Dr Siddharth Dhende | इफ्तार पार्टीतून सामाजिक एकोप्‍याचा संदेश |  प्रभाग क्रमांक दोन मध्ये आयोजन ; माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Dr Siddharth Dhende | इफ्तार पार्टीतून सामाजिक एकोप्‍याचा संदेश

|  प्रभाग क्रमांक दोन मध्ये आयोजन ; माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

 

Dr Siddharth Dhende – (The Karbhari News Service) – मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यानिमित्त पुणे महापालिकेच्‍या प्रभाग क्रमांक दोन मध्ये रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पडली. सामाजिक एकोपा व सलोखा जपण्यासाठी दरवर्षी माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांच्‍या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित केला जता आहे. सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसांतील बंधुभाव वाढवण्याच्‍या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असल्‍याचे प्रतिपादन माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांनी या वेळी केले.

प्रभाग दोन मधील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड मधील यश फाऊंडेशन, नटराज गंगावणे समाज विकास भवन येथे या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या वेळी आरपीआयच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष ऍड. आयुब शेख, माजी नगरसेविका फरजाना शेख, आरपीआयचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव, माजी नगरसेवक अशोक कांबळे, भाजपचे सुरेंद्र पठारे, प्रवक्ता मंगेश गोळे ,नामदेव घाडगे, काँग्रेसचे शिवाजी ठोंबरे, डॅनियल मगर, महेश वाघ, हिंदू संस्‍कृती मंचचे अध्यक्ष दिलीप म्हस्के, प्रेरणा ज्‍येष्ठ नागरिक संघाचे नामदेवराव वेताळ आदीसह हिंदु, मुस्लिम, बौद्ध, इसाई यांच्‍यासह विविध जाती-धर्मातील समाजबांधव उपस्थित होते. या वेळी शिरखुर्मा व सुका मेवाचे वाटप करण्यात आले.

पुणे महापालिकेच्‍या प्रभाग क्रमांक दोन मध्ये सामाजिक एक्‍याची परंपरा जपली जात आहे. गेल्‍या १७ वर्षांपासून रमजान ईद निमित्‍त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात सर्व जाती-धर्माचे नागरिक सहभागी होत आहेत. या कार्यक्रमात माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांच्‍या पुढाकाराने शिरखुर्मा आणि सुका मेवाचे वाटप करण्यात येते. यंदाच्‍या वर्षीही ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. या वर्षी एकूण २७० कुटुंबाला सुका मेवाचे वाटप करण्यात आले आहे.
——-

सर्व जाती-धर्मातील लोकांमध्ये भाईचारा कायम टिकावा, यासाठी आम्‍ही सुरूवातीपासून उपक्रम घेत आहोत. संविधानाने ज्‍या मानवी मुल्‍यांची रुजवणूक केली आहे. त्‍याच्‍या अंमलबजावणीचा प्रयत्‍न प्रभाग दोन मधील सर्वच नागरिकांकडून केला जात आहे. सर्वधर्म समभाव ही भावना प्रभाग क्रमांक दोन मध्ये जपली जात असल्‍याचे दिसते.

डाॅ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.

Ward No 2 | माणुसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे| डॉ. सिद्धार्थ धेंडे | प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्व धर्मीयांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

Categories
Breaking News cultural Political social पुणे

माणुसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे| डॉ. सिद्धार्थ धेंडे

| प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्व धर्मीयांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

संपूर्ण जगात शांतता नांदण्याची गरज आहे. सर्व जाती-धर्मामध्ये भाईचारा निर्माण व्हायला हवा. स्वतःच्या धर्माचा अभिमान असायलाच पाहिजे. मात्र इतर धर्माचा द्वेष करणे योग्य नाही. जगात माणूसकी हाच श्रेष्ठ धर्म आहे, असे प्रतिपादन पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले.

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनच्या महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथील कै. नटराज गंगावणे सभागृहात डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते धेंडे बोलत होते. या वेळी प्रत्येक घरात ईद साजरी व्हावी यासाठी गरजूंना शिरखुर्मा साहित्य किट प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमाला माजी नगरसेविका फरझाना शेख, आरपीआय (आठवले गट) महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष अयुब शेख, पुणे शहर भाजपा प्रवक्ते मंगेश गोळे, हिंदू संस्कृती मंचाचे दिलीप म्हस्के, शिख समाजाच्या वतीने सरबतजीतसिंग सिंधू, बौध्दाचार्य रमेश गाडगे, यासिन शेख, ख्रिश्चन समाजाच्या वतीने महापुरे, सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव घाडगे, हुसेन शहा बाबा दर्गा ट्रस्टचे रज्जाकभाई, मुश्‍ताकभाई तसेच प्रभागातील हमारी तंजीम व जामा मजीद ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी महिलांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

हा कार्यक्रम यशस्वी करायला सुरैया शेख, सईदा शेख, नझिम शेख, पप्पु मगदुम, फिरोज शेख, नुमान शेख, अनवर देसाई, फिरदोस शेख, विजय कांबळे, गजानन जागडे, वसंत दोंदे, अल्हाबक्ष, भिमराव जाधव , गणेश पारखे व ईतर सर्व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.

डॉ. धेंडे म्हणाले की, जगाला प्रेम अर्पण करण्याची शिकवण सर्व धर्मांमध्ये दिली जात आहे. कोणताही धर्म एकमेकांच्या विरोधात उभा राहण्याची मुभा देत नाही. माणसांनी एकमेकांचा द्वेष करायला सुरूवात केली. माणसांनीच भेदाभेद निर्माण केला. धर्माचा योग्य अभ्यास केल्यास मानवतावादी भावना सर्वांमध्ये वाढेल. पुढे तीच भावना माणसांनी पुढे घेऊन जाणे गरजेचे असल्याचे डॉ. धेंडे म्हणाले.

डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रभागात जोपासला सामाजिक एकोपा : अय्युब शेख –

डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने गेल्या 17 वर्षांपासून प्रभागात ईफ्तार पार्टीचे आयोजन केले जात आहे. प्रभागात सामाजिक एकोपा वृर्द्धींगत व्हावा, सर्व जाती धर्मात शांतता नांदावी, सर्व जाती धर्मात प्रेम भावना वाढावी या उद्देशाने उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये सर्व धर्मियांना एकत्रित करून भाईचारा वाढीसाठी प्रयत्न केले जात आहे. गेल्या वर्षांपासून महिलांसाठी देखील इफ्तार पार्टीचे आयोजन करून नवीन आदर्श डॉ. धेंडे यांनी निर्माण केला आहे, असे प्रतिपादन आरपीआय (आठवले गट) महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अय्युब शेख यांनी केले.

Davat-a-iftar | द्वेषाची आग थांबवून बंधुभाव वाढवा | सर्वपक्षीय नेत्यांचा सूर

Categories
Breaking News Political social पुणे

द्वेषाची आग थांबवून बंधुभाव वाढवा | सर्वपक्षीय नेत्यांचा सूर

| नाना पेठेतील ‘दावत-ए-इफ्तार’ मध्ये सर्वधर्मीयांची, सर्व पक्षीयांची उपस्थिती

पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहर उपप्रमुख डॉ अमोल देवळेकर यांच्या वतीने होप मेडिकल फाउंडेशन च्या सहकार्याने रमजान महिन्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘दावत-ई-इफ्तार’ कार्यक्रमाला सर्वधर्मीय बांधवांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.द्वेषाची आग थांबवून बंधुभाव वाढवावा ,असा सूर यानिमित्ताने उमटला .

रविवार दि ९ एप्रिल सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम झाला.रमजान ,ईस्टर संडे,संकष्टी चतुर्थी… असे सगळे औचित्य साधत उत्साहात हा उपक्रम रविवारी सायंकाळी पावसाच्या जोरदार सरीनंतरही पार पडला !

मुस्लीम बांधवांसाठी रमझानचा उपवास(रोझा ) सोडण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.नाना पेठेतील ए.डी.कॅम्प चौक येथे हा कार्यक्रम झाला. सामाजिक सलोखा,बंधुभाव वृद्धिंगत व्हावा,या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ,असे शहर उपप्रमुख डॉ अमोल देवळेकर यांनी सांगितले.

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस रवींद्र माळवदकर ,रघुनाथ कुचिक, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, काँग्रेसचे अरविंद शिंदे, बाळासाहेब मालुसरे, गणेश पेठ गुरुद्वाराचे प्रमुख भोला सिंह अरोरा,अफगाणिस्तानचे वली रहमान यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. संयोजक डॉ. अमोल देवळेकर, डॉ. दीपा देवळेकर, डॉ. प्रज्ञावंत देवळेकर यांनी संयोजन केले.

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या,’रमजान च्या पवित्र महिन्याच्या निमित्ताने आपण बंधुभावाची शपथ घेतली पाहिजे.श्रद्धा,संयम ,प्रामाणिकपणा वाढवला पाहिजे. ज्यांच्या मनात द्वेष आहे,त्यांनी हे उपक्रम पहिले पाहिजेत. त्यांनी मनातील द्वेष काढून टाकला पाहिजे.जीवनप्रवासात कोणाला आपण दुखवता कामा नये,असा संकल्प केला पाहिजे. त्यातून सर्वांच्या घरात शांतता आणि समृद्धी यावी. ‘

 

रवींद्र माळवदकर म्हणाले,’पूर्वी नाना पेठ,भवानी पेठ दंगलींचे उगमस्थान असायचे ,आता सर्वधर्मीय एकात्मतेचा संदेश देणारा हा परिसर सर्वधर्मीय कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून पुढे आला आहे . त्यासाठी सर्व कार्यकर्ते अभिनंदनास पात्र आहेत .

रघुनाथ कुचिक म्हणाले,’कोणताही धर्म चुकीची शिकवण देत नाही.हिंदवी स्वराज्यात शिवाजी महाराज सर्व समाजाला बरोबर घेऊन चालले होते.धर्माच्या नावावर पेटवली जाणारी आग थांबवून बंधुभाव वाढवला पाहिजे. हीच भूमिका घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना पुढे चालली आहे.शांततेसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. ‘

गणेश पेठ गुरुद्वाराचे प्रमुख भोलासिंग अरोरा म्हणाले,’ रमजान च्या पवित्र महिन्यात आपण सर्वांच्या मनातील किल्मिष निघून जावे,महाराष्ट्र प्रगतीपथावर जावा अशी प्रार्थना केली पाहिजे.

अफगाणिस्थान चे वली रहमान यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले .ते म्हणाले,’ भारताचे वैशिष्ट्य हे विविधतेतील एकता हे आहे. इथे सर्व धर्म सामंजस्याने नांदतात. सर्व धर्मीय कार्यक्रम उत्साहाने साजरे होतात. हे वैशिष्ट्य मानवतेचे आहे,ते जपले पाहिजे. ‘

चित्रपट निर्माते निलेश नवलखा,भाजपचे मनीष साळूंखे उपस्थित होते .

जावेद शेख यांनी सूत्रसंचालन केले. क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण केले.

Iftar Party | सर्व धर्मीयांमध्ये सौहार्द प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक | अजित पवार | राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

Categories
Breaking News Political social पुणे

सर्व धर्मीयांमध्ये सौहार्द प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक | अजित पवार

| राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोमीनपुरा येथे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले सदर प्रसंगी मुस्लिम समाजातील नागरिकांची अत्यंत मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती.

अजितदादा पवार यांनी रोजे ठेवणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांना या पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी बोलताना ते म्हणाले या पवित्र महिन्यामध्ये सर्वांनाच सुख-समृद्धी प्राप्त व्हावी तसेच समाजात शांतता प्रस्थापित करण्याकरिता तसेच देशातील सर्व धर्मीयांमध्ये सौहार्द  प्राप्त होण्याकरता आपण सर्वांनीच एकत्र येऊन या पुढील काळात निश्चित प्रयत्न करायला हवेत रोजा ठेवणाऱ्या सर्व बांधवांना आत्मिक बळ प्राप्त व्हावे हीच आपण प्रार्थना करूयात.


सदर प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप ,खा. वंदना चव्हाण , सह पोलिस आयुक्त संदीप कर्णीक , पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल , जयदेव गायकवाड अंकुश काकडे प्रदीप देशमुख , इकबाल शेख समीर शेख, इकराम ख़ान इम्तियाज़ तांबोळी, यूसुफ़ शेख़,जिमी पटेल गणेश कल्याणकर , मौलाना काजमी
ह भ प गणेश ठकार , भंते हर्षवर्धन शाक्य ,ग्यानी प्रताप सिंह , व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते