Pune NCP Vs BJP : स्वार्थासाठी भाजपचा महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा! : पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक  

Categories
Breaking News PMC Political पुणे

स्वार्थासाठी भाजपचा महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा!

: पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक

 

पुणे : पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आरोप केला आहे कि  महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने पुणेकरांच्या उन्नतीकडे दुर्लक्ष करून केवळ भारतीय जनता पक्षाच्या जाहिरातीकडे लक्ष केंद्रित केले आहे. म्हणूनच एरवी विकासकामांसाठी महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना निरुपयोगी कॉफी टेबल बुकसाठी मात्र महानगरपालिकेची तिजोरी ओसंडून वाहत आहे. जम्बो कोविड हॉस्पिटल व इतर सुविधांची पुणेकरांना नितांत आवश्यकता असताना पैसेच नाही असं रडगाणं सत्ताधारी भाजपने मांडलं. कोरोनाच्या भयावह संकटात पुणे शहरातील तब्बल ९११४ नागरिकांनी आपले प्राण गमावले. ​मात्र कोरोनाच्या काळात केलेल्या कामांची जाहिरात करण्यासाठी सत्ताधारी भाजपने सामान्य पुणेकरांच्या हक्काच्या निधीस हात घातला आहे. या माध्यमातून आपल्या काही हितचिंतकांचा आर्थिक फायदा व्हावा हाच भाजपचा डाव आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्वार्थासाठी पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर सत्ताधार्यांनी दरोडा टाकला असून याचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात आज तीव्र आंदोलन करण्यात आले.

जगताप पुढे म्हणाले, “पुणे महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांच्यासह महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माहितीसह पुणे शहराचा शेकडो वर्षांचा गौरवशाली इतिहास व पुणे शहराने केलेली प्रगती जगासमोर मांडली होती. भारतीय जनता पक्षाच्या काळात तयार झालेल्या कॉफी टेबल बुकमध्ये मात्र कोरोनाच्या काळात पुणेकरांचे झालेले हाल जगासमोर मांडले जाणार आहेत. पुणे शहराच्या इतिहासातील एक काळा अध्याय कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून जगाला सांगण्याचा हा प्रकार निषेधार्ह असून या गोष्टीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विरोध आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने डॉ. आशिष भारती ( आरोग्य प्रमुख )यांना निवेदन दिले आहे, तसेच या निविदेची चौकशी करण्यासाठी नगरविकास विभाग, गृह विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सीआयडी यांच्याकडे तक्रार नोंदवण्यात येणार आहे.” अशी भूमिका यावेळी श्री. प्रशांत जगताप यांनी मांडली. “गली गली में शोर है, भाजपा चोर है”, “भ्रष्टाचारी भाजपचा धिक्कार असो” अशा घोषणांनी पुणे महानगरपालिकेचा परिसर दणाणून सोडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष  रविंद्रआण्णा माळवदकर, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक  महेंद्र पठारे, नगरसेविका रेखा टिंगरे,स्मिता कोंढरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेलचे शहराध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pune NCP : Sharad Pawar : पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस भावूक  : पवार साहेबांच्या आरोग्यासाठी दगडूशेठला आरती : Video पहा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस भावूक

: पवार साहेबांच्या आरोग्यासाठी दगडूशेठला आरती

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर चोहोबाजूंनी सदिच्छांचा वर्षाव सुरू झाला. अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी प्रार्थना म्हणून पुण्याचे दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आरती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिरात आरती करून शरदचंद्रजी पवार यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

 

Pune NCP : Employment Fair : पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन 

Categories
Education Political पुणे

पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे : शहर व परिसरातील तरुण तरुणींना रोजगार मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष  प्रशांत सुदामराव जगताप यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचा शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी मुलाखतीसाठी आलेल्या सर्व युवक युवतींना शुभेच्छा दिल्या. युवा पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हातभार लागावा ही अत्यंत समाधानाची बाब असून अशाच विविध उपक्रमांतून हा प्रयत्न यापुढेही सुरू असेल हा विश्वास यावेळी श्री. प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला. या रोजगार मेळाव्यास शहरातील युवा वर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. या अंतर्गत तब्बल २०४ युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या रोजगार मेळाव्याच्या शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुख, शहर उपाध्यक्ष मिलिंद वालवडकर,  संदीप बालवडकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष  किशोर कांबळे, समन्वयक महेश हांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Pune NCP : Election : राष्ट्रवादी काँग्रेस ची मनपा निवडणुकीची जोरदार तयारी!  : समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा

Categories
Breaking News PMC Political पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस ची मनपा निवडणुकीची जोरदार तयारी!

: समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (Pune Corporation Election) पार्श्वभूमीवर पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (Pune NCP) शहरातील विधानसभा निहाय समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची आज (मंगळवार) घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (Pune NCP ) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी या पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केली आहे. ही समिती 5 जानेवारी 2022 ते 5 जून 2022 या कालावधीसाठी असणार आहे.

समन्वय समिती

1. प्रदीप देशमुख (Pradeep Deshmukh) : हडपसर विधानसभा (hadapsar vidhan sabha constituency), महिला, माहिती अधिकार, शासकीय समिती,लिगल सेल, सोशल मिडिया, आंदोलन, आजी व माजी नगरसेवक

2. महेश हांडे (Mahesh Hande) : वडगावशेरी विधानसभा (vadgaon sheri vidhan sabha constituency), कोथरुड विधानसभा (Kothrud vidhan sabha constituency), युवती, डॉक्टर, सहकार, क्रीडा,उदयोग – व्यापार, दिव्यांग,जेष्ठ नागरिक

3. संदीप बालवडकर (Sandeep Balwadkar) : पुणे कँन्टॉमेंट विधानसभा (pune cantonment vidhan sabha constituency), पर्वती विधानसभा (parvati vidhan sabha constituency), सामाजिक न्याय, ओ. बी. सी., प्रचार-प्रसिध्दी

4. दिपक कामठे (Deepak Kamath) : शिवाजीनगर विधानसभा (Shivaji Nagar Vidhan sabha constituency), विद्यार्थी, पंचायत राज, कामगार सेल,वाहतुक, ग्राहक संरक्षण सेल

5. अब्दुल हाफीज (Abdul Hafeez) : कसबा विधानसभा (Kasba vidhan sabha constituency) , खडकवासला विधानसभा (Khadakwasla vidhan sabha constituency), युवक,अल्पसंख्यांक, व्यसनमुक्ती,सेवादल,एल.बी.जी.टी.,अर्बन सेल

6. बुथ कमिटी (Booth Committee) : राजलक्ष्मी भोसले (Rajalakshmi Bhosale)

बुथ कमिटी सहायक : दीपक जगताप (Deepak Jagtap), सचिन पासलकर (Sachin Pasalkar)

विधानसभा निरीक्षक

1. वडगावशेरी विधानसभा : कमल ढोले पाटील (Kamal Dhole Patil)

2. कॅन्टोन्मेंट विधानसभा : रविंद्रअण्णा माळवदकर (Ravindra Anna Malwadkar)

3. कोथरुड विधानसभा : ॲड. अंकुशअण्णा काकडे (Adv. Ankush Anna Kakade)

4. पर्वती विधानसभा : राजलक्ष्मी भोसले

5. खडकवासला विधानसभा : दिपक मानकर (Deepak Mankar)

6. कसबा विधानसभा : अप्पा रेणुसे (Appa Renuse)

7. शिवाजीनगर विधानसभा : ॲड. भगवानराव साळुंखे (Adv. Bhagwanrao Salunkhe)

8. हडपसर विधानसभा : ॲड. औदुंबर खुणे पाटील (Adv. Audumbar Khune Patil)

NCP : Prashant Jagtap : Agitation : अमित शहा चाले जाव, च्या  घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आंदोलन : महापुरुषांचा जाणूनबुजून अवमान करण्याचे भारतीय जनता पक्षाचे  धोरण : प्रशांत जगताप

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

अमित शहा चाले जाव, च्या  घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आंदोलन

: महापुरुषांचा जाणूनबुजून अवमान करण्याचे भारतीय जनता पक्षाचे  धोरण : प्रशांत जगताप

पुणे : अवघ्या देशाचे आराध्य दैवत, महाराष्ट्राची अस्मिता युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटक राज्यात विटंबना करण्यात आली. भाजप नेते अमित शहा यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी पुणे महानगरपालिकेत आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरवापर करण्यात आला. प्रत्यक्षात चौकाचौकात लावलेल्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावता अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक किरकोळ नेत्यांचे फोटो लावण्यात आले. जिथे संधी मिळेल तिथे महापुरुषांचा जाणूनबुजून अवमान करण्याचे भारतीय जनता पक्षाचे हे धोरण आहे, याविरोधात निषेध नोंदवण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज जंगली महाराज रस्त्यावरील झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याजवळ तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून वंदन करण्यात आले. अशी माहिती शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

 

कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली, याबद्दल प्रतिक्रिया देताना ही घटना “किरकोळ” आहे असे वक्तव्य भाजप नेते व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. अवघ्या महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय आहेत, छत्रपतींच्या अवमानाची घटना आज भारतीय जनता पक्षाला “किरकोळ” वाटत आहे. महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी याचे चोख प्रत्युत्तर मतपेटीच्या माध्यमातून निश्चितच देतील. येत्या काळात या शिवद्रोही भाजपचे महाराष्ट्रातील अस्तित्व ‘किरकोळ’ झाल्याशिवाय शिवप्रेमी शांत बसणार नाही. नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करणे, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक भाषा वापरणे यांसारखे अनेक प्रकार यापूर्वीही भाजपकडून करण्यात आले आहेत. यावरूनच भाजपचे शिवप्रेम किती खोटे आणि दिखाऊ आहे हे सिद्ध होते. आताही कर्नाटकातील घटनेबद्दल राज्यातील सर्व भाजप नेते मूग गिळून बसले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती शिवाजी महाराजांवर खरी श्रद्धा असती तर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध केला असता, परंतु त्यांनी तसे केले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानापेक्षा फडनवीसांना त्यांची पक्षनिष्ठा महत्वाची वाटली अशी भावना यावेळी प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

या आंदोलनप्रसंगी शहराध्यक्ष श्री.प्रशांत जगताप,महिला शहराध्यक्ष सौ.मृणालिनीताई वाणी,प्रदेश प्रतिनिधी श्री.प्रदीप देशमुख,सौ.रुपालीताई ठोंबरे पाटील,राकेश कामठे,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष समीर शेख,मनाली भिल्लारे,महेश हांडे आदींसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.