Shirur Loksabha Constituency – Dr Amol Kolhe | “हडपसर मधून डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुकले

Categories
Breaking News Political पुणे

Shirur Loksabha Constituency – Dr Amol Kolhe | “हडपसर मधून डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुकले

| महाविकास आघाडी एकमुखाने डॉ. कोल्हे यांच्या पाठीशी – बैठकीत निर्धार

 

Shirur Loksabha Constituency – Dr Amol Kolhe –
(The Karbhari News Service) – आगामी शिरूर लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकासआघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक येथील कन्यादान मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्ष एकमुखाने डॉ.अमोल कोल्हे यांच्या पाठीशी उभा राहणार असून चांगल्या मताधिक्याने त्यांना निवडून आणणार असा विश्वास या बैठकीत सर्वपक्षीयांनी व्यक्त केला.

यावेळी खा.डॉ. अमोल कोल्हे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार महादेव बाबर, काँग्रेस निरीक्षक गोपाळ तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, माजी उपमहापौर निलेश मगर,माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप, संगीता ठोसर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देशमुख, काँग्रेस ओबीसी शहराध्यक्ष प्रशांत सुरसे, राष्ट्रवादी हडपसर अध्यक्ष प्रविण तुपे, काँग्रेस अध्यक्ष दिलीप शंकर तुपे, सीमा सावंत, विद्या होडे, रुपाली शिंदे, महिला अध्यक्ष वंदना मोडक, कार्याध्यक्ष सविता मोरे, पल्लवी सुरसे, शितल शिंदे, सुशीला गुंजाळ, नितीन आरु आदींसह सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

The Karbhari - Hadapsar mahavikas aghadi

गद्दारांची गद्दारी लोकसभा निवडणुकीत गाढली पाहिजे, महादेव बाबर व शिवसेनेने काम केले म्हणून मागच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले नंतर ते शिवसेना कार्यकर्त्यांना विसरले, यांना पाडण्यासाठी आता हडपसर मध्ये सर्वांनी काम करावे अशा शब्दात शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी चेतन तुपे यांचे नाव न घेता टीका केली.

हेवेदावे बाजूला ठेऊन भाजपला पराभूत करा, बजेट व महाविकास आघाडी समन्वय समिती जबाबदारी आमदारांची होती त्यांनी भूमिका बदलली, कार्यकर्ते नाराज झाले, हडपसर मध्ये समन्वय समिती स्थापन करून नियोजन केले जाईल. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. भाजपला सांगा रामाचे झाले आता कामाचे सांगा मोदी परिवार म्हणजे घोटाळे केलेले अन भाजप मध्ये गेले आहेत, मीडियावर दबाव आणला जात आहे, 400 खासदार आणून संविधान बदलण्याचा डाव आहे, हा डाव हणून पाडला पाहिजे असे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.

तुतारी घराघरात पोहोचली पाहिजे आढळराव पाटील यांना 55 हजाराची आघाडी 2019 ला होती ते गद्दार झाले तेच समोर असतील डॉ.कोल्हे यांना तीच आघाडी देणार, हडपसर मध्ये सर्वात आधी महाविकास आघाडी करून हडपसला राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून आणला, हडपसर ची वाट लावली, कामे झाली नाहीत, अपमानस्पद वागणूक दिली, त्यांना त्यांची जागा दाखविणार या शब्दात माजी आमदार महादेव बाबर यांनी विद्यमान आमदारांवर टीका केली.

माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी आपले मनोगत मांडले.
शिवसैनिक निखारा आहे, ही निवडणूक देशाच्या भविष्याची निवडणूक आहे, अबकी बार 400 पार हे केवळ कार्यकर्त्यांच मनोबल वाढविण्यासाठी आहे, राहुल गांधी यांच्या यात्रेने पायाखालची जागा सरकली, दक्षिण भारतात भाजप नाही, इंडिया आघाडी देशात येत आहे, शिरूर मध्ये तुतारी चिन्ह घराघरात पोहोचविले पाहिजे, या मतदारसंघात महायुतीला उमेदवार नाही, कार्यकर्त्यांमंध्ये अस्वस्थता आहे, देणारा दिल्लीत मागणारा झाला या शब्दात अजित दादांवर टीका केली, लोकशाही टिकविण्यासाठी भाजपला पराभूत करा असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले.

 “India” Aghadi meeting will be held in Pune on February 24!  

Categories
Breaking News Political पुणे

 “India” Aghadi meeting will be held in Pune on February 24!

 “India” Aghadi meeting in Pune | Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) party leader Sharad Pawar’s meeting at Modi Bagh office instructed all office bearers and workers to be ready to contest the upcoming Lok Sabha elections with a new name and a new symbol.  were given  Since the upcoming Loksabha Elections (Loksabha Election 2024) India Aghadi will fight together, the meeting of India Aghadi under the leadership of Sharad Pawar will be concluded on February 24 in Pune city.
 All the constituent parties of India Aghadi will join this meeting and it was decided to win in these three Lok Sabha constituencies with a historic majority.
 In the meeting attended by Sharad Pawar, MP Supriya Sule, Mr.  Srinivas Patil, Former Minister Anil Deshmukh, Rajesh Tope, Shashikant Shinde, Balasaheb Patil, MP Vandana Chavan, MP Mr.  Dr.  Amol Kolhe, City President Prashant Jagtap, MLA Rohit Pawar, MLA Sandeep Kshirsagar were present.

MVA | Shetkari Akrosh Morcha | महाविकास आघाडीच्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ला उद्यापासून प्रारंभ |शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात शनिवारी सभा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

MVA | Shetkari Akrosh Morcha | महाविकास आघाडीच्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ला उद्यापासून प्रारंभ

|शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात शनिवारी सभा

 

MVA | Shetkari Akrosh Morcha | पुणे : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने काढण्यात येणाऱ्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ची (Shetkari Akrosh Morcha)  तयारी पूर्ण झाली असून उद्या (दि. २७) जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे या मोर्चाची सांगता होणार आहे. (Maharashtra News)

संसद महारत्न खासदार सुप्रिया सुळे आणि संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठविल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. कोल्हे यांनी ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवणे आणि निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण, खासगी व शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान, बिबटप्रवण तालुक्यात शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा, पीक विमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून तातडीने नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निश्चित ‘शैक्षणिक कर्ज ‘ धोरण लागू करणे आदी प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेससह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी हा एल्गार पुकारला असून २७ ते ३० डिसेंबर दरम्यान भव्य ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार सुळे आणि अमोल कोल्हे यांनी दिली.

उद्या ( दि. २७) सकाळी ८ वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून ओतूर येथे पदयात्रा व कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आळेफाटा येथे कोपरा सभा व नारायणगाव येथे एस.टी. स्टँडजवळ पदयात्रा होणार असून ठिकठिकाणी शेतकऱ्यांकडून या आक्रोश मोर्चाचे स्वागत केले जाणार आहे. दुपारी ३ वाजता कळंब येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर कोपरा सभा आणि मंचर बाजार समिती येथून पदयात्रेने लक्ष्मी रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठी सभा होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता राजगुरुनगर बाजार समिती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाजवळ सभा आणि त्यानंतर राजगुरुनगर एस.टी. स्टँड येथील हुतात्मा राजगुरू आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पाबळ चौकातून वाहनांद्वारे हा मोर्चा चाकणकडे रवाना होईल. चाकण बाजार समिती प्रवेशद्वारापासून रात्री ८ वाजता काढण्यात येणाऱ्या पदयात्रेचा समारोप बाजारपेठेतून एस.टी.स्टँड, तळेगाव चौक येथे होईल. त्यानंतर चौफुला, करंदी मार्गे केंदूर येथे मोर्चाचा पहिला मुक्काम होईल, असे त्यांनी सांगितले.

गुरुवारी (दि. २८) सकाळी केंदूर येथील श्रीराम चौकात सभा आयोजित करण्यात आली असून पाबळ येथील लोणी चौकात कोपरा सभा होईल. त्यानंतर धामारी, मुखी, जातेगाव या ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वागत केल्यानंतर दुपारी दीड वाजता शिक्रापूर येथे पाबळ चौक ते चाकण चौक अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता तळेगाव ढमढेरे येथील सावता माळी सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर टाकळीभीमा, पारोडी, दहीवडी, उरळगाव मार्गे न्हावरा येथे हा मोर्चा येईल. न्हावरा येथे तळेगाव फाटा ते निर्विदरम्यान पदयात्रा आणि पुढे निर्वि, कोळगाव डोळस, कुरुळी, वडगाव रासाई मार्गे मांडवगण फराटा येथे आल्यानंतर या ठिकाणी सभा होईल आणि पुढे तांदळी, काष्टी मार्गे दौंड येथे मुक्काम, असे नियोजन करण्यात आल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारी (दि. २९) सकाळी नऊ वाजता दौंड येथील महात्मा फुले पुतळा ते आंबेडकर चौक, गांधी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दरम्यान पदयात्रा काढण्यात येणार असून त्यानंतर मोर्चा कुरकुंभ, मळद, रावणगाव मार्गे खडकी येथे येईल. याठिकाणी बारामती चौकातील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मोर्चाचे रुपांतर सभेत होईल. त्यानंतर भिगवण आणि पळसदेव येथे कोपरा सभा करुन दुपारी अडीच वाजता मोर्चा इंदापूर येथे येईल. इंदापूर येथे पदयात्रा झाल्यानंतर निमगाव केतकी येथे कोपरा सभा, आणि तेथून मसाळवाडी, काटेवाडी, लिमटेक, पिंपळी, बांदलवाडी मार्गे मोर्चा बारामती येथे आल्यानंतर नगरपालिकेसमोर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर बारामती येथे मुक्काम होईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

शनिवारी (दि. ३०) बारामती येथून मेडद, कऱ्हावागज, जळगाव, माळवाडी, तारडोळी मार्गे मोरगाव येथे मोर्चा आल्यावर मयुरेश्वराचे दर्शन घेऊन मंदिरासमोर कोपरा सभा होईल. त्यानंतर आंबी बु. मार्गे जेजुरी येथे कोपरा सभा होऊन मोर्चा शिंदवणे मार्गे हवेली तालुक्यात प्रवेश करेल. शिंदवणे येथे स्वागत स्वीकारुन उरळीकांचनला रवाना होईल. या ठिकाणी जुन्या इलाईट हॉटेलसमोर कोपरा सभा होणार असून सोरतापवाडी फाटा, कुंजीरवाडी फाटा, थेऊर फाटा मार्गे लोणी काळभोर येथे आल्यावर रेल्वे स्टेशनजवळ कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. लोणी काळभोर येथून कवडीपाट टोलनाका मार्गे मांजरी फार्म, शेवाळवाडी फाटा, १५ नंबर, हडपसर गाडीतळ मार्गे पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे हा मोर्चा जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर सभा होणार असून खासदार शरद पवार, संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे नेते याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या न्याय्य मागण्यांसाठी काढण्यात येत असलेल्या या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’त शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी केले असून पुण्यातील सभेला उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचा संदेश द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.