Health Department | PMC Pune | आरोग्य विभागाकडील CSR ची कामे डॉ विद्या नागमोडे यांच्याकडे 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे
Spread the love

आरोग्य विभागाकडील CSR ची कामे डॉ विद्या नागमोडे यांच्याकडे

| सहाय्यक आरोग्य अधिकारी पदाच्या कामकाजाचे विकेंद्रीकरण

पुणे | महापालिकेच्या आरोग्य विभागाचा विस्तार वाढतो आहे. त्यामुळे कामाची जबाबदारी देखील वाढते आहे. त्यामुळे सहायक आरोग्य अधिकाऱ्याकडील कामाचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडील CSR ची कामे डॉ विद्या नागमोडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. त्याचबबरोबर इतरही कामे देण्यात आली आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नुकतेच हे आदेश जारी केले आहेत.
पुणे महानगरपालिकेकडील आरोग्य विभागाकडे पुणे शहरातील आरोग्य व्यवस्थेबाबत विविध कामे चालतात. आरोग्य विभाग हा महत्वाचा विभाग असून पुणे शहरातील नागरिकांना विविध वैद्यकीय सेवा व इतर आरोग्य विषयक सेवा पुरविण्याचे काम या विभागाकडून केले जाते. पुणे महानगरपालिकेचा वाढता विस्तार पाहता आरोग्य विषयक कामे अधिक कार्यक्षमतेने व तत्परतेने होण्यासाठी आरोग्य विभागाकडील सहाय्यक आरोग्य अधिकारी यांसकडील कामकाजाचे वाटप  करण्यात आले आहे.
डॉ. विद्या नागमोडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी यांच्याकडील कामकाज
१. महापौर योजना
२. सामाजिक दायित्व योजना (CSR)
३. जिल्हा नियोजन समितीमार्फत करावयाची
कामे
४. क्षेत्रिय अधिकारी क्र. ५ वर संनियंत्रण व
पर्यवेक्षण