PMC: Garbage project: GB meeting: आता हडपसरला कचरा प्रकल्प नको!

Categories
PMC Political पुणे

आता हडपसरला कचरा प्रकल्प नको!

: राष्ट्रवादीचे नगरसेवक मुख्य सभेत आक्रमक

पुणे: शहरात कचर्‍याचे सर्व प्रकल्प हडपसर भागात नको, असे म्हणत गुरुवारच्या मुख्य सभेत राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक चांगलेच आक्रमक पाहायला मिळाले. पुण्यातील मेट्रो प्रकल्प पहिल्यांदा हडपसरला का केलानाही, पेठांमध्ये कचर्‍याचा प्रकल्प का केला जात नाही अशा आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नव्याने होणार्‍या सॅनटरी वेस्ट डिसपोजल प्रकल्पाला विरोध करण्यात आला. त्यामुळे याप्रस्तावावर मतदान घेण्यात आले. उपसुचनेसह 72 विरुध्द 26 मतांना या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

: काँग्रेस राहिली तटस्थ; मात्र अरविंद शिंदेंचे मतदान

महापालिकेच्या घनकचरा विभागाकडुन हडपसर याठिकाणी सॅनटरी वेस्ट शास्त्रोक्त पध्दतीन विल्हेवाट लावण्याकरत एका कंपनीकडुन प्रकल्प करण्यात येणार आहे. ही कंपनी 25 कोटी रुपये खर्च करुन याठिकाणी यंत्रसामग्री उभारण्यात येणार आहे.पहिल्या तीन वर्ष हा प्रकल्पासाठी कोणतेही पैसे महापालिकेला मोजावे लागणार नाहीत. तीन वर्षानंतर महापालिकेला पैसे द्यावे लागतील. यानंतर मुदत वाढीचा निर्णय महापालिका आयुक्त करणार होते. मात्र याप्रस्तावाला उपसुचना देण्यात आली. तीन वर्षानंतर मुदतवाढीसाठी स्थायी समितीचीमंजूरी घेवून सर्वसाधारण सभेची मान्यता घावी अशी उपसुचसह प्रस्ताव मान्य करण्यात आला.
कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी आणखी एक प्रकल्प हडपसर भागात होणार आहे. याप्रकल्पाला हडपसर भागातील नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. याविषयी नगरसेविका वैशाली बनकर म्हणाल्या, महापालिका प्रशासनाला वार्तानकूलित कार्यालयात बसून हडपसरभागातील नागरिकांचे प्रश्‍न कळणार नाहीत. प्रत्येकवेळी शास्त्रोक्त पध्दतीने कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. पुणे शहराचा संपुर्ण कचरा हडपसर भागात जिरवला जात आहे. आमच्याकडे ज्याप्रमाणे कचरा पाठवता त्याप्रमाणे मेट्रो सुध्दा पहिल्यांदा हडपसर भागात का केली नाही. महापालिका प्रशासन केवळ दिखावू पणा करत आहे. स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या पाहणीच्यावेळी केवळ दिखावा करण्यात येतो असे बनकर म्हणाल्या. महापौर मुरलीधर मोहळ यांनी यावर आक्षेप घेतला. महापालिका प्रशासनाने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक आपण करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.

 राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केल्यामुळे प्रस्ताव 72 विरुध्द 26 मतांनी मान्य झाला. याप्रस्तावावर काँग्रेसने तटस्थ भुमिका घेतली. काँग्रेस ची ही भूमिका असली तरी मात्र नगरसेवक अरविंद शिंदे यांनी एकट्याने प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे त्यांच्या भूमिके विषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

GB Meeting : Ganesh Bidkar vs Mahavikas Aghadi : भाजपने शहरात केलेल्या जाहिरातीवर महापुरुषाचे फोटो नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस सहित विरोधी नेत्यांचे चे मुख्य सभेत आंदोलन : तर गणेश बिडकर यांनी विरोधी पक्षाची बोलती केली बंद; म्हणाले हे आंदोलन निव्वळ प्रसिद्धीसाठी

Categories
Breaking News PMC Political पुणे

भाजपने शहरात केलेल्या जाहिरातीवर महापुरुषाचे फोटो नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस सहित विरोधी नेत्यांचे चे मुख्य सभेत आंदोलन

: तर गणेश बिडकर यांनी विरोधी पक्षाची बोलती केली बंद; म्हणाले हे आंदोलन निव्वळ प्रसिद्धीसाठी

पुणे : १९ डिसेंबर रोजी पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी तसेच महापालिकेत नव्याने बसवलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी देशाचे गृहमंत्री  अमित शहा येत आहेत. या कार्यक्रमाची जाहिरात म्हणून सत्ताधारी भाजपने संपूर्ण शहरभरात मोठे मोठे होर्डिंग लावले. परंतु या होर्डिंग्जवर कुठेही छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो भारतीय जनता पार्टीने लावले नाही. त्याऐवजी भाजपच्या नेत्यांचे मोठे मोठे फोटोज या बॅनर वरती लावलेले आहेत.  त्यामुळे कॉंग्रेस आणि  राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, पार्टीतर्फे महापुरुषांचा फोटो न लावणाऱ्या  भारतीय जनता पार्टीचा पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जाहीर निषेध करण्यात आला. शिवाय आंदोलन देखील करण्यात आले. मात्र त्याच वेळी आपल्या भाषणातून सभागृह नेते गणेश बिडकर यांनी देखील जुने दाखले देत विरोधी पक्षाची बोलती बंद केली. विशेष म्हणजे या बाबत निषेधाची तहकुबी देण्याचा राष्ट्रवादी चा प्रयत्न फसलेला दिसून आला.

: करणी आणि कथनी यात फरक – प्रशांत जगताप

शुक्रवार ची सभा सुरु झाल्याबरोबर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या या विषयावरून आंदोलनाला सुरुवात केली.   यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप यांनी भाजपला या प्रकारा बाबत माफी मागण्यास सांगितले.  जगताप म्हणाले कि, “या प्रकारातून भाजपचा खरा चेहरा डोळ्यासमोर आला आहे . भारतीय जनता पार्टीला महापुरुषांची आठवण केवळ मते  मागताना येते. भाजपच्या नेत्यांच्या मनात या महापुरुषांबद्दल आदत नसल्याचे या प्रकारातून उघड झाले आहे. त्यांची करणी आणि कथनी यात असलेला फरक् यातून दिसून येतो”.

: आंदोलन निव्वळ प्रसिद्धीसाठी – गणेश बिडकर

या विषयावरून गणेश बिडकर आपल्या भाषणात म्हणाले, महानगरपालिकेने वर्षानुवर्षे सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँगेसने त्यांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसविण्याचा प्रयत्न केले नाहीत. केवळ महापुरुषांच्या नावाने राजकारण केले. अनेक वर्षे हातात सत्ता असतानाही आपल्याला जे जमले नाही ते भारतीय जनता पक्षाने करून दाखविले. याचे दुःख असल्याने हा खटाटोप सुरू आहे. या दोन्ही महपुरूषांचे पुतळे पालिकेत बसत असल्याने हा पालिकेच्या इतिहासातील सुवर्णदिवस आहे.

PMC : ATMS : राष्ट्रवादीचा विरोध उरला फक्त प्रसारमाध्यमा करिता! 

Categories
Breaking News PMC Political पुणे

राष्ट्रवादीचा विरोध उरला फक्त प्रसारमाध्यमा करिता!

: स्थायी समिती किंवा मुख्य सभेत नेहमी प्रस्तावाच्याच आणि भाजपच्याच बाजूने

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्मार्ट सिटीची अडॅप्टीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (एटीएमएस) यंत्रणा उभारण्यासाठी 58 कोटींच्या खर्चाच्या प्रस्तावास महापालिकेच्या मुख्यसभेत मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्थायी समितीने या प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेने या प्रस्तावास विरोध करत भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र, मुख्यसभेत हा प्रस्ताव मान्यतेला आल्यानंतर सत्ताधारी भाजपला राष्ट्रवादीने साथ दिली तर, शिवसेना तटस्थ राहिली. त्यामुळे महापालिका आघाडीत पडलेल्या फुटीमुळे कॉंग्रेस मुख्यसभेत एकाकी पडली. दरम्यान स्थायी समितीत देखील हा प्रस्ताव मंजूर करताना राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विरोध केला नव्हता. विरोध फक्त प्रसारमाध्यमा समोर दिसला होता. याआधी देखील राष्ट्रवादीने अशीच खेळी केली आहे. एवढा विरोध असताना देखील मुख्य सभेत भाजपच्या बाजूने जाणेच राष्ट्रवादीने पसंद केले. त्यामुळे भाजपच्या नावाने खडे फोडण्याचा अधिकार राष्ट्रवादीला आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

या प्रकल्पासाठी आवश्‍यक असणारा 102 कोटी 62 लाख रुपयांचा भांडवली खर्च पुणे स्मार्ट सिटी करणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी 11 कोटी 58 लाख रुपये याप्रमाणे पाच वर्षांसाठी 57 कोटी 94 लाख (कर अतिरिक्‍त) रुपयांच्या खर्चाची जबाबदारी पुणे महापालिकेने स्वीकारली होती. त्याचा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर महाविकास आघाडीने या प्रस्तावाला जोरदार विरोध करत भाजप विरोधात आंदोलने केली होती.

माहिती कोण देणार हे तुम्ही ठरवू नका

त्यानंतर आज मुख्यसभेत हा प्रस्ताव मंजूरीला येण्याआधी या प्रस्तावास विरोध करणारे महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी सभागृहातून बाहेर निघून गेले. त्यानंतरच हा प्रस्ताव पुकारण्यात आला. त्यावेळी नगरसेवक अविनाश बागवे आणि शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी या प्रस्तावाची माहिती स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी देण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाकडून स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित नसल्याचे सांगितले. यावरून बागवे आणि सुतार यांनी सभागृहात स्मार्ट सिटी च्या अधिकाऱ्यांना बोलावण्याची मागणी केली. मात्र विद्युत विभागाच्या अधिकाऱ्या लाच माहिती देण्यास सांगण्यात आले. यावर सुतार यांनी आक्षेप घेतला. त्यावेळी सभागृह नेते यांनी सुतार यांना सुनावले कि, माहिती कोण देणार, हे तुम्ही नाही ठरवायचे. ते आम्ही ठरवणार.

 

त्यानंतर बागवे यांनी या प्रस्तावास आपला विरोध असल्याचे सांगितले. त्यामुळे सभागृह नेत्यांनी नगरसचिवांना या विषयावर मतदान घेण्यास सांगितले. दरम्यान, मतदान पुकारताच हा प्रस्ताव मंजूर करण्याच्या बाजूने भाजपसह राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हात वर केले. त्यामुळे कॉंग्रेसला चांगलाच धक्का बसला. त्यामुळे विरोधात शिवसेना आपल्या बाजूने येईल असे कॉंग्रेसला वाटत होते. मात्र, विरोधाचे मतदान पुकारताच शिवसेनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे एकटया कॉंग्रेसला विरोध करावा लागता. यावेळी सभागृहात कॉंग्रेसचे केवळ 3 नगरसेवक उपस्थित होते. त्यातच, शिवसेना तटस्थ राहिल्याने 45 विरोधात 3 मतांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

PMC : GB meeting : शाळा विलीनीकरण : सभागृह नेते विरुद्ध सर्व विरोधी पक्ष 

Categories
PMC Political पुणे

शाळा विलीनीकरण विषयावरून सभागृह तापले

: सभागृह नेते विरुद्ध सर्व विरोधी पक्ष

पुणे : शाळा विलीनीकरण या विषयावरून सोमवारी मुख्य सभेत वातावरण  चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. आमची सत्ता असताना आम्हीच जास्त काम केले, असे सभागृह नेता गणेश बिडकर यांनी आपल्या भाषणात सांगितल्याने सर्व विरोधी पक्ष कामाचे पुरावे मागू लागले. त्यामुळे सभागृहातील वातावरण काही काळ गंभीर झाले होते. मात्र महापौरांनी यात मध्यस्थी करत यावर पडदा टाकला.

: महापौरांची मध्यस्थी कामास

सोमवारच्या मुख्य सभेत शहरातील काही शाळांचे विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव अलाल होता. ज्या शाळामध्ये पट कमी आहे, अशा शाळांचे विलीनीकरणा करण्याचा हा प्रस्ताव होता. याबाबत सर्व पक्षीय नगरसेवकांची भाषणे झाली. सर्वानीच शाळांचा दर्जा सुधारण्याची मागणी केली. तर काहींनी आताच विलीनीकरण न करता पुढील वर्षी विलीनीकरणा करण्याची मागणी केली. त्यानंतर सभागृह नेता गणेश बिडकर यांचे भाषण झाले. मात्र या विषयावरून सोमवारी मुख्य सभेत वातावरण  चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. आमची सत्ता असताना आम्हीच जास्त काम केले, असे सभागृह नेता गणेश बिडकर यांनी आपल्या भाषणात सांगितल्याने सर्व विरोधी पक्ष कामाचे पुरावे मागू लागले. त्यामुळे सभागृहातील वातावरण काही काळ गंभीर झाले होते. मात्र महापौरांनी यात मध्यस्थी करत यावर पडदा टाकला. त्यांनतर सभागृह शांत झाले. शिवाय हा विषय देखील मंजूर करण्यात आला.

महानगरपालिकेच्या शाळांचे विलिनीकरण करणे ही गोष्ट काही भूषणावह नाही. पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याने उर्वरीत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी प्रशासनाने हा प्रस्ताव ठेवला होता. यापुढील काळात असे प्रस्ताव मान्यतेसाठी येऊ नयेत, यासाठी पालिका शाळेतील शिक्षणाचा दर्जा कसा सुधारता येईल यासाठी प्रयत्न करावे. पालिका शाळेतील शिक्षकांना अद्यावत प्रशिक्षण देऊन शाळांमधील पटसंख्या कशी वाढेल, याकडे प्रशासनाने गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे.

गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका