My Bharat | National Youth Day | राष्ट्रीय युवा दिन सप्ताहात पुणे महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थाचे एकूण  ३८ उपक्रमांचे आयोजन

Categories
Breaking News cultural PMC social पुणे
Spread the love

My Bharat | National Youth Day | राष्ट्रीय युवा दिन सप्ताहात पुणे महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थाचे एकूण  ३८ उपक्रमांचे आयोजन

 

My Bharat | National Youth Day | राष्ट्रीय युवा दिन १२ जानेवारी ते १९ जानेवारी २०२४ या सप्ताहात (Rashtriya Yuva Din Saptah)  पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) आणि विविध स्वयंसेवी संस्थाचे एकूण विविध ठिकाणी ३८ उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (My Bharat | National Youth Day)

भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मेरा युवा भारत (MY Bharat) ही भारतातील युवा विकासासाठी मेरा युवा भारत (MY Bharat) हे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोपाच्या कार्यक्रमात राष्ट्रीय एकता दिनाच्या औचित्यावर कर्तव्य पथ, नवी दिल्ली येथे डिजिटल प्लॅटफॉर्म “MY Bharat” https://www.mybharat.gov.in/ मा. पंतप्रधान यांनी लॉन्च केले आहे.

तदअनुषंगाने पुणे महानगरपालिकेमार्फत ०९ जानेवारी पासून वास्तविक जीवनात पूर्णपणे ऐच्छिक आधारावर काम करून, तरुण लोकांशी कसे जोडले जावे, तसेच स्थानिक लोकसमुदायामध्ये युवकांचे योगदान कसे असावे हे समजण्यासाठी व्यावहारिक शिक्षण, समुदाय प्रतिबद्धता, वैविध्यपूर्ण कनेक्शन, सहयोगी प्रकल्प, युवा-केंद्रित शासन या विविध घटकांवर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

डिजिटल प्लॅटफॉर्म चा प्रमुख उद्देश तरुणांच्या आवडीशी जुळणाऱ्या कामासाठी स्वयंसेवा कार्यक्रम करणे आणि प्रोफाईल पेजेस, इव्हेंटमध्ये सहभाग आणि अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रम वापरून मार्गदर्शक आणि समविचारी समवयस्कांशी जोडणे, तसेच समाजाचा एक भाग असण्याची भावना वाढवण्यासाठी आणि सामाजिक कारणांमध्ये व्यस्त राहण्यासाठी तसेच विविध क्षेत्रातील कार्यक्रममध्ये सहभागी होण्यासाठी आणि आयोजित करण्यासाठी, विकासात्मक कार्ये आणि नेतृत्व कौशल्य विकसित करणे ज्यामुळे तरुणांना समाजाशी जोडून घेता येईल हा आहे.

त्याअनुषंगाने उपरोक्त कार्यक्रमाची सुरवात ०९ जानेवारी २०२४ पासून पुणे महानगरपालिका आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन या सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “युवक कल्याणाशी संबंधित शासकीय योजनांबाबत जनजागृती पर सत्र” आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये युवकांना पुणे मनपाच्या विविध विभागांशी कसे जोडता येईल व फिल्ड – अनुभव कसा घेता येईल याबाबत मार्गदर्शन केले.तसेच पुणे मनपाच्या व केंद्र सरकार मार्फत सुरु असणाऱ्या  विविध योजना बाबत माहिती देण्यात आली पोर्टलचा वापर कसा करावा याबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आली.

दि.१० जानेवारी २०२४ रोजी रोटरी क्लब – केएएम फाउंडेशन व पुणे मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी “प्रशिक्षण आणि कौशल्य” कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

११ जानेवारी २०२४ रोजी Wash Summit – पुणे मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने “पाणी, आरोग्यरक्षणार्थ घ्यावयची खबरदारी आणि स्वच्छता विषयक जनजागृती सत्र” कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यामध्ये वॉश क्षेत्रातील विविध तंत्रज्ञान, नव-नविन कल्पना आणि टिकाऊपणा याबाबतचे युवकांना महत्व पटवून देण्यात आले.

उपरोक्त ०९ ते ११ जानेवारी २०२४ या तीन दिवसात झालेल्या कार्यक्रमामध्ये एकूण ३५० युवकांचा सहभाग नोंदवीला आहे.

राष्ट्रीय युवा दिनापासून म्हणजेच १२ जानेवारी ते १९ जानेवारी २०२४ या सप्ताहात पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आणि विविध सामाजिक संस्था आर.के. स्मृती बहुउद्देशीय संस्था, सौदामिनी सामाजिक संस्था, जे.एस.आय. यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय येथे युवा वर्गाच्या सहभागाने आरोग्य विषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य मित्र, आभा कार्ड नोंदणी, सि.पी.आर. प्रशिक्षण, व्यसन मुक्ती जन जागृती तसेच AIDS, टी.बी. व कुष्ठरोग इ. आजारांबाबत शास्त्रशुद्ध माहिती होणेसाठी पथनाट्ये आयोजित करण्यात आली आहेत.

पुणे मनपा – नेहरू युवा केंद्र, पोलीस विभाग, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) तसेच वेगवेगळी महाविद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियान,पर्यावरण विषयक जनजागृती, सांस्कृतिक उपक्रम’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

याचबरोबर पुणे मनपा व  कमिन्स जनवाणी यांच्या संयुक्त विद्यमाने “करिअर मार्गदर्शन आणि जागरूकता” या आधारावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिका व सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने युवकांसाठी कौशल्य विकासासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे महानगरपालिका आणि Urban- 95 यांच्या संयुक्त विद्यामाने पुणे शहराला बालस्नेही करण्याच्या दिशेने मनपाच्या अर्बन95 उपक्रमांतर्गत विविध प्रकल्प व सेवासुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. या बद्दल युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विविध कार्यशाळांसह निबंध, कल्पना, रेखाचित्र, घोषवाक्य आणि सेल्फी स्पर्धांसह खेळण्यातून शिकवणे यासारखे उपक्रम आयोजित करण्यात आले आहे.

तसेच पुणे महानगरपालिका आणि स्वच्छ संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने १५ क्षेत्रीय कार्यालयामध्ये स्वच्छ कचरा वेचक आणि घनकचरा व्यवस्थापन यांच्या नेतृत्वाखाली ओला कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय युवा दिनापासून म्हणजेच दि.१२ जानेवारी ते दि.१९ जानेवारी २०२४ या सप्ताहात विविध ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे त्यामध्ये बहुसंख्येने इच्छुक युवकांनी सहभाग नोंदवण्यासाठी खालील संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करावे ही विनंती :

https://mybharat.gov.in/Gov/Urban-Local-Body/pune-municipal-corporation या लिकावरनोंदवावा असे आवाहन पुणे महानगरपालिके मार्फत करण्यात आले आहे.