२० ते ४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ७ रुपये ६९ पैसे आणि १५ रुपये १४ पैसे प्रती लिटर कर आकारात होते. मार्च आणि मे २०२० मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे १३आणि १६ रुपये अशी वाढ केली होती.

इंधनाच्या भडकलेल्या किमती आणि महागाईमुळे होरपळलेल्या जनतेला केंद्र सरकारने काल मोठा दिलासा दिला. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ८ आणि ६ रुपये प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केली. तसेच उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना घरगुती गॅसवर प्रति सिलिंडर २०० रुपये अनुदान देण्याचेही सरकारने जाहीर केले. याशिवाय किमती कमी करण्यासाठी काही उत्पादनांवरील आयात शुल्कातही कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.