Chief Auditor | 11 विभाग आणि 5 परिमंडळाच्या निविदा प्रक्रियेबाबत मुख्य लेखा परीक्षकांकडून आक्षेप | जवळपास 10 कोटीहून अधिक वसुली अपेक्षित

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

 11 विभाग आणि 5 परिमंडळाच्या निविदा प्रक्रियेबाबत मुख्य लेखा परीक्षकांकडून आक्षेप

| जवळपास 10 कोटीहून अधिक वसुली अपेक्षित

पुणे |  महापालिकेच्या (PMC Pune) विविध विभागामार्फत तसेच 5 परिमंडळामार्फत विविध विकास कामांबाबत निविदा (Tender) काढण्यात येतात. मात्र या प्रकरणांचे लेखा परीक्षण (Audit) करताना काही दोषास्पद बाबी आढळून आल्या आहेत. तसेच या विभागांनी त्याबाबत वसुली (recovery) करणे अपेक्षित असताना ती झालेली नाही. जवळपास 10 कोटींहून अधिक वसुली आहे. मुख्य लेखापरीक्षक अंबरीष गालिंदे (Chief Auditor Ambrish Galinde) यांनी याबाबतचा अहवाल स्थायी समितीला (Standiy Committee) सादर केला आहे.  समितीने यावर उचित निर्णय घेणे अपेक्षित आहे.
मुख्य लेखापरीक्षक यांचे अहवालात नमूद केलेनुसार अतिक्रमण / अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग, मलनिःसारण देखभाल दुरुस्ती विभाग, घनकचरा व्यवस्थापन कार्यालय, मुख्य अभियंता पाणी पुरवठा, पथ विभाग, मध्यवर्ती भांडार विभाग, मोटार वाहन विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, वाहतुक नियोजन, उदयान, आरोग्य व विदयुत या कार्यालयांच्या निविदा प्रकरणांची तपासणी केली असता आक्षेपार्ह / दोषास्पद बाबींमुळे वसुलपात्र रक्कम रु. ६,३७,६८,९६५.६५ वसूल करावयाचे आहेत. तसेच आक्षेपार्ह / दोषास्पद बाबींचा खुलासा घेणे बाकी आहे. (Pune municipal corporation)
– अशी रक्कम वसूल करणे अपेक्षित
अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग – ३, ७६०, ४५२.९६
मलनिःसारण देखभाल दुरुस्ती विभाग – ५, ०३१, ००१.८७
घनकचरा व्यवस्थापन कार्यालय – ६८४,९९९.३०
मुख्य अभियंता पाणीपुरवठा विभाग
कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग — ६३८,१६३.६८
चतुश्रृंगी पाणीपुरवठा विभाग- ३६०,६१२.६५
बंडगार्डन पाणीपुरवठा विभाग-  ३१६,९६२.५०
लष्कर पाणीपुरवठा विभाग — ३३७,६८७.९७
स्वारगेट पाणीपुरवठा विभाग -३१६,९६२.५०
पर्वती पाणींपुरवठा विभाग -३००,२६८.०४
एस एन डी टी पाणीपुरवठा विभाग – ४१,८१७,४२९.८०
|पथ विभाग – ८, १५८, ५६४.३४
मध्यवर्ती भांडार विभाग – २५६,३९०.००
मोटार वाहन विभाग – २३४,७१०.७६
माहिती तंत्रज्ञान विभाग -१७९,०५४.००
| वाहतूक नियोजन विभाग – ९३,३२३.३९
| उद्यान विभाग -३६१,७७९.७१
| आरोग्य विभाग – १०६,६८७.८५
विद्युत विभाग – ६०२,२००.८९
 
एकूण  – ६३, ७६८, ९६५.६५
– परिमंडळाकडून 2 कोटी 31 लाख वसूल करणे अपेक्षित
महापालिकेच्या 1 ते 5 परिमंडळाकडून देखील निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्या होत्या. त्यांनी 2 कोटी 31 लाख रुपये वसूल करणे अपेक्षित आहे.
त्याचप्रमाणे शहर अभियंता कार्यालयाकडील बांधकाम विकास विभाग झोन १ कडील धानोरी स.नं. २९ (पा) व ६७/१ब (पै) येथील मान्य करण्यात आलेल्या संमतीपत्रापैकी तपासणीसाठी उपलब्ध झालेल्या बांधकाम प्रस्ताव प्रकरणांची तपासणी केली असता एकूण वसूल रक्कम रु. १,१९,८९,४४८/- +व्याज
वसूली करणे आहे.
या वसुलीबाबत स्थायी समिती काय निर्णय देते, यावर लक्ष लागले आहे.