Mohalla Committee | PMC Pune | मोहल्ला कमिटीच्या कामकाजाबाबत अधिकारी उदासीन  | प्रशासकीय कारवाई करण्याचा महापालिका अतिरिक्त आयुक्तांचा इशारा 

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

मोहल्ला कमिटीच्या कामकाजाबाबत अधिकारी उदासीन

| प्रशासकीय कारवाई करण्याचा महापालिका अतिरिक्त आयुक्तांचा इशारा

पुणे | नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांना समस्या सांगण्यासाठी व्यासपीठ असावे, म्हणून मोहल्ला कमिटीच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या कमिटीच्या कामकाजाबाबत मुख्य खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी उदासीन असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आगामी काळात हलगर्जीपणा झाल्यास कारवाई करण्याचा इशारा महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिला आहे. (PMC Pune)

अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयाकडे दरमहा प्रभाग समिती/मोहल्ला कमिटीचे आयोजन
केले जाते. तसेच  मोहल्ला कमिटीमध्ये कामकाज करणेबाबत कार्यालयीन आदेश पारित करण्यात आले आहेत. सदर बैठकीत समितीच्या सदस्यांकडून व इतर उपस्थित केलेल्या तक्रारी, सदर तक्रारीचे निवारण हे मुख्य खात्याकडील अधिकारी/ कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने करता येत नाही. त्यामुळे अशा तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विलंब होत आहे. असे निदर्शनास आले आहे. त्यानुसार. कार्यालयीन आदेशान्वये मोहल्ला कमिटीचे कामकाज वेळेवर करण्यात यावे याबाबत क्षेत्रीय कार्यालयाकडील
व सर्व संबंधित अधिकारी / सेवक यांनी दक्षता घ्यावी. तसेच सदर कामकाजाबाबत संबंधित खातेप्रमुख / सेवक यांनी हलगर्जीपणा केल्यास संबंधितावर प्रशासकीय करवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असे ही आदेशात म्हटले आहे. (pune Municipal corporation)