PMC Encroachment Department | कारवाई करण्यासाठी आता पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे FDA ला साकडे!

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC Encroachment Department |  कारवाई करण्यासाठी आता पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे FDA ला साकडे!

PMC Encroachment Department | पुणे शहरातील (Pune City) रस्ता-पदपथांवर विविध ठिकाणी अन्न पदार्थ तयार करून विक्री करणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांवर (Illegal Hawker’s) कारवाई करण्याची मागणी पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) अन्न आणि औषध प्रशासनाकडे (FDA)  केली आहे. याबाबत अतिक्रमण विभागाकडून FDA ला पत्र देण्यात आले आहे. (PMC Encroachment Department)

पुणे शहरातील रस्ता -पदपथांवर खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून पावसाळी गटारे व ड्रेनेज
चेंबरमध्ये अनधिकृतपणे सांडपाणी, खरकटे व इतर टाकाऊ पदार्थ सातत्याने टाकले जात असल्यामुळे तेथील चेंबर व ड्रेनेज लाईन तुंबण्याचे प्रकार वारंवार होत असल्याने त्याबाबत स्थानिक नागरिकांच्या तक्रारी महापालिकेच्या अतिक्रमण कार्यालयाकडे वारंवार येत आहेत. तसेच असे व्यावसायिक रस्ता पदपथांवर उघड्यावर अन्नपदार्थ शिजवून तयार करताना व विक्री करताना कोणतेही स्वच्छते बाबत नियम व अटींचे पालन करत नसल्यामुळे नागरिकांना अस्वच्छ खाद्यपदार्थ विकले जात असल्यामुळे आरोग्यदायी परिस्थिती निर्माण होऊ शकते. असे व्यावसायिक मासे, चिकन-मटण व इतर खाद्यपदार्थ तयार करून विक्री करताना रस्ता-पदपथांवर पडलेले खरकटे अन्न तसेच तेलकटपणा व्यवसायानंतर स्वच्छ करत नसल्यामुळे दुर्गंधी तयार होऊन त्याचा स्थानिक नागरिकांना त्रास होत असतो. असे पथविक्रेते खाद्यपदार्थ तयार करणे करिता ज्वलनशील पदार्थांचा उदा.गॅम-
सिलेंडर, रॉकेल इ. वापर करत असल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी वारंवार दुर्घटना घडत आहेत. (PMC Pune)
तरी शहरातील अशा प्रकरच्या अनधिकृत/अधिकृत पथारी व्यवसायिकांवर FDA मार्फत  तपासणी पथकांमार्फत सातत्याने कारवाया करून त्यांचेवर नियंत्रण ठेवण्याची कार्यवाही करण्यात यावी. तसेच अशा व्यवसायिकांना खाद्यपदार्थ विक्रीबाबतचा FDA चा परवाणा अतिक्रमण कार्यालयाकडील रीतसर लेखी शिफारस घेतल्यानंतरच अपलेकडील परवाना देण्यात यावा. अशी मागणी अतिक्रमण विभागाने FDA कडे केली आहे.  आपले कार्यालयाकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवून त्यांचेवर योग्य ती कारवाई करून केलेल्या कार्यवाही बाबतचा साप्तहिक अहवाल आमच्याकडे पाठवावा. तसेच  या कामी पुणे महानगरपालिकेमार्फत काही मदत लगत असल्यास पुणे मनपाच्या पंधरा क्षेत्रिय कार्यालयांकडे संपर्क साधण्यात
यावा. असे पत्रात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation News)
—-
News Title | PMC Encroachment Department |  Pune Municipal Encroachment Department to FDA now to take action!