Sane Guruji Ganesh Mandal Fire | साने गुरूजी मंडळाला लागलेली आग फटाक्यामुळे!

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Sane Guruji Ganesh Mandal Fire | साने गुरूजी मंडळाला लागलेली आग फटाक्यामुळे!

Sane Guruji Ganesh Mandal Fire | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) आज पुणे दौऱ्यात ज्या साने गुरुजी गणपती मंडळाची (Sane Guruji Ganesh Mandal) आरती करत होते तिथे आग लागली.  आरती करत असतानाच मंडळाच्या देखाव्याच्या शिखराला आग लागली. त्यामुळे त्यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना तातडीने तिथून बाहेर काढले
पाऊस पडत असल्यामुळे आणि अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने आग लगेचच विझली. नड्डांसोबत त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), शहर अध्यक्ष धीरज घाटे (Dhiraj Ghate) देखील तिथे उपस्थित होते.

अग्निशमन दल नियंत्रण कक्षात राञी ०७•४६ वाजता आंबीलोढा कॉलनी, साने गुरूजी नगर येथे असलेल्या मंडळाजवळ सजावट केलेले एक मोठे मंदिर याला आग लागल्याची वर्दि मिळाली असता दलाकडून जनता वसाहत, एरंडवणा अग्निशमन केंद्र येथून व अग्निशमन मुख्यालयातून अशी एकूण चार अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती. (Pune Ganeshotsav)
घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, सजावट केलेल्या एका मोठ्या मंदिराच्या कळसापासून आगीची सुरवात झाली असून आग वाढत आहे. जवानांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत व शहरात गणपती उत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक असल्याने तातडीने मंडपाच्या मागील बाजूने शिडी लावत वर चढून चार ही बाजूने होज पाईपच्या साह्याने पाण्याचा मारा केला. सुमारे वीस मिनिटात आगीवर नियंञण मिळवत पुढील धोका दूर केला. सुदैवाने कोणी जखमी नाही. अधिक माहिती घेतली असता आग फटाक्यांमुळे लागल्याचे समजले.

Pune Loksabha Election | BJP | पुणे लोकसभेच्या भाजपा समन्वयकपदी श्रीनाथ भिमाले!

Categories
Breaking News Political पुणे

Pune Loksabha Election | BJP | पुणे लोकसभेच्या भाजपा समन्वयकपदी श्रीनाथ भिमाले!

Pune Loksabha Election | BJP | भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या (BJP Maharashtra)  ‘महाविजय २४’ (Mahavijay 24) या अभियानाच्या पुणे लोकसभा (Pune Loksabha) समन्वयकपदी महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले (Shrinath Bhosale) यांची नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीचे पत्र भिमाले यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या हस्ते पुण्यात स्विकारले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे (Rajesh Pande), शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate), जगदीळ मुळीक उपस्थित होते.
भिमाले यांनी १९९८ साली भाजपा युवा मोर्चामधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली असून २००२ पासून पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत. शिवाय २०१२ साली पुणे शहर सरचिटणीस आणि २०१७ साली पुणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदाची धुराही सांभाळली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिमाले यांना ही जबाबदारी मिळाली आहे. शिवाय पुणे लोकसभेंतर्गत असणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांचे समन्वयक म्हणूनही भिमाले यांच्याकडे जबाबदारी असणार आहे.
नियुक्तीबाबत भिमाले म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी  आणि पार्टीने माझ्यावर टाकलेला विश्वास आगामी काळात सार्थ करण्याचा प्रयत्न आहे. पुणे लोकसभेवर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकेल, यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा मानस आहे. संघटनेत आजवर मिळालेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पडली असून नवी जबाबदारीही पूर्ण क्षमतेने आणि समर्पण भावनेतून निभावली जाईल’.
—-
News Title | Pune Loksabha Election | BJP | Srinath Bhimale as BJP coordinator of Pune Lok Sabha!

Chandrasekhar Bawankule | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच राजकीय स्फोट झालेला दिसेल | चंद्रशेखर बावनकुळे असे का म्हणाले?

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच राजकीय स्फोट झालेला दिसेल | चंद्रशेखर बावनकुळे असे का म्हणाले?

पक्षाच्या वरिष्ठांनी आपल्याला गृहमंत्री केले नाही अशी खंत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. त्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड धुसफूस असून लवकरच आपल्याला राजकीय स्फोट झालेला दिसेल.

महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अठरा महिने मंत्रालयतही गेले नाहीत. त्यांच्या दिरंगाईमुळे आणि निष्काळजीपणामुळे वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत आणि आदित्य ठाकरे यांचे आंदोलन खोटारडे आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना केली.

ते म्हणाले की, माजी मंत्री आदित्य ठाकरे वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाच्या विषयावरून तळेगाव येथे करत असलेले आंदोलन म्हणजे खोटारडेपणा आहे. हे आंदोलन म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट करून जनतेची दिशाभूल करणे आहे.

आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प उभारण्यासाठी केलेला सामंजस्य करार दाखवावा आणि त्या प्रकल्पाला तळेगावमध्ये नेमका कोणता भूखंड दिला त्याचा त्यांच्या सरकारच्या काळातील आदेश दाखवावा, असे आव्हान मा. बावनकुळे यांनी दिले.

पीएफआयवरील कारवाईनंतर पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा काहीजणांनी दिल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करून मा. बावनकुळे म्हणाले की, अशा घोषणा देणाऱ्यांना शोधून काढून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी आपली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे. सरकारने या विषयाची गंभीर दखल घेतली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कठोर कारवाई करतील याची आपल्याला खात्री आहे.

राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री प्रवास करत असून केंद्र सरकारच्या गरीब कल्याणाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेत आहेत. त्याप्रमाणे बारामती मतदारसंघाचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आढावा घेतला. बारामती मतदारसंघात आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडले पाहिजे, असा आमचा निर्धार आहे, असे त्यांनी सांगितले.

शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला परवानगी मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता मा. प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलण्यासारखे काही नसल्याने ही केवळ टोमणे सभा होईल आणि आपल्यासह अनेक नेत्यांवर वैयक्तिक चिखलफेक होईल. आतापर्यंत फेसबुक लाईव्हमध्ये असेच होत होते. त्यामुळे आता लोक उद्धव ठाकरे यांची गंभीर दखल घेत नाहीत.