Water tanker : Baburao Chandere: सुस व म्हाळुंगे गावांना टँकर द्वारे पाणीपुरवठा पूर्ववत सुरु करा

Categories
Breaking News PMC Political पुणे

सुस व म्हाळुंगे गावांना टँकर द्वारे पाणीपुरवठा पूर्ववत सुरु करा

: नगरसेवक बाबुराव चांदेरे यांची आयुक्ताकडे मागणी

पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांपैकी सुस व म्हाळुंगे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची खुप मोठी समस्या निर्माण झालेली होती. त्या अनुषंगाने या परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची अडचण दुर व्हावी या करिता पुणे महानगरपालिकेने तरतूद उपलब्ध करून सुस व म्हाळुंगे या दोन्ही गावांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यास सुरुवात केली. परंतु सध्या हे टँकर प्रशासनाने बंद केले आहेत .
     या संदर्भात स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन देऊन सदर गावांतील पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवठा पुन्हा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.

PMC : Recycled water : बिल्डर आणि मॉल धारकांना प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक 

Categories
Breaking News PMC पुणे

बिल्डर आणि मॉल धारकांना प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक

: महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे : महाराष्ट्र जल नियामक मंडळाकडून सातत्याने दिल्या जात असलेल्या निर्देशानुसार पुणे महानगरपालिकेने मैलाजलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी बांधकामासाठी वापरणे बंधनकारक करण्याकरिता आदेश कालपासून लागू केले आहे. त्यानुसार पुणे शहरातील सर्व बांधकामे तसेच बॅच मिक्स प्लांट येथे सर्व संबंधित व्यावसायिकांनी नजीकच्या पुणे महानगरपालिकेच्या अथवा खाजगी मैलापाणीशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी वापरायचे आहे. तसेच मॉलधारकांना कुलिंग टॉवर साठी देखील प्रक्रिया केलेले पाणीच वापरावे लागणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश नुकतेच जारी केले आहेत.

: असे आहेत आदेश

 पुणे महानगरपालिकेच्या मैलापाणीशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी बांधकामासाठी व बॅच मिक्ससाठी आय एस ३०२५ व आय एस ४५६ या अभियांत्रिकी मानकानुसार योग्य असल्याची खातरजमा करण्यात आलेली आहे. खाजगी मैलापाणीशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी वरील मानकानुसार बांधकामासाठी योग्य असल्याचे संबंधित व्यावसायिकाने तपासून घ्यावे. कोणत्याही परिस्थितीत बांधकामे व बांधकाम पूरक व्यवसायात पिण्याचे पाणी व भूगर्भातील पाण्याचा उपसा करून पाणी वापरावयाचे नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. तसेच पुणे शहरात असलेल्या अनेक मॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर कुलिंग टोवर्स वापरली जातात त्यासाठी सुद्धा सर्व मॉल धारकांनी पुणे महानगरपालिकेच्या नजीकच्या मैलाजलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणीच वापरायचे आहे. तरी सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व बॅच मिक्स प्लांट येथे सर्व संबंधित व्यावसयिक व सर्व मॉल-धारक नजीकच्या पुणे महानगरपालिकेच्या/ खाजगी मैलाजलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी वापरत आहेत अगर कसे याची पाहणी करून त्याचा पाक्षिक अहवाल प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने आमचेकडे सादर करावा. तसेच बांधकाम विकास विभागातील अभियंत्यांनी त्यांच्या भागातील विकास कामांवर नजीकच्या पुणे महानगरपालिकेच्या/खाजगी मैलाजलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी वापरले जात आहे अगर कसे याची पाहणी करून त्याचा पाक्षिक अहवाल आमचेकडे सादर करावा, ज्या खाजगी मैलापाणीशुद्धीकरण केंद्रातील पाण्याचा बांधकामासाठी पुनर्वापर करण्यात येणार आहे. त्या संबंधित सोसायटीला प्रक्रिया केलेल्या पाण्याचे नमुने आय एस ३०२५ व आय एस ४५६ या अभियांत्रिकी मानकानुसार दर चार महिन्यांनी तपासून घेण्यास सांगून त्याचा अहवाल

मलनिस्सारण देखभाल दुरुस्ती विभागाने सादर करावा. खाजगी मिळकती मधील अकार्यक्षम मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांचे सर्वेक्षण करून ते कार्यान्वित करण्यासाठी मलनिस्सारण प्रकल्प विभागाने कार्यवाही करावी व त्याचा अहवाल सादर करावा. या कार्यालयीन परिपत्रकानुसार लोकांमध्ये याबाबत जागृती करण्यात यावी व तसेच त्यांना मार्गदर्शन व आवश्यक त्या सुचना सातत्याने देण्यात याव्यात. असे आदेशात म्हटले आहे.

Sunil Tingare : Vadgaonsheri works : पोरवाल रस्त्याच्या पर्यायी रस्त्याची समस्या लवकरच सुटणार : आमदार सुनील टिंगरे

Categories
PMC Political पुणे

पोरवाल रस्त्याच्या पर्यायी रस्त्याची समस्या लवकरच सुटणार : आमदार सुनील टिंगरे

मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्यासोबत आमदारांनी रस्त्याची पाहणी केली

एयर फोर्स परिसरातून ड्रेनेज लाइन टाकण्यास एयर फोर्सची परवानगी

पुणे : रहदारीसाठी अतिशत व्यस्त झालेल्या धानोरी-लोहगांव परिसरातील पोरवाल रस्त्यासाठी पर्यायी रस्त्याची अत्यंत आवश्यकता आहे. या पर्यायी रस्त्याचे रखडलेले काम लवकर पुर्ण होण्यासाठी तसेच या कामातील अडथळे लवकर दूर करण्यासाठी मनपा आयुक्त विक्रम कुमार तसेच इतर अधिकार्‍यांनी मंगलवारी सकाळी या भागाची पाहणी केली. वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरे यांच्या मागणीनुसार या दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या भागातील अडचणींची माहिती सुनील टिंगरे यांनी मनपा आयुक्तांना दिली. समस्या सुटण्यासाठी विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पोरवाल रस्त्याच्या पर्यायी रस्त्याची समस्या लवकरच सुटणार असल्याची माहिती आमदार सुनील टिंगरे यांनी दिली.

पोरवाल रस्ता परिसरात अनेक मोठ्या सोसायट्यांची बांधकामे पूर्ण झालेली आहेत. या भागात मोठ्या संख्येने लोक राहत आहेत. अशावेळी पोरवाल रस्त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने या भागात सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणावर टै्रफिक समस्येचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या संदर्भात आमदार सुनील टिंगरे यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना पर्यायी रस्त्याची अडचण सोडविण्याची मागणी लावून धरली होती. यानुसार विक्रम कुमार यांनी मंगलवारी या परिसरामध्ये येऊन प्रत्यक्ष स्थितीची माहिती घेतली. यावेळी रस्ते विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी, नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त सुहास जगताप, येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त वैभव कडलख, एल.आर.डब्ल्यू.ए चे सभासद, या भागातील नागरिक, अशोक खांदवे, नवनाथ मोझे, राजेश साठे यावेळी उपस्थित होते. पोरवाल रस्त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध आहे. त्याचे काम अपूर्ण आहे, या रस्ता पूर्ण करण्यासाठी नियम २०५ च्या अंतर्गत नवा रस्ता दाखवून भू-संपादन करण्याची गरज आहे. हे कार्य लवकरात लवकर करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. पर्यायी रस्ता लवकरण पूर्ण करण्यासाठी इतर कामे गतीने करण्यात येणार आहेत. पोरवाल रस्ता परिसरातील नागरिकांना पानी मिळत नाही. याबाबत सुनील टिंगरे यांनी सांगितले की ऊंचीची समस्या असल्याने या भागात ऑटोमॅटिक बूस्टर लावण्यात यावे, जेणे करून या परिसरातील नागरिकांना योग्य दाबाने पुरेसा पाणी पुरवठा करणे शक्य होईल. याबाबत मनपा आयुक्तांनी लगेच त्यावर अंमल करण्याचा आदेश दिया.

लोहगाव या भागातील मनपामध्ये समावेश झालेल्या परिसरातील ड्रेनेज समस्या सोडविण्यासाठी एयरफोर्स परिसरातून ड्रेनेज लाइन टाकणे आवश्यक आहे. याबाबत एयरफोर्सची परवानगी आवश्यक आहे. याबाबत एयरफोर्स ग्रुप कॅप्टन व चीफ एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर संजय पिसे, विंग कमांडर पी. सजिनी यांच्यासोबत आमदार सुनील टिंगरे, मनपा आयुक्त विक्रम कुमार व मनपाचे अधिकारी ड्रेनेज विभागाचे प्रमुख जगदीश खानोरे, कार्यकारी अभियंता येवलेकर, उप अभियंता सुशील तायडे  यांची एयरफोर्समध्ये बैठक झाली. या बैठकीत ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी चर्चा करण्यात आली. या कामाकरिता एयरफोर्सने लेखी परवानगी देखील दिली. त्यामुळे हे कार्य लवकरच सुरू होईल. जेणेकरून नागरिकांची डे्रनेजची समस्या देखील सुटणार आहे.

राजीव गांधी हॉस्पिटल लवकरच सुरू होणार

येरवडा येथील राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल सुरू होत आहे. या कामाची पाहणी देखील यावेळी आमदार सुनील टिंगरे व मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी केली. याबाबत सुनील टिंगरे यांनी सांगितले कि हॉस्पिटलमधील कामे झालेली आहेत. काही कामे बाकी आहेत ती लवकरच पूर्ण केली जातील. ऑक्सीजन प्लांट संदर्भात देखील चर्चा करण्यात आली आहे. येथील स्थानीक नगरसेवकांसोबत अधिकार्‍यांची बैठक पुढील मंगलवारी आयोजित करण्यात आली आहे. सर्व अडचणी दूर करून हे हॉस्पिटल लवकरच नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे.
पुणे महानगरपालिका परिमंडळ वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा गलांडे, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. माया लोहार, राजीव गांधी बालरोग तज्ज्ञ डाॅ. स्वाती पाटील, वैद्यकीय अधिकारी डाॅ. शुभांगी लोकरे, येरवडा क्षेत्रिय कार्यालयाचे सह आयुक्त वैभव कडलख, नगरसेवक संजय भोसले, नगरसेविका अश्विनी लांडगे, डाॅनीयल लांडगे उपस्थित होते.

PMC : Budget : महापालिका आयुक्त 22 फेब्रुवारी ला सादर करणार अंदाजपत्रक!  

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका आयुक्त 22 फेब्रुवारी ला सादर करणार अंदाजपत्रक!

: निवडणूक कामकाजामुळे वाढवून मागितला अवधी

पुणे : महापालिकेचे वर्ष 2022-23 चे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त विक्रम कुमार 22 फेब्रुवारीला सकाळी 11:30 वाजता सादर करणार आहेत. नियमानुसार आयुक्तांनी 15 जानेवारी पर्यंत अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणे आवश्यक असते. मात्र महापालिका निवडणुकीच्या कामकाजामुळे आयुक्तांनी हा अवधी वाढवून मागितला आहे. तसा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समिती समोर ठेवला आहे.

: 15 जानेवारी पर्यंत अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणे आवश्यक

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ९५ नुसार महानगरपालिकेचे महसूली, भांडवली इ. उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक आराखडा (“अ” व “क’) अंदाजपत्रक १५ जानेवारी अगर तत्पूर्वी स्थायी समितीस सादर करणे आवश्यक आहे. त्यांनतर स्थायी समिती अध्यक्ष त्यात बदल करून बजेट मुख्य सभेला सादर करतात. मुख्य सभेत चर्चा होऊन हे बजेट 31 मार्च पूर्वी मंजूर होणे आवश्यक असते. त्यांनतर त्यावर अंमल करता येतो. दरम्यान महापालिका आयुक्तांनी बजेट सादर करण्याची तयारी सुरु केली होती. सर्व विभागाकडून आयुक्तांनी याबाबतची माहिती मागवली होती. मात्र महापालिका निवडणूक तोंडावर आहे. या निवडणुकीच्या कामकाजासाठी आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर करण्याचा अवधी वाढवून मागितला आहे. त्यानुसार वर्ष 2022-23 चे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त विक्रम कुमार 22 फेब्रुवारीला सकाळी 11:30 वाजता सादर करणार आहेत. तसा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समिती समोर ठेवला आहे. 

PMC Colonies : Dhiraj Ghate : सातव्या वेतन आयोगानुसार महापालिका कर्मचाऱ्यांचे वाढलेले घरभाडे कमी करा

Categories
PMC Political पुणे

सातव्या वेतन आयोगानुसार महापालिका कर्मचाऱ्यांचे वाढलेले घरभाडे कमी करा

: माजी सभागृह नेते धीरज घाटे यांची मागणी

पुणे :  सातवा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेतील सेवकांचे घरभाडे हे प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. यामध्ये मुख्यत्वे करून चतुर्थ श्रेणी सेवकांमध्ये याबाबत जास्त
अन्यायकारक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे पुणे मनपातील सेवकांचे वाढलेले घर भाडे हे पूर्वीप्रमाणे किंवा कमी घर भाडे आकारावे. अशी मागणी नगरसेवक आणि माजी सभागृह नेते धीरज घाटे यांनी महापालिका आयुक्त यांचेकडे केली आहे.

: घरांच्या पुरेशा सुविधा द्या

घाटे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार  पुणे मनपा स्थापन झाल्यापासून चतुर्थ श्रेणी सेवकांना मनपा वसाहतीमध्ये सदनिका दरमहा अल्प आडे आकारून वाटप केल्या होत्या. चतुर्थ श्रेणी सेवक हे गेली ५० वर्षांपेक्षा जास्त काळ या मनपा सदनिकेत रहात आहेत. मुख्यत्वे करून पुणे मनपा वसाहतीमध्ये राहणारे सेवक हे अत्यावश्यक {आरोग्य विभाग) खात्याशी निगडीत असून ते २४/७ पुणे शहराची स्वच्छता करतात. शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतात. हे सेवक जीव मुठीत घेवून पुणे शहराचे आरोग्य व पुणे शहर स्वच्छ ठेवतात. सन २०१३-१४ च्या ऑडीट रिपोर्टनुसार पुणे मनपातील सेवकांच्या घर भाड्यामध्ये तडका फड़की वाढ करण्यात आली. आता सातव्या वेतन आयोगामुळे प्रचंड प्रमाणात घरभाडे वाढ झाली आहे. त्यामुळे सेवकांमध्ये याबाबात असंतोष निर्माण झाला आहे. सदरची बाब हि अन्यायकारक आहे. पुणे मनपा वसाहतींचे बांधकाम होऊन सुमारे ४० ते ५० वर्ष पेक्षा जास्त कालावधी झाला आहे. येथील खूप इमारती या मोडकळीस आलेल्या आहेत वसाहतीमध्ये सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. काही इमारती ह्या धोकादायक आहे मागील वर्षी पुणे मनपातील चाळ विभागाकडील अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी करून सदर इमारती ह्या धोकादायक जीर्ण झालेल्या / मोडकळीस झालेल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते असा अहवाल सादर केला आहे. तरी या सेवकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व आयुक्त यांनी  प्रत्यक्षात इमारतींची पाहणी करून येथील सेवकांच्या घरांची स्थिती पहावी. ज्या प्रमाणात भाडे आकारले जाते त्या प्रमाणात घरांची स्थिती आहे का? पुरेश्या सुविधा आहे का? तरी आपण यामध्ये लक्ष घालून पुणे मनपातील सेवकांचे वाढलेले घर भाडे हे पूर्वीप्रमाणे किंवा कमी घर भाडे आकारावे. असे घाटे यांनी म्हटले आहे.

Hemant Rasne : PMC : सदाशिव पेठ-शनिवार पेठ  प्रभागाला एकक मानून  विकासकामे पूर्ण करणार : हेमंत रासने

Categories
PMC पुणे

सदाशिव पेठ-शनिवार पेठ  प्रभागाला एकक मानून  विकासकामे पूर्ण करणार

: स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांचे आश्वासन

पुणे: शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये सुरु असलेली विकासकामे येत्या दीड महिन्यांत पूर्ण करून परिसरातील रस्ते सुस्थितीत आणले जातील. अशी ग्वाही स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. सदाशिव पेठ-शनिवार पेठ या प्रभागाला एक एकक मानून विविध प्रकारची विकासकामे खात्यांतर्गत समन्वयातून पूर्ण करण्यात येणार आहेत. असे ही रासने यांनी सांगितले.

: आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्यासोबत विकास कामांची पाहणी

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या समवेत रासने यांनी शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, शनिवार पेठ आणि केळकर रस्ता परिसरात सुरू असलेल्या मेट्रो, रस्ते, समान पाणीपुरवठा योजना, मैलापाणी शुद्धीकरण आदी विकासकामांची पाहाणी केली.
नगरसेवक राजेश येनपुरे, गायत्री खडके, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, उपायुक्त अविनाश सकपाळ, पथ विभागाचे प्रमुख विजय शिंदे, मैलापाणी शुद्धीकरण विभागाचे प्रमुख संतोष तांदळे, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, नंदकुमार जगताप, आशिष म्हाडाळकर यांच्यासह माजी नगरसेवक दिलीप काळोखे, किरण जगदाळे, परेश मेहेंदळे, अमित गोखले, मनिष जाधव, दिलीप पवार, अनिल बेलकर, विनायक रासने, सौरभ रायकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
रासने म्हणाले, एप्रिल महिन्यापासून या परिसरात विविध प्रकारची विकासकामे सुरू आहेत. या कामांची गती खूपच संथ आहे. काही भागात काम झाल्यानंतर रस्ते डांबर आणि सिमेंट कॉंक्रिट टाकून बुजविले आहेत. हे काम निकृष्ट पद्धतीने झाल्याने काही भागातील रस्ते खचले आहेत. तर काही भागातील रस्त्यांची पातळी असमान झालेली आहे. त्यामुळे वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
रासने पुढे म्हणाले, गेल्या काही दिवसांपूर्वी अतिरिक्त आयुक्तांसमवेत या भागाची पाहाणी केली. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहे. परंतु प्रशासनाचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. म्हणून आज आयुक्तांसोबत पाहाणी करून त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली. पाहाणी दरम्यान समस्यांची नोंद करण्यात आली. सर्व खात्यातील समन्वयाने कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून विकासकामे पूर्ण करण्यात येतील. पुढील दीड महिन्यांत या परिसरातील सर्व विकासकामे पूर्ण होऊन रस्ते सुस्थितीत येतील अशी ग्वाही देतो.

प्रभाग विकासाचा आराखडा (मॉडेल)

सदाशिव पेठ-शनिवार पेठ या प्रभागाला एक एकक मानून विविध प्रकारची विकासकामे खात्यांतर्गत समन्वयातून पूर्ण करण्यात येणार आहेत. या प्रभागात ज्या समस्या आहेत तशाच समस्या अन्य ४१ प्रभागात आहेत. आजच्या पाहाणी दौऱ्यातून एक विकासाचा आराखडा (मॉडेल) तयार करण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी पुढील दीड महिन्यात पूर्ण करण्यात येईल. हा आराखडा अन्य प्रभागांमध्ये राबवून पुढील काळात त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे पुणेकरांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास रासने यांनी व्यक्त केला.

PMC : Vikram Kumar : विषय समित्यामधील प्रलंबित प्रस्तावावरून महापलिका आयुक्तांनी घेतला महत्वाचा निर्णय!

Categories
PMC पुणे

विषय समित्यामधील प्रलंबित प्रस्तावावर आयुक्त गंभीर

: दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेल्या प्रस्तावांची मागितली माहिती

पुणे : महापालिकेच्या वेगवेगळ्या खात्याकडून विषय समित्या समोर विकास कामाचे प्रस्ताव ठेवले जातात. मात्र त्यावर कित्येक महिने निर्णय होताना दिसून येत नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याकडे गंभीरपणे लक्ष दिले आहे. दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेल्या प्रस्तावांची माहिती आयुक्तांनी सर्व खातेप्रमुख, उपायुक्त आणि सहायक आयुक्तांना मागितली आहे. मात्र आयुक्तांचा हा सत्ताधारी भाजपाला झटका मानला जात आहे.

: सत्ताधारी काय भूमिका घेणार

महापालिकेत स्थायी समिती सर्वात महत्वाची मानली जाते. त्या खालोखाल विविध विकासकामे करण्यासाठी शहर सुधारणा समिती, क्रीडा समिती, विधी समिती, महिला बाल कल्याण समिती आणि शिक्षण समित्यांमध्ये प्रस्ताव ठेवले जातात. नगरसेवक आणि महापालिका प्रशासनाकडून हे प्रस्ताव ठेवले जातात. मात्र महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आले कि बऱ्याच विषयावर निर्णय होत नाही. त्यामुळे विकासकामे ठप्प होतात. याबाबत महापालिका आयुक्तांनी गंभीरपणे लक्ष घातले आहे. दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेल्या प्रस्तावांची माहिती आयुक्तांनी सर्व खातेप्रमुख, उपायुक्त आणि सहायक आयुक्तांना मागितली आहे. मात्र आयुक्तांचा हा सत्ताधारी भाजपाला झटका मानला जात आहे. यावर सत्ताधारी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

: अभिप्राय देण्यास उशीर करण्याबाबत आयुक्त काय करणार?

दरम्यान असे असले तरी प्रशासनाकडून देखील सभासदांच्या प्रस्तावावर लवकर अभिप्राय दिला जात नाही. यावर आयुक्त काय कारवाई करणार, याकडे ही लक्ष लागून राहिले आहे. कारण सभासद देखील विकास काम करण्याबाबत प्रस्ताव विषय समित्या समोर ठेवतात. मात्र समिती कडून काही प्रस्ताव  अभिप्राय देण्यासाठी पाठवले जातात. मात्र त्यावर ही लवकर निर्णय होत नाही. याबाबत तक्रारी करून देखील उपयोग होत नाही. याबाबत आयुक्त काय करणार, याकडे लक्ष लागले आहे.

Mask : Action Mode : खाजगी कार्यालयातही मास्क बाबत कारवाई करण्यासाठी आता आस्थापना अधिकारी   : मास्क कारवाई ची व्याप्ती वाढणार 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

खाजगी कार्यालयातही मास्क बाबत कारवाई करण्यासाठी आता आस्थापना अधिकारी

: मास्क कारवाई ची व्याप्ती वाढणार

पुणे : शहरात करोनाच्या नव्या बाधितांची संख्या वेगाने घटत असल्याने महापालिकेकडून शहरात  बंधने शिथील केलीआहेत. त्यातच सणांचे दिवस सुरू असल्याने नागरिक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले असून नागरिकांनी मास्क वापरण्याकडे दूर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे, शहरत करोनाचा प्रसार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, ही बाब लक्षात घेऊन शहरातील मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. आता पर्यंत महापालिकेचे अधिकारी मास्क बाबत कारवाई करत होते. मात्र आता हे अधिकारी खाजगी कार्यालयातील आस्थापना  अधिकाऱ्या ला देखील असणार आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश काढले आहेत.

याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरूवारी काढले आहेत. तसेच हे कारवाईचे अधिकार  महापालिकेच्या विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुखांसह महापालिकेचे सर्व उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, मुख्य तसेच उप आरोग्य निरिक्षक, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरिक्षक, अतिक्रमण निरिक्षक, परवाना निरिक्षक, मेंटनेन्स सर्वेअर, कार्यालयीन अधीक्षक यांना देण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील मास्कच्या करवाईची व्याप्ती वाढणार असून नागरिकांनी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. खाजगी कार्यालयात तेथील कार्यालय प्रमुखाने एक नामनिर्देशित अधिकारी नियुक्त करणे गरजेचे आहे. त्याने मास्क आणि लसीचे डोस पूर्ण झाले आहेत कि नाही हे देखील पाहायचे आहे.

 

असे आहेत आयुक्तांचे आदेश

– महापालिका हद्दीतील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी व औद्योगिक प्रतिनिधी अस्थापनांना कार्यरत अधिकारी, कर्मचारी तसेच कारणास्तव येणाऱ्या सर्व अभ्यंगतांनी कार्यालय व आवारात मास्क वापरणे बंधनकारक असेल
– कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्याची जबाबदारी संबधित कार्यालय प्रमुखांची राहिल.
– कार्यालयातील अधिकाऱ्यास वरील जबाबदाऱ्यांसाठी नामनिर्देशीत करावे
– नियमांचे पालन न झाल्यास संबधितांवर साथरोग नियमा अंतर्गत कारवाई केली जाईल.
– हे आदेश शहराच्या हद्दीतील दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डांना लागू राहतील.

PMC : Band :अखेर बँड वाजण्याचा मार्ग मोकळा : शहरात वाद्यांचा निनाद घुमणार

Categories
PMC पुणे

अखेर बँड वाजण्याचा मार्ग मोकळा

: शहरात वाद्यांचा निनाद घुमणार

पुणे : कोरोना परिस्थितीत सुधारणा होत असल्यामुळे बहुतांश सर्वच बाबींवरील निर्बंध उठले असताना, शुक्रवारपासून शहरातील वाद्य पथके, बॅन्ड पथके यांनाही परवानगी दिली गेली आहे. यामुळे गेली दीड- पावणे दोन वर्षे बंद असलेला वाद्यांचा निनाद आता पुन्हा घुमण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश आज जारी केले आहेत. वाद्य पथकांसह बॅन्ड पथकांना परवानगी दिली गेली असली तरी, पथकातील वाद्य वाजवणाऱ्या सर्व व्यक्तींची व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस (मात्रा) पूर्ण झालेले असणे बंधनकारक राहणार आहे. तसेच याबाबतची खात्री करण्याची जबाबदारी पथक व्यवस्थापनाची राहणार आहे. सदर आदेश हे महापालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या खडकी व पुणे कॅण्टोंमेंट बोर्डासही लागू राहणार आहेत.

shops : hotel : शहरात दुकाने ११ तर हॉटेल १२ वाजेपर्यंत सुरु राहणार 

Categories
PMC पुणे

शहरात दुकाने ११ तर हॉटेल १२ वाजेपर्यंत सुरु राहणार

: महापलिका आयुक्तांचे आदेश जारी

पुणे : शहरातील कोरोनाचा कहर कमी होताना दिसतो आहे. शहराप्रमाणे राज्यातही हे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचाच एक भाग म्हणून आता व्यापारी दुकाने आणि हॉटेल, फूड कोर्ट यांची वेळ वाढवण्यात आली आहे. पुणे शहरात आता दुकाने ११ वाजेपर्यंत तर हॉटेल १२ वाजेपर्यंत उघडी राहतील. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

:  निर्बंध शिथिल

शहरात कोरोनाचा कहर सुरु असल्याने महापलिका प्रशासनाने बऱ्याच गोष्टीवर निर्बंध लादले होते. त्याचा सर्वात जास्त फटका व्यापारी दुकाने आणि हॉटेलला बसला होता. व्यापाऱ्या कडून हे निर्बंध शिथिल करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. मात्र हे निर्बंध हटवण्यात आले नव्हते. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे निर्बंध हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता महापालिका आयुक्तांनी देखील याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आता दुकाने ११ वाजेपर्यंत तर हॉटेल १२ वाजेपर्यंत उघडी राहतील. त्याचप्रमाणे अमुझमेंट पार्क, इंडस्ट्रीज देखील २२ पासून सुरु करण्यात येतील. यामुळे सर्वाना दिलासा मिळाला आहे.