Pune Municipal Corporation (PMC) | तुम्ही सेवानिवृत्त नाही तर तुमची दुसरी आवृत्ती सुरु होत आहे – डॉ दिनेश ललवाणी | महापालिकेचे 43 कर्मचारी सेवानिवृत्त

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Municipal Corporation (PMC) | तुम्ही सेवानिवृत्त नाही तर तुमची दुसरी आवृत्ती सुरु होत आहे – डॉ दिनेश ललवाणी

| महापालिकेचे 43 कर्मचारी सेवानिवृत्त

PMC Retired Employees – (The Karbhari News Service) – मार्च, महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) ४३ कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी  महानगपालिका कामगार कल्याण विभाग (PMC Labour Welfare Department) च्या वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (PMC Pune)
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध व्याख्याते डॉ. श्री. दिनेश ललवानी (Dr.Dinesh Lalwani) उपस्थित होते. श्री. नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक व नियोजन याची सविस्तर माहिती दिली व शुभेच्छा दिल्या. तदनंतर श्री. अशोक धर्मा लांडगे प्रशासन अधिकारी या सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ. दिनेश ललवानी यांनी निवृत्त सेवकांना मार्गदशनपर बोलताना आपण नेहमी खुश राहिले पाहिजे, आपण आज सेवानिवृत्त होत नाहीत तर आपली दुसरी आवृत्ती सुरू होत आहे, आपण नेहमी कामात व्यस्त राहिले पाहिजे असे नमूद केले. प्रत्येकाने स्वच्छंदी राहिल्याने आपले सर्व आजार उदा. बीपी, शुगर, मानसिक रोग, थायरॉईड इ. आपोआप बरे होतात असे नमूद करून सर्वाना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अलका जोशी यांनी केले.

International Women’s Day | पी. एम. सी. एम्प्लॉईज युनियन आणि पुणे मनपा कडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन! | लकी ड्रॉ मध्ये पाच महिलांना मिळाली भेट 

Categories
cultural PMC social पुणे

International Women’s Day | पी. एम. सी. एम्प्लॉईज युनियन आणि पुणे मनपा कडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन!

| लकी ड्रॉ मध्ये पाच महिलांना मिळाली भेट

 

International Women’s Day  – (The Karbhari News Service) – जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे कामगार कल्याण विभाग, पुणे मनपा (Pune Municipal Corporation (PMC) तसेच पी. एम. सी. एम्प्लॉईज युनियन, पुणे मनपा (PMC Employees Union) यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरीता पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यामध्ये अनेक महिलांनी सहभागी होऊन उत्कृष्टरीत्या विविध कलागुणांचे सादरीकरण केले. आपले दैनंदिन कार्यालयीन कामकाज सांभाळून महिलांनी सादरीकरण करीता विशेष अशी मेहनत घेतली. कार्यक्रमा मध्ये दिव्यांग विशेष मुलींच्या डान्स ने संगळ्यांच मन जिंकली होती काही महिलांनातर अक्षरशा आश्रु अनावर झालं होत, अतिशय सुंदर असा डान्स या मुलींनी सादर केला शिक्षिका वर्षा काळे मॅडम यांनी या साठी खुप परिश्रम घेतले , उपस्थित महिलांसाठी विशेष कौतुक करणेकरीता पी.एम.सी. एम्पलॉइज युनियन कडुन प्रत्येक सहभागी कलाकारास बक्षीस देण्यात आले.

युनियन कडुन महिलांसाठी लकी ड्रॉ ठेवला होता

लकी ड्रॉ मध्ये नावे निघालेल्या पुढील पाच भाग्यवंत महिलांना भेट स्वरूपात चांदीची नाणी देण्यात आली.

१)अपर्णा दिपक भुजबळ, २) कुंदा विजय ओव्हाळ, ३) संगीता जगताप, ४) मयुरी परसराम अत्राम, ५) रसिका प्रमोद निघुट

The Karbhari - International womens day

याप्रसंगी मुख्य कामगार कल्याण अधिकारी नितीन केंजळे , युनियन अद्यक्ष – बजरंग पोखरकर,  उल्का कळसकर मुख्य लेखा व वित्त अधिकारी,  निशा चव्हाण मुख्य विधी अधिकारी, डॉ. चेतना केरुरे उप आयुक्त सांस्कृतिक व क्रीडा विभाग, ती किशोरी शिंदे उप आयुक्त परिमंडळ १ विभाग,  प्रतिभा पाटील , आशा राऊत उप आयुक्त परिमंडळ ३ विभाग,  अस्मिता तांबे- धुमाळ इंद्रायणी कर्चे सहायक महापालिका आयुक्त ,तसेच पीएमसी एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष श्रीमती. पुजा देशमुख, महिला कार्याध्यक्ष श्रीमती.वंदना साळवे, उपाध्यक्ष रोहिणी पवार कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन श्रीमती योगिता जायभाय, शशी कलमारने, युनियनचे उपाध्यक्ष श्री. विशाल ठोंबरे, श्री राजेंद्र जाधव ,खजिनदार श्री.दिपक घोडके, सह- सेक्रेटरी श्री.राजू ढाकणे, सह-खजिनदार चेतन गरुड, सुनील मधे , अजित गारळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

PMC Retired Employees | शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक स्वास्थ्य जपले पाहिजे : डॉ श्रीकांत मालेगावकर | महापालिकेचे 30 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Retired Employees | शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक स्वास्थ्य जपले पाहिजे : डॉ श्रीकांत मालेगावकर

| महापालिकेचे 30 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त

PMC Retired Employees | Pune- (The Karbhari Online) – फेब्रुवारी, 2024  महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) 30 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी  महानगपालिका कामगार कल्याण विभाग (PMC Labour Welfare Department) च्या वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (PMC Pune)
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ वकील, प्रसिद्ध व्याख्याते ऍडव्होकेट डॉ. श्री. श्रीकांत मालेगावकर ( Shrikant Malegaonkar) उपस्थित होते.  नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, वेळेचे नियोजन याची सविस्तर माहिती दिली व शुभेच्छा दिल्या. तदनंतर प्रवीण माळवे, कनिष्ठ लेखापरीक्षक, श्रीमती दाते कांचन, सहाय्यक शिक्षिका या सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ. श्रीकांत मालेगावकर यांनी निवृत्त सेवकांना मार्गदशनपर बोलताना आरोग्य हीच संपत्ती आहे.  प्रत्येकाने आपले आरोग्य जपले पाहिजे.  शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक स्वास्थ्य जपले पाहिजे, स्वच्छंदी जगले पाहिजे, असे नमूद करून सर्वाना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश परदेशी यांनी केले.

PMC 74th Anniversary | पुणे महापालिकेच्या वर्धापनदिन निमित्ताने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी! 

Categories
cultural PMC पुणे

PMC 74th Anniversary | पुणे महापालिकेच्या वर्धापनदिन निमित्ताने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी!

Pune Municipal Corporation 74th Anniversary | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) यंदा आपला 74 वा वर्धापनदिन (PMC Anniversary) साजरा करत आहे. या निमित्ताने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी पुणे महापालिका सांस्कृतिक कलामंच (PMC Sanskrutik Kalamanch) च्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस या मेजवानीचा लाभ कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar IAS), अतिरिक्त आयुक्त रविन्द्र बिनवडे (Ravindra Binwade IAS) आणि मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे (Nitin Kenjale PMC) यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

| उद्यापासून सुरु होतील कार्यक्रम

14 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिरात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे छायाचित्र तथा हस्तचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दोन दिवस सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत सुरु राहणार आहे.
15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 1 या कालावधीत विविध कला गुणदर्शनाचे कार्यक्रम होतील. सुरेश परदेशी आणि इतर कर्मचारी हा कार्यक्रम सादर करतील. बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम असेल.
15 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते 5 या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिरात मराठी नाटक सादर करण्यात येणार आहे. मंगलदास माने, आदर्श गायकवाड आणि महापालिका कर्मचारी हे नाटक सादर करतील.
15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 ते 8 या कालावधीत मराठी आणि हिंदी गीतांचा कार्यक्रम होईल. सचिन कदम आणि महापालिका कर्मचारी हा कार्यक्रम सादर करतील.

PMC Chief Labour Officer | अखेर नितीन केंजळे यांची महापालिकेच्या मुख्य कामगार अधिकारी पदी पदोन्नतीने नियुक्ती 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Chief Labour Officer | अखेर नितीन केंजळे यांची महापालिकेच्या मुख्य कामगार अधिकारी पदी पदोन्नतीने नियुक्ती

| महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे आदेश जारी

PMC Chief Labour Officer | पुणे | महापालिकेच्या मुख्य कामगार अधिकारी (PMC Pune Chief Labour Officer) पदी अखेर नितिन केंजळे (Nitin Kenjale PMC) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंजळे यांना कामगार अधिकारी पदावरून मुख्य कामगार अधिकारी पदावर पदोन्नती (Promotion) देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar IAS) यांनी जारी केले आहेत. (PMC Pune Labour Welfare Department)
तत्कालीन मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी सेवानिवृत्त झाल्यानंतर मुख्य कामगार अधिकारी हे पद रिक्त झाले होते. दरम्यान त्या अगोदर पदोन्नती समिती घेण्यात आली होती. सेवाज्येष्ठतेनुसार नितीन केंजळे यांना कामगार अधिकारी पदावरून मुख्य कामगार अधिकारी पदावर पदोन्नती देण्याबाबत बढती समितीने शिफारस देखील केली होती. मात्र याबाबतच्या प्रस्तावाला विधी समिती आणि मुख्य सभेत मान्यता मिळत नव्हती. त्यामुळे केंजळे यांच्याकडे आयुक्तांनी प्रभारी मुख्य कामगार अधिकारी पदाचा पदभार दिला होता. बऱ्याच महिन्यांच्या प्रतिक्षे नंतर हा प्रस्ताव विधी समिती आणि मुख्य सभेत मंजूर करण्यात आला. मात्र आयुक्तांकडून आदेश जारी होत नव्हते. अखेर मंगळवारी सायंकाळी पदभार दिल्याचे आदेश आयुक्तांनी जारी केले. त्यामुळे महापालिकेला नितीन केंजळे यांच्या रूपाने मुख्य कामगार अधिकारी मिळाला आहे. (Pune Municipal Corporation News)

दरम्यान केंजळे यांनी पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच सेवाप्रवेश नियम तयार करणेबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम केले आहे. पुणे मनपा अधिकारी/कर्मचारी आरोग्य सलीकरण योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवास योजना, कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) प्रतिबंध व उपचार सुरक्षा कवच योजना इ. योजनांचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. केंजळे हे पुणे महानगरपालिकेमध्ये  २/९/१९९३ पासून कार्यरत. पुणे महापालिकेमध्ये सेवकवर्ग विभाग (आस्थापना) विभागाचा १८ वर्षे प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. कामगार अधिकारी म्हणून दिनांक ९/१२/२०११ पासून ९ वर्षे कार्यरत असा एकूण २७ वर्षांचा प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. खातेप्रमुखांच्या रजा कालावधीमध्ये खातेप्रमुख म्हणून वेळोवेळी कामकाज केले आहे. प्र. सुरक्षा अधिकारी म्हणून १२/७/२०१७ पासून अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. आस्थापना विषयक सरळसेवा, पदोन्नती रोस्टर नियमावली, भरती प्रक्रिया खातेनिहाय परिक्षा मदती व निवड समिती, बदल्या, धोरणात्मक बाबी, सेवाविनियमातील दुरुस्त्या निलंबन इ. बाबत सर्व कामाची माहिती व प्रत्यक्ष कामाचा त्यांना अनुभव आहे.

कामगार कल्याण विभागाकडील कामकाजांतर्गत कामगार व औद्योगिक न्यायालयातील कोटकेसेसच्या अनुषंगाने कामकाज पाहणे तसेच सेवाप्रवेश नियम तयार केले आहेत. मनपा सेवाविनियम व सेवा वर्तणूक नियम, कामगार कायद्यांच्या अनुषंगाने कायदेशिर अभिप्राय देणे.  कंत्राटी कामगारांना विविध लाभ मिळवून देणेकामी विविध उपाययोजना करणे. पुणे महानगरपालिकेतील कर्मचान्यांना सेवा नियमांचे व किमान वेतन अधिनियमाचे प्रशिक्षण देणे, विभागीय परिक्षांसाठी प्रशिक्षण देणे, कामगार प्रशिक्षण वर्ग आयोजन करणे. अशी कामे केंजळे यांनी केली आहेत.
सन २००४ साली त्यांना पुणे मनपा सांस्कृतिक मंचातर्फे “गुणवंत कामगार” म्हणून गौरविण्यात आले आहे. तसेच पुणे महानगरपालिकेतर्फे सन २००९ साली ‘गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

PMC Retired Employees | महापालिकेच्या सेवानिवृत्त सेवकांना ABCDE शंभर वर्ष जगण्याचा मंत्र | व्याख्याते श्याम भुर्के यांचे मार्गदर्शन

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

PMC Retired Employees | महापालिकेच्या सेवानिवृत्त सेवकांना ABCDE शंभर वर्ष जगण्याचा मंत्र | व्याख्याते श्याम भुर्के यांचे मार्गदर्शन

 

PMC Retired Employees | डिसेंबर महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) 32 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी  महानगपालिका कामगार कल्याण विभाग (PMC Labour Welfare Department) च्या वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (PMC Pune)

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखक, व्याखाते व मराठी भाषा प्रसारक म्हणून परिचित असलेले शाम भुर्के (Shyam Bhurke) उपस्थित होते. श्री. नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा व त्याचे नियोजन याची सविस्तर माहिती
दिली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री. शाम भुर्के यांनी निवृत्त सेवकांना मार्गदशनपर बोलताना ABCDE हा शंभर वर्ष जगण्याचा मंत्र सांगितला. तो मंत्र असा कि, A म्हणजे ANXIETY (चिंता) काहीही झाले तरी चिंता करायची नाही. B म्हणजे बॉटल, काहीही झाले तरी बॉटल म्हणजे दारूच्या आहारी जायचे नाही. C म्हणजे सिगारेट, सिगारेट हे कर्करोगाचे प्रमुख कारण असल्याने त्यापासून दूर रहा. D म्हणजे DIET, यापुढे आहार करताना हा सकस ठेवावा व वेळेत असावा, E म्हणजे EXERSIZE, रोज किमान एक तास व्यायाम करावा, योग- योगासने करावीत. तसेच रोज किमान १२ सूर्यनमस्कार घालावीत. असा हा शंभर वर्ष जगण्याचा पंचसूत्री कार्यक्रम त्यांनी उपस्थित अधिकारी / कर्मचारी यांना सांगितला.
प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका जोशी यांनी केले.