Property tax | PMC | सुट्टी असली तरी भरू शकता मिळकतकर | महापालिकेची सीएफसी केंद्रे उद्या सुरु राहणार

Categories
Breaking News PMC social पुणे

सुट्टी असली तरी भरू शकता मिळकतकर

| महापालिकेची सीएफसी केंद्रे उद्या सुरु राहणार

श्रीराम नवमीनिमित्त उद्या ३० मार्च रोजी सुट्टी असूनही मिळकत कर भरण्यासाठी पुणे मनपाची सी. एफ. सी. केंद्रे सुरु राहणार आहेत. तसेच ३१ मार्च, २०२३ रोजी देखील स. १० ते रा. १० या वेळेत ही केंद्रे सुरु राहणार आहेत. कर भरा आणि पुणे शहराच्या विकासात सहकार्य करा. असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना हे ही आवाहन करण्यात आले कि 31 मार्च पूर्वी आपला थकीत मिळकतकर भरून घ्या. जेणेकरून पुढील आर्थिक वर्षात थकबाकी वर व्याज भरावे लागणार नाही. कारण प्रति महिना 2% आकारले जाते. हे टाळण्यासाठी मिळकतकर भरणे आवश्यक आहे. दरम्यान कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षात 1850 कोटींहून अधिक उत्पन्न मिळवले आहे.

CFC | Property Tax | मिळकत करावरील शास्ती टाळा | सुट्टीच्या दिवशी ही टॅक्स भरणा करण्यासाठी CFC राहणार सुरु 

Categories
Breaking News PMC social पुणे

मिळकत करावरील शास्ती टाळा | सुट्टीच्या दिवशी ही टॅक्स भरणा करण्यासाठी CFC राहणार सुरु

| महापालिका कर विभागाचे आवाहन

पुणे | सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील दुसरी सहामाही भरण्याचा आजचा हा शेवटचा दिवस आहे. द्वितीय सहामाहीस १ जानेवारी २०२३ पासून २% शास्ती दरमहा आकारली जाणार आहे. ही शास्ती टाळण्याचा प्रयत्न करा. असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. त्यासाठी सुट्टीच्या दिवशी देखील नागरी सुविधा केंद्र (CFC) केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. (pune municipal corporation)

पुणे महानगरपालिका (PMC Pune) कर आकारणी व करसंकलन विभागामार्फत (Property tax dept) सन २०२२-२३ करीताचे देयके ह्यापूर्वीच पाठवण्यात आली आहेत. वार्षिक देयकाची दोन सहामाहीत विभागणी असून प्रथम सहामाही दि.१/०४/२०२२ ते दि. ३०/०९/२०२२ व द्वितीय सहामाही दि. १/१०/२०२२ ते दि. ३१/०३/२०२३ पर्यंत आहे. प्रथम सहामाहीस १ जुलै पासून २% शास्ती दरमहा आकारली जात आहे. द्वितीय सहामाहीस दि. १ जानेवारी २०२३ पासून २% शास्ती दरमहा आकारली जाणार आहे. तरी सर्व मिळकत कर थकबाकीधारकांना आवाहन करण्यात येते की आपला मिळकत कर त्वरित जमा करावा.
मिळकतधारकांच्या सोयीकरिता शनिवार दि. ३१/१२/२०२२ रोजी सर्व क्षेत्रीय कार्यालय व संपर्क कार्यालय सुट्टीच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत सर्व नागरी सुविधा केंद्र येथे रोख, चेक व डी.डी. ने भरणा करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच दि. ३१ मार्च २०२३ पर्यंत सुट्टीच्या दिवशी देखील सर्व नागरी सुविधा केंद्र सुरु असणार आहेत.

CFC : PMC : नागरी सुविधा केंद्रातील कर्मचारी व कामकाजावर ठेवला जाणार ‘वॉच’ 

Categories
Breaking News PMC पुणे

नागरी सुविधा केंद्रातील कर्मचारी व कामकाजावर ठेवला जाणार ‘वॉच’

: समन्वय अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती

पुणे : महानगरपालिकेकडून नागरिकांना विविध प्रकारच्या कार्यालयीन सेवा नागरी सुविधा केंद्रामार्फत (CFC) पुरविल्या जातात. त्यामध्ये मिळकतकर भरणा व त्या संबंधित इतर सर्व दाखले, जन्म-मृत्यू दाखले, नळजोडणी व मीटर जोडणी संबंधीतील कामे, पाणी मीटर बिल, वॉटर टँक रिसीट, आरोग्य खात्याकडील नर्सिंग होम व हॉस्पिटल यांचे परवाने, विविध खात्यातील ना- हरकत दाखले, अतिक्रमण विभागातील दंडात्मक कारवाईबाबतच्या रकमा स्विकारणे इ. प्रकारच्या सेवा नागरी सुविधा केंद्रातून सर्व क्षेत्रीय कार्यालय, संपर्क कार्यालय व २३ नवीन समाविष्ट गावे अशा ठिकाणी देण्यात येत आहेत. मात्र आता पुढील काळात इथले कर्मचारी आणि कामकाजावर वॉच ठेवला जाणार आहे. त्यासाठी वरिष्ठ समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

नागरिकांना गतीमानरित्या सुविधा पुरविणे गरजेचे

सद्यस्थितीत नागरी सुविधा केंद्र चालविण्याचे कामकाज क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कार्यालयीन वेळेत क्षेत्रीय कार्यालयाच्या शिस्तीनुसार केले जात आहे. नागरी सुविधा केंद्राच्या कामकाजा अंतर्गत नागरिकांकडून दररोज विविध सेवांतर्गत रोख रकमा, डीडी व चेक जमा होतात. यामध्ये या रकमा स्विकारल्या नंतर नागरिकांना पोच पावती दिली जाते. सदर नागरी सेवा सुविधा मार्फत रोख रक्कम, डीडी व चेक नियमितपणे नागरी सुविधा केंद्रावरील (सीएफसी) सेवकांमार्फत आयसीआयसीआय या बँकेमध्ये जमा करण्यासाठी बँक कर्मचारी (CMS) यांच्याकडे दिल्या जातात. या सर्व व्यवहाराबाबत प्रत्येक दिवसा अखेर अहवाल (स्क्रोल) काढला जात असून त्यावर बँक कर्मचाऱ्यांची पोच, घेतली जाते. सदरची सर्व स्क्रोल तसेच रक्कम भरणाबाबतच्या पावत्या सद्यस्थितीत मनपा सीएफसी सेवकांमार्फत संकलित करून ठेवण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या दर वर्षी होणाऱ्या लेखापरीक्षणास सदर पावत्या व स्क्रोल तपासण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी या सर्व फाईल्स व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. याबाबत सदर स्क्रोल व पोच पावतीवर पुणे मनपाच्या कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे नियंत्रण व जबाबदारी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सदरचे दैनंदिन स्क्रोल सर्टिफाईड करणे, नागरी सुविधा केंद्रावरील (सीएफसी) सेवकांवर, नागरी सुविधा केंद्रावरील ट्रान्झेक्शन व कॅशची तपासणी करणे, नागरिकांना गतीमानरित्या सुविधा पुरविणे इ. कामकाज करणे अत्यंत महत्वाचे असून आपल्या कार्यालयाकडील वरिष्ठ सेवकानंमार्फत होणे अपेक्षित आहे.

सुविधा केंद्रावरील कामकाजावर नियंत्रण

पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडील वरिष्ठ सेवाकांद्वारे सीएफसीमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी तेथील कामकाजावर नियंत्रण ठेवणे व तेथे जमा
होणाऱ्या भरणा (कॅश + डीडी +चेक) वर देखरेख ठेवणे, तसेच तेथे दिल्या जाणाऱ्या विविध खात्यातील सोयी सुविधा पुरविल्यानंतर तयार होणाऱ्या पावत्या व त्यांचे स्क्रोल व्यवस्थितरित्या फाईलिंग करून संकलित करणे व आवश्यकतेनुसार संबंधित कार्यालयास माहिती पुरविणे व समन्वय ठेवणे, नागरी सुविधा केंदावरील ऑपरेटर यांची हजेरी तपासणे, दर महिन्याच्या हजेरीवर आपल्या कडील नियुक्त वरिष्ठ सेवकांच्या हजेरीवर स्वाक्षरी करणे, त्याबरोबर त्यावर क्षेत्रीय कार्यालयाचा शिक्का असणे इ.कामे करणे आवश्यक आहे. सदरची नागरी सुविधा केंद्र ही क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीत येत असल्याने नागरिकांना गतीमानरित्या सुविधा पुरविणेसाठी नागरिकांना सदर सेवा देताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी व तसेच तेथील कामकाजाच्या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार योग्य ती कारवाई क्षेत्रीय कार्यालयामार्फत करणे आवश्यक आहे. यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत  कार्यालयीन पत्रक काढण्यात आले आहे. तदनुषंगाने सर्व मा. महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी नागरी सुविधा केंद्रावरील कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी व त्यांची नाव, पदनाम, भ्रमणध्वनी क्र. याची माहिती, माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे कळविण्यात यावी. जेणेकरून नागरी सुविधा केंद्रावरील ऑपरेटरवर व कामकाजावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. असे निर्देश देण्यात आले आहेत.