Sports Competition | महापालिका कर्मचाऱ्यांनी खेळत राहणे आवश्यक | महापालिका आयुक्त विक्रम कुमार

Categories
Breaking News PMC Sport पुणे

महापालिका कर्मचाऱ्यांनी खेळत राहणे आवश्यक | महापालिका आयुक्त

महापालिकेच्या कामगार कल्याण निधी क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन आयुक्तांच्या हस्ते संपन्न

पुणे महानगरपालिका कामगार कल्याण निधी तर्फे अधिकारी / सेवक यांचेसाठी विविध क्रीडा स्पर्धा १ ते ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. या क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ १ फेब्रुवारी रोजी पंडीत नेहरू स्टेडियम येथे विक्रम कुमार, प्रशासक व महापालिका आयुक्त यांचे शुभहस्ते व रविंद्र बिनवडे, कार्याध्यक्ष तथा अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज),  विकास ढाकणे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि), शांताराम जाधव, अर्जुन पुरस्कार
विजेते (कबड्डी), हेमंत किणीकर, जेष्ठ रणजी क्रिकेटपटू यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
उद्घाटन समारंभास शिवाजी दौंडकर, सह महापालिका आयुक्त (मुख्य कामगार अधिकारी),  उल्का कळसकर, सह महापालिका आयुक्त (मुख्य लेखा व वित्त
अधिकारी ),    कुणाल मंडवाले उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी  प्रदीप महाडीक, अध्यक्ष, पी. एम. सी. एम्प्लॉयईज युनियन,  प्रकाश हुरकडली, सल्लागार, पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यता प्राप्त) इ. मान्यवर उपस्थित होते.
महापालिका आयुक्त यांनी सर्व सहभागी कर्मचाऱ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच काम करताना प्रत्येक कर्मचाऱ्यास ताणतणावास सामोरे जावे लागते त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने खेळत रहाणे आवश्यक आहे असा संदेश दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन   नितीन केंजळे, कामगार अधिकारी यांनी केले.

Amol Balwadkar : उपोषण करणाऱ्या खेळाडूंची नगरसेवक अमोल बालवडकर यांनी घेतली भेट

Categories
Sport पुणे महाराष्ट्र

उपोषण करणाऱ्या खेळाडूंची नगरसेवक अमोल बालवडकर यांनी घेतली भेट

पुणे : राज्य शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार श्री शिव छत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना राज्यशासन अजूनही नोकरीचे आश्वासन देऊन ते पाळत नसल्यामुळे बालेवाडी म्हाळुंगे येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ सर्व पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी कालपासून आमरण उपोषण चालू केले आहे. सदर ठिकाणी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी भेट दिली.

: खेळाडूंच्या मागण्या मान्य करा

यावेळी बालवडकर म्हणाले, राज्याचे  मुख्यमंत्री व क्रीडा मंत्री यांना वेळोवेळी निवेदन देऊनही सदर बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आता तरी राज्य शासनाने या विषयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे आणि लवकरात लवकर या खेळाडूंच्या मागण्या मान्य कराव्यात अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

या  प्रसंगी पुरस्कारप्राप्त खेळाडू विकास बबन  काळे (कबड्डी), लौकिक जगन्नाथ फुलकर (आट्यापाट्या), सागर गणेशराव गुल्लानी (आट्यापाट्या), स्नेहा ढेपे (तलवारबाजी), भाजपा नेते काळुराम गायकवाड,  सुनील पहाडे, ॲड. माणिक रायकर,  शकील सय्यद आदी उपस्थित होते.