PMC Pune | महापालिकेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दिले जाणार लक्ष 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

महापालिकेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दिले जाणार लक्ष

| अतिरिक्त आयुक्तांनी विविध खात्याकडून मागवली माहिती

पुणे | महापालिकेतील (PMC Pune) दिव्यांग कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या (Divyang employees) समस्यांकडे महापालिका गंभीरपणे लक्ष देणार आहे. विविध संघटनाकडून याबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालत सर्व खात्याकडून माहिती मागवली आहे. (PMC Pune)

पुणे महानगरपालिकेतील दिव्यांग अधिकारी/कर्मचारी यांच्या विविध प्रश्नाबाबत  विविध संघटनेकडून
विचारणा होत आहे व त्यासाठी बैठक आयोजित करणेबाबत विनंती केली होती. त्यानुसार महापालिका आयुक्त (ज) यांच्याकडे  शुक्रवार रोजी सकाळी  ११:०० वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.
त्यासाठी खात्याकडून माहिती मागवण्यात आली आहे.  यामध्ये शासनाच्या शासन निर्णयानुसार, दिव्यांग सेवकास कार्यालयात येण्या जाण्यासाठी वेळेमध्ये सवलत देण्यात येते. तथापि अशी सवलत दिव्यांग सेवकास दिली गेली नसल्याबाबत सेवकाने आपल्या विभागाकडे तक्रारी अर्ज प्राप्त झाले आहे अगर कसे ? याची  माहिती द्यावी लागणार आहे. तसेच  शासनाची दि. १६/०४/२०२१ च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग सेवकास कोणत्या प्रकारचे कामकाज देणेत यावे याबाबत नमूद आहे. त्यानुसार दिव्यांग सेवकास कामकाज दिले जात नाही. अशा बाबत आपल्या विभागाकडे तक्रारी अर्ज प्राप्त झाले आहे अगर कसे ?  त्याची देखील माहिती सामान्य प्रशासन विभागास सादर करायची आहे. (Pune Municipal Corporation)