Security In PMC : आता पुणे महापालिकेत येताना जरा काळजीच घ्या!  : नागरिक, पत्रकार, राजकीय पक्ष, मनपा कर्मचारी यांच्यासाठी नियमावली 

Categories
Breaking News PMC पुणे

आता पुणे महापालिकेत येताना जरा काळजीच घ्या!

: नागरिक, पत्रकार, राजकीय पक्ष, मनपा कर्मचारी यांच्यासाठी नियमावली

: महापालिका आयुक्तांचे आदेश जारी

पुणे : पुणे महापालिकेने किरीट सोमय्या प्रकरणापासून चांगलाच धडा घेतला आहे. महापालिका आपली सुरक्षा व्यवस्था आता अगदी चोख ठेवणार आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी एक नियमावली जारी केली आहे. नागरिक, पत्रकार, राजकीय पक्ष, मनपा कर्मचारी यांच्यासाठी ही नियमावली असेल. त्याचे पालन आता सर्वांनाच करावे लागणार आहे.

: अशी आहे नियमावली

पुणे महानगरपालिकेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचे (सर्व मनपा इमारती, शाळा, दवाखाने, उद्याने, इत्यादी ठिकाणी) रक्षण करणेसाठी सुरक्षा विभागामार्फत सुरक्षा व्यवस्था पुरविली जाते. त्याकरीता सुरक्षा जमादार, सुरक्षा रक्षक आणि खाजगी बहुउद्देशिय कामगार यांच्या नेमणुका पुणे महानगरपालिकेच्या विविध ठिकाणी करण्यात आल्या आहेत.
सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने करावयाच्या अंमलबजावणीबाबत  पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी,

– महानगरपालिका भवनाच्या आवारामध्ये कोणतेही आंदोलन/निदर्शने करण्यास प्रतिबंधीत करण्यात येत आहे. याबाबत योग्यती दक्षता सुरक्षा विभागाने घ्यावी.

– महानगरपालिकेच्या सार्वजनिक/साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी संबंधीत खात्याचे परवानगी शिवाय कोणासही मनपा भवनामध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच सार्वजनिक/साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी राजकीय पक्षाचा काही कार्यक्रम असल्यास त्याबाबत लेखी पुर्व सुचना महापालिका प्रशासनास देणे आवश्यक राहील.
– महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज करित असताना ओळखपत्र परिधान करणे/वापर करणे सक्तीचे करणेत येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या सर्व
कर्मचाऱ्यांना नागर वस्ती विभागाकडील प्रवेश व्दार व दुमजली दुचाकी पार्किग प्रवेश व्दाराने प्रवेश देण्यात यावा.
– महानगरपालिकेच्या सर्व मा. नगरसेवक/माजी नगरसेवक/स्वीकृत सभासद यांचेसाठी स्वतंत्र ओळखपत्रांची सुविधा नगर सचिव कार्यालयामार्फत करणेत यावी.
– महानगरपालिका भवनामध्ये कार्यालयीन कामासाठी आलेल्या नागरिकांना इमारतीमध्ये प्रवेश देताना त्यांचेकडील फोटो असलेले ओळखपत्र (उदा. पॅनकार्ड, आधारकार्ड, लायसन्स, मतदान ओखळ पत्र, संस्थेचे ओळखपत्र, इ.) तपासून प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आलेल्या नोंद वहीतयेताना व जाताना सुरक्षा रक्षकांनी नोंद करुन अथवा पावती देवून मुख्य इमारतीच्या मनता हॉटेल नजिकच्या प्रवेशद्वारातूनच प्रवेश देण्यात यावा.
  • महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये वेळोवेळी होणान्या सभांसाठी वारंवार येणाऱ्या पत्रकारांना जनता संपर्क अधिकारी यांचे कार्यालयामार्फत ओळखपत्र देणेची कार्यवाही करावी.
– नागरिक अथवा व्यक्ती ज्या खात्यामध्ये कामासाठी आलेला आहे. तेथील मनन अधिकारी/कर्मचारी यांनी भेट घेण्याबद्दल त्यांचेकडे गेटपास (प्रवेश पत्र) मागणी करणे आवश्यक असून, नागरिकांकडे गेटपास (प्रवेश पत्र) नसल्यास, त्यास गेट पास घेण्याची विनंती करावी.
– नागरिकांचे काम पूर्ण झाल्यास/नागरिक मनपा बाहेर जाण्यापूर्वी संबंधित अधिकारी यांनी का नागरिकाकडे असलेल्या गेटपासवर सही, पदाचा शिक्का व कार्यालय सोडण्याची वेळ, गेटपास संबंधित नागरिकास देण्यात यावा.
सदरची कार्यपध्दती मनपाच्या क्षेत्रिय कार्यालय प्रशासकीय कार्यालयामध्ये राबविण्यात यावी.
– महानगरपालिकेच्या आवारात प्रवेश करणाऱ्या चार चाकी वाहनांची तपासणी करुन वाहना द्यावा.
–  सर्व खातेप्रमुख/विभागप्रमुख यांनी त्यांचे अखत्यारित असलेल्या सर्व सुरक्षा कर्मचारी यांचेदर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवून सुरक्षेच्या कामकाजाबाबत योग्य ते आदेश देणे तसेच प्रवेशद्वारावर उसे राहण्याचे सक्त आदेश देण्यात यावेत.
– खातेप्रमुख/विभागप्रमुख यांनी त्यांचे खात्याकडे उपलब्ध करून दिलेल्या सुरक्षा का कामकाजाबाबत कसूर केल्यास तसेच आदेश न पाळणाऱ्या सुरक्षा रक्षक सेवकांवर मुख्य सुरक्षा अधिकारी यांचेमार्फत कारवाई करावी.
– सुरक्षा व्यवस्थेचे काम अखंडीत व सुरळीतपणे होणे करीता सुरक्षा रक्षक सेवकांना त्यांच्या इतर कामे न करुन घेणे बाबत खातेप्रमुख/विभागप्रमुख यांचे स्तरावर दक्षता घेण्यात यावी.

Parks : Senior KG : 1 मार्च पासून उद्यानाच्या वेळेत बदल  : शिशु वर्ग देखील सुरु राहणार 

Categories
Breaking News cultural Education PMC पुणे

1 मार्च पासून उद्यानाच्या वेळेत बदल

: शिशु वर्ग देखील सुरु राहणार

पुणे : शहरात ओमायक्रॉन (Omicron) चा प्रसार होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने (pmc officials)  उद्याने (parks)  पूर्ण वेळ सुरु ठेवली नव्हती. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर उद्यानाची वेळ सकाळी 6 ते 9 आणि सायंकाळी 5 ते 8 केली होती. मात्र आता या ही वेळेत बदल करण्यात आला आहे. ही वेळ आता वाढवण्यात आली आहे. ती वेळ आता सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 4 ते 8 अशी असेल.

: महापालिका आयुक्तांचे आदेश जारी

महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar)  यांनी हे आदेश नुकतेच जारी केले आहेत. उद्यानाच्या वेळेतील हा बदल 1 मार्च पासून लागू होईल. यामुळे मात्र लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे शहरातील सर्व माध्यमाच्या नर्सरी आणि senior KG अर्थात शिशु वर्ग देखील 1 मार्च पासून सुरु करण्यास आयुक्तांनी परवानगी दिली आहे.

Pimpari-chinchwad Mayor : Mai Dhore : PMC : पिंपरीच्या महापौरांचे पुणे महापालिकेला पत्र : मनपा कडून काम सुरु झाले नसल्याची तक्रार 

Categories
Breaking News PMC Political पुणे

बालेवाडी जवळ मुळा नदीवर पुल बांधणे व अनुषंगिक सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करा

: पिंपरी महापौरांचे पुणे मनपा आयुक्तांना पत्र

पुणे : पिंपरी चिंचवड च्या महापौर माई ढोरे यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पत्र लिहिले आहे. त्यानुसार त्यांनी बालेवाडी जवळ मुळा नदीवर पुल बांधणे व अनुषंगिक सर्व कामे पुणे महापालिकेकडून अजून सुरु झालेली नाहीत. ही कामे प्राधान्याने पूर्ण करा. अशी सूचना महापालिका आयुक्तांना केली आहे.

: पुणे मनपा कडून काम सुरु झाले नसल्याची तक्रार

महापौर माई ढोरे यांच्या पत्रानुसार  पिंपरी-चिंचवड व पुणे या दोन्ही शहरांमधील नागरिकांचे दळणवळण सुलभ, सुकर, गोयीस्करब गतिमान व्हावे तसेच वाहतुकीची समस्या दूर होऊन बाहतुक व्यवस्था अडथळ्याविना महज पार पडण्याकरिता बालेवाडी स.नं.४६/४७ जवळ मुळा नदीवर नवीन पुल बांधण्याचे दोन्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून संयुक्तपणे
प्रस्तावित आहे. तसेच पुलाचे कामकाज हे प्रत्यक्षरित्या पुणे महानगरपालिकेमार्फत पूर्ण करणेत येत आहे. पुलाचे कामकाज हे वाकड, कस्पटे बस्ती या बी.आर.टी रस्त्यालगत पूर्ण झालेले आहे. तथापि मदर पुलाचा पोहोच रस्ता (अप्रोच रोड) व पुणे महानगरपालिका हद्दीतील त्याला जोडणारे इतर रस्त्यांचे कामकाज हे अद्याप प्रत्यक्ष सुरु झालेले दिसून येत नाही. त्यामुळे  अपूर्ण अवस्थेतील पुलाचा वापर हा नागरिकांना करता येणे शक्य नाही. तेंव्हा पुणे महानगरपालिका हद्दीतील पुलाचे बांधकाम, पोहोच रस्ता (अप्रोच रोड) तसेच इतर रस्त्यांचे कामकाज हे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. तरी बालेवाडी म.नं.४६/४७ जवळ मुळा नदीवर पुल बांधणे तमेच उर्वरित अनुषंगिक सर्व कामे  प्राधान्याने पूर्ण होणेबाबत आपणांकडून संबंधितांग योग्य त्या कार्यवाहीचे तात्काळ निर्देश व्हावेत. अशी सूचना महापौर ढोरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

PMC Budget : Commissioner Vikram Kumar : अपरिहार्य कारणास्तव आयुक्त पालिकेचे बजेट 22 फेब्रुवारीला सादर करणार नाहीत 

Categories
Breaking News PMC पुणे

अपरिहार्य कारणास्तव आयुक्त पालिकेचे बजेट 22 फेब्रुवारीला सादर करणार नाहीत

: महापालिका आयुक्त आता 7 मार्च ला सादर करणार अंदाजपत्रक!

:  वाढवून मागितला अवधी

पुणे : महापालिकेचे वर्ष 2022-23 चे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त विक्रम कुमार 22 फेब्रुवारीला सकाळी 11:30 वाजता सादर करणार होते. नियमानुसार आयुक्तांनी 15 जानेवारी पर्यंत अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणे आवश्यक असते. मात्र महापालिका निवडणुकीच्या कामकाजामुळे आयुक्तांनी हा अवधी वाढवून मागितला होता. मात्र आयुक्तांनी पुन्हा एकदा कालावधी वाढवून मागितला आहे. 22 फेब्रुवारी च्या ऐवजी 7 मार्च ला बजेट सादर करण्याबाबत प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समिती समोर ठेवला होता. त्याला बुधवारच्या समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
: 15 जानेवारी पर्यंत अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणे आवश्यक
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ९५ नुसार महानगरपालिकेचे महसूली, भांडवली इ. उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक आराखडा (“अ” व “क’) अंदाजपत्रक १५ जानेवारी अगर तत्पूर्वी स्थायी समितीस सादर करणे आवश्यक आहे. त्यांनतर स्थायी समिती अध्यक्ष त्यात बदल करून बजेट मुख्य सभेला सादर करतात. मुख्य सभेत चर्चा होऊन हे बजेट 31 मार्च पूर्वी मंजूर होणे आवश्यक असते. त्यांनतर त्यावर अंमल करता येतो. दरम्यान महापालिका आयुक्तांनी बजेट सादर करण्याची तयारी सुरु केली होती. सर्व विभागाकडून आयुक्तांनी याबाबतची माहिती मागवली होती. मात्र महापालिका निवडणूक तोंडावर आहे. या निवडणुकीच्या कामकाजासाठी आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर करण्याचा अवधी वाढवून मागितला होता. त्यानुसार वर्ष 2022-23 चे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त विक्रम कुमार 22 फेब्रुवारीला सकाळी 11:30 वाजता सादर करणार होते. तसा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समिती समोर ठेवला होता. त्यास मंजुरी देखील देण्यात आली होती. मात्र महापालिका आयुक्तांनी पुन्हा कालावधी वाढवून मागितला आहे. 22 फेब्रुवारी च्या ऐवजी 7 मार्च ला बजेट सादर करण्याबाबत प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समिती समोर ठेवला होता. त्याला बुधवारच्या समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

GRC : PMC Commissioner : सानुग्रह मदतीसाठी महापालिकेच्या तक्रार निवारण समितीकडे अपील करा 

Categories
Breaking News PMC पुणे

सानुग्रह मदतीसाठी महापालिकेच्या तक्रार निवारण समितीकडे अपील करा

: महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे नागरिकांना आवाहन

पुणे : कोव्हीड-१९ ने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह मदत देण्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे पुणे महानगरपालिकेकडे अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यातील काही अर्ज नामंजूर झाले आहेत. ज्या अर्जदारांना त्यांचा अर्ज नामंजूर केल्याबाबत संदेश आला असेल किंवा ऑनलाईन प्रणालीमध्ये अर्ज नाकारल्याचे दिसत असेल त्या सर्व अर्जदारांनी ऑनलाईन प्रणालीमध्ये ‘Appeal to GRC’ हा पर्याय निवडून तक्रार निवारण समिती (GRC) कडे अपील करण्याचे आवाहन आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.

: वारसांना ५०,०००/- सानुग्रह मदत देण्याचे निर्देश

महाराष्ट्र शासनाद्वारे कोव्हीड-१९ ने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना ५०,०००/- सानुग्रह मदत देण्याचे निर्देश दिले असुन त्यानुषंगाने ऑनलाईन प्रणालीद्वारे प्राप्त अर्जाचे निराकरण करण्याचे काम पुणे मनपामार्फत सुरु आहे. कोव्हीड – १९ ने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह मदत वितरीत करणेसाठी प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने अर्जदारांकडून प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. कोव्हीड-१९ ने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह मदत देण्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे पुणे महानगरपालिकेकडे आतापर्यंत एकूण १४,३८३ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ८७७१ अर्ज मंजूर व २६०६ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. ज्या अर्जदारांना त्यांचा अर्ज नामंजूर केल्याबाबत संदेश आला असेल किंवा ऑनलाईन प्रणालीमध्ये अर्ज नाकारल्याचे दिसत असेल त्या सर्व अर्जदारांनी ऑनलाईन प्रणालीमध्ये ‘Appeal to GRC’ हा पर्याय निवडून तक्रार निवारण समिती (GRC) कडे अपील करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.

MLA Madhuri Misal : PMC : आमदार माधुरी मिसाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे अधिकारी आणि ठेकेदाराची ‘ही’ केली तक्रार

Categories
Breaking News PMC Political पुणे

मला विचारात न घेता परस्पर दुसऱ्या कामाला निधी वर्ग केला

: आमदार माधुरी मिसाळ यांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार

पुणे : भाजपच्या पर्वती विधानसभा मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांची महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. पथ विभागाकडून मिळालेला  निधी मला विचारात न घेता परस्पर दुसऱ्या कामाला वर्ग केला आहे. असा आरोप आमदार मिसाळ यांनी केला आहे. शिवाय या कामाची दक्षता समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी देखील मिसाळ यांनी आयुक्तांकडे केली आहे.

: काय म्हणतात आमदार?

मला पुणे मनपा कडून मिळालेला निधी क्र. CE20A1249/A6-503 (पथ विभाग) हा निधी मला विचारात न घेता परस्पर दुसऱ्या कामाला वर्ग केला आहे. आणि पुणे मनपा ने मी सुचवलेल्या कामाची वर्क ऑर्डर झाल्यांनतर अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने दुसऱ्या कामासाठी खर्च केला आहे त्या कामाची दक्षता समिती मार्फत चौकशी करून मला माहिती मिळावी.

Abhay yojna : PMC : अभय योजनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरु! : फक्त निवासी मिळकतींसाठी योजना 

Categories
Breaking News PMC पुणे

अभय योजनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरु!

: फक्त निवासी मिळकतींसाठी योजना

पुणे : महापालिकेने निवासी मिळतीसाठी अभय योजना लागू केली आहे. 1 कोटी पर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारासाठी ही योजना राबवबयात येत आहे. या योजनेची मुदत 26 जानेवारी पर्यंत होती. ती आता वाढवून 28 फेब्रुवारी करण्यात आली आहे. स्थायी समितीने हा निर्णय घेतला होता. शिवाय ही योजना सर्वासाठी लागू करावी, असे ही समितीने म्हटले होते. मात्र त्यावर अजून प्रशासनाकडून अंमल करण्यात आलेला नव्हता. आयुक्तांनी आता या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. आजपासून म्हणजे 9 फेब्रुवारी पासून यावर अंमल सुरु झाला आहे. मात्र ही ही योजना निवासी मिळकतींसाठीच असेल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत महापालिकेने जाहीर आवाहन देखील केले आहे.

: काय आहे महापालिकेचे जाहीर आवाहन

मिळकतकर थकबाकी वसुली अभय योजना २०२१-२२ जाहीर आवाहन
मिळकतकराची रक्कम न भरल्याने अधिनियमातील तरतुदीनुसार नियम ४१ नुसार शास्तीची आकारणी केलेली असल्याने ती माफी करणेबाबत खालीलप्रमाणे अभय योजना जाहीर करणेत येत आहे. पुणे शहरातील निवासी मिळकतींवर मिळकत कराची रक्कम १ कोटी व त्यापेक्षा कमी थकबाकी आहे. अशा मिळकतींवरील कराची थकीत बाकी वसुल करणेसाठी एकरकमी संपूर्ण रक्कम (थकबाकीसह) मिळकतदारांनी दिनांक ९/०२/२०२२ ते दि.२८/०२/२०२२ अखेर या कालावधी दरम्यान भरल्यास, भरणा दिनांकापर्यंत आकारण्यात आलेल्या एकुण २% शास्ती रकमेच्या ७५% शास्ती रक्कमेस माफी देऊन शिल्लक रक्कम भरून घेणेत येईल. तरी पुणे शहरातील ज्या निवासी मिळकतीवर मिळकत कर रक्कम १ कोटी व त्यापेक्षा कमी थकबाकी आहे. अशा मिळकतकर थकबाकीदारांनी त्यांचे मिळकतकराची थकीत बाकी एकरकमी सवलतीच्या दराने पुणे मनपाचे सर्व क्षेत्रीय, संपर्क कार्यालयातील नागरिक सुविधा केंद्र तसेच आयसीआयसीआय, एचडीएफसी, कॉसमॉस, बँक ऑफ महाराष्ट्र व इतर पुणे मनपाशी संलग्न असणाऱ्या बँकेच्या पुणे शहरातील सर्व शाखांमध्ये भरता येईल. तसेच ऑनलाईन पेमेंटसाठी www punecorporation.org. propertytax@punecorporation org या वेबसाईटवरून भरावे. २% शास्ती रकमेवर देण्यात आलेल्या ७५ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, ही विनंती.

Merged 23 Villages : PMC : समाविष्ट 23 गावांतील 626 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार

Categories
Breaking News PMC पुणे

समाविष्ट 23 गावांतील 626 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार

: महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे : राज्य सरकारच्या(State Gov) निर्देशानुसार महापालिका(pune corporation) हद्दीत 23 गावाचा समावेश करण्यात आला आहे. गावे समाविष्ट करताना गावातील कर्मचारी देखील विविध क्षेत्रीय कार्यालयात(ward offices) कामावर रुजू करून घेण्यात आले होते. मात्र त्यातील सुमारे 626 कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने नियमबाह्य ठरवले आहे. त्यामुळे त्यांना कामावरून कमी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी(PMC Commissioner) प्रशासनाला दिले आहेत.

: जिल्हा परिषदेने ठरवले नियमबाह्य

महापालिका हद्दीत एकूण 34 गावांचा समावेश झाला आहे. त्यातील 23 गावे नुकतीच महापालिका हद्दीत आली आहेत. मात्र ही गावे महापालिका हद्दीत येण्या अगोदर काही दिवसापूर्वी ग्रामपंचायत मध्ये कर्मचाऱ्यांची नियमबाह्य भरती करण्यात आली होती. हे सर्व कर्मचारी महापालिका सेवेत घेण्यात आले होते. त्यांना विविध क्षेत्रीय कार्यालयात ररुजू करून घेण्यात आले होते. मात्र याची चौकशी जिल्हा परिषदेकडून करण्यात आली आहे. त्यानुसार सुमारे 626 कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने नियमबाह्य ठरवले आहे. त्यामुळे त्यांना कामावरून कमी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत.
ग्रामपंचायत                 कमी केले जाणारे कर्मचारी
सुस                                40
बावधन बुद्रुक.                   55
किरकटवाडी                      5
कोंढवे-धावडे                     64
न्यू कोपरे                          40
नांदेड                                37
खडकवासला                     56
नऱ्हे                                   85
होळकरवाडी                       37
औताडे हांडेवाडी                   28
वडाचीवाडी                        14
नांदोशी सणसनगर               19
मांगडेवाडी                          36
भिलारेवाडी                         15
गुजर निंबाळकरवाडी              34
जांभूळवाडी कोळेवाडी           45
वाघोली                               6

PMC : Parks : Swimming Tank : उद्याने आणि जलतरण तलाव खुले करण्याच्या आदेशावरून महापालिकेचा गोंधळ 

Categories
Breaking News PMC पुणे

उद्याने आणि जलतरण तलाव खुले करण्याच्या आदेशावरून महापालिकेचा गोंधळ

पुणे : शहरातील उद्याने मंगळवारपासून सकाळी ६ ते ९ दरम्यान खुली राहणार असल्याचे महापालिकेने आज जाहीर केले. मात्र, जलतरण तलाव हे फक्त राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सरावासाठीच उघडले जातील, असे म्हटल्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांची घोषणा हवेतच विरल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच १८ वर्षाच्या आतील जलतरणपटूंसाठी कोणते धोरण असेल, याबाबतही महापालिकेने स्पष्टता न केल्यामुळे संभ्रम वाढला आहे.

आदेशात स्पष्टता नाही

कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांनी उद्याने उघडण्याबाबत सूतोवाच केले होते. त्यानुसार महापालिकेने आदेश काढला आहे. त्यानुसार शहरातील सर्व उद्याने मंगळवारपासून सकाळी ६ ते ९ दरम्यान उघडी राहतील. उद्याने सुरू राहवीत, यासाठी व्यायामप्रेमी नागरिकांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. यापार्श्वभूमीवर हे आदेश काढण्यात आले आहेत. तसेच शहरातील जलतरण तलाव हे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळडूंच्या सरावासाठीच खुले राहणार आहेत. त्या खेळाडूंचे लसीचे दोन डोस झालेले असतील, त्यांनाच तेथे प्रवेश दिला जाणार आहे. दुसऱ्या डोसनंतर १४ दिवस झाले असतील तरच त्यांना प्रवेश मिळेल. तसेच शहरातील सर्व खुली मैदानेही व्यायामप्रेमींसाठी मंगळवारपासून खुली होतील. महापालिकेने काढलेले आदेश पुणे आणि खडकी कॅंटोन्मेंट बोर्डांनाही लागू असतील, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

आदेशामुळे जलतरणपटूंमध्ये संभ्रम

दोन डोस झालेल्या सर्वांसाठी जलतरण तलाव खुले करण्यात येतील, असे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते. मात्र, महापालिकेने या बाबत काढलेल्या आदेशात जलतरण तलाव फक्त खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्या सरावासाठीच खुले राहतील, असे म्हटले आहे. त्यामुळे जलतरणपटूंमध्ये या बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच १८ वर्षाखालील खेळाडंचा एकही डोस झालेला नसेल तर, त्यांना प्रवेश दिला जाणार का, या बाबतही महापालिकेच्या आदेशात स्पष्टता नसल्याचे दिसून आले.

PMC: Labour payments: ठेकेदाराकडील कामगारांना वेळेत वेतन देण्याचे आदेश : महापालिका आयुक्तांनी खाते प्रमुखांना सुनावले

Categories
Breaking News PMC पुणे

ठेकेदाराकडील कामगारांना वेळेत वेतन देण्याचे आदेश

: महापालिका आयुक्तांनी खाते प्रमुखांना सुनावले

पुणे : महापालिकेत ठेकेदाराकडे काम करणाऱ्या कामगारांना वेळेवर वेतन दिले जात नाही. याबाबत कामगारांच्या तसेच नगरसेवकांच्या देखील तक्रारी आहेत. मुख्य सभेत देखील यावर चर्चा होते. असे असताना देखील टेंडरची मुदत संपल्यानंतर देखील नवीन टेंडर काढले जात नाही. त्यामुळे कामगारांना वेळेवर वेतन मिळत नाही. याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी खाते प्रमुखांना सुनावले आहे. शिवाय यापुढे टेंडर प्रक्रिया संपण्यापूर्वी नविन टेंडरची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून ठेकेदाराकडील कामगारांचे महिनेमाहचे वेतन वेळेत देण्याची दक्षता घेण्यात यावी. असे आदेश आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत.

: आदेशात आयुक्त काय म्हणतात?

माझे असे निदर्शनास आले आहे की, बहुतांश खात्यांमध्ये/विभागामध्ये टेंडर प्रक्रिया राबविताना सदर टेंडरची मुदत संपल्यानंतरही नवीन टेंडर प्रक्रिया करण्यात आली नाही किंवा करण्यात येत नाही. या कारणास्तव बहुतांशी खात्याकडील ठेकेदाराकडील कामगारांचे महिनेमाहचे वेतन विहीत वेळेत आदा केले जात नाही. वरील बाब विचारात घेता, असे सूचित करण्यात येते की, यापुढे टेंडर प्रक्रिया संपण्यापूर्वी नविन टेंडरची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून ठेकेदाराकडील कामगारांचे महिनेमाहचे वेतन वेळेत देण्याची दक्षता घेण्यात यावी. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित खातेप्रमुख यांचेवर राहील, याची नोंद घेण्यात यावी.