Amol Balwadkar Vs Baburao Chandre : राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी बाणेर बालेवाडीचा पाणी प्रश्न निर्माण केलाय  : अमोल बालवडकर यांचा गंभीर आरोप 

Categories
Breaking News Political social पुणे

राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी बाणेर बालेवाडीचा पाणी प्रश्न निर्माण केलाय

: अमोल बालवडकर यांचा गंभीर आरोप

पुणे : बाणेर बालेवाडी परिसरात गेली चार पाच वर्ष पाणीटंचाई नव्हती. मग आताच का? असा प्रश्न भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उपस्थित केला आहे. शिवाय बालवडकर यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे कि हा प्रश्न राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, परिसरातील व शहरातील त्यांचे पदाधिकारी पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी मिळून केला आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता फोन करो आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारावा, असे आवाहन बालवडकर यांनी परिसरातील नागरिकांना केले आहे.
बालवडकर म्हणाले महापालिकेत आता प्रशासक आहे. त्यामुळे साहजिकच शहराच्या प्रश्नांची जबाबदारी राज्य सरकारची आहे.  बाणेर बालवाडीत 2017 साली पाण्याची वितरण व्यवस्था नव्हती. प्रश्न गंभीर होता. मी नगरसेवक झाल्यानंतर नियोजन केले. समान पाणीपुरवठा योजने चे काम सुरु केले.  मात्र आता प्रशासनाने तोच पाणीपुरवठा विस्कळीत केला आहे. बालवडकर म्हणाले, पाणी प्रश्न मिटवणार भाजप कुठे आणि पाणी प्रश्न निर्माण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस कुठे? एवढा फरक आहे. पाण्यासाठी झगडणारा भाजप कुठे आणि नागरिकांची मजा पाहणारा राष्ट्रवादी कुठे?
बालवडकर पुढे म्हणाले, चांदणी चौक पाणी टाकी मधून 47mld बाणेर बालवाडीत पाषाण ला पाणीपुरवठा होत होता. गेल्या तीन महिन्यापासून या पाण्यात कपात करण्यात आली. 10 mld पेक्षा जास्त कपात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे टँकर पाठवण्याची सोसायट्यांची मागणी आहे. असे नीच पातळीवरील राजकारण राष्ट्रवादी  करते.
बालवडकर म्हणाले पाणी प्रश्न निर्माण करण्यात  आला आहे. राजकीय सूडासाठी हा प्रश्न उभा केलाय. राष्ट्रवादीने हा प्रश्न निर्माण केलाय. बाबुराव चांदेरे, पदाधिकारी,मनपा अधिकारी असे सर्वानी मिळून हा प्रश्न निर्माण केलाय. महापालिका अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे. याला सरकार जबाबदार आहे. बाबुराव चांदेरे यांनी याबाबत कधी निवेदन दिले नाही. चांदेरे चार वर्ष झोपले होते. आता निवडणुकीसाठी प्रयत्न करताहेत.

: फोन करो आंदोलन सुरु करा

बालवडकर पुढे म्हणाले, चांदेरे उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ही जबाबदारी अजित दादांची देखील आहे. पवार देखील याचे समर्थन करताहेत का? चुकीच्या पद्धतीने काम सुरु आहे. राजकारण करणाऱ्या पक्षाला यश मिळणार नाही. तुम्ही कितीही काही जरा. पाणी हेच जीवन आहे. मात्र भाजपचे लोक नाराज होणार नाहीत. नागरिकांची तुम्ही मजा पाहत आहात. आम्ही तो प्रश्न सोडवू. अधिकाऱ्यावर कुणाचा दबाव आहे? पाणी कपात नसताना पाणी का कमी केले?
नागरिकांना आवाहन आता तुम्ही फोन करो आंदोलन सुरु करा. आयुक्त आणि पाणीपुरवठा अधिकाऱ्याचे नंबर आम्ही देतोय. त्यावरून प्रशासनाला जाब विचारा. असे बालवडकर म्हणाले.

Water Cut : गुरुवारी शहराच्या या भागात पाणीपुरवठा राहणार बंद

Categories
PMC social पुणे

औंध, बाणेर परिसरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार

महापालिकेच्या चतुश्रुंगी पाणी पुरवठा विभागाअंतर्गत सिंध सोसायटी समोरील मेट्रो मार्गात अडथळा ठरणारी पाण्याची लाईन बदलण्याचे काम येत्या गुरुवारी (दि. २१) रोजी करण्यात येणार असल्याने औंध रस्ता, बोपोडी तसेच बाणेर परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आणि उशिरा कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे :
औंध गावठाण परिसर, आय.टी.आय. रोड परिसर, स्पायसर कॉलेज परिसर औंध रोड, बोपोडी गावठाण, मुंबई – पुणे रोड, भोईटे वस्ती, सानेवाडी, आनंद पार्क, दर्शन पार्क परिसर, डी-मार्ट परिसर बाणेर फाटा ते महाबळेश्वर हॉटेल दोन्ही बाजूचा परिसर, वर्षा पार्क, माउली मंगल कार्यालय परिसर.

Khandeshi Melava in Baner : बाणेर मध्ये रंगला खानदेशी मेळावा 

Categories
cultural Political पुणे

बाणेर मध्ये रंगला खानदेशी मेळावा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगेच्या वतीने बाणेर येथील धनकुडे फार्म येथे खानदेशातील नागरिकांसाठी खानदेशी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

ह्या कार्यक्रमाचे निमित्त एकच होते की खानदेशी नागरिकांची एकमेकांशी ओळख व्हावी आणि सुख-दुःखात एकमेकांना मदत करता यावी. या हेतुने खानदेशी नागरिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमात खास खानदेशी पध्दतीच्या आल्पभोजणाचे तसेच लहान मुलांसाठी “फॅंसी ड्रेस” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी डॉ. राजेश देशपांडे ,सौ. सरला चांदेरे, प्रा. रुपाली बालवडकर ,सौ. सुषमा ताम्हाणे , दत्तात्रय कळमकर , मनोज बालवडकर ,सौ.अंजना चांदेरे, प्राजक्ता ताम्हाणे , हरिश झोपे, वंदना पाटील, प्राची वराडे, छाया चौधरी, प्राची कोतकर आणि खानदेशी बंधू – भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन नितीन कळमकर, सौ.पुनम विशाल विधाते, डॅा.सागर बालवडकर व समिर बाबुराव चांदेरे यांनी केले होते. तर प्रस्तावित भूमिका नेहते यांनी केले आणि खुशबू अत्तरदे यांनी आभार मानले .

Balewadi Ground : Amol Balwadkar : बालेवाडीत 7 एकरवर उभारणार खुले मैदान  : नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कामाला केली सुरुवात 

Categories
Breaking News PMC Political Sport पुणे

बालेवाडीत 7 एकरवर उभारणार खुले मैदान

: नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कामाला केली सुरुवात

पुणे : बालेवाडी हाय स्ट्रिट येथील स.नं.१७ मध्ये मुलांसाठी व नागरीकांकरीता लवकरच बाणेर-बालेवाडी परिसरातील सर्वात मोठे खुले मैदान उपलब्ध होणार आहे. 7 एकर जागेवर हे भव्य मैदान उभारले जाईल. मैदान विकसित करण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. अशी माहिती नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिली.

: महापालिका बजेट मध्ये करून घेणार तरतूद

     याबाबत नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले कि, बालेवाडी हायस्ट्रिट येथील स.नं.१७ मधील  आरक्षित जागेवर खेळाडु, मुले व नागरीकांकरीता खुले मैदान विकसित करण्याच्या कामाला प्रत्यक्षात आम्ही सुरुवात केली आहे. माझ्याच मार्गदर्शनाखाली सदर जागा मोकळी करुन सपाट करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे मैदान 7 एकर जागेवर उभारले जाणार आहे. त्यासाठीची 90% जमीन महापालिकेच्या ताब्यात आली आहे. बालवडकर यांनी सांगितले कि जमीन ताब्यात घेण्यासाठी जागा मालकासोबत वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. यासाठी आता महापालिका बजेट मध्ये योग्य ती तरतूद करून घेतली जाणार आहे. जेणेकरून या कामास गती मिळेल.
प्रामाणिक काम, विकासावर ठाम..!
हे मैदान 7 एकर जागेवर उभारले जाणार आहे. त्यासाठीची 90% जमीन महापालिकेच्या ताब्यात आली आहे. जमीन ताब्यात घेण्यासाठी जागा मालकासोबत वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. यासाठी आता महापालिका बजेट मध्ये योग्य ती तरतूद करून घेतली जाणार आहे.
अमोल बालवडकर, नगरसेवक, पुणे मनपा

Amol Balwadkar : Hina Gavit : खासदार हिना गावित यांची नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या बाणेर जनसंपर्क कार्यालयास भेट 

Categories
Political पुणे

खासदार हिना गावित यांची नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या बाणेर जनसंपर्क कार्यालयास भेट

पुणे :  नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय संसदरत्न खासदार हिना गावित यांनी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या बाणेर जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
    याबाबत नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले कि,  यावेळी हिना ताईंनी केंद्र सरकारच्या अनेक योजनांबद्दल माहिती आम्हास दिली. तसेच त्यांच्या मतदार संघाबाबत माहिती दिली. महिला पदाधिकाऱ्यांनी  प्रभागात महिला मोर्चा मार्फत सुरु असलेल्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा केली. पेशाने डॅाक्टर असुनही राजकिय व सामाजिक क्षेत्रात त्यांचे काम अतिशय उल्लेखनिय आहे. तसेच अमोल बालवडकर क्विक रिस्पॅान्स टिमचे काम, रुग्णवाहिका व तसेच जनसंपर्क कार्यालयामार्फत होणार्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.
   यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, प्रभाग अध्यक्षा उमाताई गाडगिळ, नितिन रनवरे, शशिकांत बालवडकर, शाम पाटील, अस्मिता करंदिकर, रिना सोमैया, राखी श्रीवास्तव, वैदेही बापट, सर्व भाजपा पदाधिकारी व  मित्र परिवार उपस्थित होते.

Cricket Tournament : Baner : बाणेरच्या सोसायटीमध्ये रंगली क्रिकेट स्पर्धा 

Categories
Political Sport पुणे

बाणेरच्या सोसायटीमध्ये रंगली क्रिकेट स्पर्धा

पुणे : बाणेर-बालेवाडी-सूस-म्हाळुंगे भागातील सोसायट्यांमधील नागरिकांसाठी बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशनच्या वतीने बी बी एस एम सोसायटी फुल्ल पीच डे- नाईट क्रिकेट स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये ७० पुरुष व ५ महिला सोसयटी मधील संघांनी सहभाग घेतला. एकुण ७७० पुरुष व ५५ महिला खेळाडु सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते मा. महापौर अंकुश काकडे व शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या क्रिकेट स्पर्धेमुळे सोसायटी वर्गातील नागरिक व खेळाडू यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले; कारण अशी भव्य क्रिकेट स्पर्धा या पूर्वी कोणी भरवली नाही. त्यामुळे अश्या स्पर्धेचे आयोजन नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी दरवर्षी करावे. अशी मागणी सोसायटी मधील नागरिकांनी व खेळाडूंनी केली असता चांदेरे यांनी ही स्पर्धा तुमच्या साठी दरवर्षी भरवली जाईल. असे आश्वासन त्यांनी देताच खेळाडू आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

तसेच अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे बाणेर येथे नव्याने स्मारक उभारण्यात आले या स्मारकाचे अनावरण सोहळा संपन्न झाला , यावेळी स्वराज्य प्रतिष्ठान यांना बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनच्या वतीने ५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

याप्रसंगी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा कविता आल्हाट, नगरसेवक प्रमोद निम्हण, नगरसेविका रोहिणी चिमटे, शिला भालेराव, डॉ. सागर बालवडकर , मनोज बालवडकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक वर्ग आणि क्रिकेट प्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रिकेट स्पर्धेचे आयोजन समीर बाबुराव चांदेरे, पुनम विशाल विधाते व कोथरूड विधानसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष नितीन कळमकर यांनी केले आहे .

Cancer Hospital : Hemant Rasane : Multispeciality Hospital : बाणेर आणि वारजेत होणार १००० कोटींची महापालिकेची रुग्णालये

Categories
Breaking News PMC पुणे

बाणेर आणि वारजेत होणार १००० कोटींची महापालिकेची रुग्णालये

: मल्टिस्पेशालिटी आणि कर्करोगाच्या रुग्णालयांच्या प्रस्तावाला मान्यता

 

पुणे : बाणेर येथे ७०० कोटी रुपयांचे कर्करोग रुग्णालय आणि वारजे येथे ३५० कोटी रुपयांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली असल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, महापालिकेच्या अंदाजपत्रकात कॅन्सर रुग्णालय आणि मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. खासगी संस्थांच्या सहकार्यातून ही दोन रुग्णालये डिझाइन-बिल्ट-फायनान्स-ऑपरेट-ट्रान्सफर (डीबीएफओटी) तत्वावर उभारण्यात येणार आहेत. त्यानुसार आज स्थायी समितीत प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

रासने म्हणाले, वारजे येथे सध्याच्या प्रभाग क्रमांक ३० मध्ये मल्टिस्पेशालिटी रुग्णालयासाठी आर सेव्हन अंतर्गत जागा आरक्षित करण्यात आली आहे. या ठिकाणी १० हजार ५६४ चौरस मीटर इतकी जागा उपलब्ध आहे. डीबीएफओटी तत्वावर हे रुग्णालय संबंधित संस्थेला तीस वर्षांसाठी चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. संबंधित संस्था रुग्णालय उभारणे आणि त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरविण्यासाठी निधी पुरविणार आहे. या ठिकाणचे काही बेड मोफत, काही बेड सीजीएचएस दराने आणि काही बेड खासगी दराने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यातून महापालिका उत्पन्नही मिळणार आहे. प्रकल्पासाठी निविदाधारकाला कर्ज घेता येणार आहे. या कर्जाची परतफेड करण्याची हमी महापालिका संबंधित वित्त संस्थेला देणार आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

रासने पुढे म्हणाले, मुंबईतील टाटा रुग्णालयाच्या धर्तीवर कर्करोग या आजारावर उपचार करणारे एकही स्वतंत्र रुग्णालय पुणे शहर किंवा पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये नाही. कर्करोगाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अशाप्रकारचे रुग्णालय उभारणे आवश्यक आहे. सध्या देशात एक लाख लोकसंख्येमागे ९० कर्करोगाचे रुग्ण आहेत. या आजारावरील उपचार खूपच खर्चिक आणि दीर्घकालीन असतात. सर्वसामान्य गरीब नागरिकांना हा खर्च परवडत नाही. महापालिकेतर्फे अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय उभे केल्यास नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. प्लॅन, डिझाइन, बिल्ट, इक्विप, फायनान्स (पीडीबीआईएफ) या तत्वावर खासगी संस्थेमार्फत या रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे. संबंधित संस्था कर्ज घेऊ शकते. महापालिका या कर्जफेडीची हमी घेणार आहे. कर्करोग रुग्णालयासाठी बाणेर परिसरात जागा उपलब्ध आहे. या प्रकल्पासाठी ७०० कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे.

Traffic at Baner : Sameer Chandere : बाणेर येथील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार : युवा नेते समीर चांदेरे यांनी व्यक्त केला विश्वास 

Categories
PMC Political पुणे

बाणेर येथील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार

युवा नेते समीर चांदेरे यांनी व्यक्त केला विश्वास

पुणे : बाणेर – बालेवाडी या परिसराचा नियोजनबद्ध विकास झाल्यामुळे या परिसरात मोठ्या संख्येने नागरिक, उद्योजक, व्यावसायिक वास्तव्यास आहेत. अनेक नागरिक व्यवसाय निमित्त, नोकरी निमित्त ये – जा करतात त्यामुळे वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रहदारी मोठ्याप्रमाणात वाढत आहे. त्यामुळेच बाणेर भागात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत वाढ होताना दिसत आहे. यावर युवा नेते समीर चांदेरे यांनी पोलिसांना काही उपाय सुचवले आहेत. त्यामुळे बाणेर मधील वाहतूक कोंडी लवकर सुटेल, असा विश्वास चांदेरे यांनी व्यक्त केला.

बाणेर येथील पॅनकार्ड क्लब रोड आणि श्रॉफ रोड ह्या रोड वर दुहेरी वाहतूक असल्यामुळे त्याचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे . हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी या दोन्ही रस्त्यांवर एकेरी वाहतूक केली तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो यासंदर्भात नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी चतृशृंगी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन जाधव आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम देवकर यांच्यासोबत चर्चा करून यावर तातडीने मार्ग काढावेत अशी मागणी केल्यामुळे युवा नेते समीर चांदेरे , विशाल विधाते , अमोल भोरे , सिद्धराम कलशेट्टी आणि पोलीस अधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून त्यावर सविस्तर चर्चा केली , याबाबत बारकाईने पाहणी करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी पोलीस अधिकारी यांनी दिले .
बाणेरच्या मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी श्रॉफ रोडचा तर मुख्य रस्त्याकडून येण्यासाठी पॅन कार्ड क्लब रोडचा एकेरी वापर करण्यास यावेळी पोलिस अधिकाऱ्यांना सुचवले , दोन्ही रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरु झाल्यास बाणेरची वाहतुक कोंडीतून सुटका होईल आणि नागरिकांचाही त्रास वाचेल, असा विश्वास यावेळी युवा नेते समीर चांदेरे यांनी व्यक्त केला .

Baner:Balewadi : बाणेर-बालेवाडी संपूर्ण प्रभाग प्रकाशमान करणार! : नगरसेवक अमोल बालवडकर

Categories
PMC social पुणे

बाणेर-बालेवाडी संपूर्ण प्रभाग प्रकाशमान करणार!

नगरसेवक अमोल बालवडकर यांचे नागरिकांना आश्वासन

पुणे : भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून व पुणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बाणेर बालेवाडीतील विविध सोसायटींमध्ये स्मार्ट पथदिवे खांब आणि हायमास्ट लाईटचे उद्घाटन नागरिकांच्या हस्ते संपन्न झाले. स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या निधीतून हा खर्च करण्यात आला आहे. शिवाय बालवडकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला. बालवडकर यांनी यावेळी सांगितले कि येणाऱ्संया काळात संपूर्ण प्रभाग प्रकाशमान करण्यात येईल.

विविध सोसायटीमध्ये पथदिवे आणि हायमास्ट लाईट चे उद्घाटन

प्रभागातील मधुबन सोसायटी, सफिरे पार्क, भाग्य अपार्टमेंट, गोल्डन ट्रेलीज, परफेक्ट 10, पल्लाझो, कॉनकॉर्ड पोर्टिया, गिनी विविआना, मानस हेरिटेज, मधुकोष, ऑरा, अस्टोनिया, मोंट वेर्ट कोर्सिका, निर्मिती झिऑन, द लेबर्नुम,  सिद्धी आणि आजूबाजूच्या सर्व सोसायटींचा यामध्ये समावेश आहे.
यासोबतच, कूल होम्स, परितोष सोसायटी, द्वारका साई पॅरामाऊंट, ओर्विक, वाटिका, 7 अव्हेन्यू, अटलांटिस या सोसायटींमध्येही उद्घाटन समारंभ पार पडला. या कार्यक्रमास नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला.
येणाऱ्या काळात प्रभागातील विविध भागांमध्ये देखील अशाच प्रकारचे एल.ई.डी.पथदिवे बसवून संपूर्ण प्रभाग प्रकाशमय करण्यात येईल असे आश्वासन नगरसेवक अमोल बालवडकर यांनी यावेळी दिले.