Security of the statue of Shivaji Maharaj : पालिकेतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र सुरक्षा रक्षक नेमा

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

पालिकेतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र सुरक्षा रक्षक नेमा

: शिवाजीनगर पोलिसांची महापालिकेला सूचना

पुणे : पुणे महानगरपालिका मुख्य इमारतीच्या आवारातील उद्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठीत पुतळा बसवण्यात आला आहे. सिंहासनाधिष्ठित पुतळा सुरक्षिततेसाठी दिवस व रात्री याप्रमाणे २४ तास सुरक्षा रक्षक नेमणे आवश्यक आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची आवश्यकता आहे. अशी सूचना शिवाजीनगर पोलिसांनी महापालिकेला केली आहे. याबाबत पोलिसांनी महापालिकेला पत्र दिले आहे.
: जिल्हाधिकाऱ्यांनी घातल्या होत्या अटी

पोलिसांनी दिलेल्या पत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांनी पुतळा बसविणेकामी दिलेल्या अर्टीचे अवलोकन केले असता नमुद अटींमध्ये  “छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांचा सिहासनाधिष्ठित पुतळा उभारण्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवनार नाही, याची जबाबदारी आयुक्त, पुणे महानगरपालिका पुणे यांची राहिल” तसेच “छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा सिहासनाधिष्ठित, पुतळा यांचा सुरक्षिततेच्या अनुषंगाने आयुक्त पुणे महानगरपालिका, पुणे यांनी स्वखर्चाने पुरेशा संरक्षक भिंतीसह सुरक्षित व उंच चतुतऱ्यावर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा सिहासनाधिष्ठित पुतळा उभारावा, तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळयाच्या सभोवतालाचा परिसर दृष्टीक्षेपात येईल अशा रितीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन घेवुन छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा सुरक्षिततेसाठी दिवस व रात्री याप्रमाणे २४ तास सुरक्षा रक्षक नेमणे आवश्यक आहे”. असे नमुद करण्यात आलेले आहे.

तसेच पुतळा परिसर येथे विविध पक्ष संघटना यांनी एकत्र येवुन स्थानिक वाद अथवा जातीय तपणाव वाढवणे अशी संभाव्य कृत्ये टाळण्यासाठी सदर पुतळा परिसराचे १०० मिटरच्या त्रिज्येच्या परिसरात कोणताही सांस्कृतिक अथवा अन्य कार्यक्रम आयोजित करणेस कोणत्याही संस्था/संघटना/पक्ष/व्यक्ती/व्यक्ति समुदाय यांना कायदा व सुव्यवस्था या कारणास्तव परवानगी देण्यात येवू नये हि विनंती. तरी वर नमुद प्रमाणे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या उक्त अटी व शर्ती प्रमाणे आपण आपले पुणे मनपा कार्यालय आवारातील छत्रपती श्री शिवाजी महाराज, यांचे पुतळयाचे अनुषंगाने भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवु नये याकरीता सदर ठिकाणी योग्य प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येवुन, पुतळयाचे सुरक्षिततेसाठी दिवस व रात्री २४ तास आपले कडील सुरक्षा रक्षक नेमण्यात यावे. असे पोलिसांनी पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply