Uruli Devachi | Fursungi | कचरा डेपोची जागा मनपा हद्दीत ठेऊन उरुळी व फुरसुंगी गावे वगळली | राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

Categories
Breaking News PMC social पुणे महाराष्ट्र

कचरा डेपोची जागा मनपा हद्दीत ठेऊन उरुळी व फुरसुंगी गावे  वगळली

|  राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

पुणे | महापालिका हद्दीत समाविष्ट उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावांची नगरपालिका करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान ही गावे वगळण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्याचे निर्देश राज्य सरकारने महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून दोन्ही गावातील कचरा डेपोची जागा महापालिका हद्दीत ठेऊन उर्वरित गावे महापालिका हद्दीतून वगळण्याबाबतचा प्रस्ताव सरकारला पाठवला होता. त्यानुसार सरकारने कचरा डेपोची जागा मनपा हद्दीत ठेऊन गावे वगळण्याची अधिसूचना जारी केली आहे.

राज्य सरकारच्या मान्यतेनुसार २०१७ साली नवीन ११ गावे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करण्यात आली. पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील उरुळी देवाची व फुरसुंगी या दोन गावांमधुन जाणा-या ६५ मी रुंदीच्या रिंगरोडसाठी अंदाजे ५५५ हेक्टर क्षेत्रावर नगर रचना परियोजना राबवविण्याचा प्रस्तावास महानगरपालिकेच्या  मुख्य सभेने २०१९ ला मान्यता दिली आहे.  सद्यस्थितीत दोन्ही टीपी स्कीम ना सरकारने मंजुरी दिली आहे. तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिकेकडून उक्त नगर रचना योजनांबाबत सुमारे ६० ते ७०% काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे प्रगती पथावर आहेत.

२०१८ साली पुणे महानगरपालिकेकडून शासनाचे राजपत्रात तसेच वर्तमानपत्रात इरादा प्रसिध्द करण्यात आला आहे. सदर ११ गावांचा प्रारूप विकास योजना आराखडा बनविण्याचे काम अंतिम टप्यामध्ये आहे. तथापि पुणे महानगरपालिकेत नव्याने सामाविष्ट गावातील फुरसुंगी व उरुळी देवाची या गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करणेबाबत मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दि. ०६/१२/२०२२ रोजी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत ‘सदर गावे पुणे महानगरपालिकेत असणे आवश्यक आहे’ असा नगर अभियंता विभागाचा अभिप्राय असल्याचे नगर विकास विभागाकडून तयार करण्यात आलेल्या या बैठकीच्या इतिवृतात नमूद केलेले होते. मात्र या बैठकीत मुख्यमंत्री यांनी “फुरसुंगी व उरुळी देवाची या गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यात यावी. उरुळीफुरसुंगी येथील कचरा डेपोची जागा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत ठेवण्यात यावी” असे निदेश दिले. त्यानुसार  उक्त गावांचा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतून वगळण्याबाबत अधिनियमनातील तरतुदी नुमार कार्यवाही करून तसा प्रस्ताव शासनास तात्काळ उपलब्ध करून दयावेत असे कळविले होते. 
पुणे महानगरपालिकेमधील फुरसुंगी व उरुळी देवाची या गावांमध्ये नागरी सेवा सुविधांसाठी लागणारी आरक्षणे आणि सक्षम अशा रस्त्यांचे जाळे यांचा अभाव दिसून येतो. या गावांमध्ये नागरीकारणाचा वेग झपाट्याने वाढत असून यामुळे सदर गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंठेवारी स्वरुपाची बांधकामे झालेली होती. २०१७ मध्ये उक्त गावे पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर आजतागायत या गावांमध्ये तीन प्रारूप नगर रचना योजना, प्रारूप विकास आराखडा, रस्ते, पाणी पुरवठा वाहिन्या, जलशुद्धीकरण प्रकल्प योजना, मल:निसारण योजना वाहिन्या, शैक्षणिक व आरोग्य विषयक सुविधा पुरविण्याची कामे पुणे महानगरपालिकेकडून चालू आहेत. नवीन समाविष्ट ११ गावांमध्ये पाणी पुरवठा वाहिन्या, जलशुद्धीकरण प्रकल्प योजना, मल: निसारण योजना वाहिन्या विकसित करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून सन २०२२-२३ च्या व त्यापूर्वीच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली असून या विकासकामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. उपरोक्त पार्श्वभूमीवर मा. मुख्य सभा ठराव क्र. ५३५ दि.१८/१२/२०१३ अन्वये सदर गावे समावेश करणेस मा. मुख्य सभेकडून मान्यता देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे यापुर्वीच पुणे महानगरपालिकेकडून या गावांचा समावेश करणेबाबत अभिप्राय शासनास सादर करण्यात आलेला होता. सदर गावे समावेश करणेबाबत शासन निर्णयानंतर उरुळी देवाची व फुरसुंगी या गावामध्ये समाविष्ठ ११ गावांपैकी सुमारे ७.७८% क्षेत्रावर नगर रचना योजनेचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित ९२.२२% क्षेत्रावरील प्रारूप विकास आराखड्याचे काम देखील अंतिम टप्यात आले आहे.

असे असले तरी मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार  मौजे उरुळी देवाची व मौजे फुरसुंगी येथील पुणे महानगरपालिकेची कचरा डेपोची जागा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत ठेऊन उर्वरित भाग पुणे महानगरपालिका हद्दीतून वगळणेबाबतचा प्रस्ताव  शासनास सादर करणे आवश्यक होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव शहर सुधारणा समिती मार्फत मुख्य सभेची मान्यता घेऊन प्रस्ताव सरकारला पाठवला होता. त्यानुसार सरकारने गावे वगळण्याची अधिसूचना जारी केली आहे.

Uruli Devachi and Fursungi | कचरा डेपोची जागा मनपा हद्दीत ठेऊन उरुळी व फुरसुंगी गावे वगळली जाणार! | मुख्य सभेसमोर प्रस्ताव 

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

कचरा डेपोची जागा मनपा हद्दीत ठेऊन उरुळी व फुरसुंगी गावे वगळली जाणार!

| मुख्य सभेसमोर प्रस्ताव

पुणे | महापालिका हद्दीत समाविष्ट उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावांची नगरपालिका करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान ही गावे वगळण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्याचे निर्देश राज्य सरकारने महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करून शहर सुधारणा समितीच्या माध्यमातून मुख्य सभेसमोर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार दोन्ही गावातील कचरा डेपोची जागा महापालिका हद्दीत ठेवली जाणार आहे. उर्वरित गावे महापालिका हद्दीतून वगळली जाणार आहेत. या प्रस्तावावर येत्या मुख्य सभेच्या बैठकीत चर्चा होईल. (PMC Pune)
मुख्य सभेसमोरील प्रस्तावानुसार राज्य सरकारच्या मान्यतेनुसार २०१७ साली नवीन ११ गावे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करण्यात आली. पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील उरुळी देवाची व फुरसुंगी या दोन गावांमधुन जाणा-या ६५ मी रुंदीच्या रिंगरोडसाठी अंदाजे ५५५ हेक्टर क्षेत्रावर नगर रचना परियोजना राबवविण्याचा प्रस्तावास महानगरपालिकेच्या  मुख्य सभेने २०१९ ला मान्यता दिली आहे.  सद्यस्थितीत दोन्ही टीपी स्कीम ना सरकारने मंजुरी दिली आहे. तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिकेकडून उक्त नगर रचना योजनांबाबत सुमारे ६० ते ७०% काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे प्रगती पथावर आहेत. (Uruli devachi and Fursungi)
२०१८ साली पुणे महानगरपालिकेकडून शासनाचे राजपत्रात तसेच वर्तमानपत्रात इरादा प्रसिध्द करण्यात आला आहे. सदर ११ गावांचा प्रारूप विकास योजना आराखडा बनविण्याचे काम अंतिम टप्यामध्ये आहे. तथापि पुणे महानगरपालिकेत नव्याने सामाविष्ट गावातील फुरसुंगी व उरुळी देवाची या गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करणेबाबत मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दि. ०६/१२/२०२२ रोजी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत ‘सदर गावे पुणे महानगरपालिकेत असणे आवश्यक आहे’ असा नगर अभियंता विभागाचा अभिप्राय असल्याचे नगर विकास विभागाकडून तयार करण्यात आलेल्या या बैठकीच्या इतिवृतात नमूद केलेले आहे. मात्र या बैठकीत मुख्यमंत्री यांनी “फुरसुंगी व उरुळी देवाची या गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यात यावी. उरुळी, फुरसुंगी येथील कचरा डेपोची जागा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत ठेवण्यात यावी” असे निदेश दिले. त्यानुसार  \उक्त गावांचा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतून वगळण्याबाबत अधिनियमनातील तरतुदी नुमार कार्यवाही करून तसा प्रस्ताव शासनास तात्काळ उपलब्ध करून दयावेत असे कळविले होते. (Pune Municipal Corporation)
पुणे महानगरपालिकेमधील फुरसुंगी व उरुळी देवाची या गावांमध्ये नागरी सेवा सुविधांसाठी लागणारी आरक्षणे आणि सक्षम अशा रस्त्यांचे जाळे यांचा अभाव दिसून येतो. या गावांमध्ये नागरीकारणाचा वेग झपाट्याने वाढत असून यामुळे सदर गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंठेवारी स्वरुपाची बांधकामे झालेली होती. २०१७ मध्ये उक्त गावे पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर आजतागायत या गावांमध्ये तीन प्रारूप नगर रचना योजना, प्रारूप विकास आराखडा, रस्ते, पाणी पुरवठा वाहिन्या, जलशुद्धीकरण प्रकल्प योजना, मल:निसारण योजना वाहिन्या, शैक्षणिक व आरोग्य विषयक सुविधा पुरविण्याची कामे पुणे महानगरपालिकेकडून चालू आहेत. नवीन समाविष्ट ११ गावांमध्ये पाणी पुरवठा वाहिन्या, जलशुद्धीकरण प्रकल्प योजना, मल: निसारण योजना वाहिन्या विकसित करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून सन २०२२-२३ च्या व त्यापूर्वीच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली असून या विकासकामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. उपरोक्त पार्श्वभूमीवर मा. मुख्य सभा ठराव क्र. ५३५ दि.१८/१२/२०१३ अन्वये सदर गावे समावेश करणेस मा. मुख्य सभेकडून मान्यता देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे यापुर्वीच पुणे महानगरपालिकेकडून या गावांचा समावेश करणेबाबत अभिप्राय शासनास सादर करण्यात आलेला होता. सदर गावे समावेश करणेबाबत शासन निर्णयानंतर उरुळी देवाची व फुरसुंगी या गावामध्ये समाविष्ठ ११ गावांपैकी सुमारे ७.७८% क्षेत्रावर नगर रचना योजनेचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित ९२.२२% क्षेत्रावरील प्रारूप विकास आराखड्याचे काम देखील अंतिम टप्यात आले आहे. (PMC Pune News)
असे असले तरी मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार उरुळी देवाची व मौजे फुरसुंगी येथील पुणे महानगरपालिकेची कचरा डेपोची जागा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत ठेऊन उर्वरित भाग पुणे महानगरपालिका हद्दीतून वगळणेबाबतचा प्रस्ताव  शासनास सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव शहर सुधारणा समिती मार्फत मुख्य सभेसमोर मान्यता मिळणेसाठी ठेवला आहे. यावर आगामी बैठकीत चर्चा होईल.  (PMC Pune)

Uruli Devachi and Fursungi | उरुळी देवाची आणि फुरसुंगी महापालिकेतच राहू द्या | महापालिका राज्य सरकारला देणार आपला अभिप्राय

Categories
Breaking News PMC पुणे

उरुळी देवाची आणि फुरसुंगी महापालिकेतच राहू द्या

| महापालिका राज्य सरकारला देणार आपला अभिप्राय

पुणे | महापालिका हद्दीत समाविष्ट झालेली फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नगरपालिका करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र याबाबत अजून कुठलेही आदेश नाहीत. दरम्यान राज्य सरकारने या गावांबाबत महापालिकेकडे अभिप्राय मागितला आहे. महापालिका आयुक्तांनी नगर अभियंता यांना अभिप्राय देण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार बांधकाम विभागाने आपला अभिप्राय तयार केला आहे. त्यानुसार ही दोन्ही गावे महापालिकेतच राहू द्यावीत अशी भूमिका मांडण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्ताकडे पाठवला जाईल. यावर आयुक्तच निर्णय घेतील. अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.
पुणे महापालिका हद्दीत 2017 साली 11 गावे समाविष्ट करण्यात आली होती. यामध्ये फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांचा समावेश होता. या दोन्ही गावांची लोकसंख्या अडीच लाख इतकी आहे. दरम्यान सरकारने निर्णय घेऊन बरेच दिवस झाले असले तरी याबाबतची कुठलीही अधिसूचना काढण्यात आलेली नाही.

ही गावे महापालिकेत आल्यानंतर गेल्या पाच वर्षात सुमारे २५० कोटी रुपये या गावांमध्ये खर्च झाले आहेत. तर ३९२ कोटी रुपयांच्या मलःनिसारण प्रकल्पामध्ये या दोन्ही गावांमध्ये सुमारे ४२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच या दोन्ही गावात ३७१ हेक्टरची टीपी स्कीम शासनाने मंजूर केली आहे. पुणे महापालिकेत ३३ वर्षानंतर टीपी स्कीम होत असताना ही दोन गावे हद्दीबाहेर जात असल्याने मोठे नुकसान होणार आहे. दरम्यान फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावात मिळकतकर चुकीच्या पद्धतीने लागला असल्याने लाखो रुपयांची थकबाकी निर्माण झाली आहे. त्याविरोधात नागरिकांनी तक्रारी सुरू करून ही गावे वगळण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे झालेल्या बैठकीत ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय झाला व या दोन्ही गावांची नगर परिषद स्थापन केली जाणार आहे. ही बैठक झाल्यानंतर १५ दिवसात त्याचे आदेश निघणार होते, पण महिना उलटून गेला तरी काहीच होत झाले नव्हते. अखेर नुकतेच शासनाने महापालिकेला पत्र पाठवून ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळावीत असा मुख्यसभेत ठराव करून शासनाकडे पाठवावा असे आदेश दिला आहे.

महापालिका प्रशासनाने यासंदर्भात आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला जाणारआहे, पण त्यात ही गावे वगळू नये अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य शासनाचे प्रतिनिधी या नात्याने महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार हे अंतिम निर्णय काय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळल्यानंतर नियोजन प्राधिकरण म्हणून पीएमआरडीच्या हद्दीत त्यांचा समावेश होईल. या दोन्ही गावातील टीपी स्कीमचे नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिकेनेच काम करावे अशी अधिकाऱ्यांची भूमिका आहे, पण शासन पीएमआरडीएकडे ही जबाबदारी देऊ शकतो, अशी भीती अधिकाऱ्यांना आहे.

Municipality for Fursungi-Uruli Devachi | फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र

फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

| नवीन नगरपालिका नागरी विकासामध्ये सर्वोत्कृष्ट ठरेल

पुणे महानगरपालिका (PMC Pune) हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी (Fursungi) आणि उरुळी देवाची (Uruli Devachi) या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय आज येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतला.  ‘या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच नागरिकांच्या सहभागातून ही नगरपालिका विकास कामांमध्ये एक सर्वोत्कृष्ट ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील मालमत्ता कर व मुलभूत सोयी सुविधांबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा शासकीय निवासस्थानी बैठक झाली. बैठकीस माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह या दोन्ही गावांतील स्थानिक नागरिक उपस्थित होते. (new municipality for Fursungi-Urulidevachi)

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील नागरिकांनी आपली नगरपालिका राज्यातील एक सर्वोत्कृष्ट अशी नगरपालिका ठरावी यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसेच पुणे नगरपालिकेने या दोन्ही गावांत नागरी सुविधांशी संबंधित सुरु केलेल्या प्रकल्प, योजनामंध्ये सहकार्य देणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी समन्वयाने काम करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

या निर्णयासाठी उपस्थित फुरसुंगी आणि ऊरळी देवाची येथील नागरिकांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे आभार मानले. तसेच पुणे महानगरपालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या कचरा व्यवस्थापन तसेच अन्य नागरी प्रकल्पांमध्येही सहकार्य दिले जाईल असे सांगितले.

पुणे महानगरपालिकेमध्ये २०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यामध्ये या फुरसूंगी आणि उरूळी देवाची या गावांचा समावेश होता. या दोन्ही गावांची मिळून सुमारे अडीच लाख इतकी लोकसंख्या आहे.

Fursungi, Uruli Devachi Water Supply Scheme | फुरसुंगी, उरुळी देवाची पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाकडून २४ कोटी सात लाख मंजूर | खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांना यश

Categories
Breaking News PMC Political social पुणे

फुरसुंगी, उरुळी देवाची पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाकडून २४ कोटी सात लाख मंजूर

| खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांना यश

पुणे| मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत हवेली तालुक्यातील फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील नळ पाणी पुरवठा योजनेस शासनाने मंजुरी दिली असून त्यासाठी रुपये २४ कोटी ७ लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने या योजनेच्या मंजुरीसाठी प्रयत्नशील होत्या. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांचा पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत झाली आहे.

या योजनेसाठी २८ नोव्हेंबर २०१६ च्या शासन निर्णयान्वये रक्कम रुपये. ७२ कोटी ८८ लाख इतक्या ढोबळ किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. यात राज्य शासनाचा वाटा रक्कम रुपये ४७ कोटी सहा लाख आणि पुणे महानगरपालिकेचा वाटा रक्कम रूपये २५ कोटी ८२ लाख इतका होता. तथापि संदर्भाधीन क्र. २ येथील शासन निर्णयान्वये, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत देण्यात आलेली प्रशासकीय मंजूरी रद्द करून, या योजनेस राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत रक्कम रूपये ७५ कोटी ६५ लाख इतक्या ढोबळ किंमतीस प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे.

या प्रशासकीय मान्यतेमध्ये केंद्र शासनाचा वाटा रक्कम रुपये २४ कोटी ९१लाख, राज्य शासनाचा वाटा रक्कम रुपये २४ कोटी ९१ लाख आणि पुणे महानगरपालिकेचा वाटा रक्कम रुपये २५ कोटी ८२ लाख असा निश्चित करण्यात आला आहे. ही योजना तातडीने मंजूर होऊन या भागातील पाण्याचा प्रश्न लवकरात सोडवावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने करत होत्या. पुणे महापालिका आयुक्तांसोबत वारंवार या विषयासंदर्भातन त्यांनी बैठका घेऊन चर्चा केली आहे. याशिवाय शासनाकडे पाठपुरावा करताना संबंधित खात्याच्या मंत्र्यांची भेट आणि पत्रव्यववहारही त्यांनी अनेक वेळा केला आहे. खा. सुळे यांनी विद्यमान मुख्यमंत्र्यांनाही या कामाची आठवण करून देत दोनच दिवसांपूर्वी ट्विट केले होते.

फ़ुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गांवे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्याने या योजनेची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत IMIS प्रणालीवर नोंद होत नाही, त्यामुळे केंद्र शासनाच्या सहभागाचा निधी उपलब्ध होऊ शकत नाही. परिणामी या योजनेवर खर्च झालेला राज्य शासनाचा हिस्सा व पुणे महानगरपालिकेचा हिस्सा वगळता, योजनेची उर्वरित कामे पुर्ण करण्यासाठी केंद्र शासनाच्या हिस्स्यापोटीची रक्कम उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूरी देण्यात आलेल्या प्रगतीपथावरील आणि अपुर्ण पाणी पुरवठा योजनांची कामे पुर्ण करण्याकरिता, दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा व या कार्यक्रमांतर्गत फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील नळ पाणी पुरवठा योजनेचा (दायित्वासह) समावेश करण्याचा निर्णय ६ जून २०२२ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता. या योजनेकरिता यापुर्वी झालेला खर्च हा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत कायम ठेवून, संदर्भाधीन क्रमांक ४ येथील पत्रासोबतच्या संक्षिप्त टिप्पणी मधील या योजनेची उर्वरित कामे पुर्ण करण्यासाठी आवश्यक निधी रुपये २४ कोटी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमामधून देणे तसेच निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

TP Scheme | उरुळी देवाची  व फुरसुंगी  टीपी स्कीम | हरकती सूचनांचा अहवाल सरकारकडे पाठवला जाणार 

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

उरुळी देवाची  व फुरसुंगी  टीपी स्कीम

हरकती सूचनांचा अहवाल सरकारकडे पाठवला जाणार

 

उरुळी देवाची व फुरसुंगी i) टीपीस्कीम मधील बाह्य वळण मार्गाची रुंदी 110 मी. हून कमी करून 65 मी. करण्यासाठी मागविण्यात आलेल्या हरकती  व सूचनांवर ) सुनावणी घेऊन अंतिम अहवाल राज्य शासनाकडे ( पाठविण्यासाठीचा प्रस्ताव महापालिकेच्या  शहर सुधारणा समितीपुढे ठेवण्यात आला आहे.

महापालिका  हद्दीमध्ये चार वर्षांपुर्वी समाविष्ट करण्यात आलेल्या उरुळी देवाची व फुरसुंगी या गावांमध्ये महापालिकेच्यावतीने टी.पी.स्किम द्वारे विकास करण्याची प्रक्रिया मार्च 2019 पासून सुरू करण्यात आली आहे. दरम्यान यापुर्वी जाहीर केलेल्या इराद्यामध्ये या दोन्ही गावांच्या मध्यातून जाणार्‍या बाह्यवळण मार्गाची रुंदी 110 मी. होती. परंतू  रस्तारुंदीसाठी आवश्यक जागेची प्रकरणे न्यायालयात असून न्यायालयीन प्रक्रिया ( दिर्घ काळ सुरू राहाण्याची शक्यता आहे. यामुळे टी.पी.स्किमला वेळ लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने बाह्यवळण मार्गाची (Bypass) रुंदी 110 मी. वरून 65 मी. पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांच्या हरकती आणि सूचनाही मागवल्या आहेत. रस्ता रुंदी बदलावर उरुळी देवाची मधील टी.पी. स्किम योजना क्र. 6 वर 55 हरकती व सूचना आल्या आहेत. तर फुरसुंगीमधील योजना क्र. 9 वर 155 हरकती व सूचना आल्या आहेत.
या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन अंतिम अहवाल तयार करून शहर सुधारणा समिती आणि मुख्य सभ्येच्या मान्यतेने तो शासनाच्या नगर रचना विभागाकडे (Town Planning Department) सादर करण्यात येणार आहे.
या प्रक्रियेला मान्यता देण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाने शहर सुधारणा समितीपुढे ठेवला आहे. यापैकी उरूळी देवाची येथील योजना क्र. 6 ही 109. 78 हेक्टरवर राबविण्यात येणार असून योजना क्र.9 ही 260.67 हेक्टर क्षेत्रावर राबविली जाणार आहे.

Handa Morcha : PMC : माजी जलसंपदा राज्यमंत्री पुणे महापालिकेवर आणणार हंडा मोर्चा 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

माजी जलसंपदा राज्यमंत्री पुणे महापालिकेवर आणणार हंडा मोर्चा

: फुरसुंगी, उरुळी देवाची गावाची पाणी समस्या सोडवण्याची मागणी

पुणे : फुरसुंगी, उरुळी देवाची ही दोनही गावे तीन वर्षांपूर्वी पुणे महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून या गावांना पाणीपुरवठासुद्धा नीट होत नसल्याने नागरिकांचे खूप हाल होत आहेत. मी मंत्री असताना जलसंपदा विभागाला निर्देश देऊन कालव्याद्वारे नियमित पाणी सोडत होतो. मात्र आता नागरिक परेशान आहेत. त्यामुळे या गावांची पाणी योजना 15 दिवसांत पूर्ण नाही झाल्यास महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा राज्याचे माजी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी महापालिकेला दिला आहे.

: गावांना व्यवस्थित पाणीपुरवठा नसल्याची केली तक्रार

शिवतारे यांच्या पत्रानुसार फुरसुंगी, उरुळी देवाची ही दोनही गावे तीन वर्षांपूर्वी पुणे महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून या गावांना कुठल्याही नागरी सुविधा मिळत नसल्याने येथील लोकांच्यात तीव्र रोष आहे. त्यातच अलीकडे या गावांना पाणीपुरवठासुद्धा नीट होत नसल्याने नागरिकांचे खूप हाल होत आहेत. या गावांमध्ये ग्रामपंचायत असताना पाणीपुरवठा व्यवस्थित केला जात होता. अडचणीच्या काळात मी जलसंपदा विभागाला निर्देश देऊन कालव्याद्वारे नियमित पाणी सोडत होतो. निदान त्याद्वारे स्थानिक टैंकर्स घरोघरी पाणीपुरवठा करीत होते. दुर्दैवाने महापालिकेत गेल्यानंतर या गावांचा पाणीपुरवठा सुधारण्याऐवजी पूर्ण कोलमडून गेला आहे.

: पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नागरिकांच्या या मागण्यांचा विचार व्हावा

१) ग्रामपंचायतची जुनी पाणीयोजना आणि जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करावा जेणेकरून पाणीपुरवठा सुरळीत व्हायला मदत होईल.
२) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला मनपाकडून देय असलेला निधी लवकरात लवकर वर्ग करावा.
३) फुरसुंगी, उरुळी देवाची पाणीयोजना लवकरात लवकर पूर्ण करावी.

या बाबत १५ दिवसात समाधानकारक कार्यवाही न झाल्यास नाईलाजास्तव पुणे मनपावर हंडा मोर्चा काढण्यात येईल. त्यासाठी हे पत्र हीच नोटीस समजण्यात यावी. असा इशारा शिवतारे यांनी दिला आहे.