PMC Pune Tender | RTO टेंडर बाबतची तक्रार निराधार | महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांचा खुलासा

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

PMC Pune Tender | RTO टेंडर बाबतची तक्रार निराधार | महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांचा खुलासा

PMC Pune Tender | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) वाहनांचे पासिंग करण्यासाठी आरटीओ (RTO) साठी एजन्सी नेमणे बाबत महापालिकेकडून टेंडर काढण्यात आल्याचा आरोप करत हे टेंडर तत्काळ रद्द करावे अशी मागणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर (Ujjwal Keskar), प्रशांत बधे (Prashant Badhe), सुहास कुलकर्णी (Suhas Kulkarni) यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली. मात्र ही तक्रार निराधार (Baseless complaint) असल्याचा खुलासा अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार (IAS Dr Kunal Khemnar) यांनी केला आहे. हे टेंडर एजेन्सी नियुक्त करण्याचे नाही. असे अतिरिक्त आयुक्तांनी म्हटले आहे. (Pune Municipal Corporation)

माजी नगरसेवकांनी आरोप केला होता कि, पुणे  महानगरपालिकेने (PMC Pune) आरटीओ च्या कामासाठी एका एजन्सीची नेमणूक करण्याचे टेंडर काढले आहे. मात्र आरटीओ मध्ये एजंट आणि एजन्सी यांना परवानगी नाही.  दीड कोटी रुपयाचे हे टेंडर कशासाठी काढले’ याचा खुलासा खातेप्रमुखांना विचारला पाहिजे. पुणे मनपा ही एक अर्ध शासकीय संस्था तर आरटीओ ही पूर्ण शासकीय संस्था आहे. यामध्ये समन्वयासाठी एजन्सीची गरज नाही. त्यामुळे हे टेंडर तातडीने रद्द करावे. अशी मागणी या लोकांनी केली होती. यावर महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी आपला खुलासा सादर केला आहे. The karbhari शी बोलताना डॉ कुणाल खेमणार यांनी सांगितले कि, ही एक निराधार तक्रार आहे.  काढण्यात आलेले टेंडर हे  आरटीओ मध्ये गाड्या पासिंगसाठी  एजंट नियुक्त करण्यासाठी नसून आरटीओच्या शिफारसीनुसार किरकोळ दुरुस्तीची कामे करण्यासाठी आहे.  गरज वाटल्यास याबाबत अधिक चौकशी करू. मात्र यात शंका असलेल्या कुणीही माझ्याशी किंवा आयुक्तांशी संपर्क साधला नाही. असे डॉ खेमणार यांनी सांगितले. (PMC Pune News)

———

News Title | PMC Pune Tender | Complaint regarding RTO tender is baseless Disclosure of Municipal Additional Commissioner Dr. Kunal Khemnar