MP Supriya Sule | दौंड, पुरंदर तालुक्यांतील रेल्वेशी संबंधीत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी | खा. सुप्रिया सुळे यांची विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसोबत बैठकीत मागणी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

दौंड, पुरंदर तालुक्यांतील रेल्वेशी संबंधीत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी

| खा. सुप्रिया सुळे यांची विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसोबत बैठकीत मागणी

पुणे – बारामती लोकसभा मतदारसंघातील रेल्वे खात्याशी संबंधित विविध समस्यांबाबत मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांची भेट घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी आज चर्चा केली. दौंड रेल्वे स्थानकाचा रेल्वेच्या पुणे विभागीय कार्यक्षेत्रात समावेश करणे आणि अन्य मुद्द्यांचा यात समावेश आहे.

दौंड रेल्वेस्थानक हे सोलापूर पेक्षा पुणे शहराशी जवळचे स्थानक असून आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी येथील प्रवाशांना पुणे विभागीय कार्यालय सोयीचे आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक विचार व्हावा, अशी मागणी खासदार सुळे यांनी यावेळी केली. या मुख्य मुद्द्यासह बारामती लोकसभा मतदार संघातील पुरंदर तालुक्यातील रेल्वेशी संबंधीत समस्यांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

दौंड तालुक्यातील रेल्वे रुळांखालील कानगाव – पाटस रोड (एल.सी. नंबर १५),कडेठाण – वरवंड रोड (एल.सी. नंबर १४) आणि गिरिम वायरलेस फाटा ते नानवीज ट्रेनिंग सेंटर रस्ता (एल.सी. नंबर १७) येथील मोऱ्यांची कामे अत्यंत संथ गतीने सुरु आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाचे पाणी मोऱ्यांमध्ये साचून वाहतुकीला अडथळा ठरत आहे. याशिवाय काम सुरु असल्याने पर्यायी रस्त्याचे गेटही बंद आहेत. परिणामी वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. या मोऱ्यांचे काम तातडीने पूर्ण व्हावे, अशी मागणी सुळे यांनी यावेळी केली.

पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे जेजुरी एमआयडीसी जवळील मोरीचे काम तातडीने सुरु करण्याची गरज असून जेजुरी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील वस्त्यांसाठी सर्विस रोड करण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याबरोबरच पुरंदर तालुक्यातील अन्य ठिकाणी राहिलेली मोऱ्यांची कामेही तातडीने पूर्ण करावी. आंबळे येथील अंडरपासच्या संरक्षक भिंत, शाळेजवळील उड्डाण पूल कोथळे येथील मोरीचे काम अर्धवट अवस्थेतील काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली.

Water Project | मोरगाव  परिसर भागात पुरंधर उपसा सिंचन योजनेच्या 3.9 km पाईपलाईनचे काम विक्रमी 40 दिवसांत पुर्ण 

Categories
Breaking News social पुणे शेती

 मोरगाव  परिसर भागात पुरंधर उपसा सिंचन योजनेच्या 3.9 km पाईपलाईनचे काम विक्रमी 40 दिवसांत पुर्ण

मोरगाव व परिसर भागात पुरंधर उपसा सिंचन योजनेच्या 3.9 km पाईपलाईनचे काम विक्रमी अशा 40 दिवसांत पुर्ण करण्यात आले आहे. या योजनेमुळे परिसरातील लोकांना चांगलाच फायदा होणार आहे.

श्री क्षेत्र मोरगांव ता. बारामती जि.पुणे येथील जिरायत भाग शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  यांचे माध्यमातुन व  आदर पूनावाला सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांचे सहकार्यातुन पुरंधर उपसा सिंचन योजनेमध्ये जोगवडी ते खटकळ ओढा, ढोलेमळा, मोरगाव येथील शेतीला पाणी पुरवठा होणेकामी पाइपलाइन करणेसाठी ८ मार्च रोजी 1.32 कोटी C.S.R फंडातून निधी देणेत / उपलब्ध करून दिला होता. सदर पाईपलाईनचे काम पुर्ण करणेसाठी मोरगाव येथील तरुण शेतकरी / कार्यकर्ते  अनिल ढोले, चांगदेव ढोले,गणेश ढोले, अविनाश ढोले, हनुमंत ढोले, अंकुश ढोले ,विठ्ठल ढोले, त्रिंबक खोपडे, सखाराम तावरे, विजय ढोले,नारायण तावरे, विलास तावरे महादेव ढोले ,अभिजीत ढोले तसेच मोरगाव चे विद्यमान सरपंच श्री निलेश केदारी , माजी सरपंच पोपट तावरे व ग्रामपंचायत सदस्य यांनी विशेष कष्ट घेतले होते. सदर योजनेमुळे मोरगांव परिसरातील ढोलेमळा, पाटील बुवाचा मळा, चोपणवस्ती, तावरेवस्ती, हनुमाननगर सोनारशेत येथील शेतक-यांना फायदा होणार आहे.

सदर योजनेमुळे अंदाजे 450 ते 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच अंदाजे 150 से 200 शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचवणार आहे. सदर योजनेकामी शेतकरी, ग्रामपंचायत, सिंचन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच व इतर ठिकाणी पत्रव्यवहार व पाठपुरावा इतर बाबींसाठी  संदीप शंकरराव कदम ,उपायुक्त ,पुणे महानगरपालिका यांनी समन्वय साधून योजना पूर्ण करणेसाठी विशेष योगदान व सहकार्य केले आहे .सदर पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ सोमेश्वर स.सा.कारखाना चेअरमन पुरूषोत्तम जगताप व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष  संभाजी नाना होळकर यांच्या हस्ते झाले होते.

सदर काम दिनांक 18 जुन 2022 रोजी पुर्ण झाले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे नवनियुक्त पुणे शहराध्यक्ष अविनाश ढोले व सर्व ग्रामस्थ यांचे उपस्थित खटकळ ओढयात पाणी सोडण्यात आले.

सदर योजनेमुळे मोरगाव व परिसरातील वाडीवस्ती- वरील शेतकरी यांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच त्यांनी  अजितदादा पवार  यांचे नुकतेच मुंबई येथे जाऊन सत्कार केला व आभार व्यक्त केला आहे. तसेच सिंचन विभागातील मुख्य अभियंता गुणाले साहेब व इतर अधिकारी त्यांचेही आभार मानले आहेत.

Purandhar Upsa Irrigation Scheme : मोरगाव व परिसर भागात पुरंधर उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईन कामाला सुरूवात : पुणे महापालिका उपायुक्त संदीप कदम यांचे विशेष सहकार्य 

Categories
Breaking News social पुणे शेती

 मोरगाव व परिसर भागात पुरंधर उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईन कामाला सुरूवात

: पुणे महापालिका उपायुक्त संदीप कदम यांचे विशेष सहकार्य

पुणे : मोरगाव व परिसर भागात पुरंधर उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईन कामाला सुरूवात झाली आहे. श्री क्षेत्र मोरगांव  येथील जिरायत भाग शेतकऱ्यांसाठी अजितदादा पवार,उपमुख्य मंत्री  यांचे माध्यमातुन व  आदर पूनावाला सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांचे सहकार्यातुन पुरंधर उपसा सिंचन योजनेमध्ये जोगवडी ते खटकळ ओढा, ढोलेमळा, मोरगाव येथील शेतीला पाणी पुरवठा होणेकामी पाइपलाइन करणेसाठी  1.32 कोटी C.S.R फंडातून निधी देणेत / उपलब्ध करून दिला आहे.

पाईपलाईन च्या कामासाठी मोरगाव येथील तरुण शेतकरी / कार्यकर्ते  अनिल ढोले, चांगदेव ढोले, अविनाश ढोले, हनुमंत ढोले, अंकुश ढोले ,विठ्ठल ढोले, त्रिंबक खोपडे, सखाराम तावरे, नारायण तावरे, विलास तावरे महादेव ढोले,अभिजीत ढोले तसेच मोरगाव चे विद्यमान सरपंच निलेश केदारी , माजी सरपंच पोपट तावरे व ग्रामपंचायत सदस्य यांनी विशेष कष्ट घेतले आहेत. या योजनेमुळे मोरगांव परिसरातील ढोलेमळा, पाटील बुवाचा मळा, चोपणवस्ती, तावरेवस्ती, हनुमाननगर सोनारशेत येथील शेतक-यांना फायदा होणार आहे

या योजनेमुळे अंदाजे 450 ते 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच अंदाजे 150 से 200 शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचवणार आहे. सदर योजनेकामी शेतकरी, ग्रामपंचायत, सिंचन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच व इतर ठिकाणी पत्रव्यवहार व पाठपुरावा इतर बाबींसाठी  संदीप शंकरराव कदम , उपायुक्त, पुणे महानगरपालिका यांनी समन्वय साधून योजना पूर्ण करणेसाठी विशेष योगदान व सहकार्य केले आहे. तसेच  कदम हे मोरगांव भूमिपुत्र आहे व आम्हास त्यांचा अभिमान आहे असे मोरगांवचे सरपंच  निलेश केदारी व ग्रामस्थांनी सांगितले. सदर पाईपलाईनचे काम येत्या एक दोन दिवसांत चालू होणार असुन दिड ते दोन महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

सदर योजनेमुळे मोरगाव व परिसरातील वाडीवस्ती- वरील शेतकरी यांनी समाधान व्यक्त केले. तसेच त्यांनी  अजितदादा पवार साहेब  नुकतेच मुंबई येथे जाऊन सत्कार केला व आभार व्यक्त केला आहे. तसेच सिंचन विभागातील मुख्य अभियंता गुणाले साहेब व इतर अधिकारी त्यांचेही आभार मानले आहेत.