DA Hike Circular | पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! | कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून ४ टक्के महागाई भत्ता लागू | DA बाबतचे सर्क्युलर जारी

Categories
Breaking News Commerce PMC पुणे
Spread the love

DA Hike Circular  : पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! |  कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून ४ टक्के महागाई भत्ता लागू | DA बाबतचे सर्क्युलर जारी

Dearness Allowance to PMC Pune Employees : पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी  गुडन्यूज आहे. महागाई भत्त्यातील ४ टक्के वाढ १ जुलैपासून लागू करण्यात आली आहे. याबाबतचे सर्क्युलर महापालिकेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी उल्का कळसकर यांनी जारी केले आहे. चार महिन्याचा फरक नोव्हेंबर पेड इन डिसेंबर च्या वेतनातून दिला जाणार आहे. तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 5 महिन्याचा फरक डिसेंबर पेड इन जानेवारी च्या निवृत्ती वेतनातून दिला जाणार आहे. (DA Hike Circular)

केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता दिल्यांनतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेत महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली आहे. १ जुलै २०२३ पासूनही वाढ लागू करण्यात आली आहे. यामुळे  कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची वातावरण आहे. (7th pay Commission)

दरम्यान पुणे महापालिकेने देखील  आपल्या कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता देण्याबाबत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार १ जुलै २०२३ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२ वरुन ४६ टक्के करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ १ जुलै २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या चार महिन्याच्या कालावधीतील थकबाकीसह नोव्हेंबर पेड इन डिसेंबर च्या वेतनातून द्यावा   असा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित दराचा जुलै ते नोव्हेंबर असा 5 महिन्याचा फरक डिसेम्बर पेड इन जानेवारी च्या पेन्शन मधून दिला जाणार आहे. (Dearness allowance News)

महागाई भत्त्याची रक्कम फरकासह अदा करताना नोव्हेंबर पेड इन डिसेम्बर च्या पगारबीलातून 24 महागाई भत्ता, या अंदाजपत्रकीय तरतुदींवर खर्च टाकण्यात यावा. तसेच दर महाच्या महागाई भत्त्याचा खर्च खात्याच्या वेतन विषयक तरतुदींमधून करण्यात यावा. यासाठी सर्व खातेप्रमुख आणि सहायक आयुक्त यांनी आपल्या नियंत्रणाखालील सेवकांना सूचित करण्या बाबत सांगण्यात आले आहे.