NCP Pune Agitation | Jayant Patil | जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ पुणे राष्ट्रवादीकडून निदर्शने 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

NCP Pune Agitation | Jayant Patil | जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ पुणे राष्ट्रवादीकडून निदर्शने

| ईडी म्हणजे भाजपची घरगडी – शहराध्यक्ष प्रशांत जगताप

NCP Pune Agitation | Jayant Patil | केंद्र सरकारच्या यंत्रणांचा (Central government Agencies) वापर करून सूडबुद्धीने विरोधकांवर कारवाई करण्याचे सत्र सध्या देशभरात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील  (NCP State President Jayant Patil) यांना समन्स जारी केल्यानंतर आज स्वतः जयंत पाटील  ईडीच्या कार्यालयात(ED Office) गेले आहेत. यावेळी जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या समर्थनार्थ पुणे शहरातील (NCP Pune) समस्त पदाधिकाऱ्यांनी बालगंधर्व रंगमंदिर चौकात निदर्शने केली व स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी इडी सारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा निषेध केला. अशी माहिती शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Pune city president Prashant Jagtap) यांनी दिली. (NCP Pune Agitation | Jayant Patil)

“सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है” , “ईडी म्हणजे भाजपचा घरगडी”, “वातावरण फिरलय , सरकार घाबरलय” , “नागपूरचा पोपट काय बोलतोय,फौजदाराचा हवलदार झालो म्हणतोय” अश्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. (NCP Pune Agitation)

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”गेल्या तीन दशकांपासून राजकारण आणि समाजकारणात सक्रिय असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आ. श्री. जयंत पाटील साहेब यांच्यावर देखील इडीची कारवाई करत त्यांचा आवाज दाबण्याचा तसेच त्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रकार केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी करू पाहत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अश्या दबावाला बळी पडणार नाही,तुम्ही जितका त्रास द्याल तितक्या जास्त ताकदीने आम्ही येत्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा देखील त्यांनी दिला. तसेच पुणे जिल्याचे जिल्हाधिकारी मा.श्री. राजेंद्र देशमुख याना निवेदन सुधा देन्यात आले. (Jayant Patil News)

आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप अंकुश काकडे, प्रदीप गायकवाड़ ,किशोर कांबळे, सदानंद शेट्टी, राकेश कामठे, अजिंक्य पालकर, मनोज पाचपुते,नितीन जाधव, महेश हांडे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.


News Title | NCP Pune Agitation | Jayant Patil Demonstrations by Pune NCP in support of Jayant Patil| ED is home of BJP – City President Prashant Jagtap

Congress | Pune | मोदी आणि शाह यांना विसरण्याचा आजार | पुणे काँग्रेसची टीका

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

मोदी आणि शाह यांना विसरण्याचा आजार | काँग्रेसची टीका

केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणेचा हुकूमशाही पद्धतीने वापर करून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात आज सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा बोलावले याच्या निषेधार्थे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज बुधवार दि. 27 जुलै 2022 रोजी सकाळी १०.०० वा., डॉ आंबेडकर पुतळा येथे “शांततापूर्ण सत्याग्रह” करण्यात आला त्यावेळी पुणे शहर प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष मोहन जोशी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा बागवे, यांच्या सह इतर सर्व कॉंग्रेस पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष मोहन जोशी ह्यांनी आंदोलनात निषेधात्मक भाषणात आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे मानसिक रोगी आहेत, त्यांना विसरण्याचा आजार झाला आहे. त्यामुळे त्यांनी जे जे वचन जनतेला दिले होते त्याच्या बरोबर विरुद्ध करण्याचे काम ते करत आहेत. त्यांनी जनतेला 2014 पेक्षा महागाई कमी करण्याचे वचन दिले होते पण आजारी मोदी हे ते विसरले आणि त्यांनी महागाई कमी करण्याऐवजी महागाई वाढवली, त्यांनी सांगितले होते की देशाची इज्जत वाढवेल त्या एवजी आजारी मोदी धडाधड सरकारी संपती विकत आहेत. आणि त्याच्या पुढे आत्ता त्यांना अजून एक रोग झाला आहे ते म्हणजे काही ही कारण नसताना गांधी घराण्यातील मंडळीना त्रास द्यायचा त्यालाच आधारून ईडी च्या माध्यमातुन राहुल गांधी आणि सोनिया गांधी ह्यांना त्रास देण्याचे कार्य सुरू आहे..

आजारी असलेले मोदी हे घृणा पूर्ण तिरस्कारपूर्ण राजकारण करत आहेत पण आम्ही तिरस्कार घृणा करणार नाही कारण आम्ही गांधी विचारांची मंडळी आहोत त्यानुसार आम्ही परमेश्वराला अशी प्रार्थना करतो हे परमेश्वरा ह्या आजारी मोदी ह्यांना बरे कर, त्यांच्या मध्ये शिरलेला भस्मासुर राक्षस बाहेर काढ आणि त्यांना सद्बुद्धी दे….

त्यांच्या समोर फक्त देशातील 2 बिजनैस मन दिसत आहेत त्यांना 130 करोड़ जनता दिसत नाही. त्यांना असे वाटते की ते केवळ दोन उद्योजकांचे पंतप्रधान आहेत तरी परमेश्वरा त्यांना बुद्धी दे आणि स्मृती दे जेणेकरून त्यांना आठवेल की पंतप्रधान म्हणुन त्यांचे कार्य 130 करोड़ जनतेसाठी आहे केवळ दोघांसाठी नाही.

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘नॅशनल हेराल्ड वर्तमान पत्राने स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिले आहेत्याच वर्तमान पत्राच्या खोट्या प्रकरणात सोनियाजी व राहुलजी यांची चौकशी केली जात आहे त्याचबरोबर काँग्रेस पक्ष महागाईबेरोजगारी सारखे सामान्य माणसांचे प्रश्न हाताळत आहे. संसदेत व संसदेबाहेर काँग्रेस पक्ष भाजपा सरकारला जाब विचारत आहे त्यामुळे ईडीसारख्या कारवायांच्या माध्यमातून दबाव आणून विरोधकांना संपवण्याचे काम केले जात आहे. सोनियाजी गांधी या देशातील गोरगरीब, सर्वसामान्य पिडीत, शोषित, वंचितांचा आवाज आहेत. त्या केंद्र सरकारच्या या दडपशाहीला भीक घालत नाही. लोकशाहीत विरोधकांना असा त्रास देण्याचे काम लोकशाहीला मारक आहे. सरकारविरोधात आवाज उठवणे हा लोकशाही परंपरेचा भाग आहे पण भाजपा सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचे काम करत आहे.’’

Congress Pune | महागाई व GST च्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच काँगेस नेत्यांना मोदी सरकार त्रास देत आहे | अरविंद शिंदे

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महागाई व GST च्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच काँगेस नेत्यांना मोदी सरकार त्रास देत आहे | अरविंद शिंदे

     अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी यांना केंद्रातील भाजपचे मोदी सरकार सूडबुध्दीने लक्ष करीत असून ईडीच्या चौकशीसाठी सातत्याने बोलवित आहेत. याच्या विरोधात प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट येथील देशभक्त कै. केशवराव जेधे यांच्या पुतळ्याजवळ शांततापूर्ण बैठा सत्याग्रह करण्यात आला.

     यावेळी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकारने घेतलेले चूकीचे निर्णय व धोरण यावरून सर्वसामान्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेस नेत्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राजकीय सूडबुध्दीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती. सोनियाजी गांधी यांना लक्ष करून ईडीच्या चौकशीसाठी बोलविले जात आहे. हे हुकूमशाही सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करीत असून या विरूध्द आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. ज्या पध्दतीने केंद्रातील मोदी सरकार आमच्या नेत्या सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांना ईडी चौकशी मार्फत त्रास देत आहे व काँग्रेस पक्षाला बदनाम करीत आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष सक्षम असावा असे काँग्रेस पक्षाला वाटते परंतु या ठिकाणी केंद्रातील भाजप सरकार हे हिटलरशाही पध्दतीने विरोधी पक्ष संपविण्याचे काम करीत आहे.’’

     यावेळी माजी आमदार उल्हास पवार, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड, संगीता तिवारी, अविनाश बागवे आदींनी आपले विचार व्यक्त केले.     तसेच यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस संजय बालगुडे, आबा बागुल, कमल व्यवहारे, बाळासाहेब दाभेकर, महिला अध्यक्षा पुजा आनंद, नगरसेविका लता राजगुरू, वैशाली मराठे, रफिक शेख, अजित दरेकर, नरेंद्र व्यवहारे, अण्णा राऊत, नीता रजपूत, रजनी त्रिभुवन, ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर, रमेश सोनकांबळे, प्रविण करपे, शोएब इनामदार, सतीश पवार, भरत सुराणा, अविनाश अडसुळ, प्रशांत सुरसे, शिलार रतनगिरी, राजू साठे, राहुल तायडे, ज्योती परदेशी, स्वाती शिंदे, सिमा महाडिक, योगिता सुराणा, ॲड. निलेश बोराटे, राजू नाणेकर, उमेश कंधारे, रामविलास माहेश्वरी, विश्वास दिघे, भगवान कडू, बाळासाहेब प्रताप, रवि मोहिते, कान्होजी जेधे, शिवराज भोकरे, अक्षय माने, वैशाली परदेशी, अनुसया गायकवाड, वाल्मिक जगताप, सुरेश कांबळे, सचिन सावंत, चेतन आगरवाल, शाबीर खान, नर.सिंह आंदोली, हनुमंत राऊत, विक्रम खन्ना, बाबा सय्यद, हेमंत राजभोज, ॲड. अश्विनी गवारे, श्रीकृष्ण बराटे, अविनाश गोतारणे, रवि पाटोळे आदी उपस्थित होते.

     सत्याग्रहाचे सूत्रसंचालन द. स. पोळेकर यांनी केले तर आभार सचिन आडेकर यांनी मानले.

Video | Anti-Inflation Movement | शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने “महागाई विरोधी आंदोलन”

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने “महागाई विरोधी आंदोलन”

केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर प्रस्तावित केलेली जी.एस.टी दरवाढ, गॅसच्या दरात झालेली वाढ,राज्य सरकारने वीज दरात केलेली वाढ या सर्व महागाईच्या आघातांच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बालगंधर्व चौक येथे “महागाई विरोधी आंदोलन” करण्यात आले.

यांत प्रतिनिधिक स्वरूपात मोदींच्या सर्वात आवडत्या प्रतिनिधी गरिबी, महागाई व बेरोजगारी यांचा वेश परिधान करून उपस्थीत होते. यावेळी बोलताना गरीबी,महागाई व बेरोजगारी यांनी सांगितले की, “गेल्या आठ वर्षात मोदीजींनी आम्हाला एकही दिवस सुट्टी दिली नाही.आमचा उपयोग करत मोदीजी देशातील जनतेला लुटत असून आम्हाला जनतेची किव येते परंतु मोदीजींना येत नाही.कृपया जनतेनेच मोदींना धडा शिकवत आमची या त्रासातून मुक्तता करावी”.

या आंदोलन प्रसंगी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”देशातील नागरिकांनी आपल्या मूलभूत गरजा भागवायच्या कश्या….? असा प्रश्न या देशातील प्रत्येक नागरिकास पडत आहे. याचं कारण आहे, जी.एस.टी परिषदेत केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातील मूलभूत वस्तू तेल, तूप, पनीर या जीवनावश्यक वस्तूंवर देखील जी.एस.टी वाढवण्याची तरतूद केली आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असं होत आहे की , अगदी मूलभूत जीवनावश्यक वस्तूंवर देखील जी.एस.टी लागल्यानंतर या गोष्टी महाग होणार आहेत. त्याचप्रमाणे घरगुती गॅसच्या किमतीत देखील तब्बल पन्नास रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे.गेल्या आठ वर्षात घरगुती गॅस जवळपास तिपटी ने वाढला असून स्वयंपाक घरातील प्रत्येक गोष्ट महाग करण्याचा केंद्रातील मोदी सरकारने जणू विडाच उचलला आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेले एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकार म्हणजेच ED सरकार देखील केंद्राच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांचा महागाईचा कित्ता गिरवत आहे. राज्यातील सरकारने सत्तेवर येतात पहिल्याच आठवड्यात वीज दरवाढीचा शॉक सर्वसामान्य नागरिकांना दिला आहे.

केंद्र व राज्य सरकार या दोघांकडून होत असणारी ही जनतेची लूट थांबावी जनतेला आपले जीवन सुसह्य व्हावे, याकरीता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हे आंदोलन घेण्यात येत आहे.

जोरदार पाऊस असताना देखील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलन उपस्थित होते. विशेषतः महिला भगीणींची मोठी संख्या आंदोलनात पाहायला मिळाली. तसेच जीवनावश्यक वस्तू, घरगुती गॅसचे दर वाढल्याने सर्व महिला भगिनींनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या आंदोलनासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप , प्रदीप देशमुख ,सुरेश गुजर ,अजिंक्य पालकर ,समिर शेख , हेमंत बघे , सागर राजे भोसले , अमोल ननावरे , नरेश पगड्डालू , शशिकला कुंभार ,प्रतिभा गायकवाड, वर्षा ढावरे ,पुजा झोळे ,मिना पवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Mai Bhi Rahul Gandhi | ‘मै भी राहुल गांधी’ हा ट्रेन्ड काँग्रेस कार्यकर्त्यांनी चालवावा |  डॉ. विश्वजीत कदम

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

‘मै भी राहुल गांधी’ हा ट्रेन्ड काँग्रेस कार्यकर्त्यांनी चालवावा |  डॉ. विश्वजीत कदम

     पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेल्या मोदी सरकारने सरकारी यंत्रणेचा गैर वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न चालविला आहे त्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे तीव्र आंदोलन केले. महाराष्ट्राचे सहकार राज्य मंत्री  डॉ. विश्वजीत कदम,  आ. प्रणिती शिंदे, आ. राजेश राठोड, आ. लहू कानडे, आ. जयंत आसगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आंदोलन पार पडले.

     यावेळी बोलताना डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, ‘‘केंद्रातील मोदी सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैर वापर करीत असून लोकशाही धोक्यात आणलीच आहे परंतु आराजकतेच्या दिशेने या देशाची वाटचाल चालू झाली आहे. याला केवळ मोदी व शहा जबाबदार आहेत. केंद्र व राज्य यांचे अत्यंत चांगले असलेले संबंध गेल्या अडिच वर्षांपासून महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर मोदीजी फक्त सूडाचे राजकारण करीत असून ई.डी., सी.बी.आय. सारख्या संस्थाचा गैरवापर करीत आहेत्‌. काँग्रेस कार्यकर्त्याने रस्त्यावर उतरून या सर्व गोष्टी जनतेपर्यंत मांडल्या पाहिजेत. काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी या सर्व गोष्टी संसदेमध्ये व बाहेर लोकांपुढे सतत मांडत आहेत म्हणूनच त्यांचा आवाज दाबण्यासाठी ई. डी. ची चौकशी लावून त्यांच्यावर दबाब आणण्याचा प्रयत्न हे मोदी शासीत केंद्र सरकार करीत आहे त्यामुळे आजपासून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वावरताना ‘मै भी राहुल गांधी’ असे लोकांपुढे जायला पाहिजे’’

     आ. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, ‘‘देशामध्ये मोदी व शहा हे लोकशाही धोक्यात आणत आहेत. सार्वजनिक संस्था विकल्यानंतर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ई. डी. चा वापर करून आपण केलेल्या चूका झाकण्याचे काम करीत आहे. राहुलजी गांधी हे या देशाचे भविष्य असून त्यांच्या सत्य बोलण्याने केंद्रातील मोदी सरकारचे पितळ उघडे पडत आहे. त्यामुळेच राहुलजी गांधी यांना टारगेट करून त्यांना ई. डी. मार्फत त्रास देण्याचे काम हे मोदी सरकार करीत आहे.’’

     यानंतर शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड आदींची भाषण झाली.

     यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, कमल व्‍यवहारे, संजय बालगुडे, गोपाळ तिवारी, सोनाली मारणे, पुजा आनंद, गटनेते आबा बागुल, नगरसेवक रविंद्र धंगेकर, लता राजगुरू, अविनाश बागवे, रफिक शेख, चंदूशेठ कदम, राहुल शिरसाट, शिवा मंत्री, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, सचिन आडेकर, शोएब इनामदार, प्रदिप परदेशी, विजय खळदकर, प्रवीण करपे, विकास टिंगरे, साहिल केदारी, अमिर शेख, रमेश अय्यर, राजेंद्र शिरसाट, द. स. पोळेकर, फिरोज शेख, प्रमोद निनारिया, संदिप मोकाटे, आबा जगताप, अनुसया गायकवाड, इंदिरा अहिरे, रजनी त्रिभुवन, स्वाती शिंदे, राधिका मखामले, राजश्री अडसुळ, शारदा वीर, राहुल तायडे, सुजित यादव, शाबीर खान, आयुब पठाण, चेतन आगरवाल, भरत सुराणा, मेहबुब नदाफ, अजित ढोकळे, अजित जाधव, भगवान कडू, नरसिंग आंदोनी, ऋषीकेश वीरकर, रामविलास माहेश्वरी, संगीता क्षीरसागर, नलिनी दोरगे, पपिता सोनावणे, बबलू कोळी, सुरेश कांबळे, विनोद रणपिसे, प्रशांत सुरसे, बंडू नलावडे, सुमित डांगी, विश्वास दिघे आदींसह असंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Rahul Gandhi | Pune congress | राहुल गांधीच्या समर्थनार्थ पुणे कॉंग्रेस कडून निदर्शने 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राहुल गांधीच्या समर्थनार्थ पुणे कॉंग्रेस कडून निदर्शने

केंद्रातील भाजपचे नरेंद्र मोदी सरकार काँग्रेसच्या अध्यक्षा  खा.‌ सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर सक्त वसुली संचालनालयामार्फत (ईडी) दबाब आणून लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचमुळे गेली ३ दिवस काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांना ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलावून त्यांच्या अटकेसाठी मार्ग तयार करीत असून या अन्यायाविरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे प्रभारी  अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व चौक येथे निदर्शने करण्यात आली.

     यावेळी बोलताना प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘आमचे नेते राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाबरले असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशाचे नेतृत्व राहुलजी गांधी करतील या भीतीमुळेच नॅशनल हेरॉल्ड या चूकीच्या प्रकरणामध्ये मुद्दामून नाव बदनाम करून खोट्या गुन्ह्यात अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना असून पक्षाचा कार्यकर्ता कदापी शांत राहणार नाही, या विरोधात रस्त्यावर उतरून मोदी सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्याचे काम काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते येथून पुढे करतील मोदी सरकारने चूकीच्या पध्दतीने राहुलजी गांधी यांना अटक करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मोठ्या  प्रमाणावर रस्त्यावर उतरून निषेध नोंदविला जाईल.’’

     यावेळी माजी आमदार रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड यांची यावेळी निषेधाची भाषणे झाली.

     यावेळी कमल व्यवहारे, अजित दरेकर, अविनाश बागवे, रफिक शेख, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, संगीता तिवारी, पुजा आनंद, गोपाळ तिवारी, मुख्तार शेख, राजेंद्र शिरसाट, नारायण पाटोळे, सुनिल शिंदे, शिवा मंत्री, प्रदिप परदेशी, सतिश पवार, विजय खळदकर, रमेश सोनकांबळे, प्रविण करपे, अजित जाधव, सचिन आडेकर, यासीन शेख, आबा जगताप, नितीन परतानी, साहील केदारी, मेहबुब नदाफ, सुरेश कांबळे, फैय्याज शेख, विश्वास दिघे, गुलाम हुसेन, प्रमोद निनिरिया, मुन्नाभाई शेख, परवेज तांबेळी, संजय अंभग, सेल्वराज ॲन्थोनी, संतोष आरडे आदींसह असंख्य काँग्रेस कार्येकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

Big Breaking News : Nawab Malik : ED : मोठी बातमी:  ईडीने नवाब मलिकांना घेतले ताब्यात 

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

मोठी बातमी:  ईडीने नवाब मलिकांना घेतले ताब्यात

: ईडीच्या कार्यालयात सकाळपासून मलिकांची चौकशी

मुंबई – राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे  प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर ईडीने (Enforcement directorate) मोठी कारवाई केली आहे. आज पहाटे मलिक यांच्या निवास्थानी आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांना मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात आणले असून, तिथे सकाळपासून त्यांची चौकशी सुरू आहे.

 कुर्ल्यातील जमीन व्यवहाराप्रकरणी नवाब मलिक यांची चौकशी करण्यात येत असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. दरम्यान, या कारवाईमुळे राज्यातील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे साडेचारच्या सुमारास ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या निवासस्थानी आले. तेव्हा त्यांच्यासोबत सीआरपीएफचे जवान होते. मलिक यांना कारवाईची कल्पना दिल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी साडेसात वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात आणले. त्यानंतर सकाळी पावणेआठ वाजल्यापासून मलिक यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच ईडीच्या कार्यालयाबाहेरही बंदोबस्त वाढण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कागदपत्रे समोर आणत नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींसोबत व्यवहार  केल्याचा आरोप केला होता. आता त्या आरोपांबाबतच्या चौकशीसाठीच ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

Anil Deshmukh: अखेर अनिल देशमुख यांना अटक :! ED चा दिवाळी धमाका

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक

: ED चा दिवाळी धमाका

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukhh) यांना अखेरीस सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली. ही अटक टाळण्यासाठी देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. मात्र कठोर कारवाईपासून त्यांना संरक्षण मिळाले नाही.

ईडीचे मुंबईतील अधिकारी सुलतान यांनी काल सकाळी अकरापासून देशमुख यांची चौकशी सुरू केली होती. रात्री आठनंतर ईडीचे दिल्लीतील अधिकारी सत्यव्रतसिंह हे मुंबईत दाखल झाल्यानंतर देशमुख यांना अटक होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

 

ईडीच्या अटकेच्या कारवाईपूर्वी देशमुख यांनी एक निवेदन प्रसिद्धिस दिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की परमबीर सिंह, सचिन वाझे यांनी माझ्यावर केलेल्या बिनबुडाच्या आरोपांनंतर ईडी, सीबीआयकडून सुरू असलेल्या चौकशीला मी पूर्ण सहकार्य केले. मला पाठवलेल्या समन्सलाही मी लेखी स्वरूपात उत्तर देत आलो. मा. उच्च न्यायालयाने मला सांविधानिक हक्कांतर्गत विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तरीही मी आज ईडीच्या कार्यालयात स्वतः हजर राहून पुढील चौकशीस सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंह गेले ४ महिने बेपत्ता आहेत, यातूनच त्यांच्या आरोपांतील खोटारडेपणा समजतो आहे. त्यांच्यावरही अनेकांनी गंभीर आरोप केले आहेत. याचाही विचार व्हायला हवा, असे त्यांनी म्हटले होते.