River Improvement : नदी सुधार प्रकल्प : सामाजिक संस्थांसोबत आज बैठक 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

नदी सुधार प्रकल्प : सामाजिक संस्थांसोबत आज बैठक 

पुणे : मुळा-मुठा नदी काठ सुधारणा प्रकल्पावर पर्यावरणतज्ज्ञांनी आक्षेप घेतल्याने त्या आक्षेपांबाबत महापालिकेचे अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची आज बैठक होणार आहे. या प्रकल्पाबाबत सामाजिक संस्थांच्या हरकतींवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे, भविष्यात शहराला पुराचा धोकाही होण्याची शक्यता व इतर आक्षेप सामाजिक संस्थांनी घेतला होता. त्यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी याप्रकल्पावर पुण्यातील एका कार्यक्रमात बोट ठेवून याचा अभ्यास करावा लागणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर या प्रकल्पाच्या धोक्यासंदर्भात मुंबईत १२ मार्च रोजी शरद पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये चर्चा करताना पर्यावरणवादी व महापालिकेचीही बाजू ऐकून घेण्यात आली. त्यानंतर अभ्यास करण्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय घेतला असून, ही समिती १५ दिवसात त्यांचा अहवाल सादर करणार आहे.याच वेळी या प्रकल्पावर पुण्यातील सामाजिक संस्था, संघटना, पर्यावरणवादी यांच्याशी चर्चा करण्यासाठी १६ मार्च रोजी जलसंपदा विभाग आणि महापालिकेची बैठक होईल असे आदेश जयंत पाटील यांनी दिले. त्यानुसार ही बैठक उद्या सकाळी ११ वाजता होत असून, महापालिकेने या प्रकल्पावर कोणते आक्षेप घेतले जाऊ शकतात याचा विचारू करून त्याबाबत तयारी करण्याची लगबग सुरू होती.
“बैठकीत शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीसमोर महापालिका प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहे. त्यावेळी महापालिकेचा आराखडा तयार करणारे तज्ज्ञही उपस्थित राहणार आहेत.’’
– विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

Leave a Reply