PMC Encroachment Department | गॅस सिलिंडर वापरणारे पथारी धारक आणि वितरक दोघांवरही गुन्हे दाखल होणार

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

PMC Encroachment Department | गॅस सिलिंडर वापरणारे पथारी धारक आणि वितरक दोघांवरही गुन्हे दाखल होणार

| पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सुरु केली तयारी

PMC Encroachment Department | शहरातील पथारी व्यावसायिकांना (Hawker’s) महापालिकेने दिलेल्या परवान्यानुसार पथारीच्या ठिकाणी अन्न पदार्थ शिजविण्यास अथवा तयार करण्यास बंदी आहे. तरीही अनेक पथारी धारक गॅस सिलिंडर (Gas Cylindres) वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा व्यावसायिकांवर महापालिकेकडून (PMC Pune) कारवाई केली जाणार आहे. तसेच, व्यावसायिकाला सिलिंडर देणाऱ्या वितरकावरही गुन्हे दाखल केले जाणार आहेत. अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली आहे. (PMC Encroachment Department)

शहरात बंदी असतानाही तसेच महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) कार्यवाही सुरू असतानाही अनेक जण सिलिंडर वापरतच असल्याने प्रशासनाने या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधितांची बैठक बोलावली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. शहरात रस्ता-पदपथावर जे पथविक्रेते अनधिकृतपणे सिलिंडरचा वापर करत असताना आढळून आल्यास अशा पथविक्रेत्यांवर सिलिंडर जप्तीची कारवाई करून तसेच संबंधित व्यावसायिकांवर व वितरकांवर पोलिसांमार्फत गुन्हे दाखल करण्याची कारवाई चालू करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप (Deputy Commissioner Madhav Jagtap) यांनी सांगितले.

दरम्यान या कारवाईबाबत जगताप यांच्या नियंत्रणाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिक्रमण विभाग, पोलीस विभाग, अन्न पुरवठा विभाग व गॅस वितरक कंपनीतील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत हा निर्णय संयुक्तपणे घेण्यात आल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. पुणे महापालिकेकडून आतापर्यंत अतिक्रमण कारवाईमध्ये जे व्यावसायिक व्यवसाय करताना सिलिंडरचा वापर करतात, अशा व्यावसायिकांवर 1021 सिलिंडर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. (PMC Pune News)

——

News Title | PMC Encroachment Department | Both the holders and distributors of gas cylinders will be charged| The encroachment department of Pune Municipal Corporation has started preparations