Pune Municipal Corporation (PMC) | महापालिका आयुक्तांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आप पक्षांच्या कार्यकर्त्यांवर महापालिकेकडून गुन्हा दाखल 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Municipal Corporation (PMC) | महापालिका आयुक्तांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आप पक्षांच्या कार्यकर्त्यांवर महापालिकेकडून गुन्हा दाखल

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिका शाळेतील (PMC Pune Schools) विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन (Sanitory Napkins) मिळावेत, अशी मागणी करत आम आदमी पक्षाच्या (AAP Pune) वतीने महापालिकेत आंदोलन (Agitation in PMC) करण्यात आले. मात्र कार्यकर्त्यांच्या वर्तणुकीबाबत महापालिका प्रशासनाने आक्षेप घेत त्यांच्या विरोधात शिवाजी नगर पोलिसात (Shivaji Nagar Police Station) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
पुणे महानगरपालिका शाळेतील विद्यार्थिनींना मागच्या एक वर्षा सॅनिटरी नॅपकिन मिळत नाहीत म्हणून आम आदमी पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत सॅनिटरी नॅपकिनच्या वाटपाची मागणी केली. मात्र हे आंदोलन करताना पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यानी कुठलीही परवानगी घेतली नाही. असा आक्षेप महापालिकेचे सुरक्षा अधिकारी राकेश विटकर (PMC Security officer Rakesh Vitkar) यांनी घेतला आहे. (Pune PMC News)
याबाबत विटकर यांनी सांगितले कि, सर्वांनाच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र आप पक्षाने अशी कुठलीही परवानगी घेतली नव्हती. पुणे शहरात 144 कलम लागू आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ठराविक अंतरावर आंदोलन करण्यास मनाई आहे. तसेच पार्टीच्या कार्यकर्त्यांनी  महापालिका आयुक्त यांच्या गाडीवर सॅनिटरी नॅपकिन चिटकवले. हे सरकारी मालमत्तेचे  विद्रुपीकरण आहे. तसेच महापालिकेच्या आवारात  घोषणा, आंदोलन, सभा घेण्यास परवानगी नाही. असे असतानाही पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आणि आंदोलन करताना महापालिका आयुक्त यांच्या विरोधात अर्वाच्च भाषा वापरली. त्यामुळे आगामी काळात असे प्रकार घडू नयेत म्हणून आम्ही आप पार्टीच्या 15-20 कार्यकर्त्या विरोधात शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. असे विटकर यांनी सांगितले.

PMC Pune Building | पुणे महापालिका भवन मध्ये ‘तळीराम’ रिचवताहेत ‘कित्येक प्याले’! 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Building | पुणे महापालिका भवन मध्ये ‘तळीराम’ रिचवताहेत ‘कित्येक प्याले’!

| पुणे महापालिका भवन मध्ये आढळला दारूच्या बाटल्यांचा खच!

PMC Pune Building | पुणे : पुणे महापालिकेचा (Pune Municipal Corporation) नावलौकिक देशभर आहे. राज्यातील इतर महापालिका पुणे मनपाचा आदर्श घेत पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र पुणे महापालिकेचा दिव्याखाली अंधार असल्याचा दिसून आले आहे. कारण पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्येच (PMC Main Building) दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. मनपा भवनात तळीरामांना कुणीतरी आश्रय देत असल्याचं आढळलं आहे. यावर आता पालिका प्रशासन काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. (PMC Pune)
महापालिका मुख्य तथा जुन्या इमारतीतील पार्किंग मध्ये  आणि पूर्वी जिथे महापौरांची गाडी लावली जायची, त्याच्या शेजारीच या दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. तसेच पालिकेचे वाहन चालक जिथे आपल्या गाड्या पार्क  करतात, तिथे त्यांची खोली आहे. त्या ठिकाणी देखील बाटल्यांचा खच आढळून आल्या आहेत. महापालिकेने आपल्या सर्व इमारती खासकरून मुख्य भवन मध्ये आपले सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.  24 तास हे रक्षक भवन मध्ये असतात. असे असतानाही महापालिकेत तळीरामांनी तळ ठोकलेला दिसून येतोय. भवन मधेच बाटल्यांचा खच आढळून आला आहे. याबाबत आता महापालिका कुणाला दोषी धरणार? कुणावर कारवाई करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महापालिकेच्या इमारतीमध्ये अशा पद्धतीने दारूच्या बाटल्यांचा खच आढळून येणे, हे गंभीर आहे. आम्ही याची गंभीर दखल घेतली असून याची पाहणी देखील केली आहे. दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात येईल.
राकेश विटकर, मुख्य सुरक्षा अधिकारी