Dr. Siddharth Dhende : आरोग्य खात्यात काम करणाऱ्या  इतर खात्यातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ जागी पाठवा 

Categories
Breaking News PMC Political आरोग्य पुणे

आरोग्य खात्यात काम करणाऱ्या  इतर खात्यातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ जागी पाठवा

: नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची महापालिका आयुक्तांना मागणी

पुणे : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून महापालिका आरोग्य खात्यात काम करण्यासाठी इतर खात्यातील कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. आता कोरोनाची लाट संपत आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ जागी पाठवा. अशी मागणी नगरसेवक आणि माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.

: आयुक्तांना दिले पत्र

डॉ धेंडे यांच्या पत्रानुसार सन २०१९ पासुन पुणे शहरामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण व पहिली लाट सुरु झाली.  त्यावेळेस आरोग्य खात्याचे कर्मचारी कमी असल्या कारणाने इतर खात्यामधील कर्मचारी व अधिकारी यांना आरोग्य खात्याकडे हजर करुन घेतलेले आहे. आता सन २०२२ चालु आहे. गेल्या २ वर्षामध्ये कोरोनाच्या तीन लाटांचा प्रादुर्भाव होऊन गेलेला आहे. इतकेच नव्हे तर पुणे शहरामध्ये जवळजवळ ९०% लसीकरण नागरिकांचे झालेले आहे. तिसरी लाट देखिल आता संपत चालेली आहे. पुणे महानगरपालिका मध्ये अटलबिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय चालू होण्याकरिता आपण अनेक डॉक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांची देखिल भरती केलेली आहे. हे डॉक्टर वैद्यकिय महाविद्यालयाला प्रशासकिय मान्यता मिळत नाही, तोपर्यंत ते नुसतेच बसून पगार घेत आहेत. माझी आपणास विनंती आहे. या डॉक्टरांना पुणे महानगरपालिकाच्या आरोग्य खात्याच्या सेवेमध्ये कार्यरत करावे.  तसेच जे कर्मचारी आरोग्य खाते सोडुन इतर खात्यामध्ये काम करित आहेत; त्यांना त्यांच्या मुळ खात्यामध्ये काम करता येईल असे आदेश आपण तत्परतेने दयावे. असे डॉ धेंडे यांनी पत्रात म्हटले आहे.

Murlidhar Mohol : Kirit Somaiya : किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरण : महापौरांनी आयुक्तांना मागितला खुलासा 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरण : महापौरांनी आयुक्तांना मागितला खुलासा

पुणे : महापालिकेत जंबो कोविड सेंटर बाबत तक्रार करण्यासाठी आलेल्या भाजप नेता किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली होती. याबाबत राज्यभरात भाजप विरुद्ध शिवसेना असे चित्र पाहायला मिळाले होते. मात्र याबाबत महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी शांत राहणे पसंत केले होते. मात्र आता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापौरांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पत्र धाडत सुरक्षा व्यवस्था आणि एकूणच प्रकाराबाबत लेखी खुलासा मागितला आहे. स्वतः किरीट सोमय्या यांनी हे पत्र ट्विट देखील केले आहे.

: काय आहे महापौरांचे पत्र

शनिवार, दि. ०५/०२/२०२२ रोजी किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेस भेट देणेकामी आले असता त्यांना पुणे महानगरपालिकेच्या आवारात शिवसैनिकांमार्फत धक्काबुक्की करण्यात आली. सदर बाब ही अत्यंत गंभीर असल्याने या प्रसंगामुळे पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.  किरीट सोमय्या, खासदार यांच्या दौऱ्याबाबत पुणे महानगरपालिकेस अवगत करण्यात आले असतानादेखील योग्य ती सुरक्षा व्यवस्था का करण्यात आली नाही? तसेच शनिवार, दि. ५/२/२०२२ या दिवशी साप्ताहिक सुट्टीचा दिवस असतानादेखील त्या वेळेत उपस्थित शिवसैनिकांस पुणे महानगरपालिकेच्या आवारत प्रवेश कसा मिळाला अथवा कोणी दिला? आपल्या सुरक्षा व्यवस्थेमधील त्रुटीबाबत आपणामार्फत माननीयांस का अवगत करण्यात आले नाही? याबाबत सर्व प्रश्नांचा खुलासा आम्हांस लेखी स्वरुपात तात्काळ कळविण्यात यावा.

Merged 23 Villages : PMC : समाविष्ट 23 गावांतील 626 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार

Categories
Breaking News PMC पुणे

समाविष्ट 23 गावांतील 626 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार

: महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे : राज्य सरकारच्या(State Gov) निर्देशानुसार महापालिका(pune corporation) हद्दीत 23 गावाचा समावेश करण्यात आला आहे. गावे समाविष्ट करताना गावातील कर्मचारी देखील विविध क्षेत्रीय कार्यालयात(ward offices) कामावर रुजू करून घेण्यात आले होते. मात्र त्यातील सुमारे 626 कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने नियमबाह्य ठरवले आहे. त्यामुळे त्यांना कामावरून कमी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी(PMC Commissioner) प्रशासनाला दिले आहेत.

: जिल्हा परिषदेने ठरवले नियमबाह्य

महापालिका हद्दीत एकूण 34 गावांचा समावेश झाला आहे. त्यातील 23 गावे नुकतीच महापालिका हद्दीत आली आहेत. मात्र ही गावे महापालिका हद्दीत येण्या अगोदर काही दिवसापूर्वी ग्रामपंचायत मध्ये कर्मचाऱ्यांची नियमबाह्य भरती करण्यात आली होती. हे सर्व कर्मचारी महापालिका सेवेत घेण्यात आले होते. त्यांना विविध क्षेत्रीय कार्यालयात ररुजू करून घेण्यात आले होते. मात्र याची चौकशी जिल्हा परिषदेकडून करण्यात आली आहे. त्यानुसार सुमारे 626 कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने नियमबाह्य ठरवले आहे. त्यामुळे त्यांना कामावरून कमी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत.
ग्रामपंचायत                 कमी केले जाणारे कर्मचारी
सुस                                40
बावधन बुद्रुक.                   55
किरकटवाडी                      5
कोंढवे-धावडे                     64
न्यू कोपरे                          40
नांदेड                                37
खडकवासला                     56
नऱ्हे                                   85
होळकरवाडी                       37
औताडे हांडेवाडी                   28
वडाचीवाडी                        14
नांदोशी सणसनगर               19
मांगडेवाडी                          36
भिलारेवाडी                         15
गुजर निंबाळकरवाडी              34
जांभूळवाडी कोळेवाडी           45
वाघोली                               6

PMC Commissioner : Twitter : महापालिका आयुक्त ट्विटरद्वारे नागरिकांशी साधणार लाईव्ह संवाद!

Categories
Breaking News PMC social पुणे

महापालिका आयुक्त ट्विटरद्वारे नागरिकांशी साधणार लाईव्ह संवाद!

पुणे : स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, स्वच्छतेच्या प्रक्रियेत वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग वाढावा तसेच महानगरपालिकेशी संबंधित अन्य इतर विषयांवर थेट नागरिकांशी चर्चा करण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे  आयुक्त विक्रम कुमार हे स्वत: दिनांक ४ फेब्रुवारी, २०२२ रोजी दुपारी 3 ते 3.30 दरम्यान ट्विटरद्वारे लाईव्ह संवाद साधणार आहेत.

यामध्ये नागरिकांना त्यांच्या सूचना, प्रश्न, विचारण्याची संधी मिळणार आहे. तरीही जास्तीत जास्त नागरिकांनी या चर्चेमध्ये सहभागी व्हावे. असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

नागरिकांनी आपल्या सूचना किंवा मते #आयुक्तांशीचर्चा किंवा #AskPMCCommissioner हा हॅशटॅग वापरून दुपारी दोन वाजेपर्यंत ट्विट करावेत, असे पुणे महानगरपालिकेने कळविले आहे.