Congress | Pune | मोदी आणि शाह यांना विसरण्याचा आजार | पुणे काँग्रेसची टीका

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

मोदी आणि शाह यांना विसरण्याचा आजार | काँग्रेसची टीका

केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणेचा हुकूमशाही पद्धतीने वापर करून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात आज सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा बोलावले याच्या निषेधार्थे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज बुधवार दि. 27 जुलै 2022 रोजी सकाळी १०.०० वा., डॉ आंबेडकर पुतळा येथे “शांततापूर्ण सत्याग्रह” करण्यात आला त्यावेळी पुणे शहर प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष मोहन जोशी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा बागवे, यांच्या सह इतर सर्व कॉंग्रेस पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष मोहन जोशी ह्यांनी आंदोलनात निषेधात्मक भाषणात आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे मानसिक रोगी आहेत, त्यांना विसरण्याचा आजार झाला आहे. त्यामुळे त्यांनी जे जे वचन जनतेला दिले होते त्याच्या बरोबर विरुद्ध करण्याचे काम ते करत आहेत. त्यांनी जनतेला 2014 पेक्षा महागाई कमी करण्याचे वचन दिले होते पण आजारी मोदी हे ते विसरले आणि त्यांनी महागाई कमी करण्याऐवजी महागाई वाढवली, त्यांनी सांगितले होते की देशाची इज्जत वाढवेल त्या एवजी आजारी मोदी धडाधड सरकारी संपती विकत आहेत. आणि त्याच्या पुढे आत्ता त्यांना अजून एक रोग झाला आहे ते म्हणजे काही ही कारण नसताना गांधी घराण्यातील मंडळीना त्रास द्यायचा त्यालाच आधारून ईडी च्या माध्यमातुन राहुल गांधी आणि सोनिया गांधी ह्यांना त्रास देण्याचे कार्य सुरू आहे..

आजारी असलेले मोदी हे घृणा पूर्ण तिरस्कारपूर्ण राजकारण करत आहेत पण आम्ही तिरस्कार घृणा करणार नाही कारण आम्ही गांधी विचारांची मंडळी आहोत त्यानुसार आम्ही परमेश्वराला अशी प्रार्थना करतो हे परमेश्वरा ह्या आजारी मोदी ह्यांना बरे कर, त्यांच्या मध्ये शिरलेला भस्मासुर राक्षस बाहेर काढ आणि त्यांना सद्बुद्धी दे….

त्यांच्या समोर फक्त देशातील 2 बिजनैस मन दिसत आहेत त्यांना 130 करोड़ जनता दिसत नाही. त्यांना असे वाटते की ते केवळ दोन उद्योजकांचे पंतप्रधान आहेत तरी परमेश्वरा त्यांना बुद्धी दे आणि स्मृती दे जेणेकरून त्यांना आठवेल की पंतप्रधान म्हणुन त्यांचे कार्य 130 करोड़ जनतेसाठी आहे केवळ दोघांसाठी नाही.

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘नॅशनल हेराल्ड वर्तमान पत्राने स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिले आहेत्याच वर्तमान पत्राच्या खोट्या प्रकरणात सोनियाजी व राहुलजी यांची चौकशी केली जात आहे त्याचबरोबर काँग्रेस पक्ष महागाईबेरोजगारी सारखे सामान्य माणसांचे प्रश्न हाताळत आहे. संसदेत व संसदेबाहेर काँग्रेस पक्ष भाजपा सरकारला जाब विचारत आहे त्यामुळे ईडीसारख्या कारवायांच्या माध्यमातून दबाव आणून विरोधकांना संपवण्याचे काम केले जात आहे. सोनियाजी गांधी या देशातील गोरगरीब, सर्वसामान्य पिडीत, शोषित, वंचितांचा आवाज आहेत. त्या केंद्र सरकारच्या या दडपशाहीला भीक घालत नाही. लोकशाहीत विरोधकांना असा त्रास देण्याचे काम लोकशाहीला मारक आहे. सरकारविरोधात आवाज उठवणे हा लोकशाही परंपरेचा भाग आहे पण भाजपा सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचे काम करत आहे.’’