Alandi Municipal Council : Irrigation Department : PMC : पाटबंधारे विभागाचा पुणे महापालिकेबाबत अजब न्याय!

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

पाटबंधारे विभागाचा पुणे महापालिकेबाबत अजब न्याय

: आळंदी नगरपरिषदेने पाणी पट्टी भरली नाही म्हणून पुणे महापालिकेला इशारा

पुणे : आळंदी नगर परिषदेने जलसंपदा विभागाची घरगुती पाणी वापराची २४,३७,८०३  इतकी थकबाकी थकवली आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाने नगर परिषदेला इशारा दिला आहे कि थकबाकी भरा अन्यथा कारवाई केली जाईल. सोबतच जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला देखील इशारा दिला आहे. जलसंपदा विभागाची पूर्ण पाणीपट्टीची रक्कम भरलेशिवाय आपल्या योजनेतून आळंदी नगर परिषदेला  पाणी उचलण्यास परवानगी देणेत येऊ नये. अन्यथा त्यांची थकबाकीची रक्कम आपणाकडून वसूल करणेत येईल. पुणे महापालिकेला दिलेल्या या इशाऱ्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

: आळंदी नगर परिषदेला काय म्हणते पाटबंधारे?

आळंदी नगर परिषद, आळंदी क्षेत्रासाठी इंद्रायणी नदीवरील चिंबळी बंधाऱ्याच्या खालील बाजूस घरगुती कारणासाठी पाणी पुरवठा करण्यात येत होता. जुन्या अभिलेखांची पडताळणी केली असता इंद्रायणी नदीवरील नमूद ठिकाणापासून पाणी पुरवठा करणेसाठी कोणतीच मंजुरी घेतली नसलेबाबत आढळून आले होते. मंजुरी घेऊन पाणी वापर करणेबाबत प्रस्ताव दाखल करणेबाबत  लेखी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. तरी इंद्रायणी नदीतून होणारा उपसा पूर्णपणे बंद करण्यात आलेबाबत कळविलेले आहे. तसेच संजीवन समाधी सोहळा तसेच इतर आळंदी वारीनिमित्त आपणास पाणी लागणार आहे किंवा नाही याबाबतदेखील आळंदी परिषदे मार्फत  स्पष्टता यावी. जर पाणी कोटा लागत असेल तर तो रीतसर जलसंपदा विभागाची मंजुरी घेऊन वापर करण्यात यावा अथवा आपणास गरज नसल्यास सदर पाणीकोटाबाबत भविष्यात कोणतीही गरज नाही असे ग्राह्य धरून इतर गरजू बिगर सिंचन ग्राहकास हा पाणी कोटा देणेत येईल. आपणास कोणत्याही कारणास्तव भविष्यात पाणीपुरवठा करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. माहे डिसेंबर २०२१ अखेर आपणाकडे २४,३७,८०३/- इतकी थकबाकी आढळून येत आहे. तरी सदरची थकबाकी भरणेबाबत आपल्या पालिकेकडून अनास्था आढळून येत आहे. थकबाकी भरणेबाबत आपणाकडून कोणतीही कार्यवाही होताना आढळून येत नाही. तरी तत्काळ सदरची थकबाकी भरून जलसंपदा विभागास सहकार्य करावे. अन्यथा वरील नमूद रकमेवर व्याजाची रक्कम वाढत राहील. तरी १५ दिवसांच्या आत सर्व थकबाकी भरून सहकार्य करावे. अन्यथा आपल्या आळंदी नगर परिषदेस जलसंपदा विभागा मार्फत होणारा सर्व पाणी पुरवठा खंडित करण्यात येईल. 

: पुणे मनपाला काय आहे इशारा?

आळंदी नगर परिषद यांची वरील नमूद थकबाकी असल्या कारणाने, जलसंपदा विभागाची पूर्ण पाणीपट्टीची रक्कम भरलेशिवाय आपल्या योजनेतून त्यांना पाणी उचलण्यास परवानगी देणेत येऊ नये. अन्यथा त्यांची
थकबाकीची रक्कम आपणाकडून वसूल करणेत येईल, याची नोंद घेणेत यावी. तसेच  शाखाधिकारी, भामा आसखेड धरण शाखा, करंजविहीरे यांना देखील इशारा दिला आहे.  आळंदी नगर परिषद यांची वरील नमूद थकबाकी असल्या कारणाने, जलसंपदा विभागाची पूर्ण पाणीपट्टीची रक्कम भरलेशिवाय पुणे महानगर पालिकेच्या योजनेतून त्यांना पाणी उचलण्यास परवानगी देणेत येऊ नये. अन्यथा त्यांची थकबाकीची रक्कम महानगरपालिकेकडून वसूल करणेबाबत विनंती आहे.

MWRRA : PMC : Water Use : महापालिकेच्या जॅकवेल वर पाटबंधारेचे नियंत्रण!  : MWRRA च्या निर्देशाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेच्या जॅकवेल वर पाटबंधारेचे नियंत्रण! 

 

: MWRRA च्या निर्देशाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता 

 
पुणे : महापालिकेच्या पाणी वापरावरून पाटबंधारे विभाग नेहमीच ताशेरे ओढत असते. शिवाय कालवा सल्लागार समितीत देखील महापालिकेच्या विरोधात तक्रारीचा सूर असतो. काही दिवसापूर्वी पाटबंधारे विभागाने पोलीस बंदोबस्तात पुण्याचे पाणी कमी करण्याची तयारी केली होती. तसेच पाणी वापरावरून महापालिकेच्या विरोधात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे (MWRRA) केस सुरु आहे. त्यात झालेल्या सुनावणीत प्राधिकरणाने महापालिकेला आदेश दिले आहेत कि महापालिकेच्या लिफ्टिंग पॉईंट (Lifting point) अर्थात जॅकवेल च्या आवारात पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना प्रवेश द्या. यामुळे आता पाटबंधारे ला पाणीवापर नियंत्रण करण्याचे अधिकार मिळणार आहेत. मात्र यामुळे पुण्याच्या पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. दरम्यान प्राधिकरणाने नवीन सुनावणी 17 मार्च ला ठेवली आहे. यावेळी महापालिका काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे. 

: डिसेंबर महिन्यात पाटबंधारेने घेतली होती आक्रमक भूमिका 

महापालिकेने पाणी वापर कमी करावा याबाबत पाटबंधारे विभाग नेहमीच आक्रमक राहिला आहे. मात्र महापालिकेच्या तांत्रिक अडचणी पाहता महापालिका पाणीवापर कमी करू शकत नाही. यामुळे मात्र महापालिकेच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पाटबंधारे विभागाच्या म्हणण्यानुसार पाणीवापर कमी करण्याचे निर्देश  उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री महोदय व अध्यक्ष का.स.स. यांनी दिलेले होते. तथापि अद्यापही पुणे मनपा खडकवासला धरणातील दैनंदिन पाणीवापर नियंत्रित / कमी केलेला नाही. ही बाब पुन्हा उन्हाळा हंगामाच्या नियोजनाबाबत दि. २६/०३/२०२१ रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निदर्शनास आल्याने पुणे महानगरपालिकेने भामा आसखेड प्रकल्पातील वापर सुरू केल्यामुळे खडकवासला धरणातील पाणीवापर नियंत्रित /कमी न केल्यास जलसंपदा विभागाने सदरील पाणीवापर कमी करावा असे.  उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री महोदय व अध्याय निर्देश दिलेले होते. पुणे महानगरपालिका खडकवासला धरणातून सध्या दैनंदिन सरासरी १४६० एमएलडी पाणीवापर करीत असून भामा आसखेड धरणातूनही १८० एमएलडी व पवना धरणातून २०० एमएलडी इतका दैनंदिन पाणीवापर करीत आहे. पुणे मनपाचा दैनंदिन पाणीवापर नियंत्रित / कमी करण्याबाबत  आयुक्त, पुणे मनपा यांनादेखील कळविण्यात आले होते. तसेच कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या नियोजनानुसार
शेतीला उन्हाळ्यात सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने धरणात मर्यादित पाणीसाठा उन्हाळा अखेरीस पिण्यासाठी उपलब्ध राहणार आहे व त्यामुळे पुणे शहरास जून जुलै २०२१ मध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता असल्याचेही पुणे मनपास अवगत करण्याते आले होते तरीही मनपाने अद्यापही दैनंदिन पाणीवापर नियंत्रित/ कमी केलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे २०२१-२०२२ च्या उन्हाळा हंगामामध्ये शेतीसाठी पाणीटंचाई होऊ शकले असे आपणास या विभागामार्फत वारंवार कळविलेले आहे. त्यामुळे, अद्यापपर्यंत पुणे महानगरपालिकेचा दैनिक पाणीवापर
नियंत्रणात न आणल्यामुळे जलसंपदा विभागामार्फत 3 डिसेंबर पासून पाणीवापर नियंत्रणात आणण्याची तयारी केली होती. मात्र याला विरोध झाल्याने हा विषय मागे पडला होता. मात्र MWRRA च्या निर्देशाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

: नवीन सुनावणी 17 मार्च ला

पाणी वापरावरून महापालिकेच्या विरोधात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे केस सुरु आहे. त्यात झालेल्या सुनावणीत प्राधिकरणाने महापालिकेला आदेश दिले आहेत कि महापालिकेच्या लिफ्टिंग पॉईंट (Lifting point) अर्थात जॅकवेल च्या आवारात पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना प्रवेश द्या. यामुळे आता पाटबंधारे ला पाणीवापर नियंत्रण करण्याचे अधिकार मिळणार आहेत. दरम्यान प्राधिकरणाने नवीन सुनावणी 17 मार्च ला ठेवली आहे. त्यावेळी महापालिकेला पाणी वापर कमी करण्याबाबतचा रिपोर्ट द्यावा लागणार आहे. यामुळे महापालिकेची मात्र डोकेदुखी वाढणार आहे.

Water Use : PMC : Canal Advisory Commitee : पाणीवापर आणि पाणीपट्टी भरण्याबाबत पुणे मनपा ने पिंपरी मनपाचा आदर्श घ्यावा 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

पाणीवापर आणि पाणीपट्टी भरण्याबाबत पुणे मनपा ने पिंपरी मनपाचा आदर्श घ्यावा

: कालवा सल्लागार समितीचे पुणे महापालिकेला आदेश

 

पुणे : पुणे महापालिकेच्या पाणी वापरावरून कालवा सल्लागार समितीत नेहमीच ओरड होत असते. पाटबंधारे विभागाकडून बैठकीत नेहमी तक्रारीचा सूर आळवला जातो. त्यानुसार नुकत्याच झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत देखील पाटबंधारे विभागाने पाणी वापराबाबत महापालिकेची तक्रार केली. शिवाय ज्यादा पाणी वापर असून देखील महापालिका नियमानुसार पाणीपट्टी भरत नाही, असा आरोप केला. त्यावर समितीचे अध्यक्ष अजित पवार यांनी पुणे म.न.पा.ने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आदर्श घेऊन मापदंडाप्रमाणे पाणीवापर करावा व नियमितपणे पाणीपट्टी जलसंपदा विभागाकडे भरावी असे आदेश बैठकीत दिले.

: नियमानुसार पाणीपट्टी भरत नसल्याची पाटबंधारे विभागाची तक्रार

पाटबंधारे विभागाने समितीच्या बैठकीत केलेल्या निवेदनानुसार पुणे महानगरपालिका सध्या खडकवासला प्रकल्पातून १४६० एमएलडी, भामा आसखेड प्रकल्पातून १६५ एमएलडी व पवना प्रकल्पातून २७ एमएलडी असा एकूण १६५२ एमएलडी वापर करीत आहे. पुणे म.न.पा. जलसंपदा विभागाच्या विविध धरणातून (खडकवासला, पवना, भामा आसखेड) पाणीवापर करीत आहे. पुणे म.न.पा.चा एकत्रित पाणीवापर हा अनुज्ञेय पाणीवापरापेक्षा जास्त असल्याने म.ज.नि.प्रा.च्या दरानुसार जादा पाणीवापरास दीडपट व दुप्पट  असे अनुज्ञेय दर आहेत. त्यानुसार भामा आसखेड प्रकल्पातून वापरलेल्या पाण्यावर दुप्पट दर लागू आहेत. परंतु दुप्पट दराने केलेली पाणीपट्टी आकारणी म.न.पा. भरत नसल्याचे अधीक्षक अभियंता व सदस्य सचिव, यांनी नमूद केले. या उलट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पाणीवापर मापदंडानुसार करत असून त्यांची पाणीपट्टी नियमितपणे जलसंपदा विभागाकडे जमा होत असते. असेही बैठकीत नमूद केले. पुणे महानगरपालिकेस शासन निर्णय दि.२७.०८.२०२० अन्वये भामा आसखेड धरणातून २.६७ टीएमसी पाणी आरक्षण मंजूर केले आहे. त्यानुसार पुणे म.न.पा.ची सदरील पाणीवापरासाठीची योजना दि.०१.११.२०२१ रोजी कार्यान्वित झाली असून, त्याद्वारे पुणे म.न.पा.स दैनंदिन २०० एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुणे म.न.पा.ने आता खडकवासला प्रकल्पातून करीत असलेला दैनंदिन २०० एमएलएडी पाणीवापर कमी केल्यासदरवर्षी २.६० टीएमसी पाणी लाभक्षेत्रातील दौंड, बारामती, इंदापूर तालुक्यांस सिंचनासाठी उपलब्ध होईल असे सदस्य सचिव यांनी बैठकीत सांगितले. त्यावर समितीचे अध्यक्ष अजित पवार यांनी पुणे म.न.पा.ने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आदर्श घेऊन मापदंडाप्रमाणे पाणीवापर करावा व नियमितपणे पाणीपट्टी जलसंपदा विभागाकडे भरावी असे आदेश बैठकीत दिले.

: पाटबंधारे विभागाकडे करोडो ची थकबाकी

दरम्यान पाटबंधारे विभागाकडे महापालिकेच्या टॅक्स विभागाची करोडो रुपयाची थकबाकी आहे. मात्र पाटबंधारे विभाग याबाबत कुठलीही कार्यवाही करताना दिसून येत नाही. महापालिका टॅक्स कर्मचारी ही थकबाकी वसूल करायला गेल्यांनतर त्यांना व्यवस्थित उत्तरे दिली जात नाहीत. मात्र महापालिकेची ही बाजू कालवा सल्लागार समितीत मांडली जात नाही. त्यामुळे महापालिकेने देखील याबाबत आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे. असे मत व्यक्त केले जात आहे.
..

Jayant Patil : Murlidhar Mohol : जलसंपदा मंत्र्यांनी भेट नाकारल्याने महापौर नाराज!

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

जलसंपदा मंत्र्यांनी भेट नाकारल्याने महापौर नाराज 

: पुणेकरांच्या दबावाने पाणी कपात रद्द : महापौर 

पुणे : पुण्याच्या पाणी प्रश्‍नावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची वेळ घेऊन पाच वाजता सिंचन भवन येथे गेलो, तासभर वाट पाहिली. त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन थेट पत्रकार परिषदेला गेले. त्यामुळे मी सिंचन भवन येथून निघून आलो. माझ्या वैयक्तीक कामासाठी नाही तर पुणेकरांचा प्रतिनिधी म्हणून त्यांना पूर्वकल्पना देऊन भेटण्यासाठी गेलो होते. तरीही भेट झाली नाही, ’’ अशा शब्दात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान पुणेकरांच्या दबावामुळे भितीपोटी जलसंपदा मंत्र्यांनी पाणी कपात रद्द केली याचे आम्ही स्वागत करतो, असे मोहोळ म्हणाले. जयंत पाटील यांनी भाजपवर केलेल्या आरोपांमध्ये मला जायचे नाही, पण दोन दिवसांपूर्वी तुमच्या खात्याने आदेश काढून पोलिस बंदोबस्तात पाणी कपात करणार असल्याचे सांगितले. तरीही पाणी कपातीचा कोणताही प्रस्ताव नव्हता असे मंत्री सांगत आहेत. हे राजकारण सुज्ञ पुणेकर बघत आहेत. भामा आसखेडचे पाणी मिळाले म्हणून खडकवासल्याचे पाणी कपात केले जात आहे, यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायचा काय संबंध. वड्याचे तेल वांग्यावर काढत असल्याची टीका मोहोळ यांनी केली. दरम्यान, पाटील यांनी ‘‘महापौर मला कशासाठी भेटणार आहेत हे माहिती नाही, पत्रकार परिषद संपल्यानंतर मी त्यांना भेटेल असा खुलासा केला. तर जयंत पाटील यांच्या खुलाशानंतर महापौरांनी या प्रकरणातून माघार घेतली. असा आरोप शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. तर महापौर म्हणाले कि पाण्यात राजकारण आणू नये, ही आमची इच्छा आहे.

Irrigation : Water Cut for Pune : पोलीस बंदोबस्तात पाटबंधारे विभाग उद्या पुण्याचे पाणी करणार कमी! : महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला निषेध

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

पोलीस बंदोबस्तात पाटबंधारे विभाग उद्या पुण्याचे पाणी करणार कमी!

: पुणेकरांवर पाणीसंकट

पुणे : पुणे शहरावर आगामी काळात पाणी संकट ओढवण्याची चिन्हे आहेत. कारण उद्यापासून पाटबंधारे विभाग पुण्याचे पाणी कमी करणार आहे. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्तात हे पाणी कमी केले जाणार आहे. वारंवार सांगूनही महापालिकेने पाणी वापर कमी केला नाही म्हणून हे पाऊल उचलले जात आहे. असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. दरम्यान पाटबंधारे विभागाच्या या निर्णयाचा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी निषेध केला आहे.

: वारंवार सांगूनही पाणी कमी केले नाही : पाटबंधारे

पाटबंधारे विभागाच्या म्हणण्यानुसार पाणीवापर कमी करण्याचे निर्देश  उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री महोदय व अध्यक्ष का.स.स. तसेच मा.ना दत्तात्रय भरणे राज्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मद व जलसंधारण बने पदम सामान्य प्रशासन तथा (पालकमंत्री सोलापूर) यांना निर्देश दिलेले होते. तथापि अद्यापही पुणे मनपा खडकवासला धरणातील दैनंदिन पाणीवापर नियंत्रित / कमी केलेला नाही. ही बाब पुन्हा उन्हाळा हंगामाच्या नियोजनाबाबत दि. २६/०३/२०२१ रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निदर्शनास आल्याने पुणे महानगरपालिकेने भामा आसखेड प्रकल्पातील वापर सुरू केल्यामुळे खडकवासला धरणातील पाणीवापर नियंत्रित /कमी न केल्यास जलसंपदा विभागाने सदरील पाणीवापर कमी करावा असे.  उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री महोदय यांनी निर्देश दिलेले होते. पुणे महानगरपालिका खडकवासला धरणातून सध्या दैनंदिन सरासरी १४६० एमएलडी पाणीवापर करीत असून भामा आसखेड धरणातूनही १८० एमएलडी व २०० एमएलडी इतका दैनंदिन पाणीवापर करीत आहे. पुणे मनपाचा दैनंदिन पाणीवापर नियंत्रित / कमी करण्याबाबत मा. आयुक्त, पुणे मनपा यांनादेखील कळविण्यात आले होते. तसेच कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या नियोजनानुसार शेतीला उन्हाळ्यात सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने धरणात मर्यादित पाणीसाठा उन्हाळा अखेरीस पिण्यासाठी उपलब्ध राहणार आहे व त्यामुळे पुणे शहरास जून जुलै २०२१ मध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता असल्याचेही पुणे मनपास अवगत करण्याते आले होते तरीही मनपाने अद्यापही दैनंदिन पाणीवापर नियंत्रित/ कमी केलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे २०२१-२०२२ च्या उन्हाळा हंगामामध्ये शेतीसाठी पाणीटंचाई होऊ शकले असे आपणास या विभागामार्फत वारंवार कळविलेले आहे. त्यामुळे, आपण अद्यापपर्यंत पुणे महानगरपालिकेचा दैनिक पाणीवापर
नियंत्रणात न आणल्यामुळे जलसंपदा विभागामार्फत शुक्रवार दि. ०३/१२/२०२१ पासून पाणीवापर नियंत्रणात आणण्यात येणार आहे. असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.

पुण्याचं पाणी कमी करण्याचा डाव ! : महापौर

पुणेकरांना गरजेचं असणारं पाणी कमी करण्याचा डाव पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे. उद्यापासून पुणे शहराचे पाणी कमी करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे, याचा समस्त पुणेकरांच्या वतीनं तीव्र निषेध! असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.
पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेली २३ गावे आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता दैनंदिन १ हजार ४६० एमएलडी पाणी खडकवासलातून आणि ३८० एमएलडी पाणी भामाआसखेडमधून पुरवठा होतोय. परंतु उद्यापासून पोलीस बंदोबस्तात पाणी कमी करण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभाग करत आहे.
पालकमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना माझी विनंती आहे, पुण्याचं पाणी कृपया कमी करु नका. पाणीगळती थांबवणे, पाणीबचत करणे, यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत. २४x७ समान पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत वेगाने सुरु असून ते काम लवकरच पूर्ण करणार आहोत. आमचे अनेक प्रयत्न सुरु असतानाही पोलीस बंदोबस्तात पाणी कमी करण्याचा निर्णय चीड आणणारा आहे. शेतील पाणी देण्यास आम्हा पुणेकरांचा अजिबातही विरोध नाही. मात्र प्राधान्य नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला असायला हवं, याचं थोडंही भान जलसंपदा विभागाला असू नये? जलसंपदाचा हा सुलतानी कारभार आणि दादागिरी पुणेकर कदापिही सहन करणार नाहीत. असे ही महापौर म्हणाले.

PMC : Irrigation : महापालिकेसोबत नेहमीच पत्रयुद्ध खेळणारे पाटबंधारे आता साधणार समन्वय! 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेसोबत नेहमीच पत्रयुद्ध खेळणारे पाटबंधारे आता साधणार समन्वय!

: विविध कामे मार्गी लावण्यासाठी समन्वय समिती गठीत

पुणे : पाटबंधारे विभागाकडून पुणे महापालिकेला नेहमीच पाणी वापर कमी करा म्हणून सुनावले जाते. शिवाय अतिरिक्त पाणी वापराचा दंडपाटबंधारे समन्वय  भरा म्हणून नेहमीच पत्र देखील पाठवले जातात. शिवाय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाटबंधारे कडून महापालिकेबाबत नेहमीच तक्रार केली जाते. मात्र आता पाटबंधारे विभाग महापालिका प्रशासनासोबत समन्वय साधणार आहे. कारण महापालिकेलाच या समन्वयाची आवश्यकता आहे. विविध कामे मार्गी लावण्यासाठी ५ लोकांची एक समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये महापालिका आणि पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

५ अधिकाऱ्याची समिती

पुणे महानगरपालिकेकडून पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या जागेमध्ये कामे करताना पाटबंधारे विभागाशी समन्वय ठेवणे आवश्यक आहे. तदनुषंगाने, पुणे महानगरपालिका व पाटबंधारे विभाग यांचेमध्ये समन्वय ठेऊन काम करणेकरीता ५ अधिकाऱ्यांची एक  समिती गठीत करण्यात आली आहे. या  कक्षामार्फत पाटबंधारे विभागाशी निगडीत असलेल्या मर्व कामांमाठी प्रस्ताव तयार करुन सादर करणे, वेळोवेळी पाठपुरावा करणे, पूर्तता करणे व अन्य तदनुषंगिक कामे संबंधित खात्याशी समन्वय साधून कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत करणे अपेक्षित आहे. महापलिका अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

अशी असेल समिती

अमर शिंदे                     कार्यकारी अभियंता (पथ)
 राजेश बनकर                कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा)
 विपिन शिंदे                   कार्यकारी अभियंता (बांधकाम)
विजय पाटील                 कार्यकारी अभियंता (जलसंपदा)
जयवंत पवार                 उपअभियंता (मालमत्ता व्यवस्थापन)