Baner-Balewadi Water Issue | बाणेर-बालवाडीच्या नागरिकांकडून पाणीपुरवठ्या बाबत पुणे महापालिकेचे कौतुक!

Categories
Breaking News PMC social पुणे

Baner-Balewadi Water Issue | बाणेर-बालवाडीच्या नागरिकांकडून पाणीपुरवठ्या बाबत पुणे महापालिकेचे कौतुक!

Baner-Balewadi Water Issue – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) हद्दीतील बाणेर, बालेवाडी आणि वारजे भागात पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर होती. मात्र महापालिकेने एल अँड टी (L And T) कंपनीच्या माध्यमातून समान पाणीपुरवठा योजने (24*7 equivalent Water Project) अंतर्गत केलेल्या कामामुळे आता नागरिकांना पुरेसे पाणी मिळू लागले आहे. शिवाय नागरिकांच्या तक्रारींवर देखील तात्काळ दखल घेऊन समस्या सोडवली जाते. त्यामुळे नागरिक महापालिका पाणीपुरवठा विभाग आणि कंपनीचे कौतुक करत आहेत. (PMC Water Supply Department)
बाणेर, बालेवाडी आणि वारजे परिसरातील पाणीप्रश्न हा उच्च न्यायालय पर्यंत जाऊन पोचला होता. नागरिकांना समान पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले होते. याबाबत राजकीय लोक देखील पाठपुरावा करत होते.
दरम्यान महापालिका पाणीपुरवठा विभागाने या परिसरात एल अँड टी च्या माध्यमातून समान पाणीपुरवठा योजना चांगल्या पद्धतीने अंमलात आणण्याचे ठरवले. त्यानुसार महापालिकेने आवश्यक त्या ठिकाणी पाईपलाईन टाकत नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले. तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी संबंधित कंपनीचे कमर्चारी उपलब्ध करून दिले. हे कर्मचारी नागरिकांच्या मागणीनुसार पुरवठा करत आहेत. त्यामुळे परिसरातील पाणीप्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागला आहे. याबाबत महापालिका प्रशासन आणि एल अँड टी कंपनीचे परिसरातील नागरिक आणि सोसायट्याकडून कौतुक होत आहे. त्यामुळे महापालिका देखील आता समाधानी आहे.
आमच्या तक्रारीची महापालिका प्रशासन आणि एल अँड टी कंपनी कडून तात्काळ दखल घेतली जाते. तसेच समान पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.  प्रशासनाने नागरिकांचा पाणीसमस्येचा गांभीर्याने विचार करून पाणीपुरवठा विभाग व L and T  कंपनीच्या माध्यमातून तक्रारीचे  करून पाणीपुरवठा सुरु करून दिल्याबद्दल पाणीपुरवठा विभाग, प्रशासनाचे व L&T कंपनीचे मनस्वी आभार.
कुणाल अस्पायर को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ली.

MNS Agitation | PMC Pune | पिण्याच्या पाण्याच्या लाईन मधून सांडपाणी मिश्रित पाणी | मनसेने केला आरोप आणि पुणे महापालिकेवर काढला मोर्चा 

Categories
Breaking News PMC Political पुणे

MNS Agitation | PMC Pune | पिण्याच्या पाण्याच्या लाईन मधून सांडपाणी मिश्रित पाणी | मनसेने केला आरोप आणि पुणे महापालिकेवर काढला मोर्चा

MNS Agitation | PMC Pune | पुणे शहरातील पाणी प्रश्नावर (Pune Water issue) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) वतीने पुणे महानगरपालिके (Pune Municipal Corporation) समोर जोरदार निदर्शने करण्यात आले. या आंदोलनात मोठया संख्येने महिला पाण्याचे हांडे घेऊन सहभागी झाल्या होत्या.  पुणे महानगर पालिका प्रशासनाच्या (Pune Civic Body) विरोधात घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (Additional Commissioner Ravindra Binwade) यांना निवेदन देण्यात आले. (MNS Agitation | PMC Pune)
याप्रसंगीं  पक्षाचे नेते राजेंद्र वागसकर, शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, सरचिटणीस किशोर शिंदे,  बाळ शेडगे,  रणजीत शिरोळे, हेमंत संभूस, महिला शहर अध्यक्षा वनिता वागसकर, आरती बाबर,  पुष्पां कनोजिया,  अस्मिता शिंदे,  विभाग अध्यक्ष अमोल शिरस,  विनायक कोतकर,  गणेश भोकरे,  सुनील कदम, सुधीर धावडे,  विक्रांत अमराळे, अजय कदम, विजय मते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनसेच्या निवेदनात म्हटले आहे कि पुणे महापालिकेने दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यानंतर दोन-दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळित होत असल्याने पुणे शहरातील सर्व भागातील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. हडपसर, कोंढवा, मुंढवा, वारजे, कोथरूड, शिवाजीनगर, वडगावशेरी, वाघोली, ओंध, बाणेर, पाषाण, कर्वेरोड, डेक्कन सर्व पेठा, पुणे कॅम्प या भागात पाणी पुरवठा होत नसल्याने पुणेकरांचे पाण्यावाचून प्रचंड हाल होत असल्याचे चित्र दैनंदिन झाले आहे. पुणे शहरातील सर्व भागातील पेठा उपनगरातील सर्व भागात अशीच परिस्थिती आहे. पुण्याचे  पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळित झाले असल्याने दोन तीन दिवसाने पाणी येणे तेही कमी दाबाने पाणी येणे. रात्री अपरात्री पाणी आल्याने महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या पेठेतून दुसऱ्या पेठेत डोक्यावर हांडे घेऊन महिला पाण्यासाठी वणवण फिरत आहेत, पाणी प्रश्नावर पुणे मनपा पाणीपुरवठा अधिकारी मात्र उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.
मनसेने पुढे म्हटले आहे कि, पुणे शहरातील टँकर ने सुरु असलेल्या पाणी पुरवठ्यामध्ये  कोणतीही पाणी टंचाईची तक्रार नसल्याने पुणे मनपा अधिकारी व टँकर माफिया यांच्या संगनमताने पुणेकरांवर पाणीकपात लादली असल्याचा संशय पुणेकरांना येत आहे. पुणे शहरात ४३ पाण्याच्या टाक्या बांधून तयार आहेत त्यासाठी पुणे शहरातील रस्ते खोदाई करून पाइप लाइन टाकण्यात आलेल्या आहेत. पुणे शहरात २४/ ७ पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली करोडो रुपयांचे बजेट वापरण्यात आले आहे. मेट्रो, स्मार्ट सिटी कामामुळे  रस्ते खडल्याने पिण्याच्या पाण्याच्या लाईन मधून सांडपाणी मिश्रित पाणी अनेक भागात येत आहे.
आगामी काळात पुणे शहराचा पाणी पुरवठा नियमित व योग्य दाबाने करण्यात यावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असा इशारा प्रशासनाला देण्यात आला.
News Title | MNS Agitation | PMC Pune | Mixed water from drinking water line | MNS accused and marched against Pune Municipal Corporation