Retired Employees Notional Increment | 30 जूनला सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जुलै ची काल्पनिक वेतनवाढ | पुणे महापालिका मागवणार राज्य सरकारचे मार्गदर्शन

Categories
Breaking News Commerce PMC social पुणे महाराष्ट्र

Retired Employees Notional Increment | 30 जूनला सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जुलै ची काल्पनिक वेतनवाढ | पुणे महापालिका मागवणार राज्य सरकारचे मार्गदर्शन

Retired Employees Increment | ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या (Retired Employees) किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ ( Notional Increment) विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन (Pension) निश्चित करण्याबाबत राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. याचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. मात्र वित्त विभागाच्या परिपत्रकात (Finance Department GR) राज्यातील महापालिकांचा उल्लेख नाही. त्यामुळे हे परिपत्रक पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) लागू करण्यासाठी महापालिका राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून मार्गदर्शन घेणार आहे. असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. (Retired Employees Increment)

३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा आता होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत  विविध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून निवेदने  संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागास प्राप्त होत आहेत. तसेच त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण व उच्च न्यायालयात उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक १८८१ / २०२३ व इतर याचिकांमध्ये मध्ये दि.१६.०२.२०२३ रोजी दिलेला निर्णय विचारात घेऊन आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार सरकारच्या वित्त विभागाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे.
काय म्हटले आहे परिपत्रकात?

उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेले  आदेश विचारात घेऊन. जे राज्य शासकीय कर्मचारी दि. ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत व ज्यांनी मागील १२ महिन्यांची अर्हताकारी सेवा केलेली आहे अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दि.०१ जुलै रोजीची काल्पनिक (Notional) वेतनावाढ विचारात घेऊन, त्यांचे सेवानिवृत्तीवेतन सुधारीत करण्यासाठी संबंधित कार्यालयांकडे अर्ज करण्याबाबत सर्व संबंधित सेवानिवृत्तांना आवाहन करण्याबाबत, सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयातील विभागप्रमुखांना कळवावे. त्यानंतर याप्रमाणे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित कार्यालयांनी वर नमूद केलेल्या मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांच्या उपरोक्त आदेशात नमूद केल्यानुसार संबंधितांना सुधारीत सेवानिवृत्तीविषयक लाभ अनुज्ञेय करावेत. तसेच सदर लाभ सुधारीत करण्यात आल्यानंतर त्यांनी अर्ज दाखल केलेल्या दिनांकाच्या मागील ३ वर्षांची थकबाकी अथवा त्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक या पैकी जे कमी असेल तितकी थकबाकी देण्यात यावी. उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करीत असलेल्या कोणत्याही सेवानिवृत्ताचा अर्ज फेटाळण्यात येऊ नये. तसेच संबंधित कार्यालयांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे अशा प्रकरणांचा त्यांच्या स्तरावरच तपासणी करुन निपटारा करावा. उपरोक्त प्रमाणे कार्यवाही केल्यानंतर उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी त्यांच्या
दिनांक १६.०२.२०२३ रोजी च्या आदेशातील परिच्छेद क्रमांक ९ मध्ये नमूद केले आहे की, This notional inclusion of the annual increment would be considered for re-calculating their pension, gratuity, earned leave, commutation of pension benefits etc. तरी त्याप्रमाणे अर्जदारास लाभ अनुज्ञेय करण्यात यावे.
उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांच्या उपरोक्त निर्णयाचे तंतोतंत पालन करण्यात यावे.

महापालिकांचा उल्लेख नाही

दरम्यान हे परिपत्रक वित्त विभागाने सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जारी केले आहे. राज्यातील महापालिकांचा यात उल्लेख नाही. याबाबत प्रशासनाला विचारणा केली असता सांगण्यात आले कि, पुणे महापालिकेत यावर अंमल करण्यासाठी नगर विकास विभागाच्या आदेशाची वाट पाहावी लागेल किंवा महापालिकेला नगर विकास कडून मार्गदर्शन मागवावे लागेल. त्यानुसार मार्गदर्शन मागवण्याची तयारी सुरु केली आहे. असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
News Title | Notional pay hike on July 1 for employees retiring on June 30 |  Pune Municipal Corporation will seek guidance from the state government

Salary System | महापालिका सेवकांच्या वेतन प्रणालीत होणार सुधारणा! | पे रोल, शिक्षण विभाग व सेवानिवृत्त सेवकांना एकत्रितपणे जोडणार

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका सेवकांच्या वेतन प्रणालीत होणार सुधारणा!

| पे रोल, शिक्षण विभाग व सेवानिवृत्त सेवकांना एकत्रितपणे जोडणार

पुणे | महापालिका सेवक वेतन व सेवानिवृत्त सेवक वेतन प्रणालीमध्ये (Pay Roll and Pension Software) सुधारणा करून त्याचे अद्यावतीकरण केले जाणार आहे.    पे रोल वरील सेवक, सेवानिवृत्त सेवक आणि शिक्षण विभागाकडील सेवक अशा सर्वांना एकत्रितपणे जोडले जाणार आहे.  याचा चांगला फायदा सेवानिवृत्त सेवकांना (Retired Employee) होणार आहे. त्यांची प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत आणि त्यांना लवकरात लवकर पेन्शन मिळण्यास सुरुवात होणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली आहे. लवकरच याबाबतची टेंडर प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. आगामी 3 महिन्यात याचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

महापालिका सेवकांच्या वेतनासाठी महापालिकेकडून सेवक वेतन व सेवानिवृत्त सेवक वेतन प्रणाली (pay Roll and pension software) वापरली जाते. मात्र यात बऱ्याच तांत्रिक अडचणी निर्माण होताना दिसताहेत. कारण ही प्रणाली आता जुनी झाली आहे. त्याचे आधुनिकीकरण आवश्यक असते. जेणेकरून प्रणालीत सुटसुटीतपणा येईल आणि वेतन करण्यात गतिमानता येईल. त्यानुसार महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्याबाबत आगामी अंदाजपत्रकात तरतूद केली आहे. यासाठी 80-90 लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

त्यानुसार पुणे महानगरपालिकेतील सेवकांच्या माहितीचे संगणक प्रणालीद्वारे व्यवस्थापन करणे, सेवकांचे वेतन बिले अदा करण्याची संगणक प्रणाली तयार करणे व सेवक निवृत्त झाल्यावर सेवानिवृत्त वेतन अदा करण्याची संगणक प्रणाली एकमेकांना जोडून अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारीत तयार करणे. अशी कामे या माध्यमातून केली जाणार आहेत. पे रोल वरील सेवक, सेवानिवृत्त सेवक आणि शिक्षण विभागाकडील सेवक अशा सर्वांना एकत्रितपणे जोडले जाणार आहे. सर्वाधिक फायदा सेवानिवृत्त सेवकांना होणार आहे. कारण आता या सेवानिवृत्त सेवकांची खूप प्रकरणे प्रलंबित राहतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. मात्र या प्रणालीमुळे सेवानिवृत्त सेवकांच्या पेन्शनचा मार्ग सुकर होणार आहे. तसेच पे रोल वरील सेवकांना देखील याचा चांगला फायदा होणार आहे. कारण यातून बिल क्लार्कला कामात गतिमानता आणता येणार आहे.
—-
महापालिका सेवक वेतन व सेवानिवृत्त सेवक वेतन प्रणालीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. कारण ही प्रणाली जुनी झाली आहे. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पात याबाबत तरतूद केली आहे. पे रोल वरील सेवक आणि सेवानिवृत्त सेवक अशा दोघांना याचा फायदा होणार आहे. यामुळे वेतन बाबतच्या कामात गतिमानता येणार आहे. याबाबतची टेंडर प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल.

राहूल जगताप, विभाग प्रमुख, माहिती व तंत्रज्ञान विभाग.