Tag: Health Officer
महापालिका आरोग्य अधिकारी डॉ आशिष भारती यांची अखेर बदली
| राज्य सरकारकडून आदेश जारी
सरकारच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी या संवर्गातील डॉ. आशिष हिरालाल भारती यांची दि.३०.०९.२०२० च्या शासन आदेशान्वये पुणे महानगरपालिकेच्या “आरोग्य वैद्यकीय अधिकारी” या पदावर एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली. तदनंतर, दि.०८.०२.२०२२ च्या आदेशान्वये डॉ. आशिष भारती यांच्या प्रतिनियुक्तीस दि.०५.१०.२०२१ पासून पुढे एक वर्ष म्हणजेच दि.०४.१०.२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती.
आदेशात पुढे म्हटले आहे कि, आता, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या मान्यतेनुसार डॉ. आशिष हिरालाल भारती यांची पुणे महानगरपालिकेच्या “आरोग्य वैद्यकीय अधिकारी” या पदावरील प्रतिनियुक्ती दि.०१.०३.२०२३ (म.नं.) पासून संपुष्टात आणण्यात येत आहे. त्यानुसार डॉ. आशिष हिरालाल भारती यांनी पुढील आदेश होईपर्यंत त्यांच्याकडील पुणे महानगरपालिकेच्या “आरोग्य वैद्यकीय अधिकारी” या पदाचा कार्यभार महानगरपालिकेतील सक्षम प्राधिकारी यांच्याकडे तात्काळ सुपूर्द करून उप संचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे यांच्या कार्यालयात हजर व्हावे.
डॉ कल्पना बळिवंत यांची उप आरोग्य अधिकारी पदी वर्णी!
|आगामी काळात महापालिकेचाच होऊ शकतो आरोग्य प्रमुख
आरोग्य विभागाकडील CSR ची कामे डॉ विद्या नागमोडे यांच्याकडे
| सहाय्यक आरोग्य अधिकारी पदाच्या कामकाजाचे विकेंद्रीकरण
डॉ. विद्या नागमोडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी यांच्याकडील कामकाज
…आणि महापालिका कर्मचारी जिंकले!
: आरोग्य प्रमुखांना काढावे लागले शुद्धिपत्रक
: असे आहे शुद्धिपत्रक
संदर्भान्वये निर्गमित करण्यात आलेल्या पत्रातील दुसरा परिच्छेद पुढील प्रमाणे आहे ….
तपासण्यांबाबतची देयके अदा करणेत येणार नाहीत. अशा प्रकारची देयके प्रतिपूर्तीसाठी सादर केल्यास, पुणे मनपामार्फत अदा करणेत येणार नाही याची पुणे मनपाचे पॅनेलवरील सर्व रुग्णालयांनी नोंद घ्यावी.”