PMC Chief Labour Officer | अखेर नितीन केंजळे यांची महापालिकेच्या मुख्य कामगार अधिकारी पदी पदोन्नतीने नियुक्ती 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

PMC Chief Labour Officer | अखेर नितीन केंजळे यांची महापालिकेच्या मुख्य कामगार अधिकारी पदी पदोन्नतीने नियुक्ती

| महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे आदेश जारी

PMC Chief Labour Officer | पुणे | महापालिकेच्या मुख्य कामगार अधिकारी (PMC Pune Chief Labour Officer) पदी अखेर नितिन केंजळे (Nitin Kenjale PMC) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंजळे यांना कामगार अधिकारी पदावरून मुख्य कामगार अधिकारी पदावर पदोन्नती (Promotion) देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar IAS) यांनी जारी केले आहेत. (PMC Pune Labour Welfare Department)
तत्कालीन मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी सेवानिवृत्त झाल्यानंतर मुख्य कामगार अधिकारी हे पद रिक्त झाले होते. दरम्यान त्या अगोदर पदोन्नती समिती घेण्यात आली होती. सेवाज्येष्ठतेनुसार नितीन केंजळे यांना कामगार अधिकारी पदावरून मुख्य कामगार अधिकारी पदावर पदोन्नती देण्याबाबत बढती समितीने शिफारस देखील केली होती. मात्र याबाबतच्या प्रस्तावाला विधी समिती आणि मुख्य सभेत मान्यता मिळत नव्हती. त्यामुळे केंजळे यांच्याकडे आयुक्तांनी प्रभारी मुख्य कामगार अधिकारी पदाचा पदभार दिला होता. बऱ्याच महिन्यांच्या प्रतिक्षे नंतर हा प्रस्ताव विधी समिती आणि मुख्य सभेत मंजूर करण्यात आला. मात्र आयुक्तांकडून आदेश जारी होत नव्हते. अखेर मंगळवारी सायंकाळी पदभार दिल्याचे आदेश आयुक्तांनी जारी केले. त्यामुळे महापालिकेला नितीन केंजळे यांच्या रूपाने मुख्य कामगार अधिकारी मिळाला आहे. (Pune Municipal Corporation News)

दरम्यान केंजळे यांनी पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच सेवाप्रवेश नियम तयार करणेबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम केले आहे. पुणे मनपा अधिकारी/कर्मचारी आरोग्य सलीकरण योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवास योजना, कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) प्रतिबंध व उपचार सुरक्षा कवच योजना इ. योजनांचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. केंजळे हे पुणे महानगरपालिकेमध्ये  २/९/१९९३ पासून कार्यरत. पुणे महापालिकेमध्ये सेवकवर्ग विभाग (आस्थापना) विभागाचा १८ वर्षे प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. कामगार अधिकारी म्हणून दिनांक ९/१२/२०११ पासून ९ वर्षे कार्यरत असा एकूण २७ वर्षांचा प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. खातेप्रमुखांच्या रजा कालावधीमध्ये खातेप्रमुख म्हणून वेळोवेळी कामकाज केले आहे. प्र. सुरक्षा अधिकारी म्हणून १२/७/२०१७ पासून अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. आस्थापना विषयक सरळसेवा, पदोन्नती रोस्टर नियमावली, भरती प्रक्रिया खातेनिहाय परिक्षा मदती व निवड समिती, बदल्या, धोरणात्मक बाबी, सेवाविनियमातील दुरुस्त्या निलंबन इ. बाबत सर्व कामाची माहिती व प्रत्यक्ष कामाचा त्यांना अनुभव आहे.

कामगार कल्याण विभागाकडील कामकाजांतर्गत कामगार व औद्योगिक न्यायालयातील कोटकेसेसच्या अनुषंगाने कामकाज पाहणे तसेच सेवाप्रवेश नियम तयार केले आहेत. मनपा सेवाविनियम व सेवा वर्तणूक नियम, कामगार कायद्यांच्या अनुषंगाने कायदेशिर अभिप्राय देणे.  कंत्राटी कामगारांना विविध लाभ मिळवून देणेकामी विविध उपाययोजना करणे. पुणे महानगरपालिकेतील कर्मचान्यांना सेवा नियमांचे व किमान वेतन अधिनियमाचे प्रशिक्षण देणे, विभागीय परिक्षांसाठी प्रशिक्षण देणे, कामगार प्रशिक्षण वर्ग आयोजन करणे. अशी कामे केंजळे यांनी केली आहेत.
सन २००४ साली त्यांना पुणे मनपा सांस्कृतिक मंचातर्फे “गुणवंत कामगार” म्हणून गौरविण्यात आले आहे. तसेच पुणे महानगरपालिकेतर्फे सन २००९ साली ‘गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.