PMC Pune | Mahavikas Aaghadi March | महाविकास आघाडी पुणे महापालिकेवर काढणार मोर्चा 

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

PMC Pune | Mahavikas Aaghadi March| महाविकास आघाडी पुणे महापालिकेवर काढणार मोर्चा

| ठेकेदार व प्रशासन यांच्या भ्रष्टाचाराविरूध्द १६ जूनला मोर्चा

 

PMC Pune | Mahavikas Aaghadi March| काँग्रेस भवन (Congress Bhavan pune) येथे महाविकास आघाडीची (Mahavikas aaghadi) बैठक पार पडली. यामध्ये पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) ठेकेदार (Contractor) व प्रशासन (Pune civic body) यांच्या भ्रष्टाचाराविरूध्द (Corruption) १६ जूनला मोर्चा (march) काढण्याचा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडीच्या वतीने ही माहिती देण्यात आली. (PMC Pune | Mahavikas Aaghadi March)

महाविकास आघाडीने दिलेल्या निवेदनानुसार काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीची बैठक पार पडली. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde), राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap), व शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन थरकुडे (Gajanan Tharkude) व संजय मोरे (Sanjay More) यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

 या  बैठकीत पुणे महानगरपालिकेमधील (Pune Municipal Corporation) भाजपाचा भ्रष्टाचार व शिंदे – फडणवीस राज्यात बसून पुणे महानगरपालिकेतील टेंडर राज व विशिष्ट ठेकेदार चालवित असलेली पुणे महानगरपालिका (PMC Pune) व प्रशासन या विरूध्द  १६ जून रोजी पुणे महानगरपालिकेवर मोर्चाचे आयोजन करण्याचे ठरले. (Mahavikas Aaghadi March)

     लाल महाल (Lal Mahal) येथे सुरू होणारा मोर्चा पुणे महानगरपालिका भवनवर (PMC Pune Building) काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडीचा हा मोर्चा पुणे महानगरपालिकेतील ठेकेदार व प्रशासन यांच्या भ्रष्टाचाराविरूध्द काढण्यात येणार आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

     यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सर्व आजी माजी आमदार, आजी माजी नगरसेवक, प्रदेश प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


News Title | PMC Pune | Mahavikas Aaghadi | Mahavikas Aghadi will hold a march on Pune Municipal CorporationJune 16 march against corruption of contractors and administration