Vetal Tekadi Trek | शिवसेना ठाकरे गटाकडून वेताळ टेकडी ट्रेकचे आयोजन

Categories
Breaking News Political social पुणे

Vetal Tekadi Trek | शिवसेना ठाकरे गटाकडून वेताळ टेकडी ट्रेकचे आयोजन

Vetal Tekadi Trek | गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील वेताळ टेकडीचा (Vetal Tekadi) मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. टेकडी फोडून रस्ता बनवल्या जात असल्याने विविध स्तरातून या प्रकल्पाचा विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT)  विभागप्रमुख प्रविण डोंगरे (Pravin Dongre) यांनी आज वेताळ टेकडी ट्रेकचे (Vetal Tekadi Trek) आयोजन केले होते. (Vetal Tekadi Trek pune)
टेकडीवरील मारूती मंदिर (Vetal Tekadi Maruti Temple) येथे या ट्रेकची समाप्ती झाली. टेकडीचे महत्त्व समजण्यासाठी आणि पर्यावरण जनजागृती (Environment Awareness) करिता या ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. (Vetal Tekadi News)
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे  (Shivsena UBT) पक्षाचे  शहरप्रमुख गजानन थरकुडे (Gajanan Tharkude), संजय मोरे(Sanjay More), राम थरकुडे,व सूर्यकांत पवार,आकाश रेणुसे,अभिजीत धाड़ावे,निखिल ओरसे, युवराज पारेख उपस्थित होते.
यासह पर्यावरण प्रेमी सारंग यादवाडकर, डॉ.सुमिता काळे, प्रदीप घुमरे, ऍड. असीम सरवदे यांनी मार्गदर्शन केले. (Shivsena UBT Pune)
यावेळी सर्व पर्यावरणप्रेमींच्या हातात सेव्ह वेताळ टेकडी असे फलकही दिसून आले. (Pune vetal Tekadi News)
——
News Title | Vetal Tekadi Trek |  Vetal hill trek organized by Shiv Sena Thackeray group

NCP | Balbharti-paud Fata Road | विकास हवाय परंतु पर्यावरणाचे नुकसान करून नको | राष्ट्रवादीची बालभारती पौड रस्ताबाबत भूमिका

Categories
Breaking News PMC Political पुणे

विकास हवाय परंतु पर्यावरणाचे नुकसान करून नको

| राष्ट्रवादीची बालभारती पौड रस्ताबाबत भूमिका

पुणे शहरात पुणे महानगरपालिकेने वेताळ टेकडी येथे प्रस्तावित केलेल्या बालभारती ते वनाज या नव्या रस्त्याच्या कामास शहरातील पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शवला आहे. या कामामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असून वेताळ टेकडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असुन, पर्यावरणाची खूप मोठी हानी होणार आहे. यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.

शहारात विकास नक्कीच व्हायला हवाय परंतु पर्यावरणाचे नुकसान होवून नाही, ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका असुन पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते शनिवारी होणा-या टेकडी बचाव कूती समितीच्या बालभारतीपासून निघणा-या मोर्चात सहभागी होणार आहेत.

या बैठकीसाठी खा.वंदना चव्हाण, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, दीपक मानकर, रवींद्र माळवदकर, निलेश निकम , उदय महाले व पदाधिकारी उपस्थित होते.